जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणी आ.दे. चा मते 'किती निष्पाप आहे हि'.
काय रे देवा...अरेय मुर्खा महा तयारिचि आहे ति....

मला तर वाटले,काल चा एपिसोड ला कोणि वाक्यं लिहुन दिलि नव्हति म्हणुन आ.दे.(निष्पाप) आणि प्रा.मा.(शिर्याने पोट बिघडणे) तोंडाला येइल ते बरळले आणी बाकि अनुभवि कलाकार काम चलाऊ वागले

<<ईव्हन होसूमीयाघ मध्येसुद्धा इतकी पात्रे, इतकी उपकथानके असताना कथा फुलवण्याचे किती प्रचंड पोटेन्शिअल उपलब्ध आहे. पण एक लक्ष्मीकांत ह्या विषयावर आठवडेच्या आठवडे चाललेले आहेत. ऑडियन्स इज फूल हे एकच तत्व अंगी बाणून लिहितात की काय कथा?

नो वंडर - क्राईम पॅट्रोल सारख्या वास्तव कथा केव्हाही अतीसरस ठरतात ह्यांच्यापेक्षा!>>

खरंय तुमचं! दर्जा असा काही राहिलाच नाहीये.
मी हल्ली या मराठी मालिका बघायचं सोडूनच दिलंय. कधीतरी एखादा भाग बघते. त्यापेक्षा हल्ली अमेरिकन/बीबीसीच्या मालिका जास्त बघायला आवडतात.

आज फष्ट टाईम पहिला एक भाग . परमेश्वरा, पांडुरंगा , इठ्ठला , मायबापा ......अरे मी कुठे डोक आपटू रे ...

प्रेम आंधळच नाही तर मूक, बहिर, पांगळ अजून ज्या काही व्याधी असतील ते सगळ असतच अस पटलं आहे . एवढ प्रेम करणार सासर , नवरा असताना अशी दुर्बुद्धी फक्त प्रेमग्रस्त लोकांनाच होऊ शकते . गाढवाला गुळाची चव काय तर काय जागी नाय असंच वापरलं पाहिजे .

एक बै त्यांच्या देवाला प्रार्थना करत होत्या मेघनाला पेपर सोप्पा जाऊ दे . मनात म्हटलं काकू पेपर नेहमी गठ्ठ्यातून जातो .
मित्र बिचारा जीव तोडून म्हणतो कि बाबा ये परिक्षा दे तर ह्याचं भलतंच मग मेघनाच्या नावाने ते तयार होतात.जाता जाता मेघनाच्या पेन मुळे चमत्कार होऊन हे महाशय पास होणार असे संकेत त्यांनी दिले आहेत . नेमक ते वाक्य दुसरा आदित्य ऐकतो .
बाकी सुकन्या कुलकर्णी , गिरिश ओक यासारख्या लोकांना अस काम करताना पाहून खूप आणि मनापासून वा ई ट वाटल . उगीचच फालतू विनोद करायचे आणि हसायचे . कसतरीच वाटल . असो .

बरं झालं नाही बघितला भाग. परवा शिरा प्रकरण इतकं डोक्यात गेलं की वाटलं, समजा हिला पेपर लिहिता नाही आला तर त्या साजूक तुपातल्या शिऱ्यावर खापर फोडायची.

कुणी कोडे माझे उकलील का? फा.च. दुसर्‍या कॉलेजात होता ना? आणि वरच्या वर्गात? आता त्याचं कॉलेज संपलंय बहुधा. मग मे.दे. च्या कॉलेजात कसल्या परीक्षेला आला होता? का कोणाच्या बदली प्रॉक्सी म्हणून आलेला?

आधी दाखवल्याप्रमाणे आ. न. उर्फ फा. च. मेघनाच्या कॉलेजमध्ये नाटक बसवायला यायचा. सुरुवातीला मेघनाच्या बाबाजींनी म्हणजे बाबांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास सोडुन इतर अवांतर गोष्टीत लक्ष घातल्यामुळे तो नापास झाला आणि मेघना एम. ए. करता पुढे गेली तरी हा अजुन शिकतोच आहे. पण लेखक बहुदा हे विसरल्यामुळे आणि प्रेक्षकही विसरले आहेत असे गृहीत धरून मेघना आणि आन एकत्र दाखवले आहेत.

हा. मग बरोबरे! म्हणजे नवरा सीए आणि मित्र एक कलाकार असणं हे फार स्मार्ट असल्याचं लक्षण आहे!

हो ज्योती, मेघना खूपच smart आहे. इतका चांगला नवरा, हातात सर्व देणारी एवढंच काय भरवणारी सासू, आयता मिळणारा डबा हे तिला सोडवत नाहीये आणि त्या नवऱ्यापुढे आदु आदुचा जप पण करता येतो, नशीबवान आहे. आदुबरोबर गेली तर फरफट होणार, इथे सर्व आरामात चाललंय.

माझे मन मधल्या सासूसारखी सासू हवी होती तिथे शुभ्राला सकाळी स्वयंपाक करून स्वतःचा आणि नवऱ्याचा डबा करून कॉलेजला जायला लागतं (sorry अवांतर). इथे मेघनाला डबा आयता मिळतो आणि सतत चुका करून चुका पदरात घालतात. फक्त अर्चना तेवढी बोलते तर बाकीचे तिलाच बोलतात.

काही प्रतिसाद वाचून तर आता असे वाटू लागले आहे की एक पन्नास टक्के महिला वर्ग त्या मेघनाच्या सुदैवावर जळतोच आहे. शिरा भरवणारी सासू, वाट्टेल ते अ‍ॅकोमोडेट करणारे सासर, संयमाचा पुतळा नवरा, घरकामाऐवजी अभ्यास करायला नुसती मुभाच नव्हे तर अभ्यास कर असा आग्रह आणि वर बाहेर एक जुना (नवर्‍याने अधिकृत ठरवलेला) प्रेमिक!

कोणत्या स्त्रीला नको वाटेल इतके रोमँटिक आणि फ्री आयुष्य!

(:दिवा:)

हो बेफि Happy सगळ्या जळताहेत . कारण इतके सगळी समजूतदार माणस ह्या गोगलगाईच्या वाट्याला ?
नाही पाहवत आम्हाला. नाही पाहवत Lol

कोणत्या स्त्रीला नको वाटेल इतके रोमँटिक आणि फ्री आयुष्य!>>> आम्हाला, आम्हाला नक्को वाटेल असले फ्री आयुष्य. अहो बेफि त्या फदुकलीवर कोण कशाला जळेल्?:फिदी: उलट सुमो आणी गिओ ची किव यायला लागलीय आता.:फिदी:

देवा! ही असली डोम्बारीण सुन ( दोन डगरीवर पाय ठेवणारी) देव कुणाला न देवो, आणी त्या तुतिमी मधल्या मन्जिरीसारखी बहीण कुणाला न देवो, जी सख्ख्या बहिणीवरही विश्वास ठेवत नाही आणी आपल्या सन्साराचे वाटोळे करुन घेते.:फिदी:

बेफी याला चणे आहेत तर दात नाहीत आणि दात आहेत तर चणे नाहीत असं म्हणतात Wink आता चणे आणि दात दोन्हींचा समसमा योग असणारे अतिभाग्यवान विरळाच नै का!! Happy (दात चणे कुठले ते आपापल्या अनुभवावर ठरवावेत Wink )

शब्दच नाहीत....सर्व रिअ‍ॅक्शन योग्य......बादवे तो शिरा भरवताना चमच्यात कित्ती मोठ्ठं ढेकुळ घेतलेलं सुमो ने?? माझा नवरा बोलत होता भर एकदाच तीच्या तोंडात ते आणि पेपर लिहीता लिहीता पोटात कळ येउदेत तीला......
आणि त्या विजयाने खरच ट्रिटमेन्ट घ्यावी पिंपल्स साठी...बघवत नाही तिच्याकडे

प्रतिक्रिया व्यक्त करताना कृपया शब्दांवर नियंत्रण असू द्या. हा सार्वजनिक फोरम आहे हे ध्यानात ठेवा.

manju + 1

किती त्या बायका जळतात मेघूवर. तुम्हाला मिळत नाही शिरा भरवणारी सासू वगैरे म्हणूनच ना? Wink

मला अजूनही आई भरवते शिरा वादिला.

एकदा आक्षेपार्ह शब्दांची यादी बनवा आणि प्रसिद्ध करा. हल्ली कुठल्या शब्द मुळे भावना दुखावतील कळेना झाले आहे.>> मलाही नाही समजलं कुठले प्रतिसाद डिस्गस्टींग वाटले ते... Uhoh मला खरंच नाही समजलं.

माझ्या प्रतिसादानंतर अनिश्काने तिचा प्रतिसाद एडीट केलेला आहे. आमच्या दोघींच्या प्रतिसादांची वेळ पाहिली तर हे सहज लक्षात येईल.

अशिष्ट आणि असभ्य शब्दांची यादी मायबोलीवर प्रसिद्ध करण्याची वेळ कधीच न येवो.

ओह मी उशीरा पाहीलं...

अशिष्ट आणि असभ्य शब्दांची यादी मायबोलीवर प्रसिद्ध करण्याची वेळ कधीच न येवो.>> मान्य Happy

<अशिष्ट आणि असभ्य शब्दांची यादी मायबोलीवर प्रसिद्ध करण्याची वेळ कधीच न येवो<> + १००००
कसं असतं, आपल्या निकटवर्तियांमधे बोलणे, आणि एका पब्लिक फोरम वर बोलणे, यात फरक असतो. त्या फरकाची जाण ज्यांना आहे, आली, येईल ते खरे सुजाण.

मंजूडी यांचा आणि अनिश्कांचा प्रतिसाद एकाच वेळी होता आणि तो नंतर तिने एडीट केला हे मंजूडी ने सांगितले म्हणून समजले आणि तिने( अनिश्काने ) लगेच तीन मिनिटात एडीट केला आहे हेही समजले पण पेट थेरपीन चा प्रतिसाद मंजुडी यांच्या प्रतिसादानंतर जवळ जवळ अर्ध्या तासाने आहे. त्यामुळे त्यांना कुठला प्रतिसाद डिस्गस्टींग वाटला ते समजलेच नाही.
आणि कुठला प्रतिसाद कुणाला आक्षेपार्ह्य वाटतो तर कुणाला नाही वाटत त्यामुळे हे ठरवणार कोण ?

Pages