जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सध्यातरी आवडतेय ही मालिका.. प्राजक्ता माळी मस्त अभिनेत्री आहे.. घाबरलेल्या, भेदरलेल्या कोकरासारखा अभिनय तिला छान जमतोय... नवा हिरो आवडला. पहिल्यांदाच पाहतेय त्याला.. उंच माझा झोकातली ताई सासूबाईपण आहे यात.. सुकन्या कुलकर्णी खुप दिवसांनी दिसली... डॉ. गिरीश ओक माझे ऑल टाईम फेवरेट... मावशीपण छान..

मला प्राजक्ता सोडुन सगळेच आवडले Happy
सध्य अतरी आवडतेय
कंसेप्ट सध्या थोडी माझ्या विरुद्ध वाटतेय पण तरीही आवडतेय

<उंच माझा झोकातली ताई सासूबाईपण आहे यात<> शर्मिष्ठा राउत>> हो, नाशिकची आहे ती.... माझ्या मित्राची बायको आहे.. Happy

पहिले १-२ भाग बघुन मला ती "हम दिल दे चुके सनम" च्या जवळ जाणारी वाटते आहे.
पण मांडणी चांगली आहे. महाराष्ट्रीय एकत्र कुटुंब इ. दाखविण्याचा प्रयत्न चांगला आहे.

मधुगंधा कुलकर्णी म्हणजे 'होणार सून' ची लेखिका का ? कुणाचे काम केले आहे तिने ह्यात ?
मावशीचे काम करणार्‍या अभिनेत्री मस्त आहेत. ह्याआधी पाहिले नव्हते त्यांना. नीना कुलकर्णी ह्यांच्या बहीण वाटतात Happy जावेचे काम करणारी अभिनेत्रीही छान आहे.
'हम दिल दे चुके सनम' सिनेमा होता म्हणून चालले. तीच थीम मालिकेत असेल तर काही महिन्यांनी टॉर्चर वाटायला लागेल असे वाटते आहे. सध्या अधूनमधून बघते कधीतरी ही मालिका.

मी काही भाग पाहीले या मालिकेचे... लग्नाळू (असुनही) मुलाची काही ठाम मते, स्वप्नाळूपणा आवडला...
मधुगंधा कुलकर्णी ही लेखिका अभिनेत्री आहे. हिच्या आहोजींनी (परेश मोकाशी) हरीशचंद्राची फॅक्टरी दिग्दर्शित केला आहे.
मावशीचे काम करणार्‍या अभिनेत्री मस्त आहेत.>> मृणाल चेंबूरकर.. या दिल्या घरी... मध्ये वृंदाची आई दाखवलेल्या. त्या काम छान करतात.

मला ते बाबाजी बाबाजी करत डोक्यावर मारणे डोक्यात जातेय अशक्य...
पण तरीही एलदुगो पासून सासरचे हल्ली फारच सुखद चित्र दाखवतात... गोग्गोड मोरंब्याच्या बरणीसारखं!! कोण मुरणार नाही मग त्या गोडव्यात!!! आमच्या काळी का बै नव्हतं काही असं... निदानपक्षी तेव्हा ही सिरीयल तरी यायला हवी होती... म्हणजे वारंवार " बघा, जरा शिका" हा लूक देता आला असता... तेव्हा व्हिलन सासवा बोकाळलेल्या... तेव्हा आम्हाला लूक मिळायचे "बघा..." Sad
स्वप्नरंजन करणारी बाहुली...

मला ते बाबाजी बाबाजी करत डोक्यावर मारणे डोक्यात जातेय अशक्य...>>>>+१११
मावशीने ते दागिने पाहिले ना? अजून बहिणीला विचारले नाही बहुतेक.
गिरिश ओक चा अभिनय मस्तच. काहीकाही पंचेस छान आहेत.

सुकन्याबाईंचा अभिनय हल्ली बिघडत चाललाय.
अभिनय सहज नाहीए. डोळे गटागटा फिरवतात आणि संवादफेक पण अडखळते थोडीशी.
डॉ. ओक मात्र छान !
शर्मिष्ठा आवडतेच मला पण नवोदित हिरो आदित्य पण छान वाटला.
प्राजक्ता दिसते छान पण तिचा रोल कसा खुलवतेय बघायचं आता !

या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे, आई-वडलांसोबत मुलगा-सूनच नाही, तर मुलगी-जावई हे पण एकाच घरात राहत आहेत.. ही सुखद बदलांची नांदीच आहे.. आवडलं हे फार...
भ्रष्ट माणसं किती प्रेशरखाली जगत असतात, हा नवा पैलू सुद्धा छान वाटला...

सानी, त्यांची पूर्ण वाडीच दाखविली आहे. तिथेच लेक- जावई नाममात्र वेगळे (मे बी भाड्याने ) असे दाखविले आहे. इतरही भाडेकरु दिसले परवा.

<मधुगंधा कुलकर्णी म्हणजे 'होणार सून' ची लेखिका का ? कुणाचे काम केले आहे तिने ह्यात <> बहुतेक सून, विजुची भुमीका केली आहे

हो का, मुग्धानंद? मी सगळे भाग पाहिले, पण ते असे नाममात्र का होईना, वेगळे राहतायत, हे कधी मेन्शन केलं, तो भाग मी मिसला बहुतेक.... धन्स गं..

सानी, कालच्...ते त्यांच्या घरासमोरील बाल्कनीत असतात. पेपर मधे लाचखोर कर्मचार्‍यांची बातमी वाचुन नानांना सांगायला येतात.

आमच्या काळी का बै नव्हतं काही असं... निदानपक्षी तेव्हा ही सिरीयल तरी यायला हवी होती... म्हणजे वारंवार " बघा, जरा शिका" हा लूक देता आला असता... तेव्हा व्हिलन सासवा बोकाळलेल्या... तेव्हा आम्हाला लूक मिळायचे "बघा..." अरेरे
स्वप्नरंजन करणारी बाहुली...> Lol

ए गपे दक्षे! 'ह्याच्यातली' एक व्यक्तिरेखा 'पल्याड'ची अख्खीच्या अख्खी कथा लिहित असेल तर अशी वाहतूक होणारच... त्याला इलाज नाही.. Wink Proud

हेहे!! Proud मलाही असंच वाटलं सुरुवातीला, नंतर ट्युब पेटली.. इकडच्या गप्पा तिकडे वाहून निघाल्या, म्हणजे मधुगंधा कुलकर्णीविषयीची चर्चा 'होणार सून...' च्या नव्या (तिने टेक ओव्हर केलेल्या) धाग्यावर गेली, असं म्हणायचंय तिला...

मेघनाचा नगरकर आदित्य तिच्या नशीबात नाहीये, हे ओपन सिक्रेट असल्यामुळे त्याला भेटण्याचा तिचा आटापिटा यशस्वी होणार नाहीच, हे माहिती असल्यामुळे कथा खुपच प्रेडिक्टेबल चाललीये सुरुवातीपासूनाच... पुढे काय होणार अशी थोडीशीही धाकधूक नाही.. फक्त तिच्या वडलांचं काय होणार, याचीच उत्सुकता आहे.
बाकी ते दाढीवाले, शबनम बॅग घेऊन फिरणारे काका कालच्या भागात दुसर्‍यांदा दाखवले. त्यांना बहुतेक सत्यवादी आणि बुप्रा दाखवायचे असावे, मेघनाच्या वडलांच्या व्यक्तिरेखेच्या अगदी विरुद्ध.. पुढेमागे त्यांच्या रोलचे फुटेज वाढवतील, असं वाटतंय.. चांगलं काम करतायत.. Happy

कालचे मेघनाचे बाबा छान दाखवलेले... बाबाजी पुराण जरा कमी होतं आणि त्यांनी चक्क मुलीशी हसत हसत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मेघनाबाई पळून जायच्या तयारीत असताना.

आदित्यच्या बहिणीचे काम तर शर्मिष्ठा राऊत करतेय ना? (शर्मिष्ठा राऊत बहिण आणि मधुगंधा कुलकर्णी आदित्यची वहिनी दाखवलीये माझ्यामते) की तुला तो प्रेमी आदित्य म्हणायचंय, मुग्धानंद?

सोनाली, तो प्रेमी आदित्य दिल्लीत आहे, कसल्यातरी ऑडिशन की कशातरीसाठी.. तो मेघनाला कॉल करतो, तेव्हा फोन नेमका बाबांकडे असतो आणि ती त्याला कॉल करते, तेंव्हा त्याचा फोन कव्हरेजबाहेर असतो म्हणे.... त्यामुळे त्यांच्या कॉमन मित्राच्या मध्यस्तीने त्यांचा संवाद सुरु आहे..

योगिनी चौक नी कोणाच काम केलाय?>>>>> अरे ती त्यांची शेजारी दाखवली बहुतेक. ते काका दाखवले ना गिरिश ओकशी बोलताना तेव्हा.

Pages