लगोरी - मराठी मालिका
मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणार्या मैत्रीसारख्या अत्यंत पवित्र मानल्या जाणार्या नातेसंबंधावर भाष्य करणारी `लगोरी’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9.00 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारीत होत आहे.
`एंडेमॉल इंडिया प्रा.लि.’या निर्मितीसंस्थेची निर्मिती असलेल्या `लगोरी’ची संकल्पना अतुल केतकर यांची आहे. दिग्दर्शक गौतम कोळी यांच्या दिग्दर्शनाखाली सादर होत असलेल्या या मालिकेचे लेखन सचिन दरेकर आणि अमृता मोरे यांनी केले आहे.
`लगोरी’ ही धनश्री नावाच्या मुलीची आणि तिच्या चार मैत्रीणींची कथा आहे.