Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07
महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या कुलकर्णी कुटुंबाचं तर
त्या कुलकर्णी कुटुंबाचं तर अतीच दाखवलं आहे. दोन टोकंच थेट. आधी अती आज्ञाधारक सून, आता अती उद्धट. अधलंमधलं काही नाहीच.
परिस्थिती माणसाला काहीही
परिस्थिती माणसाला काहीही बनवते.
मग काय आणि इतका उद्धटपणा
मग काय आणि इतका उद्धटपणा मुळात अंगात असेल तरच शक्य आहे. उगाच असं ठरवून अचानक कोणी इतकं उद्धट नाहीच होऊ शकणार. तो नुपूर तर ठोकळा आहे नुस्ता. तो असून नसून काहीच फरक पडत नाही.
रच्याकने, भोसल्यांचं घर म्हणजे कोणत्यातरी क्लबहाऊस नाहीतर रिसॉर्टचंच शूटिंग वाटतं. आलिशान बंगला वगैरे तर अजिबातच वाटत नाही तो....
मग काय आणि इतका उद्धटपणा
मग काय आणि इतका उद्धटपणा मुळात अंगात असेल तरच शक्य आहे. उगाच असं ठरवून अचानक कोणी इतकं उद्धट नाहीच होऊ शकणार. >> करेक्ट. संवाद भयंकर गंडले आहेत. प्रवीण तरडेंनी निराशा केली. अर्थात जिथे चिमां बुद्धी गहाण ठेवतो तिथे.... असो!
>>त्या कुलकर्णी कुटुंबाचं तर
>>त्या कुलकर्णी कुटुंबाचं तर अतीच दाखवलं आहे. दोन टोकंच थेट. आधी अती आज्ञाधारक सून, आता अती उद्धट. अधलंमधलं काही नाहीच.>> +१
वैभव आणि मनवाचे भांडणही किती ओढूनताणून आणलय, दोघं तीन वर्ष स्टेडी जात होते तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता आणि आता एकाएकी मनवाच्या कलीगवरुन भांडण?
काल काय झाले? मी ८ ते ९.४५
काल काय झाले? मी ८ ते ९.४५ झोपून गेले. इतकी थकले होते. नैतर आता साबांनाच बोलावते घरचं बघायला.
मनवाचा नवा हेअर्कट आवडला का?
मनवाचा नवा हेअर्कट >> भीषण
मनवाचा नवा हेअर्कट >>
भीषण आहे आणि त्यात ती अजूनच भीषण दिसते. सध्या तसल्या हेअर्कटची फ्याशन दिसते. सध्या जाहिरातींमधे अनुष्का शर्माचा तसलाच हेअर्कट दिसतोय...
काही नाही विशेष झालं मामी..
काही नाही विशेष झालं मामी.. बरं झालं झोपलात. वेळ सत्कारणी लागला तुमचा.
मनवा वैभव आपापल्या आई बाबांना त्यांच्या भांडणाविषयी आणि वेगळं होण्याविषयीही सांगतात. त्या भांडणात मध्यस्थी करायला दोन्ही आई बाबा ह्या दोघांच्या अनुपस्थितीत एकत्र मिटिंग भरवतात आणि तेच भांडत बसतात. ते भांडण म्युट केलं त्यांनी. कारण ते भांडत नसतीलाच, हे चक्क समजतं चाणाक्ष प्रेक्षकांना. वैभवचे आई बाबा त्याला ह्या मिटिंगमध्ये आपला अपमान झाला आणि तू मनवापासून वेगळा होच असं सांगतात. असं बोलल्याने वैभव मनवाविषयी पॉझिटिव्ह होईल आणि त्यांचं आपसातलं भांडण मिटेल असा प्लॅन असेल ह्या आई बाबांचा. तिकडे मनवाचे आई वडिल तिला पण हेच सांगतील आजच्या भागात बघा.
मनवाचा हेअरकट बोरिंग.....
आजच्या भागात म्हणे ती दोन तास
आजच्या भागात म्हणे ती दोन तास उशीरा घरी येणारी सून सासूला 'वंशाचा दिवा, मुलगी अपत्य' यावरून जबरदस्त काहीतरी ऐकवणार आहे म्हणे. इति आमच्या मातोश्री.
हो, आजच्या भागाची झलक दाखवली
हो, आजच्या भागाची झलक दाखवली होती काल. कुलकर्णी काकू म्हणतात, मुलगाच हवा आणि मुलगी होणार असेल आणि तुला हवी असेल तर नुपूरला दुसरा विचार करायला हवा. सून म्हणते, असला विचार करणार असाल तर तुमची जमात नष्ट झालेलीच बरी..
है शाबास! तरड्यांना शाबासकी
है शाबास!
तरड्यांना शाबासकी द्यायलाच हवी.
तरड्या कोण?
तरड्या कोण?
तरडे. प्रवीण तरडे-
तरडे. प्रवीण तरडे- संवादलेखक.
शाबासकी!! काय डायलॉग होते- मी तुझी जीभ हासडीन, मी तुमचा गळा दाबीन, मुलगा झाला तर आनंद आहे, पण मुलगी झाली तर अत्यानंद होईल! अरे काय! मुलगा-मुलगी काही होवो, एकसारखंच वगैरे सेन्स कुठे गेलाय??
अमा, तुम्ही बघत जा हो सिरियल. तुमच्या कॉमेन्टी ब्येष्ट असतात!
असे होते संवाद???
असे होते संवाद???
डेलीसोपमधे अतिरंजीत प्रसंग, संवाद दाखवण्याचा मोह कधी आवरणार हे सगळेजण?
हो ना.. आणि सासूला गाढव
हो ना.. आणि सासूला गाढव म्हणणं म्हणजे गाढवाचा अपमान वगैरे???? कितीही पटत नसेल सासूशी तरी ह्या भाषेत बोलतं का कोणी?? काहीही दाखवतात.
संवाद फारच थंडपणे म्हटले
संवाद फारच थंडपणे म्हटले गेले. मज्जा नाही आली.
डेलीसोपमधे अतिरंजीत प्रसंग,
डेलीसोपमधे अतिरंजीत प्रसंग, संवाद दाखवण्याचा मोह कधी आवरणार हे सगळेजण?>>>> +१
टोटल फसलेली मालिका.
आता कंटाळा यायला लागला
आता कंटाळा यायला लागला आहे...मनवा चा हेअर कट पहिल्या दिवशी बरा वाटला दुस्रर्यादिवशी त्याची माती केली मधे भांग पाडुन.....आणि सविता मालपेकरांचं पात्र डोक्यात जातं..:(
प्रसंगः मन्वाची आई तिला
प्रसंगः मन्वाची आई तिला तुमच्या आजकालच्या पिढीलाच जास्त कळतं वगैरे ऐकवत असते.
आमचे ६ वर्षीय पाल्य : अय्या मम्मा म्हणजे ही साडी नेसलेली तिची मम्मा आहे होय?
मी: अरे मग काय तुला ती ड्रेसमधली मम्मा वाटली का?
मुलगा: हो
मी : अरे मम्मा साडी नेसते ना आणि मुली ड्रेस घालतात.
मुलगा : अगं पण तिचा चेहरा बघ ना.. साडिवाली किती यंग वाटते त्या ड्रेसवालीपेक्षा!!
आता काय बोलणार?
एकुणच सुरुवातीला बरी असेल ही
एकुणच सुरुवातीला बरी असेल ही सिरीयल असे वाटले होते पण बट्ट्याबोळ केलाय तिचा. कालचे व आधीचे दोन तिन एपिसोड तर अतिशय भि का र होते.
साडिवाली किती यंग वाटते त्या
साडिवाली किती यंग वाटते त्या ड्रेसवालीपेक्षा!!
>> मनवाची आई गोडच आहे. फक्त ते सायरस प्रकरण काय आहे माहीत नाही.
हा बाफ महेश मांजरेकरांनी वाचावा अशी माझी फार्फार इच्छा आहे (भाबडी)
चिमांनी तुतीमी चा बाफ वाचला तर ते लिहायचं सोडुन देतील.
कालचे डायलॉग एकदमच भीषण होते
कालचे डायलॉग एकदमच भीषण होते कुलकर्णी सासू सुनेचे ...
अनुमोदन अंजली, बंद केले मी.
अनुमोदन अंजली, बंद केले मी. असे बोलते का कोणे मध्यमवर्गिय सुसंस्कृत घरात?
मांजरेकर हॅज लॉस्ट् द प्लॉट कंप्लिटली. काय होणारे सायरस जाणे.
काय होणारे सायरस जाणे.>
काय होणारे सायरस जाणे.>
याना --नी मारायला पायजे
याना --नी मारायला पायजे
रिमा वैभव ला म्हणते 'ती
रिमा वैभव ला म्हणते 'ती जिवाचा खंडाळा करते तर तू जिवाचे पुणे नाही तर कोथरुड तरी कर'
कालचा भाग फारच विनोदी होता
कालचा भाग फारच विनोदी होता
रिमा वैभव ला म्हणते 'ती जिवाचा खंडाळा करते तर तू जिवाचे पुणे नाही तर कोथरुड तरी कर'
क्रिश मनवाला म्हणतो 'तू येणार नसशील तर मी क्लाएंटला पार्टी कॅन्सल करायला सांगतो'
ते परवाचे सासू सुनांचे डायलॉग
ते परवाचे सासू सुनांचे डायलॉग म्हणजे हाईट आहे!
काल तर तो 'क्रिश' मनवाला विचारत होता - आज संध्याकाळी तू कोणता ड्रेस घालणारेस?
क ह र
ऑन अ सिरीयस नोट : ज्यांनी आजतागायत कधी 'कॉर्पोरेट कल्चर, आयटी इंडस्ट्री' इ शब्द फक्त ऐकले आहेत त्यांच्या मनात असले प्रसंग गैरसमज निर्माण करायला मदत करतात असं नाही का वाटत? सिनेमा, टीव्ही माध्यमातून या क्षेत्राचं जे चित्र दाखवतात ते अगदी भयाण आणि टोकाचं आहे. म्हणूनच कुठेही येता जाता अगदी कुणीही ' हे हे सगळं 'कॉर्पोरेट कल्चर, आयटी इंडस्ट्री' मुळे!' म्हणायला सोकावतात.
हो आशू ते एक महाविनोदी वाक्य
हो आशू ते एक महाविनोदी वाक्य होते
अजुन एक गंमत म्हणजे तो क्रिश
अजुन एक गंमत म्हणजे तो क्रिश त्या टेबलवर बसून त्या दोघींना पार्टीबद्दल पहील्यांदा सांगतो आणि त्यानंतर जेंव्हा त्या पार्टीत घालयच्या ड्रेसबद्दल चर्चा होती तेन्व्हा ती दुसरी मुलगी म्हणते की मी त्या पार्टीसाठी स्पेशल ड्रेस शिवलाय वगैरे.... तिला काय स्वप्न पडल होत त्या पार्टीबद्दल.... आणि क्लायंटच्या पार्टीत घालाय्ल स्पेशल ड्रेस शिवला?... अॅड वर्ल्ड आहे का फॅशन इंडस्ट्री?
Pages