तुझं माझं जमेना

Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07

महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....

Tuza-Maza-Jamena-New-Serial-Zee-Marathi-Serial.jpg

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<अरे, ते कतार रिटर्न काका ज्या निर्विकारपणे "मला तुझं थोबाड फोडावंसं वाटतंय " उद्गारतात त्यापेक्शा कितीतरी भावपूर्ण टेप "कृपया प्रतीक्शा करे आप कतार मॆ है" ची होती.> Lol

सोफ्यावर आरामात टेकून बसून भांडण करणारे कुटुंब पाहताना अगदी गलबलून आलं.
पुढल्या एखाद्या भागात आरामात लोळत भांडण दाखवतील अशी आशा आहे.

परवाच्या जीभ हासडीन, गळा दाबीन मध्ये तंगडं मोडीन, थोबाड फोडीनची भर पडली. पण या कृतींमधली हिंसकता माझ्या मते उतरत्या भाजणीची आहे; हे भांडण मिटत आल्याचे लक्षण समजावे.

आपण कमर्शियल ब्रेकमध्ये ज्या जाहिराती पाहतो त्याच पाहून काकूंचे मतपरिवर्तन झाले असावे.

ईटिव्हीवर मराठी करोडपती असतं, तर तिथे पर्सनल प्रश्न आणि कथा यांमुळे अतिशय कंटाळा येतो. प्रश्नांपेक्षा कहाण्यातच त्यांना जास्त रस >>+१०

बा बहु बेबी केली तिने. म्हणजे एखाच्या चांगल्या सिरियलचा कोटा पूर्ण झाला.
आणखी पण एका सिरियलीत होती. त्यादरम्यान तिला जोधा अकबर (शिनुमा) मिळाल्याने मालिकावाल्यांना ती डोइजड झाली आणि मग ती रंगवीत असलेल्या पात्राला कॅन्सर झाला.

आभाळमाया (माझ्या) गेल्या जन्मातली मालिका वाटतेय. सुकन्या कुलकर्णी -मोने, श्री. मोने, उ.का., स्मिता सरोदे एवढेच आठवताहेत.
शीर्षक गीत लख्ख आठवतंय.
नीना कुलकर्णी दिग्दर्शित हमीदाबाईची कोठी मध्ये मनवा नाईक आहे.

ईटिव्हीवर मराठी करोडपती असतं तिथे सचिन खेडेकर सतत कॉम्पुटरला 'राजे अमुक करा, तमुक करा' असं म्हणत असतो.

काय राजे काय त्याचे नोकर आहेत का काय? उगाचच दुसर्‍यांची उष्टी शैली कॉपी करतांना काहीसुद्धा वाटत नाही यांना. अरे तुम्हाला संवाद लिहून दिले म्हणजे जे द्याल ते म्हणाल काय?

अन राजे या शब्दाला मराठीत वेगळाच संदर्भ आहे बाबा सचिन खेडेकर.

तुला तर ते जास्तच माहीत असायला हवं कारण तू शिवाजी राजे भोसले मध्ये काम केले आहे बाबा. ते राजे राजे बंद कर म्हणावं.

जय महाराष्ट्र !!

मनवाची आई - पौर्णिमा मनोहर
मनवाचे बाबा - विद्याधर जोशी
वैभव - वैभव तत्ववादी
त्याचे बाबा - राया भावे

आपल्या सासर्यांसाठी आपण जोडीदार शोधतोय ही गोष्ट ती बाई घरी येऊन बसल्यावर सांगण्याइतकी साधी आहे?
हे मराठी सिरीयल मधले भाषांतराचे प्रकार कधी थांबतील? we should meet. आपण भेटायला हवं. किती अवघड वाक्य !
मनवाची मजाय. मूड नसला की काम बंद करून पोर्ट्रेटमोड मध्ये बसायचं. आणि बॉसला हिची विपू करण्याशिवाय उद्योग नाही दुसरा.
कतार काकू एखादं लग्न अटेंड करून फ्लाईट पकडणार होत्या. गजरा अन गिफ्ट जाता जाता घेतील असं आत्ताच चोंबड्यानं आमच्या घरी सांगितलं. Proud

मांजरेकरांकडे बजेट टाईट दिसतंय. बापटकाकू येणार म्हणून कतार-काकूंना नारळ.

ती रोझा लिमये काका-काकूंसमोर अ‍ॅक्सेंटवालं मराठी बोलते आणि वैभवशी बोलताना नॉर्मल मराठी बोलते. हे मुद्दाम आहे का दिग्दर्शकाची डुलकी आहे?

कतार काकू एखादं लग्न अटेंड करून फ्लाईट पकडणार होत्या. >> असे छान नटून विमानप्रवास करणारे अनेक दिसलेत मला Happy

ती रोझा लिमये काका-काकूंसमोर अ‍ॅक्सेंटवालं मराठी बोलते आणि वैभवशी बोलताना नॉर्मल मराठी बोलते. हे मुद्दाम आहे का दिग्दर्शकाची डुलकी आहे?>>>>>+१००००००००

अरे काय फालतूपणा चाललाय या मालिकेत Uhoh
कालचा ऑडिशनचा भाग म्हणजे तर कहर होता.... सोसायटीतली हौशी नाटुकली ह्याच्यापेक्षा दर्जेदार असतात... रिमा लागू, सुहास जोशी सारखी मातब्बर मंडळी या सगळ्या पाणचटपणाचा भाग बनताना पाहून फारच कसेतरी वाटते.... कल्पनाशून्य दिग्दर्शक आणि संवादलेखक चांगल्या स्टारकास्टची कशी वाट लावू शकतात याचे हे आदर्श उदाहरण आहे Sad

ही मालिका कम्प्लीट बायनरी आहे. एकदम हे टोक नाहीतर ते टोक, अधेमध्ये काहीच नाही. अगदी कडाकडा भांडताना दाखवले नंतर एका झटक्यात दिलजमाई झाली की जणू काही घडलेच नव्हते. एका क्षणात मतपरिवर्तन होणारी ही पहिलीच मालिका असावी.
सध्याचा रोख पाहता चोंबड्याचा 'बावर्ची' करण्याचा प्रयत्न चालू आहे असं वाटतं.

बाकी, नवरा बायकोचं पटत नसेल तर सामंजस्याने विचार करून दोघांना एकत्र आणण्यापेक्षा तिसरी व्यक्ती मध्ये आणावी हे नवीन फॅड 'तुझं माझं' आणि 'एलदुगो' नं आणलेलं दिसतंय. आणि अर्थातच डोकी गहाण ठेवून इतर पात्रे सगळ्या गोष्टींना साथ देतात. धन्य ती रिअ‍ॅलिटी!!!

नवरा बायकोचं पटत नसेल तर सामंजस्याने विचार करून दोघांना एकत्र आणण्यापेक्षा तिसरी व्यक्ती मध्ये आणावी हे नवीन फॅड 'तुझं माझं' आणि 'एलदुगो' नं आणलेलं दिसतंय.>>>>>"ए.ल.दु.गो" बद्दल कै बोलायचं नै हा.....माझी फेवरेट, अगदीच फेवरेट मालिका होती ती. Happy

आणि या धाग्याचे ३०० प्रतिसाद पूर्ण झाले....हा माझा ३०० वा प्रतिसाद!!! Proud

Pages