तुझं माझं जमेना

Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07

महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....

Tuza-Maza-Jamena-New-Serial-Zee-Marathi-Serial.jpg

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लॆचची चावी नाही म्हणून आपलं घर सोडून दुसरीकडे रहायला जाणं किती मूर्खपणाच आहे - तेही वाढदिवशी. रात्री रिमा लिमयांशी बोलते तेही किती वास्तविक होतं. शेवटी नवरा बायकोच एकमेकांना असतात.

पण मला एक प्रश्न पडतो असा कुठला जावई उठसुठ आपल्या सासरी जातो?

झोपलेल्या आई-बाबांना त्रास नको म्हणून हे तिकडे गेले, समजा गेले असते घरी तर अस काय आभाळ कोसळलं असत? सासुच्या वाढदिवशी रात्री १२:०० उठवून विश केलच होत ना, तेव्हा कुठे गेली होती काळजी झोपमोडीची? आणि कोणत्याही कारणाने बाहेर गेल तरी लॅचची चावी आणि आपला मोबाईल आपल्या जवळच हवा. वर नवर्‍यालाच "तूच म्हणाला होतास मोबाईल नको म्हणून"

काल बापटांच्या सुनेने भावी सासुला स्वतःच्या हाताने घराबाहेर काढलं....... काय पण अटी? "आपल लग्न झाल्यावर ही दोघ इथे रहाणार नाहीत..... डॉ. बापटांनी क्लिनिकला आठवड्यातून फक्त ३ वेळाच जायच..... महिन्यातून एक आउटिंग कम्पल्सरी..." हल्लीच्या प्रथमवधु पण असल्या अटी घालत नाहीत

बापटांच्या सुनेने भावी सासुला स्वतःच्या हाताने घराबाहेर काढल्याने आमच्या साबा खूश...

काल बापटांच्या सुनेने भावी सासुला स्वतःच्या हाताने घराबाहेर काढलं....... >> काढलं का? अरेरे मी मिस केला हा सोहळा Proud

अग दक्षिणा पण आता मोठाच प्रॉब्लेम झाला आहे बापटांना. त्या बाईने त्यांच्याविरुध्द अतिप्रसंगाची तक्रार केलिय आणि रिमाताई तिच्याशी बोलायला गेल्या तर त्यांना सांगितल की डॉ बापटांच्या चुकिच्या निर्णयामुळे तिच्या बहिणीला वेड लागल आणि त्याचा बदला तिला घ्यायचा आहे म्हणून तिने तस केल, खोटी तक्रार वगैरे......

अगं तिला आईवडील नसतात.
सानेकाकूंकडे बरोब्बर जितकी माणसं येणार तितक्या खुर्च्या मांडलेल्या! आपल्यासारखी डायनिंगच्या ओढून आण, स्टूलं खेचा, सोफ्याच्या हॆंडलवर बूड टेका असे प्रकार नाहीत बघा. Proud सुहास जोशी त्यांच्या सात्विक रोलात गुंडाळल्या गेल्या बाई. डॉ. बापट सेन्सिबल वाटतात त्यातल्या त्यात. जनसंदेश चांगला होता

ती चोंबड्याची बायको कोमातून बाहेर आली,इतके दिवस आजारी होती असे वाटते तरी का? चांगली गुटगुटीत वाटते आणि बडबड किती करते.

मला काही प्रश्न पडलेत.
१) ही मालीका चांगल्या उच्चवर्गीयांतली दाखवलेली आहे पण त्यातील पात्रे मध्यमवर्गीयच विचार करतात.
२) अगदी गोड गोड संवाद आहेत.
३) फालतू कारणांसाठी राग/ लोभ ठेवत आहेत.
४) मनवाचा बाबा सुत्रधारासारखा का निवेदन करतो मधून मधून?
५) एकदोन पात्रे सोडली तर रिटायर लोक भरपूर आहेत. मालिका रिटायर आहे.
६) मालिकेचे नाव व त्यातील संहिता जुळत नाही. जर पुढे दाखवतील तर मग इतर कुटूंबे का दाखवली? त्यांची डोकउठाड प्रेक्षकांच्या माथी मारलीय.

कल्पनादारीद्र आहे.
इतका गोड शिरा असेल तर चांगला लागत नाही.

दिप्ती ओढून ताणून आजारी असल्याचा आवाज काढायचा प्रयत्न करते पण तिला जमत नाही.
रिमा लागू वगैरे एकवेळ अगदी नैसर्गिक अभिनय करतात
पण दिप्तीच्या घरी सगळं गुर्‍हाळच आहे. लईच गुळमाट.... Sad यक्क

दक्षिणा.. दीप्तीला आईवडील नाहीयेत म्हणुन ती तिच्या आत्याकडे रहात असते. अस ती आजारी पडल्या पडल्याच समजल. मला रीमा लागू आवडते..... आधी म्हटल्याप्रमाणे ती ज्या पद्धतीने तिचा राग व्यक्त करते तसं मातीच्या चुलीमध्ये वंदना गुप्तेना जमल नाही अस वाटत....... मी तर हि मालिका फक्त रीमा साठीच बघते.

अरेरे किती चुकीचे मराठी बोलतात या मालिकेत...
माझी मदत करा, तुझ्याशी काम आहे, लोकं बोलतात... अरे काय?
या संवादलेखकाने पुण्यात राहणार्‍या एखाद्या तरी लिमये, कुलकर्णी, जोशी वगैरे घरात जरा डोकावावे....
जरा पण अभ्यास करत नाहीत लेकाचे!

<<अरेरे किती चुकीचे मराठी बोलतात या मालिकेत...>>
'मस्करी' हा शब्द पण पुण्यात वापरतात का? अगदी थट्टा जरी नाही तरी मी तूझी गंम्मत केली असं म्हणतात ना?? चूकभूदेघे

>>> अरे ह्या मनवाला कट केला वाटत.
मंग! तुमी लोग लई तरास देत व्हते. मन्वा अशीच मन्वा तशीच. लईच आगोचर हाय, लईच बुटकी हाय. काढून टाक्ल तिला.

मी ही सिरियल आधीपासून पाहिली नाहीय. पण आईच्या कृपेने हल्ली रोज पहावी लागते. यात एक निपुत्रिक जोडपे दाखवले आहे. त्यांनी नोकराच्या मुलीला दत्तक घेतलय असं काहीतरी. इतपत ठिक होतं पण मधल्या काळात दोन सिन्स मध्ये ते आपल्या निपुत्रिक असण्याचे रडगाणे गाताना दिसले. काय तर म्हणे आमचा वेळ जात नाही म्हणून आम्हि बाल्कनीत उभे राहून येणार्‍या जाणार्‍यांची चौकशी करायचो. असं काहितरी...... डोक्यातच गेले माझ्या..... ज्यांना मुले नसतात त्यांना काहीच कामधंदे नसतात असं म्हणायचय का सिरियल वाल्यांना? मुर्ख कुठचे

मी अमि अनुमोदन

त्यातल्या त्यात त्या सुहास, अभिजित आणि दिप्तीचं कुटुंब मला शहाणं वाटतं. (गोड गिट्ट आहे पण बुद्धि वापरतात जरा तरी)

मी नताशा, मी तर हि मालिका फक्त आणि फक्त रिमा लागुसाठिच बघते. त्या सविता मालपेकरांना कुणीतरी लिमये नीट म्हणायला शिकवा रे..... दोन तीन वेळा त्यांच्या तोंडुन लिमयेच लिमिये अस ऐकायला आलं..... Sad
अगदी तुंपातली मराठी नको पण नीटनेटकी मराठी भाषा तर येउदेत....

कालच्या भागात दिप्तीभाई रॉक्स, काय सुनावलं आहे कुकांना :फिदि:

काय तर म्हणे आमचा वेळ जात नाही म्हणून आम्हि बाल्कनीत उभे राहून येणार्‍या जाणार्‍यांची चौकशी करायचो. असं काहितरी...... >> आधी मला पण त्यांचा खूप राग यायचा पण हे बघितले / ऐकले तेव्हा खूप दया आली.

नताशा, हेच मला खटकलं. निपुत्रिकांना समाजाने सहानुभुतीने/ दयेने का पहावं? त्यांना असं पोर्ट्रे का केलं जावं? मुलं नसूनही अगदी आनंदात असणारी कितीतरी जोडपी जगात आहेत की. त्यांना भरपूर कामधंदाही असतो. अशी पात्रं कुठल्याच मालिकेत/ चित्रपटात नसतात.

निपुत्रिकांना समाजाने सहानुभुतीने/ दयेने का पहावं?>>> त्यांना दयेने पाहण्याची अजीबातच गरज नाही पण या वयात त्यांना एक रितेपण जाणवू शकते म्हणून वाईट वाटले.

मुलं नसूनही अगदी आनंदात असणारी कितीतरी जोडपी जगात आहेत की.>>>आहेतच. अगदी ठरवून मुले नको असे म्हणणारी सुद्धा आहेत. दत्तक घेणारीही आहेत. पण मुले नाहीत म्हणून दुखी असणारी पण असतील की.

अशी पात्रं कुठल्याच मालिकेत/ चित्रपटात नसतात>>> पण प्रत्यक्षात असू शकतात.

किमान एक चांगले आहे की त्यांच्या निपुत्रिकपणावरून त्यांना कोणी हिणवत आहे असे दाखवले नाही. किंवा बाळाला बघू न देणे, टोमणे मारणे इत्यादी.

किमान एक चांगले आहे की त्यांच्या निपुत्रिकपणावरून त्यांना कोणी हिणवत आहे असे दाखवले नाही. किंवा बाळाला बघू न देणे, टोमणे मारणे इत्यादी>>>>>> हे अजुनही होतं आणि हे खुप वाईट आहे Sad

काय तर म्हणे आमचा वेळ जात नाही म्हणून आम्हि बाल्कनीत उभे राहून येणार्‍या जाणार्‍यांची चौकशी करायचो. असं काहितरी...... डोक्यातच गेले माझ्या..... ज्यांना मुले नसतात त्यांना काहीच कामधंदे नसतात असं म्हणायचय का सिरियल वाल्यांना? मुर्ख कुठचे>>> ते मालिकेमधले एक पात्र आहे- त्यानुसार ते वागणार. हे पात्र संपूर्ण समाजाचा आरसा नव्हे अथवा समस्त निपुत्रिक जोडप्यांचे प्रतिनिधी नव्हे.. सीरीयलवाल्यांनी प्रत्येक जोडप्याला विचारून मग कथा लिहावी की काय?

<त्यातल्या त्यात त्या सुहास, अभिजित आणि दिप्तीचं कुटुंब मला शहाणं वाटतं> आवडलेल्या मुलीशी आईवडील लग्न करू देत नाहीत म्हणून मुलाच्या डोक्यावर परिणाम(नाटक) झाला आणि मुलीने घरात येऊन गुंडगिरी केली ते हेच कुटुंब ना?

ज्यांना मुले नसतात त्यांना काहीच कामधंदे नसतात असं म्हणायचय का सिरियल वाल्यांना?>>> अरेरे!!!
ते असं नाही दाखवलंय... तो एकूणच संवाद 'दोघांच्या एकटेपणा'विषयी होता, आणि तो त्या प्रसंगाला साजेसाच होता.

पण तरीही एकूण ही मालिका म्हणजे बेढब ठिगळं लावलेली गोधडी वाटते. असं वाटतं की जे जे प्रसंग मांजरेकरांना सिनेमात घेता येत नाहीत ते ते सगळे प्रसंग मालिकेत घुसडलेत. तेही ठीके... पण किमान त्याची जोडणी, शिलाई तरी लौकिकाला साजेशी असायला हवी, ते नाहीच.

Pages