Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07
महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला आवडली, रिमा फ्रेश वाटते,
मला आवडली, रिमा फ्रेश वाटते, मनवा सुद्धा गोड आहे
मातिच्या चुली यापेक्षा नक्किच सरस होता कारण वंदना गुप्ते..
बाकी ह्यात म.मा.न्जरेकर काय" प.न्चतारा.न्कित चाळ" दाखवतायत का? ज्या पद्धतीने जोशी गॅलरित उभे असतात आणी गॉसिप दाखवलेय त्यावरुन तरी वाटते.
घर/ इंटेरीअर जबरी घेतलियेत.
अमा, मी मस्त... मजेत तुम्ही
अमा, मी मस्त... मजेत
तुम्ही कशा आहात?
स्विस आय्लंड म्हण्णारी>>> सविता मालपेकर. जुन्या सिनेमांमध्ये पाहिलंय तिला. शिवाय, काकस्पर्शमध्येही होती. (खुपते तिथे गुप्ते मुळे कळलं) महेश-मेधा मांजरेकरांची मैत्रीण आहे ती.
अॅमेनोरा टाऊनशिप आहे ही
अॅमेनोरा टाऊनशिप आहे ही पंचतारांकित चाळ म्हणजे
प्राजक्ता- अगदी अगदी.-
प्राजक्ता- अगदी अगदी.- पंचतारांकित चाळ.
अश्विनीमामी+१
मस्त सिरिअल आहे ,इतके दिवस
मस्त सिरिअल आहे ,इतके दिवस बघण्यासारखे काही न्हवते .
मनवा आणि रीमा दोघी मस्त ! रीमा अजून मस्त दिसते आणि हसते पण गोड !
पुलं ची बटाट्याची चाळ आठवली , पण हि श्रीमंत चाळ आहे खरे .
बाबुमोशाय , ही अख्खी दुनिया
बाबुमोशाय , ही अख्खी दुनिया एक व्हर्चुअल गॉसिप चाळ आहे

चाळीतली बाल्कनी असो , फाइव स्टार होम च्या गॅलर्या असो , मायबोली वरची गप्पांच्या पेजेसवरची गॉसिप असोत किंवा फेसबुक सारख्या ईन्स्लाइन सोशल नेटवर्क खिडक्या !
दुसर्याच्या आयुष्यात काय नाट्यमय चाल्लय यात यावर गॉसिप करणे हा जगातल्या प्रत्येकाचा जन्मसिध्द अधिकार आहे
दीपांजली , अख्खीच्या अख्खी
दीपांजली , अख्खीच्या अख्खी पोस्ट जबरी !!!

सोला आणे सच बात , ट्चकन पाणीच आल ग डोळ्यात
दिपांजली, जन्मसिद्ध अधिकार
दिपांजली, जन्मसिद्ध अधिकार +१००
डिजे क्या बात क्या बात!!
डिजे
क्या बात क्या बात!!
एक्झॅक्टली डीजे! पंचतारांकित
एक्झॅक्टली डीजे! पंचतारांकित अपार्टमेन्ट असली तरी वृत्ती एकच असते सगळ्यांची हेच तर दाखवायचं आहे!! आणि पंचतारांकित बिल्डिंगला साजेसं घराचं इन्टिरियरही आहे. तेच ते बेगडी आणि खोटे सेट्स दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष फ्लॅट्स, सोसायटी, बिल्डिंग दाखवतात हा बदल छान वाटतो बघायला.
पौर्णिमा +१
पौर्णिमा +१
सध्या त्यातल्या त्यात बघणेबल
सध्या त्यातल्या त्यात बघणेबल आहे ही सिरीअल.... म्हणजे यातल्या व्यक्तिरेखा बर्यापैकी आपल्या बघण्यातल्या आहेत... थोडेफार तरी रिलेट करु शकतो आपण
चकचकीतपणा असला तरी तो अंगावर येत नाही.... मांजरेकर असल्यामुळे थोडी अतिशयोक्ती आहे पण कलाकारांच्या सहज अभिनयामुळे ती खपून जातीय!
पूनम + १०. भरजरी साड्या,
पूनम + १०.
भरजरी साड्या, दागिने, भ.मे. करून वावरणार्या गृहिणी यात नाहीयेत हे फारच सुखावह आहे. सगळ्यांचे कपडे सामान्य माणसांसारखे तरीही उच्च अभिरुचीचे आहेत. घरं तर फारच सुंदर आहेत. रीमा आणि सुहास जोशीच्या अनुभवाला आणि अभिनयाला वाव देणारं स्क्रिप्ट नाहीये, संवादही अगदीच साधारण आहेत. पण तरीही पडद्यावर जे चालू असतं ते डोक्यात जात नाही हे दिलासादायक आहे.
वैभव मला आवडतो. खूपच आवडतो.
विद्याधर जोशी मुलीच्या बापाची भुमिका फारच छान साकारतो आहे.
तो चोंबडा डोक्यात जातो ते
तो चोंबडा डोक्यात जातो
ते पात्रं नसतं तर जास्त बरं झालं असतं.
चायनीज जेवणाचा बेत आणि
चायनीज जेवणाचा बेत आणि चोंबड्या नसता तर सिरीयल ऩ़क्कीच उजवी ठरली असती. बाकी त्यातले चकचकीत गाणे छान. आणि नेत्रसुखद पंचतारांकीत चाळ आणि जोशी काका वा: वा:
मला खुप आवदलि
मला खुप आवदलि
मला आवडली ही सिरीयल.
मला आवडली ही सिरीयल.
संवाद कोण लिहितंय हा प्रश्न
संवाद कोण लिहितंय हा प्रश्न पडला आहे मला. मनवाचं अब्राह्मण्य दाखवताना तिला "काकी", "चपाती" म्हणताना त्याऐवजी "काकू" आणि "पोळी" म्हणायला सांगतात. आणि रिमा लागूंच्या तोंडी, "मला जेवण करायला खूप आवडतं" किंवा "मला चण्याच्या झाडावर चढवू नका" असले संवाद दिलेयत.
अवांतरः स्वयंपाकाच्या ऐवजी 'जेवण' हे मी मुंबईतच फक्त ऐकलंय.
मस्त कलंदर सिरियल महेश
मस्त कलंदर सिरियल महेश मांजरेकरांची असली म्हणुन काय झालं? शेवटी ती मराठी सिरियलच! आजकाल व्याकरणात चुका आणि अशुद्ध बोलणं असल्याशिवाय मालिका आपल्या वाटत नाहीत प्रेक्षकांना
काल परत एक सोसायटीमधले
काल परत एक सोसायटीमधले रिसेप्शन दाखिवले. ह्या लोकांना फक्त शेजारीच आहेत का साधे नेहमीचे नातेवाईक जे अश्या कार्यांना आवर्जुन येतात. निदान पुण्यात तरी नक्की. ते इथे दिसत नाहीत. बरं रुखसाना साडी नथ वगैरे तयार होउन आली म्हणून ती चांगली काय? तिला शरारा मेहंदी असा मुस्लीम वधूचा पोषाख करू वाटला तर? दिग्दर्शकाने सोय ठेवलेली नाही.
जोशी हावरट दाखवायचे प्रयत्न हास्यास्पद आहेत. मातीच्या चुलीतल्या सुनेपेक्षा मनवा जास्त हाय फाय दाखविली आहे व त्यामुळे ती जास्त लवकर डोक्यात जात आहे. आता कन्फ्रंटेशन इमिनंट आहे.
कधी भांडतील दोघी?
अवांतरः स्वयंपाकाच्या ऐवजी
अवांतरः स्वयंपाकाच्या ऐवजी 'जेवण' हे मी मुंबईतच फक्त ऐकलंय.<< मी कोकणात सर्रास ऐकलंय.
जेवण बनवलेस का? म्हणजे स्वयंपाक झाला का? असा या प्रश्नाचा अर्थ.
आश्विनीमामी, तुम्ही लिहिलेले
आश्विनीमामी,
तुम्ही लिहिलेले १०१% पटले.
हावरट जोशी , चोंबड्या आणि
हावरट जोशी , चोंबड्या आणि लग्नाला डेस्परेट तो सुहास जोशीचा बायकी मुलगा ही फार बोरिंग कॅरॅक्टर्स आहेत!
सुहास जोशीचा मुलगा काय धक्का देणार आईला ? गे रिलेशनशिप वगैरे विषय् दिसेल असं वाटायला लागलय , " मां दा लाडला बिगड गया' , तिथे किरोन खेर ऐवजी सुहास जोशी!
डिजे..... ऐकत नाय हां.....
डिजे..... ऐकत नाय हां..... दोन्ही पोस्टी खतर्नाक.....
बाकी " मला सासू हवी", "अजूनही चांदरात...." , " तू तिथे मी" ह्यांच्या भाउ गर्दीत एकदम सुखद धक्का.... कलाकार ही चांगलेच आहेत. सुहास जोशी आणि रीमा आवडत आहेत. मनवाने चांगले काम केले आहे. आर्थात ती वैभव पेक्षा मोठी आहे हे जाणवतं आहे.... ( नक्कीच मोठी असणार)
मला सासू हवी मधे सविता प्रभुणे आली आणि धक्काच बसला..... बापरे तिच्यवर ह्या मालिकेत काम करण्याची वेळ आली?
बापरे तिच्यवर ह्या मालिकेत
बापरे तिच्यवर ह्या मालिकेत काम करण्याची वेळ >>> पवित्र रिश्ता पाहिलेली दिसत नाहिये तुम्ही.
इरिटेटिन्ग कॅरेक्टर होतं.
पवित्र रिश्ता पाहिलेली दिसत
पवित्र रिश्ता पाहिलेली दिसत नाहिये तुम्ही>>>
नाही .. सुदैवाने हिंदी सीरेयल आणि त्याही सासु सुना टाईप.... मी बघतच नाही.... एकुणातच फक्त ९ ते९.३० च वेळ असतो त्या वेळात घरात जे सुरु असेल ते पहायचे....
मराठी मालिकेत
मराठी मालिकेत स्वित्झर्लंडमधील गाणे ? सही आहे

पण मनवा एवढे उबदार कपडे घालूनही अक्षरशः गोठलेली वाटतेय त्या गाण्यात. चेहेर्यावर ओढूनताणून रोमॅंटिक भाव आणले आहेत. नाहीतर बॉलिवूडच्या नायिका स्लिव्हलेस घालून काय मस्त शॉट्स देतात एवढ्या थंडीत
नायकाचे काम करणारा मुलगा चांगला वाटतोय.
ह्या मालिकेबद्दल कालच रीमा ह्यांच्या मुलाखतीत वाचले आणि आज हा धागा पाहिला. बघितली पाहिजे कधीतरी.
मला वैभव नाही आवडत, उमेश कामत
मला वैभव नाही आवडत, उमेश कामत हवा होता तिथे, बाकी मालिका मस्तच.
तो सुहासचा मुलगा अभिजीत बहूतेक त्या घार्या मुलीशी लग्ग्न करून धक्का देइल.
ती घारी मुलगी जाम डोक्यात
ती घारी मुलगी जाम डोक्यात गेली काल. काहीतरीच टोनमधे बोलते.
एकदम बाद.
"मातीच्या चुली" नावाचा मराठी
"मातीच्या चुली" नावाचा मराठी सिनेमा होता, अंकुश चौधरी आणि त्या वेलणकरचा .....त्याचीच कॉपी आहे हि सिरीयल!
Pages