कलर्स मराठीवर सुरू झालेली ही मालिका.. विषय तसा जुना , (आईना सारख्या) अनेक चित्रपटांमध्ये दाखवलेला..
पण यातली नायिका, शिवानी सोनार आणि नायक मणिराज पवार, दोघेही मस्त आहेत. स्पेशली तो मणिराज जाम सॉलिड दिसतो आणि कामही सहज , मस्त करतो
शुभांगी गोखले , गार्गी फुले, अजय पुरकर अशी तगडी स्टारकास्ट आहे मालिकेची...
तर या चर्वितचर्वण करायला न पिसं काढायला!
२१ ऑक्टोबर पासून चालू होतेय. रानादा टाटा करणार बहुतेक...
सोनी मराठीवर हल्ली नव्यानेच सुरू झालेली मालिका म्हणजे सारे तुझ्याचसाठी. गौतमी देशपांडे आणि हर्षद अटकरी प्रमुख भूमिकेत आहेत. नायक एक गायक तर नायिका एक बॉक्सर आहे. मृण्मयी देशपांडेची बहीण गौतमीची ही पहिलीच मालिका आहे. मालिकेचे शीर्षकगीत आर्या आंबेकरने गायलंय. तर चला मालिकेची चर्चा करूया
जाडूबाई जोरात ही विनोदी मालिका झी मराठी वर २४ जुलै पासून (सोमवार ते शुक्रवार, दुपारी १ वाजता) चालू होतेय.
किशोरी शहाणे आणि निर्मिती सावंत कलाकार आहेत.
आधीचा धागा दोन मालिकांचा सोबत आहे म्हणून हा वेगळा काढलाय जेणेकरून वेगवेगळं चर्वितचर्वण (चांगलं/वाईट दोन्ही इथेच) करता येईल.
चला सुरू व्हा...
टी आर पी
प्रतिष्ठित लेखकू |
वाहिन्यासी आधारू |
मालिकांचा प्रसवू |
कर्तव्य योगी ||
रटाळ कथांचा स्वामी |
कल्पना अतिपुरोगामी |
सुचती उचापत्या नामी |
उगा कारणे ॥
आशयाच्या भराऱ्या प्रचंड |
घडवितो नाना कांड |
अंतिमत: ते थोतांड |
सिद्ध होतसे ||
घेउनिया अतिसुंदर तरुणी |
छळवीतसे नानाकारणी |
भलत्याच गेंड्याच्या चरणी |
सोडतसे ||
अत्यंत दुर्गुण संपन्न |
हीनांहूनही हीन |
प्रवेशती एकामागोमाग |
खालनायके ||
कधी नवीनच कथानक आणी |
एक होता चिमणा; पण कावळी 'काणी' |
अन् जुन्याच बाटलीतली जुनीच वारुणी |
वाद जनांचा ||
कधी कथा असे आखूड |
संपते तयातील गूढ |
मला एवढ्यात युट्युबवर गंगाधर टिपरे मालिकेचे बरेचसे भाग सापडलेत. मालिका माहिती होतीच. पण आता काही भाग पुन्हा पाहिलेत अन एक नो नॉन्सेस करमणुक मिळाली.
ही मालिका दिलिप प्रभावळकर यांच्या 'अनुदिनी' पुस्तकावर आधारित आहे.
अगदी सर्वसामान्य चौकोनी कुटुंब + आबा.
राजन भिसे - शेखर
शुभांगी गोखले - श्यामल
रेश्मा नाईक - शलाका
विकास कदम - शिर्या (श्रिलेश)
आणि
दिलीप प्रभावळकर - आबा
मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणार्या मैत्रीसारख्या अत्यंत पवित्र मानल्या जाणार्या नातेसंबंधावर भाष्य करणारी `लगोरी’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9.00 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारीत होत आहे.
`एंडेमॉल इंडिया प्रा.लि.’या निर्मितीसंस्थेची निर्मिती असलेल्या `लगोरी’ची संकल्पना अतुल केतकर यांची आहे. दिग्दर्शक गौतम कोळी यांच्या दिग्दर्शनाखाली सादर होत असलेल्या या मालिकेचे लेखन सचिन दरेकर आणि अमृता मोरे यांनी केले आहे.
`लगोरी’ ही धनश्री नावाच्या मुलीची आणि तिच्या चार मैत्रीणींची कथा आहे.
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया.