Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राजक्ता माळी मस्त अभिनेत्री
प्राजक्ता माळी मस्त अभिनेत्री आहे.. घाबरलेल्या, भेदरलेल्या कोकरासारखा अभिनय तिला छान जमतोय >> असे आधी मलाही वाटलेले. पण 'अरे बाबा, तिने डोळ्याला काही मेकप नाही केलाय म्हणून तशी वाटतेय ती' अशी कन्यकेनॅ ज्ञानात भर टाकली. एकदम पटले ते. डोळ्यात काजळ वगैरे घातले तर ही भूमिका आणि सुवासिनी मधली भूमिका यात तिने काहीच वेगळे केलेले नाहीये.
उदय टिकेकरचे पात्र डोक्यात जातय कारण तो सुंदर अभिनय करतो. तो पॉझीटीव्ह भूमिका आणि खलनायकी भूमिका तितक्याच सहजतेने करू शकतो - ते पण घारे, भेदक डोळे असताना.
मालिका अजून तरी पकड घेत नाहीये.
हो. हो. सानी बरोबर.
हो. हो. सानी बरोबर.
धन्यवाद सानी. 'अरे बाबा,
धन्यवाद सानी.
'अरे बाबा, तिने डोळ्याला काही मेकप नाही केलाय म्हणून तशी वाटतेय ती' अशी कन्यकेनॅ ज्ञानात भर टाकली. >>>मला ही पटले.
श्री न जानूचे लग्न झाले. आता या रविवारी आदित्य आणि मेघनाचे लग्न दाखवतिल.....महाएपिसोड!
उद्याला
उद्याला महाएपिसोड...
पार्श्वसंगीत पण हदिदेचुस (हम दिल दे चुके सनम) पण वापरलेले आहे....
पण मला तरी हे पटले नाही. जे काही आहे ते लग्नाआधी सांग ना बाई...
लग्नाचा बट्टा का त्या चांगल्या मुलाला आणि मानसिक त्रास त्या कुटुंबाला...?
आणि जाहिरातीत दाखवलेय की तो
आणि जाहिरातीत दाखवलेय की तो फुल्ल तयारीत सुहागरातीच्या, आणि बाईसाहेब एकदाचं तोंड उघडतात, 'माझं दुसर्या कुणावरती तरी प्रेम होते.'...काय पण वेळ साधलिये..
उदय टिकेकर मस्त काम करतोय या
उदय टिकेकर मस्त काम करतोय या मालिकेत. जबरी बेअरिंग ठेवलय त्याने बाबाजी म्हणत हात डोक्यावर नेण्याचं. आणि इमोशनल सीन्सही क्यूट करतोय. छान लिहिलय त्याचं कॅरेक्टर. गिरिश ओकलाही सूर लागलाय या मालिकेत चांगला. नाहीतर बरेचदा तो डोक्यात जातो. मुख्य जोडीपैकी कोणीच आवडलं नाही. बाकी कलाकारही मागच्या पानावरुन पुढे अभिनय करताहेत.
कालच्या भागात काय झालं ?
कालच्या भागात काय झालं ?
इफ आय अॅम नॉट मिस्टेकन, काल
इफ आय अॅम नॉट मिस्टेकन, काल साग्रसंगीत लग्नविधी, बिदाई वगैरे पार पडले असावे. (जर मी म्हणतो ती हीच मालिका असली तर). सप्तपदीच्या वेळी प्रत्येक पावलाला गुरुजी इल्लॉजिकल तत्वज्ञान मांडत होते आणि ती नववधू वाळत टाकलेले कपडे निथळावेत तशी रडत होती. नंतर बिदाईला एक रूदनाचा कार्यक्रम स्वतंत्ररीत्या झाला. त्या वधूचे रडणे पहून हे लग्न आहे की...... असे मनात आले.
असो!
ही ती मालिकाच नसली तर माझा फाऊल समजून मला माफ करा.
Meghna ani Janhavi doghinche
Meghna ani Janhavi doghinche Manglsutra pan same aahe.
चांगली चालेय मालिका . आवडतेय
चांगली चालेय मालिका . आवडतेय
ओके, प्रोमो मधे दाखवत होते तो
ओके, प्रोमो मधे दाखवत होते तो डायलॉग झाला का ? "माझं दुसर्या कोणावर तरी प्रेम होतं हा" ?
बाकी हे लग्न आणि रडारडी बघून माझी ५ वर्षांची मुलगी म्हणते - मी लग्न झालं तरी आई-बाबा तुमच्या बरोबरचं राहणार, दुसरीकडे जाणार नाही , हे अगदी रडत रडत आणि
तिच्यासमोर टीव्ही बघणं कमी करावं हाचं उपाय दिसतोयं............
तो डायलॉग झाला का ? "माझं
तो डायलॉग झाला का ? "माझं दुसर्या कोणावर तरी प्रेम होतं हा" ?
प्राजक्ता- शिरीन मला हि तेच विचारायचं होत. काल एक तासाचा भाग होता .तो चुकलाच
ओके, प्रोमो मधे दाखवत होते तो
ओके, प्रोमो मधे दाखवत होते तो डायलॉग झाला का ? "माझं दुसर्या कोणावर तरी प्रेम होतं हा" ?<<<
त्या संवादाच्या वेळी आजूबाजूला असलेले नेपथ्य पाहून असे वाटते की तो संवाद पहिल्या रात्री एखाद्या अणूबॉंबप्रमाणे पेरलेला असावा.
तेथपर्यंत कालची रडारडी पोचली नाही.
(चला, म्हणज एमी जे पाहिले ते रेशिमगाठीच होते तर)
बेफी काल मी सुद्धा पाहीलं
बेफी
काल मी सुद्धा पाहीलं नाही. प्रोमोमधे दाखवत आहेत तसं ती त्या बिचार्याला पहिल्या रात्री खरंच म्हणाली असेल तर आधीच अजिबात न आवडणारी ती कोण जी हिरॉइन आहे ती डोक्यातच जाणार.
बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या
बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या मालिकेवर
सुजा
सुजा
शर्मिला +१ हो पुर्ण भागात
शर्मिला +१
हो पुर्ण भागात नवरी मुलगी रडत असते. गळ्यात मंसू घालताना तर गच्च डोळे मिटून बसली होती. कोणीही बघून विचारले असते कि हिला काय झालेय?
या भागात शेवटी सांगते ती कि मा दु मु प्रे होतं म्हणून......
तेव्हाच त्याने तिला परत घरी पाथवून द्यायला हवे
हम दिल दे चुके सनम वर
हम दिल दे चुके सनम वर जाणार का?
ह्या सर्व मराठी मालिकेतील नायिका बुटक्या, जाड्या एकदम...
ती जान्हवी आहे की उंच आणि
ती जान्हवी आहे की उंच आणि शेलाटी वगैरे.
एक बघताय का? होणार सुन मी य
एक बघताय का?
होणार सुन मी य घरची - कल्पना थोडीशी सास बिना ससुराल सारखी
एका लग्नाची तिसरी गोष्ट - सजन रे झुठ मत बोलो
आणि ही रेशिमगाठी - थोडीशी ससुराल गेंदा फुल
नाही वाटतेय का असं?
पतीनी पत्नीच्या प्रेमाचा आदर
पतीनी पत्नीच्या प्रेमाचा आदर करावा......हा गुरुजींचा सल्ला आदित्य मनावर घेणार असं वाटतय......
हल्ली लग्नातही दाढी न
हल्ली लग्नातही दाढी न करण्याची लाट आलीये का? हा आदित्यही लग्नात दाढी न करताच
मला वाटतेय ही स्टोरी धडकन
मला वाटतेय ही स्टोरी धडकन सारखी पण होउ शकेल....
ही आधी त्याच्याशी फटकुन वागेल...मग त्याची अच्छाईया बाहेर निघतील....मग ही त्याच्या प्रेमा बिमात पडेल...मग त्यांची गाणी होतील...मग सुखाच्या क्षणी तो तिचा बॉफ्रे येइल आणि मग खुन्नस , हीचे रडणे , नवर्याचे समजुन घेणे...घरातल्यांना पण अजुन कशा तरी टेन्शन मधे घालणे.....
र च्या क ने तो ललित बदाणे
र च्या क ने तो ललित बदाणे कस्सल्ला क्क्य्युट्ट दिसतो नै????
हल्ली लग्नातही दाढी न
हल्ली लग्नातही दाढी न करण्याची लाट आलीये का? हा आदित्यही लग्नात दाढी न करताच>>>>> अंजली माझ्या ही नवर्याने नव्हती केली... मधे शिवाजी राजांसारखी दाढी ठेवायचं भुत सवार झालं होतं...मग रागवुन...लग्न मोडाबिडायच्या धम्क्या देउन....महाराज कट ला कट मारुन फ्रेंच पर्यन्त ते फॅड आणलं होतं मी............
महाराज कट ला कट मारुन फ्रेंच
महाराज कट ला कट मारुन फ्रेंच पर्यन्त ते फॅड आणलं होतं मी..........<<<
र च्या क ने तो ललित बदाणे
र च्या क ने तो ललित बदाणे कस्सल्ला क्क्य्युट्ट दिसतो नै?>>>> कोण आहे हा?
प्लीज आपण या मालिकेवर पुढची
प्लीज आपण या मालिकेवर पुढची चर्चा ईथे करु या का?
http://www.maayboli.com/node/46946
सॉरी पण आधी मी या नावाचा धागा शोधला पण मीळाला नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरु केला.
अनिश्का भारीच की गं
अनिश्का भारीच की गं
स्टोरी लाइन हम दिल दे चुके
स्टोरी लाइन हम दिल दे चुके सनमची वाटतेय
Pages