Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मालिकेची नायिका(?) च जर कायम
मालिकेची नायिका(?) च जर कायम घरात सुतक असल्यासारखा रडवेला चेहरा करून बसत असेल तर मालिका काय त्या बाबाजीसाठी बघायची?
सारिका.चितळे.... नायिका
सारिका.चितळे.... नायिका सुतकात असली तरी तिच्या सासरचे लोक छान अभिनय करतात (डॉ. गिरीश ओक, सुकन्या मोने,इ.) त्यांच्यासाठी मधून मधून पाहायची
मला ती विजया पण आवडली.
मला ती विजया पण आवडली.
हा आदित्य किती माठ आहे.
हा आदित्य किती माठ आहे. आपल्या बायकोचे कुणातरी दुसर्यावर प्रेम आहे हे कळल्यावर तिला तिच्या घरी का नाही पाठवते? घेउन बसलाय उगिच घरात.
हा आदित्य किती माठ आहे.
हा आदित्य किती माठ आहे. आपल्या बायकोचे कुणातरी दुसर्यावर प्रेम आहे हे कळल्यावर तिला तिच्या घरी का नाही पाठवते? घेउन बसलाय उगिच घरात.
अग दक्षु तो पण हिंदी मुव्ही /
अग दक्षु तो पण हिंदी मुव्ही / मालिका बघतो...त्याला माहितै की अंत मे जीत उसीकी हय......
इथे पण आलाच का गोडाचा शिरा!
इथे पण आलाच का गोडाचा शिरा!
आज ती थोडी हसताना दाखवलेय.
आज ती थोडी हसताना दाखवलेय. हळू हळू रुळावर येईल गाडी ती घरात रमायला लागेल आणि नवरा आदित्य तिच्या आदित्य कडे तिला धाडायची धडपड करेल. स्टोरी माहितीतली आहे. तरी बघायला आवडतेय. घरातल्या सगळ्यांचा अभिनय छान आहे. एकदम फेश
झी मराठीचं पेटंट आहे. शिरा
झी मराठीचं पेटंट आहे. शिरा
'गुंतता र्हुदय हे' नंतर
'गुंतता र्हुदय हे' नंतर पहायला घेतलेली दुसरी मराठी सिरियल. सिरियल आवडते आहे मायनस जुलाब झाल्यासारखा सतत चेहरा करुन बसणारी हिरॉइन आणि तिचे गावठी कपडे. एकुणातच सगळ्यांचे कपडे अगदी टिपिकल मर्हाटी आहेत. ( मी तरी सिरियल्स कथा आणि अभिनयाबरोबरच फॅशन्स, मेकअप, घराचं इंटेरिअर यासाठी सुद्धा बघते. गुंतता र्हुदय मधे पल्लवी आणि मृणालचे कपडे कसे मस्त असायचे).
आज त्या मुलीने चक्क बरे कपडे घातले होते आणि तो कोण रेसिपी विचारायला आलेला शेजारी होता त्याकडे बघुन भरपुर हसली सुद्धा. आज कळालं कि ती जाड असली तरी सुंदर आहे. आणि हसल्यावर तर फारच सुंदर दिसली. कथालेखक आणि डायरेक्टर करो आणि तिच्या चेहर्यावर हसु कायम रहो ! आमेन.
शिरात साखर टाकतच नाही. तरी तो
शिरात साखर टाकतच नाही. तरी तो आदि शिरा खातो.
आज हिने पण बरा चुडीदार घातलेला.
तो कोण रेसिपी विचारायला आलेला
तो कोण रेसिपी विचारायला आलेला शेजारी होता>> तो आदित्यच्या बहिणीचा नवरा आहे.
लग्नाअगोदर लो बिपी मुळे चक्कर
लग्नाअगोदर लो बिपी मुळे चक्कर आली, हनिमुनला आइस्क्रिम खाल्यामुळे सर्दी खोकला झाला, त्यानंतर पाय मुरगळला आणि आता शिरा करताना हात भाजला. या मेघानाला सारखे काही ना काही होत कसे असते?
काल ही शिरा करताना त्यात साखर घालायची विसरली. बीए झालेली आणि एमए करणारी मध्यमवर्गीय मुलगी असुनसुध्दा हिला साधा रोजचा स्वयंपाक सुध्दा करता येऊ नये? श्रीमंत घरात वाढल्याने घरी काम करायला १० नोकर असले तर समजु शकते. पण सरकारी नोकरी करणारे हिचे आईवडील असताना तिच्या आईने तिला किमान रोजचा स्वयंपाक करायलासुध्दा शिकवु नये हे पटत नाही. मी शाळेत असताना स्वयंपाक शिकायला सुरुवात केली होती. लेखकाने किमान इतका बावळटपणा तरी दाखवु नये.
त्या मेघनाला हसता सुध्दा येते हे आज पहिल्यांदा समजले.
या मेघानाला सारखे काही ना
या मेघानाला सारखे काही ना काही होत कसे असते?
>> त्याशिवाय त्या आदित्यला तिची काळजी घेऊन तिच्या मनात स्वतःची महान अशी प्रतिमा कशी तयार करता येईल? ह्यापुढेही तिच्यावर अशीच एक से एक संकटे येणार/ येतच राहणार आणी हा आदित्य तिला त्यातुन वाचवत/ सावरत राहाणार. आणी यातुनच मग मेघना हळुहळु त्या आदित्यच्या प्रेमात पडत जाणार.
हम्म्म्म्म्म.... दिल दे चुके सनम्म्म्म्म्म्म्म...
आदित्य (देसाई) आधीच
आदित्य (देसाई) आधीच मेघानाच्या प्रेमात पडलेला आहे. आता प्रश्न असा आहे कि हि मेघना त्या आदित्य (नगरकर) ला विसरून ह्या आदित्य (देसाई) ला आपलेसे करेल का?
शिरा कसा करायचा हे माहित नसले
शिरा कसा करायचा हे माहित नसले तरी आईला फोन करायच्या आधी या मेघनाने (आणि लेखकाने) माबोवरचा 'होणार सुन मी…'' हा धागा वाचला नव्हता का? तिकडे आधीच शिरा बनवण्याची पाककृती सांगितली आहे. किमान आमचा वेळ तरी वाचला असता.
सारिकाचितळे....तुमच्या सर्व
सारिकाचितळे....तुमच्या सर्व पोस्टींना अनुमोदन....स्वयंपाकवाल्या पोस्टीचे तर सहस्त्रवेळा अनुमोदन....कितीही श्रीमंत असले तरी आई मुलीला बेसिक गोष्टी शिकवतेच. त्यात शिरा कधी केलेला नसला तरी तो कसा करायचा हे सांगितलेले असतेच, अगं काही नाही एकदम सोप्पा आहे वगैरे प्रस्तावना करून.
बाकी मेघनाने नियमित मा.बो. वाचल्यास खास सुग्रुहिणींचे ' शिराच काय पण नारळी भात किंवा मुगाचे डोसे ' हे अवघड (!) पदार्थ करून मल्टिपल सासवा ( सासू शब्दाचे बहुवचन, चू.भू.द्या.घ्या.) आणि आजेसासू यांचे डोळे कसे दिपवायचे याचे प्रशिक्षण मिळेल.
बाकी मेघनाने नियमित मा.बो.
बाकी मेघनाने नियमित मा.बो. वाचल्यास खास सुग्रुहिणींचे ' शिराच काय पण नारळी भात किंवा मुगाचे डोसे ' हे अवघड (!) पदार्थ करून मल्टिपल सासवा ( सासू शब्दाचे बहुवचन, चू.भू.द्या.घ्या.) आणि आजेसासू यांचे डोळे कसे दिपवायचे याचे प्रशिक्षण मिळेल.>>
नारळी भात किंवा मुगाचे डोसे!
नारळी भात किंवा मुगाचे डोसे!
अरे बापरे, जिथे त्या मेघनाला शिरा आणि खिचडीसारखे साधे पदार्थ करायला येत नाहीत, तिथे नारळी भात किंवा मुगाचे डोसे खुप दुरची गोष्ट आहे.
माबो वाचायला लागली तर स्वयंपाकात लवकरच पारंगत होईल हेवेसानल.
हिला किमान चहा (तरी) करता येत असावा अशी अपेक्षा आहे. नाहीतर ऊद्या कोणी हिच्याकडे चहा मागितला तर ही लगेच आईला फोन करायची, चहा कसा करायचा हे विचारायला!
तो तिचा आदित्य (देसाई नव्हे,
तो तिचा आदित्य (देसाई नव्हे, तो अर्धी चड्डीवाला) नेमका आहे तरी कुठे?? फोनबिन पण नाही काही..आणि या मेघनाला साधा शेकहँड करायला पण प्रॉब्लेम आहे म्हणजे कमालच आहे बाई..एवढा चांगलं वागणार्या त्या मुलाशी मैत्री करायला काय हरकत आहे?? जाता येता सगळे एकच पालुपद, 'तू लकी आहेस बाई, असा नवरा मिळायला भाग्य लागतं,,'
रमा +१ कोणाचीही अशा मुलाशी
रमा +१
कोणाचीही अशा मुलाशी खुप मस्त मैत्री झाली असती.
बाकी स्वयंपाकाच्या बाबतीत, बायांनों असं असतं रिअल लाईफ मध्ये सुद्धा.
मी आत्ताच स्वयंपाक करायला शिकलेय. चोविसाव्या वर्षी.. आणि माझ्या अनेक मैत्रिणींना स्वयंपाकाचा स पण येत नाही.
गोडाचा शीरा मीही पहिल्यांदा केला तेंव्हा बिघडवला होता.
पण आपल्याला खिचडी येत नाही तर थोबाड पाडुन विचार करत बसण्यापेक्षा सरळ भाताचा कुकर लावावा इतकी अक्कल मला असली असती.
शीरा येत नाही तर आईला विचारण्यापेक्षा मी मोबाईलचं नेट चालू करुन गूगल सर्च मारला असता (मी हेच करते)
नाही तर मैत्रीणींना विचारलं असतं! पण बिचारीकडे माबोकर मैत्रिणी नाहीत सो जाऊ देत!
अरे ए असं नका म्हणू रे... मी
अरे ए असं नका म्हणू रे... मी सुद्धा लग्नाआधी ढ गोळा होते स्वयंपाकात... (कपभर चांगला चहाही न करता येण्याएवढी) इकडचं तिकडचं वाचून पाहून शिकले... [ कारण आता फक्त अभ्यासात लक्ष घाल असा आईचा दंडक! आणि पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतो तसंच स्वयंपाकाचं अशी समजूतही शिवाय मला स्वतःला फारशी आवड नव्हतीच]
हो पण मेघनाची आई जर नोकरी करणारी दाखवलेय तर तिला थोडंफार करता यायला हवं होतं असं प्राथमिक मत. सुतकी चेहरा, एक चमचा आईस्क्रीम एक घोट पाणी, नाजूकपणाचा कळस हे अगदी कैच्याकै...
गोडाचा शिरा आलाच पुन्हा!! पण मेघनाच्या मोठ्या दिराने तिला फार सुंदर समजावून सांगितलं. फार आवडलं ते. तिच्या जावेचे पंजाबी ड्रेस खूप्पच गबाळ्या कॅटॅगरीमधील आहेत. रंग तर बाप्रे आणि एकदम ढगळे... त्यामानाने मेघनाचे परवडले म्हणायला हवं.
हल्ली मुद्दाम लावून बसते ही मालिका... नवरा विचारत होता... खरंच एवढं गोडगोड सासर असतं का?? मी म्हटलं हो.. असतं तर!!! मी पाहीजे होते त्या मेघनाच्या जागी!! कुठे ठेऊ नी कुठे नको असं केलं असतं त्या सासूला पण सासर म्हणजे नशीबाचाच भाग! दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत. मेघनासारखा चेहरा करून सुस्कारा टाकणारी बाहुली...
मेघनासारखा चेहरा करून
मेघनासारखा चेहरा करून सुस्कारा टाकणारी बाहुली
बाकी पुर्ण पोस्टला मम
बाकी पुर्ण पोस्टला मम
कितीही श्रीमंत असले तरी आई
कितीही श्रीमंत असले तरी आई मुलीला बेसिक गोष्टी शिकवतेच>>
आईच का शिकवते? वडील नाही का शिकवत?
मुलीलाच का शिकवते? मुलाला नाही का शिकवत?
बेसिक गोष्टीच का शिकवते? अॅडव्हान्स्ड गोष्टी नाही का शिकवत?
मंजुडी +१००
मंजुडी +१००
मंजुडी +१०१ आई किंवा वडील,
मंजुडी +१०१
आई किंवा वडील, कोणीतरी शिकवले म्हणजे झाले.
मुलगी असो वा मुलगा, तिला/त्याला किमान रोजच्या गोष्टी तरी यायला पाहिजेत ना?
मुलीला आणि मुलालासुध्दा शिकवले पाहिजे.
बेसिक शिकवल्यावर (आणि जमल्यावरच) अॅडव्हान्स्ड गोष्टीं जमतील ना!
बाबाजीवाल्यांनी मेघनाच्या
बाबाजीवाल्यांनी मेघनाच्या लग्नासाठी एव्हढे कष्ट घेतले पण लग्न झाल्यावर कसं वागायचे, घरकाम वगैरे काही शिकविले नाही.(कुछ सिखाया नही..बस्स भेज दिया!)... तरी बरे अशी (स्वप्नातली) सासू मिळाली तिला ..नाहीतर सर्वात आधी सासूमुळेच बाहेर पडावं लागलं असतं मेघनाला.
dreamgirl &
dreamgirl & sonalist....अनुमोदन.... मेघनाच्या जागी असते तर कुठे ठेऊ अन कुठे नको असं केलं असतं त्या सासूला>>>>> अगदी अगदी....;)
आईच का शिकवते? वडील नाही का
आईच का शिकवते? वडील नाही का शिकवत?>>>>>>>>>>>>.. मला शिकवलेले बाबांनी.....
बाबाजीवाल्यांनी मेघनाच्या लग्नासाठी एव्हढे कष्ट घेतले पण लग्न झाल्यावर कसं वागायचे, घरकाम वगैरे काही शिकविले नाही>>>>>>>>>>>>>>>>>. तीला बाबाजी का ठुल्लु दिला......
Pages