तुझं माझं जमेना

Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07

महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....

Tuza-Maza-Jamena-New-Serial-Zee-Marathi-Serial.jpg

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कंटाळा आला. खूपच मंद आहे ही मालिका.
तू तू मैं मैं च्या आठवणी जागवत या मालिकेचे एक-दोन भाग पहायचे प्रयत्न केले...रिमा तिच्या भावी व्याह्यांच्या नसलेल्या मिश्यांबद्दल हसत सुटते तो आणि चायनीज जेवणाचा. रिमाताईं(अभिनेत्री आणि ते पात्र- दोन्ही) बद्दल वाईट वाटू लागले.
पात्रांची नावे ठेवण्यातसुद्धा कल्पनाशक्ती वाचवलेली दिसते.
काही घडले (नसले तरी)की प्रत्येक पात्राच्या रिअ‍ॅक्शनचा क्लोजप.
त्यातून या स्लॉटवर अग्ली बेटी पाहायची सवय होती. Sad
फ्रेंच ओपन आणि मग विंबल्डन आहे ते छान आहे.

ती सुकन्या नाहीतर घनाची आई नाही ते बरे झाले.>>>+१००

कालच्या भागात ...मुलगा आणि सुन म्हणत होते ना कि आम्ही हॉटेलमध्ये नाही जाणार तर त्यांना जायला लावले आणि मग ते गेल्यावर चेहेरा पाडून आपल्याला किती वाटले यावर चर्चा.

तूतिमी मधे तर आता त्या सत्यजीतचे पुन्हा सनम बेवफा नाटक सुरु झाले Uhoh तो आशिष त्या मंजिरीशी फोनवर बोलतोय तर हा लगेच मंजिरीला फोन लाऊन बघतोय......अरे त्यापेक्षा त्या आशिषलाच फोन लावायचा ना.....अन त्याचा नंबर नसेल तर त्याची call history बघायची...पण नाही...आता परत येरे माझ्या मागल्या!

तुझं माझं जमेना...मस्त हलकी फुलकी मालिका आहे.... मला तरि आवडलि. बाकिच्या भयाण मालिकान पेक्शा छान आहे.

मला कंटाळा आला. खूपच मंद आहे ही मालिका.
तू तू मैं मैं (किंवा साराभाई v/s साराभाई )च्या आठवणी जागवत या मालिकेचे एक-दोन भाग पहायचे प्रयत्न केले...)+१

त्या मनवाच्या चेहर्‍यावरची कृत्रिमता घालवायला एखादे क्रीम वगैरे असेल तर सुचवा बुवा!

रीमाचा नवरा आणि विद्याधर जोशीची बायको ह्यांना कथेत काही स्थान असेल असे वाटत नाही त्यांचे कास्टींग बघून.

चैत्राली, ही मालीका साराभाई किंवा तुतुमैमैशी कंपेअर नका करु. पुढचे पाऊल कींवा तु तिथे मी शी कर. मग आवडेल नक्कीच.

तो वैभव ती एक मुस्लिम मुलगी आणि हिंदु मुलाच्या प्रेमकथेवर आधारीत बंडल मालिका होती ना त्यात होता . नाव आठवत नाहिये आता.

तो वैभव ती एक मुस्लिम मुलगी आणि हिंदु मुलाच्या प्रेमकथेवर आधारीत बंडल मालिका होती ना त्यात होता . नाव आठवत नाहिये आता.>>> हो... अमरप्रेममध्ये.. http://www.youtube.com/watch?v=wZML4M2MYjY

तुमाज छान चाललीये. दिग्दर्शन, पटकथा, संवाद सगळं आवडतंय... वैभव-मनवाच्या स्विस-हनिमून गाण्याचे चित्रिकरण आणि ते गाणेच खुप आवडले. ( http://www.youtube.com/watch?v=ZqTNB-t1v0k ) मुख्य म्हणजे बर्फाच्या कुडकुडणार्‍या थंडीत नायिकेला साडी नेसवण्याची बॉलिवुड स्टाईल स्किप करुन त्यांना उबदार कपडे घालू दिल्याने खुप नॅचरल फील आला. (तरीही मनवाला सर्दी झालीच, हा भाग वेगळा Proud ) फक्त वैभवने उडी मारून पाय फोल्ड करण्याची स्टेप कितीवेळा केली, हे मोजावे, इतकी ती रिपीटिटीव्ह झाली.

एकता कपूर बजेट + मराठमोळे मन + मालिकेची दर्जेदार हाताळणी = महेश मांजरेकर... पहिल्यांदाच असा सुखद कॉम्बो मिळालाय. Happy

मी बघायला सुरवात केली. फार भंगार नाही वाटली अजून तरी.
मनवा- अगदी यथातथा. ती त्या वैभवपेक्षा मोठी वाटते.
वंदना गुप्तेंनी 'मातीच्या चुली' मध्ये धम्माल उडवली होती. चक्कं बरा चित्रपट होता तो. तुलनेत रीमालागू कमी पडतील असे कधी वाटले नव्हते, पण त्या कमी पडतायेत.

सानी, कशी आहेस लाँग टाइम नो सी.

मला पण ते गाणे आवडले. तरी अजून जास्त चांगला वाद्यवृंद वापरता आला अस्ता पण बजेट रेस्ट्रिक्क्षन असतील. पर फेक्ट हनिमून गाणे रोजा मधले. ये हसीं वादिया. त्याची आठवण आली.
श्री. जोशी आणि सुहासची खडूस व्यक्तिरेखा पण अगदी अगदी आहे. चोंबड्या प्रकरण पटत नाहिये.

मनवा आवडते मला. ते एक स्विस आय्लंड म्हणणारी जुन्यामताची बाई कोण आहे. तिचा फार राग येतो. असतात असले गड्डे आणि लोकांना सुखाने जगू देत नाहीत.

वन्दना गुप्तेचा ठसका ़ , तो शालजोडितला ह्युमर नाही जमते खरा , तरी पण या क्राउड मधे रिमा च बेस्ट परफॉर्म करते.
मन्वाचा बडा बाप 'भोसले' कमी आणि कोणी' चंगेडिया- तापडीया' जास्त वाटतो :).
सुहास जोशी नाही शोभते खाष्ट म्हणून !
इथला चोंबडा आणि तिथला ' माउली' ( एलदुगो)फार बोअर !

नाना पर्फेक्ट वाटला असता , त्यानेच खाल्ली असती मग सिरियल :).
मांजरेकरांचा लाडका सचिन खेडेकरही चाल्ला असता !

बायदवे, ती घरं एवढी झकपक का आहेत? बजेट आहे म्हणून काहीही..
मातीच्याचुली मधले घर असे अंगावर येणारे श्रीमंत नव्हते, त्यामुळेच वंदनाताईंच्या त्या सुतीसाड्या, चष्मा, डोक्याला बांधलेला पंचा वगैरे त्या हॉटेलातल्या बिलाचे आकडे ऐकल्यावरची रिअ‍ॅक्शन अशा अनेक गोष्टी सुसंगत होत्या.
आता अशा सुपरश्रीमंत घरात राहणार्‍या बाईची चिनी जेवणाच्या बिलाला रिअ‍ॅक्शन यॅडचॅप वाटते. असो..

संजय मोनेने मुलीच्या बापाचे आणि सुत्रधाराचे काम मस्त केले होते.

मला तरी सुहास जोशी OK वाटतीये.
तरी पण या क्राउड मधे रिमा च बेस्ट परफॉर्म करते>>>>>>> डीजे वासरात लंगडी गाय की काय सं..... Happy पण वंदना गुप्तेंनी ते कॅरॅक्टर एका वेगळ्या उंचीला नेउन ठेवलंय. सो रिमा ५०% च आवडतीये.
बाकी त्या राया ला काहीच काम नसल्यासारखं वाटतंय.

मातीच्या चुलीचा विषय निघालाच आहे तर,

मधुरा वेलणकर इज मेनी टाईम्स बेटर दॅन मनवा नाईक

वंदना गुप्ते जास्त ह्युमरस आहे ह्यात शंका नाही पण अभिनयात रीमा तिच्याशी अ‍ॅट पार आहे.

वंदना गुप्ते फार बेटर आहे. रीमा अजून ग्ग्गोड आईच्याच मोड मध्ये आहे असे वाटते. वंदी मस्त खडूस होती. मी सान्यांच्याकडे भेळ खाउन आले म्हणते. जिरे वेगळ्या ड्ब्यात आहेत असे सांगते तेव्हा लै बेस्ट.

मी अजुनतरी 'मातीच्या चुली' नाही बघितला.. बघावाच आता Happy
तुमाज थंड आहे खरी पण डोक्याला काही ताप देत नसल्याने वेळ असला तर बघते अधनमधन.
मराठी सिरीयल असुन पण कसली भारी घर / इंटेरीअर आहे ! मला तर आवडते आहे अजुनतरी..

वंदना गुप्ते फार बेटर आहे.

>>पण इथेही वंदनाताईंना घेतले असते तर "तुमाज" ही "माचु" ची कॉपी आहे यावर सरळसरळ शिक्कामोर्तब आहे असे झाले असते ना?

बाकी ह्या अश्या मालिका बघतांना घरातलंच काय ते पुन्हा सिरीयलमध्ये बघायचं असं वाटतं Happy

Pages