तुझं माझं जमेना

Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07

महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....

Tuza-Maza-Jamena-New-Serial-Zee-Marathi-Serial.jpg

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काये न दिपा, मी कोकणस्थ असल्याने मला तिचे घारे डोळे छान वाटले....>> मुग्धा, मी कोकणस्थ नसूनपण मला तिचे डोळे आवडले, बरंका! Happy पण सगळ्याच लोकांच्या चेहरेपट्टीला घारेडोळे नाही छान वाटत... आणि सगळ्यांचेच नाकातले बोलणे मला नाही आवडत. पण मला ती दिप्ती पहिल्या एन्ट्रीपासूनच खुप आवडली होती. अभिजीतला त्याच्या आईच्या अटींवरुन सही सुनवलं होतं तिने... मध्यंतरी तो भाईगिरी प्रकार करत होती, ते नाही आवडलं, पण किडनी फेल झाल्यानंतर जी काही अ‍ॅक्टिंग केलीये तिने, ती सॉलिडच.. अभिजीतला 'किस' मागते, तो सीन तर डोळ्यात पाणी आणणारा होता.. खरं सांगू का? हल्ली वैभव-मनवा स्टोरीपेक्षा हीच स्टोरी आणि फॅमिली पहायला मला बरं वाटतंय. Happy

सानी अनुमोदन. मलाही ती आवडली.. साधी सरळ वाटतेय.
काय तो वैभव Sad दारू पिऊन आला वाट्टेल ते बोलला वेळ वाया घालवला त्यात.
आणि दुसर्‍या दिवशी मनवा ओढून ताणून भांडते त्याच्याशी..
तिने ते फोनला घातलेलं टोपडं डोक्यात जातं... Angry

मला तर कोणाचेच घारे डोळे नाही आवडत...
घार्‍या डोळ्यांच्या माणसांबद्दल माझे मत खराब आहेत
(घाडो वाल्यांनी मला प्लिज मोठ्या मनाने (असेलच तर) माफ करा.... )

काल त्या लेखाबाईला चांगलेच सुनावले रुक्सानाच्या नवर्‍याने. रुक्साना अजुनही पडती बाजू घेतेय पण डॉक्टरांनी पण लेकाचीच बाजू उचलुन धरल्यावर बरं वाटलं.

वैभव मनवा आता डोक्यात जाताहेत. क्रिश सोडुन पण जगात विषय असतात नवरा बायकोची भांडणे व्हायला हे कुणीतरी सांगा राव यांना. लुटुपुटुची भांडणे परत मायक्रोसेकंदातला मिलाप आणि वरतुन एखाद्या कडव्यावर नाचल की सगळं पहिल्यासारख सुरळित परत हे भांडायला रिकामे Lol

रिमाताई आणि सासरेबुवा बाहेरगावी गेलेत का? काल वाडेश्वरला सकाळी सासरे दिसले मला मनवाचे.

(घाडो वाल्यांनी मला प्लिज मोठ्या मनाने (असेलच तर) माफ करा.... )>> This is too much!

माझे डोळे घारे नाहीयेत पण तरीही हे म्हणणं खटकलंच.

लेखाबाईशी तो माणूस लग्न करणारे का? Uhoh कशाला असली बाई?
आणि आधीच ती बाई येऊन यांच्या घरी नाच बिच करायचे नाहीत असं का सांगते? Uhoh
तो मुलगा मस्त बोलला पण तिला.. एकदम जबरी.

मंजू Happy
मी सहज लिहिलय ते
गमतीतच घ्या सगळ्यांनी
कोणाला दुखवण्याचा उद्देश नाही.
(किंवा अस म्हण की ते वाक्य लिहिताना जे जे लोकं डोळ्यासमोर आले त्यांच्यामुळे ते तस लिहिलं गेलं)
बाकीच्यांनी अजिबातच मनावर घेऊ नये Happy

लेखाबाईशी तो माणूस लग्न करणारे का? अ ओ, आता काय करायचं कशाला असली बाई?>>>>>>> दक्षिणा तुझ्या प्रश्नावर मी आधिच प्रतिक्रीया दिली आहे.. ही बघ
"त्या बापट काकांना म्हणाव नका करु त्या बाईशी लग्न.... पस्तावाल..... पेशंट सोडून फिरायला जाल आणि इथे तेवढ्यात कोणी गेल तर केवढ्याला पडेल तो एकटेपणा घालवणं?????" कारण एकदा ती लेखा डॉ बापटांना क्लिनिकच्या वेळात फिरायला चला म्हणते, ते नाही म्हणतात तर हि बया म्हणते कशी "एव्हढ काय होणार आहे? कोणी लगेच मरणार आहे का?" म्हणुन लिहिली होती ही प्रतिक्रिया
येडि आहे का खुळी तेच कळत नाही

चोम्बड्याची बायकोतर आल्या आल्या डोक्यात गेली. बसंती नी काय काय.>>> हो ना आणि ती कोमामधून उठलेली अजिबात वाटत नाही.

चोम्बड्याची बायकोतर आल्या आल्या डोक्यात गेली. बसंती नी काय काय.>>> हो ना आणि ती कोमामधून उठलेली अजिबात वाटत नाही.

चोम्बड्याची बायकोतर आल्या आल्या डोक्यात गेली. बसंती नी काय काय.>>> हो ना आणि ती कोमामधून उठलेली अजिबात वाटत नाही. >>+१

आणि रिपोर्ट द्यायला घरी येणारा डॉक्टर .. काहीही!!!

स्नेहल च्या नवऱ्याचं नाव 'नुपूर' ??!!?? अणि त्याच्या गळ्यात ते पेंडंट?? या उलट स्नेहल म्हंजे एकदम पैलवान…. त्या दोघांमध्ये नवरा कोण आणि बायको कोण असा प्रश्न पडतो कधीकधी… Uhoh

स्नेहल च्या नवऱ्याचं नाव 'नुपूर' ??!!?? अणि त्याच्या गळ्यात ते पेंडंट?? या उलट स्नेहल म्हंजे एकदम पैलवान…. त्या दोघांमध्ये नवरा कोण आणि बायको कोण असा प्रश्न पडतो कधीकधी…>> Happy मलाही हाच प्रश्न पडतो ! सिरिअल बघायची बंद केली आहे

कालचा भाग चांगला होता. पहिल्यांदाच लॉजिकल वगैरै वाटला. आणि रिमा लागूही फक्त रिमा लागूंसारख्या. वंदना गुप्तेंची आठवणही नाही आली. मस्त.

हो. लिमयांचं चिडणं स्वाभाविक होतं. जेव्हा मन दुखावलं जातं तेव्हा दुसरी बाजू काहीही असली तरी समजून घेणं अवघडच जातं. काल तर दुसरी बाजूही फुसकीच होती.

अत्यंत बिनबुडाची कथा सुरु आहे या मालिके मधे.. तू तिथे मी बद्दल तर न बोललेच बरं. या पार्श्वभूमीवर सध्या मग... "होणार सून मी या घरची" चांगली वाटतीये

काल तर दुसरी बाजूही फुसकीच होती.>> आणि त्या दोघांचं ऐकून घेतल्यावर रिमा म्हणाली की 'आम्ही जागे आहोत हे कळल्यावर तुम्ही घरी येऊ शकला असता, दहा मिनिटांचाच तर रस्ता होता.', हे तर अगदी फार्फारच लॉजिकल होतं.

Pages