Submitted by योकु on 18 January, 2015 - 11:41
मला एवढ्यात युट्युबवर गंगाधर टिपरे मालिकेचे बरेचसे भाग सापडलेत. मालिका माहिती होतीच. पण आता काही भाग पुन्हा पाहिलेत अन एक नो नॉन्सेस करमणुक मिळाली.
ही मालिका दिलिप प्रभावळकर यांच्या 'अनुदिनी' पुस्तकावर आधारित आहे.
अगदी सर्वसामान्य चौकोनी कुटुंब + आबा.
राजन भिसे - शेखर
शुभांगी गोखले - श्यामल
रेश्मा नाईक - शलाका
विकास कदम - शिर्या (श्रिलेश)
आणि
दिलीप प्रभावळकर - आबा
अगदी नेहेमीचे घरगुती प्रसंग घेउन तयार झालेली ही मालिका. कुठेही सासू-सुनेची, दीर-नंणंदेची, मामा-पुतण्याची "'बा'चा-'बा'ची" नाही. पुनर्जन्म नाही की अवकाळी मृत्यू नाही! मस्तपैकी नर्मविनोदी भाग आहेत. टिपिकल बाप म्हणून शेखर, तशीच आई म्हणून श्यामल अन पोरंही आपापल्या भूमिकेमध्ये चपखल आहेत. दिलीप प्रभावळकरांनी म्हातारे आबा अग्दी हुबेहूब वठवलेले आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त होती ही मालिका खरंच.
मस्त होती ही मालिका खरंच.
आमचे ज्येना या मालिकेची आठवण काढत, उसासे टाकत का होइना पण होसुमीयाघ, जुयेरेगा, इ. सिरियल्स नेमाने बघतात हे ही खरं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मालिका पाहिली नाही पण एक
मालिका पाहिली नाही पण एक विनोदी सदर म्हणून टिपरेंची रोजनिशी वाचायचो दर आठवड्याला लोकसत्तामध्ये. विधूर असले तरीही हसरे, खेळकर स्वभावाचे टिपरे आजोबा ग्रुप फोटो काढताना माझ्या शेजारी एक रिकामी खुर्ची ठेवा असं सर्वांना सांगतात तेव्हा ते वाचून मी फार रडलो होतो.
मस्त आहे मालिका. अधून मधून
मस्त आहे मालिका. अधून मधून यूट्यूबवर भाग बघतोच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शलाका उर्फ रेश्मा नाईक पून्हा
शलाका उर्फ रेश्मा नाईक पून्हा कूठल्या मालिकेत दिसल्याचे आठवत नाही.
'आपण यांना पाहिलेत का' मध्ये समविष्ट करा.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मालिका छान होतीच शिवाय या
मालिका छान होतीच शिवाय या मालिकेत माझे एक दीर आबांच्या मित्राचे काम करीत असत म्हणून आम्हाला या मालिके बद्दल जरा जास्त ममत्व.
मस्त होती मालिका. हेमाताई नाव
मस्त होती मालिका.
हेमाताई नाव सांगाना दिरांचे.
मस्त मालिका होती
मस्त मालिका होती अगदी!!
सेनापती तिचं नाव आहे तिकडे. मालिका संपता संपताच तिचे लग्न झाले व तिने मालिका सोडली. मला वाटतं मालिकेत देखील ती ऑस्ट्रेलियाला गेल्याचं दाखवले आहे ना? ( आठवत नाही आता)
अंजु , अनंत वेलणकर ग त्यांच
अंजु , अनंत वेलणकर ग त्यांच नाव . मालिकेतल नाही आता लक्षात. मालिकेत एकदा त्यांच गाणं ( नाट्यगीत ) दाखवल होतं . ते गायचे ही सुंदर.
खरंय! अगदी सुंदर, सहज
खरंय! अगदी सुंदर, सहज अभिनयाने नटलेली मालिका! अधूनमधून बघते मी पण!
मीही ते लोकसत्तातलं सदर वाचत
मीही ते लोकसत्तातलं सदर वाचत असे. ते मस्त होतं. (बुक इज ऑलवेज बेटर दॅन द मुव्ही :डोमा:)
पण मालिकाही चांगलीच होती. आजोबा-नातूचे सीन्स बेस्ट होते.
अनंत वेलणकर, ओके. विपुत
अनंत वेलणकर, ओके.
विपुत लिहिते हेमाताई.
मस्त होती मालिका. शुभांगी
मस्त होती मालिका.
शुभांगी गोखले नी एका मुलाखती मध्ये ऋशिकेश मुखर्जी नी त्याना फोन करुन कौतुक केल्याचे सांगितले होते.
मस्त मालिका
मस्त मालिका आहे.
www.apalimarathi.com वर झी मराठी मालिका मधे सर्व भाग आहेत.
मालिका संपता संपताच तिचे लग्न
मालिका संपता संपताच तिचे लग्न झाले व तिने मालिका सोडली. मला वाटतं मालिकेत देखील ती ऑस्ट्रेलियाला गेल्याचं दाखवले आहे ना? ( आठवत नाही आता)>>>>>>>्होय....तिचे लग्न झाले आणी ती ऑस्ट्रेलियाला गेल्याचं दाखवले आहे.