तुझं माझं जमेना

Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07

महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....

Tuza-Maza-Jamena-New-Serial-Zee-Marathi-Serial.jpg

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिमा अभिजीतला सल्ले देत होती ते पटलं नाही. आधी स्वतःच्या घरी बघा.
तिला काय जातंय म्हणायला कालचं विसरून जायचं वगैरे वगैरे...
कमीत कमी तिला वाईट वाटलंय असं तरी दाखवावं.

तो मातीच्या चुली २००६ चा आहे. आता ६-७ वर्षांत जरा तरी काही वेगळी परीस्थिती दाखवायची. एवढ्या चकचकीत घरात रहाणार्‍या मॅनेजमेंट ट्रॅकवरील मुलाचा पगार आईच्या हातात हे बघून तर हसूच आले. हल्लीची मुलं एवढी बावळट?

>वंदना गुप्तेला तोड नाहीच. >> +१
रीमा लागूंचा अभिनय आवडतोच पण ह्या मालिकेत मधे मधे काही प्रसंगांत त्यांचा अभिनय जरासा खटकतोही आहे, किंचित ओव्हरअ‍ॅक्टींग वाटते, सहज सुंदर नाही वाटत. वंदना गुप्तेंना पहायला आवडलं असतं. Happy

मनवा आवडते मला. तिच्या आईचं काम करतात त्या कोण? त्यांचं नाव?

स्वातीताई +१

ओके अंजली_१२, धन्यवाद. Happy मागे पण त्यांना कोणत्या तरी सिरियलमधल्या एका एपिसोडमध्ये पाहिल्याचं आठवतं आहे. नक्की आठवत नाही, एखादाच मधला कोणता तरी एपिसोड पाहिला होता.

तिसर्‍या पानावर दीपांजलीने ही साईट सांगितली होती पण ती चालत नाही. कोणती साईट आहे ऑनलाईन बघण्यासाठी?

दीपांजली | 14 June, 2013 - 05:49
Aditi,
apalimarathi.com

आपलीमराठी भारतातून चालत नाही. मात्र, dailymotion.com वर सिरियलचे नाव आणि तारिख दिल्यास आपलीमराठीवर अपलोड होणारे एपिसोड्स बघता येतील. शिवाय झी मराठीच्या युट्युबचॅनेलवरही ते बघता येईल.

आज त्या अभिजीतच्या वडिलांची रिअ‍ॅक्शन एकदम हायपर वाटली.. आणि त्याचे वेडाचे नाटक करणे आणि त्यामुळे सुहास जोशींनी घाबरुन जाणे पण एकदम मठ्ठाड..

पूर्णिमा गानू आहे ती. किती लहान आहे ती त्या आईच्या भूमिकेसाठी!! Uhoh

उंबरठामध्ये पण होती ती. बालकलाकार.

फिल्ममधे एकदम सहज, नॅचरल वाटलेली कथा सिरीअलमधे एकदम फिल्मी वाटते आहे, ये क्या हो रहा है >> अगदी अगदी!

मला वाटत, सिच्युएशन,स.न्वाद सहित सगळ कॉपी करायची गरज नव्हती, जरा क्रिएटिव्हीटी दाखवता आली आसती /येईल.

फिल्ममधे एकदम सहज, नॅचरल वाटलेली कथा सिरीअलमधे एकदम फिल्मी वाटते आहे, ये क्या हो रहा है >>> ३ तासांच्या कथेत पाणी घालुन ६ महिने मालिका चालवण्याचा प्लॅन असेल तर हेच होणार.

सिरियलचे संवाद सॉलिडच गंडलेत. खरंतर संवाद चांगले देऊन सिरियल पुढे न्यायला खूपच चांगला स्कोप होता.

मातीच्या चुली हा सिनेमा मात्र इतक्या लोकांनी पाहिला आहे आणि तो इतका लोकप्रिय आहे हे हा बाफ वाचूनच समजले!

वैभवचे कॅरॅक्टरपण गंडले आहे.

सिनेमात तो थोडासा चिडका, निर्णय न घेऊ शकणारा आहे. पण ३ तासाचे सहा महिने करताना त्याचा स्वभाव सारखा बदलतो.

मातीच्या चुली हा सिनेमा मात्र इतक्या लोकांनी पाहिला आहे आणि तो इतका लोकप्रिय आहे हे हा बाफ वाचूनच समजले!>>> लोकप्रिय माहीत नाही पण मला प्रिय होता Happy वंदना गुप्ते आणि सुधीर जोशी

'सासू-सुना' हा विषय सोडून दुसर्‍या विषयांवर एकाही निर्माता-दिग्दर्शकाला टिव्हीवर डेलिसोप बनवता येऊ नये याचं मला आश्चर्यमिश्रीत दु:ख होतं.

सुहास जोशींवर इतकी काय परिस्थीती आली की त्यांना कालचा भाग करावा लागला?>>> Lol

चांगले पोटेन्शियल होते. पण पार गंडले आहे सगळेच. अरूण +१! मला सासू हवीपेक्षा बरी म्हणायची Proud आणि लवकर संपणार आहे हा प्लस.

कसल्याही मालिकेशी प्रेक्षकांचं जमतं प्राची, नाहीतर ती अतिबंडल मसाह आणि चिमांची कुठली ती मालिका.. कश्या चालल्या असत्या एवढ्या?

Pages