जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफी, मेघना खूप आवडते ना? उगाच फोटो वगैरे शोधून टाकताय... असु द्या असु द्या. पहले इन्कार फिर प्यार. Proud

बेफी .. Lol
टीप ३ - तिला एखाद्या आय पी एल सामन्यात चीअरगर्ल म्हणून घेतले गेले तर ती टूर्नामेंट रद्द करून दाखवण्याची क्षमता तिच्यात आहे. >> Rofl

मी काही विचारले तर चालेल का? Happy माझ्या माहिती प्रमाणे आन मेघनाच्या कॉलेज मधे नव्हता. तो मेघनाला सिनियर होता. त्याला नाटकात रस होता म्हणुन तो नाटक बसवायला फक्त मदत करायचा.

हो ते शिरा प्रकरण डोक्यात गेले एकदम.
काय ते माईच्या मांडीवर झोपणे, शिरा खाल्ला तर मला काही होणार नाही ना म्हणे. मुर्ख आहे ती. आणि तिला सहन करणारे पण.त्यातल्या त्यात अर्चनाच्याच प्रतिक्रिया मस्त वाटल्या, real वाटल्या.

मी कालचा एपिसोड शेवटची पाच दहा मिनिटे राहिलेली असताना पाहू शकलो. तेही त्या आय पी एल चा टाईम आऊट आला होता म्हणून स्विच झालो होतो.

त्यामुळे शिरा प्रकरण पाहण्याचे दुर्दैव माझ्या ललाटी गोंदलेले नव्हते.

कोणीतरी कृपया साद्यंत हकीगत वर्णिता का शिरा प्रकरणाची?

धन्यच वाद!

त्यातल्या त्यात अर्चनाच्याच प्रतिक्रिया मस्त वाटल्या, real वाटल्या.
>>>>> कालचा एपिसोड अर्चुचाच होता.
तिचा डायलॉग, अगदी जोरात, " ए ती माझी माई आहे, ती मला भरवणारच. अधुनमधुन तुला भरवत जाइल" मस्तच होता.
अजुन बरेच बोलली तिला.

मेघनाच नाव बदलून मंदाकिनीच ठेवा मग Happy

एवढ्या पोस्टींवरुन शिर्‍याचा पांचटपणा लक्षात आला.

मी कालचा एपिसोड शेवटची पाच दहा मिनिटे राहिलेली असताना पाहू शकलो. तेही त्या आय पी एल चा टाईम आऊट आला होता म्हणून स्विच झालो होतो.
>>> सेम हिअर!
आमच्या घरात लैच फॉलोअर आहेत या मालिकेचे.

मेघनाला परीक्शेचे टेन्शन येते. मेघना रडते. आ.दे माईला बोलावतो. मेघना माईच्या गळयात पडून रडते. मांडीवर डोके ठेवून झोपते. माई अर्चुला बोलावून "साजुक तुपातला शिरा " करायला सांगते. ह्या special treatment चा अर्चु ला राग.. मग विजया शिरा करते. माई खुद अपने हाथोसे मेघना को शिरा खिलाती हे.
ह्यासगळ्यात कहर म्हण्जे मेघना माईना विचारते 'हा शिरा खाऊन मला काही होणार नाही ना???'

ह्यासगळ्यात कहर म्हण्जे मेघना माईना विचारते 'हा शिरा खाऊन मला काही होणार नाही ना???'<<<

काय??????

हे दाखवलं? काय पटकथा आहे का काय आहे?

आता देव्हार्‍यात ठेवा तिला आणि रोज आरती करा, ते एक राहिलेलं आहे.

फॉर बेफि (तसही आज विषेश काम नाही मला Wink )

सकाळी आदे उठला तो मंदाच्या रडण्याच्या आवाजानेच. ती रडत होती (तस काही कारण लागत नाही तिला रडायला) पण तात्कालीन कारण अस होत कि तिला अस वाटत होत कि तिचा अभ्यासच झाला नाही. (२-२ आदित्य डोक्यात असल्यावर काय डोंबलाचा अभ्यास होणारेय ?)
तेव्हा आदे तिला समजावतो तसच येडपट पण न्हणतो (आताशी त्याला तिची खरी ओळख पटलीय अस वाटतय).
मग माईंना बोलावून आणतो तेव्हा मंदा माईंना मला सोडून जाऊ नका असा हट्ट करून त्यांच्या मांडीवर डोक ठेऊन झोपते. तेव्हा माई अर्चनाला हाक मारून साजुक तुपातला शिरा कराय्ला सांगतात. अर्थातच यामुळे अर्चुचा पारा चढतो तरीही ती शिरा करायला जाते.
( पण साजुक तुपातला न करता वनस्पती तुपातला करते अस आमच निरिक्षण. कारण
१. ते वनस्पती तुपासारखचं दिसत होत.
२. तुप उलथण्याने काढलेल मी तरी अजुन बघितलेल नाही. असो )

मग तिची बडबड ऐकुन विजया तिथे येते अन तिला समजावते कि एकदा बाबाजींचा चेहरा डोळ्यासमोर आण म्हण्जे तुला कळेल माई तिला इतक का जपतात ते.
तो शिरा माई तिला भरवतात ते पाहुन अर्चुच्या मस्तकात तिडिक जाते अन ती बाहेर हॉलमध्ये जिथे इतर सगळे बसलेले असतात तिथे जाते. तिचा आवेश पाहुन सगळे समजतात कि काहीतरी झालय. माई बाहेर येतात तोपर्यंत विजया सगळ्यांसाठी शिरा घेऊन येते व माईंनी तो अर्चुला भरवावा अस सुचवते. अर्चु मग खुश होते. पण मेघना ते पाहुन माई तुम्ही ताईंना का भरवताहात असे विचारते.
बाकीचे मी लिहिले आहेच वर.

अशक्य मूर्खपणा चाललेला आहे. कहर झाला.

एक कथानक गंभीरपणे हाताळणे ह्यापासून आपण लोक इतकी फारकत का घेतो? कोणत्या जमान्यातील प्रेक्षक असतात असे आपण समजतो?

खरे तर आत्तापर्यंत दोन्ही आदित्यंचा एक परिपक्व संवाद झडायला हवा होता. लग्न म्हणजे थट्टा नव्हे, दोन्ही डगरींवर चालणे अयोग्य आहे वगैरे मुद्दे निघायला हवे होते. मेघनाला लग्नाच्या आदित्यला सोडून आधीच्या आदित्यकडे जाऊन भ्रमनिरास किंवा तत्सम काहीतरी झालेले दाखवायला हवे होते. लग्न ही संस्था परीपूर्णच आहे हा समज वाटतो तितका खरा नाही हा मुद्दा तरी सरफेसवर आणला जायला हवा होता.

अजूनही वेळ गेलेली नाही. पण खरंच फालतूपणा बंद व्हायला हवा आहे.

ईव्हन होसूमीयाघ मध्येसुद्धा इतकी पात्रे, इतकी उपकथानके असताना कथा फुलवण्याचे किती प्रचंड पोटेन्शिअल उपलब्ध आहे. पण एक लक्ष्मीकांत ह्या विषयावर आठवडेच्या आठवडे चाललेले आहेत. ऑडियन्स इज फूल हे एकच तत्व अंगी बाणून लिहितात की काय कथा?

नो वंडर - क्राईम पॅट्रोल सारख्या वास्तव कथा केव्हाही अतीसरस ठरतात ह्यांच्यापेक्षा!

मेघनासारख्या मुलींना आम्ही 'मंदाकिनी' म्हणायचो कॉलेजमधे असताना >>

ती अजिबात मंद नाहिये
उलट चांगलीच स्मार्ट आहे , सतत वाकड़ थोबाड़ करून बसायच आणि सगळ्यांना कस वापरून घ्यायच ते तीला बरोबर समजत
आणखी दोन वर्ष तरी ती काही निर्णय घेणार नाही ,ती बहुदा आदु बाळ सेटल होण्याची वाट बघतेय
तो पर्यंंत आ. दे च्या घरातून हलणार नाही।
आता आदु कड़े गेली तर खाणार काय
बाबाजीचा भक्त तर घरात घेणार नाही
बरय मस्त खायो ,पियो ऐश करो
अधून मधून एरंडेल प्यायल्यासारख तोंड करून सॉरी आणि थॅंक यू म्हटल की झाल
एक कानाखाली द्यावीशी वाटते तिच्या

साहेब कलेक्शन !

आज मेघना बॅडमिंटन खेळायला शिकली
ते फक्त साहेबांच्या महिला धोरणामुळेच !

आज मेघना साजूक तूपातला शिरा खाऊन (पचवून) परिक्षेला जाऊ शकली
ते फक्त साहेबांच्या महिला धोरणामुळेच !

आज मेघना अधून मधून थोडसंच का होईना पण हसू लागली
ते फक्त साहेबांच्या महिला धोरणामुळेच !

Wink

मी पण कालचा पूर्ण एपिसोड नाही बघू शकले Happy
<<तेव्हा आदे तिला समजावतो तसच येडपट पण न्हणतो (आताशी त्याला तिची खरी ओळख पटलीय अस वाटतय).>> Lol

शिरा प्रक्रण वाचूनच मेघनाची उर्फ मंदाकिनीची राग नव्हे तर कीव (आणि वृत्तीची किळसही) यायला लागलेय... श्शीSSSS!!
अभ्यास झाला नाही म्हणून रडणे व माईंच्या मांडीवर डोके ठेवणे इथपर्यंतपण ठीक पण
शिरा खाऊन मला काही होणार नाही ना? आणि माई तुम्ही ताईंना शिरा का भरवताय!!!! अरेरे!! सहनशक्तीला सलाम... देसाई कुटुंबाच्या (स्पेशली अर्चूच्या... नुस्त्या त्राग्यावर थांबलेय... तिच्या स्वभावाची दुसरी नणंद असती तर बरोब्बर धारेवर धरलं असतं.) आणि येथील वाचक जे नियमित हे उसासे हो हो होहो होहो, नवनवीन चिवित्र पदार्थ, मंदाकिनीचे अगम्य आणि अत्यंत रटाळ नखरे पाहतात त्यांच्याही सहनशक्तीचे अपार कौतुक... tusi great ho.gif

स्वप्नसुंदरी,

मला ह्या प्रकारच्या कथानकांवर सविस्तर लिहावेसे वाटत आहे. 'ह्या धाग्यावरील एक प्रतिसाद' ह्यापेक्षा अधिक व्याप्तीचे मुद्दे त्यात असल्याने ते वेगळे लिहावे की येथेच लिहावे हे ठरलेले नाही. तरी सर्वजण हा धागा वाचत असल्याने येथे लिहिणे अधिक सुलभ ठरेल असे वाटते.

समजा आदित्य देसाईने घरी सांगितले की मेघनाचे आदित्य(२) वर प्रेम आहे आणि मी त्याला तिच्यासाठी सोडुन देणार आहे.(म्हणजे त्याच्याकडे सोडुन येणार आहे).

नॉर्मल आईची रीअ‍ॅक्शन - आपल्या मुलाला असा त्रास देणार्‍या मेघनाच्या झिंज्या उपटणे..

सुकन्याची रीअ‍ॅक्शन -
लब्बाडा , इतके दिवस लपवुन ठेवलेस ना आमच्यापासुन..
हो रे..बघ पोर कशी कोमेजुन गेली आहे..फार गुणाची आहे हो पण..इतके महिने झाले पण तुझ्याशिवाय आम्हा इतर कोणाला काही त्रास होउ दिला नाही. कसे काढले असतील तिने हे दिवस कल्पनाच करवत नाही. ते काय ते घटस्फोटाचे कागदपत्र वगैरे बनवायचे ते सुरु कर. सगळे कसे गुण्यागोविंदाने व्हायला हवे. नंतर आपण नानांना, इतर सगळ्यांना आणि मुख्य म्हणजे इतर भाडेकरुंना सांगु. त्यांना आपल्या घरगुती गोष्टीत किती रस आहे हे तुला माहित आहेच. बर चल.. चहा टाकते.. मेघना यायची वेळ झाली ना.. आपण तिला सरप्राईझ देउ या >>>>>>>>>११११११११११११
--------------------------------------------------------------------------------------------------------
नाही फ़क्त एवढ्यावर थांबणार नाहीत हे देसाई

मेघनाने आ दे ला घटस्फोट दिल्यावर तिचे वडील तिला घरात घेणार नाहीत
त्यामुळे नाना आणि माई मेघना आणि आदु दोघांच लग्न लावून देतील
मेघनाला मुलगी मानून तीच कन्यादान करतील
आणि आ, दे , एका बाजूने अंतरपाट धरेल
मग मेघना माईच्या गळ्यात पडून रडेल ,आणि रड़क्या तोंडाने सॉरी आणि थॅंक यू म्हणेल

आणि ख़ास सरप्राइज म्हणून मेदु ( मेघना आणि आदु ) च्या सुहागरात साठी खोली सजवतील

आणि निर्लज्ज मेदु एरंडेल प्यायल्यासारख थोबाड़ करून पुन्हा एकदा थॅंक यू म्हणतील

काळजी नसावी... नवीन धागा उघडून त्यात या धाग्याची लिंक पोस्टलीत वर आणि इथे कमेंटमध्ये नवीन अपडेट्सची रिक्षा फिरवलीत तरी चालतंय बघा... धावतंय...
इथे सगळ्या कमेंटस ची खिचडी होतेय... तिथे फक्त बेफी इष्टाईल वाचायला मिळेल... काय बोल्ताय Happy

मेदु Biggrin

कालचा शिरा भरवण्याचा भाग पाहिला. कसे तरीच झाले. आमच्या पिढीतल्या मुलींचे सासू ने कधी असे लाड केले नाहीत. म्हणून कदाचित ही सासू ओव्हर करेक्षन करते आहे कि काय असे वाट्ते. नणंदेचे पात्रच खरे वाट्ते.

थोरली जाऊ हिचा चेहरा किती पिंपल्सने भरलेला आहे. मेकपने देखील झाकला जात नाही ह्या बायका काळजी घेत नाहीत का स्किनची? पुढचा एपिसोड पेन लक्की लक्की पेन असणार.

हाईट होती. ही बदकम्मा शिरा खायच्या आधी विचारते की मला याने काही होणार तर नाही ना.:राग: माझ्या सासु- कम अहो आई तशा गरीब असल्या तरी समज असा प्रश्न त्याना कुणी विचारला असता तर ( मी नाही ह, मी नाही) त्यानी आधी विचारले असते की तुझ्या माहेरी शिरा बनवत नाहीत का?:अओ::फिदी:

बेफिकीर तुम्ही दोन शिरीयली एकत्र करुनच टाका. तसेही ई टिव्हीवर मागे ती सुनील बर्वेची भैरव पात्र असलेली एक सिरीयल जी होती ना, त्यातली हिरॉईन आधीच्या सिरीयलमधून एकदम भैरव मध्ये घुसली, जशी दारातुन पाल किन्वा घुस यावी तशी. मला तर कित्येक दिवस थान्गपत्ता लागत नव्हता की काय चाललय ते.:अओ:

पोरगी कार्टुन बघते आणी साबु ई आणी झी तळ्यात मळ्यात करुन बघतात, त्यामुळे विचारायची सोय नाही. इथले अपडेट्स वाचल्यावर थोडे थोडे कळते.:फिदी:

नाही फ़क्त एवढ्यावर थांबणार नाहीत हे देसाई

मेघनाने आ दे ला घटस्फोट दिल्यावर तिचे वडील तिला घरात घेणार नाहीत
त्यामुळे नाना आणि माई मेघना आणि आदु दोघांच लग्न लावून देतील
मेघनाला मुलगी मानून तीच कन्यादान करतील
आणि आ, दे , एका बाजूने अंतरपाट धरेल
मग मेघना माईच्या गळ्यात पडून रडेल ,आणि रड़क्या तोंडाने सॉरी आणि थॅंक यू म्हणेल

आणि ख़ास सरप्राइज म्हणून मेदु ( मेघना आणि आदु ) च्या सुहागरात साठी खोली सजवतील

आणि निर्लज्ज मेदु एरंडेल प्यायल्यासारख थोबाड़ करून पुन्हा एकदा थॅंक यू म्हणतील

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग २
आदु सध्या स्ट्रगल करतोय त्यामुळे मेदु देसाई वाडीत भाड्याने राहतील
स्वयंपाकाची काही काळजी नाही ,कारण नवी आई उर्फ़ माई रोज आयता डबा पाठवेल

कारण त्यांना माहितीये त्यांची पोरं किती नाजुक आहे
डब्यात शिरा ,पोहे ,थालीपीठ कधी कोथिम्बीर वड़ी
कधी कधी सरप्राइज म्हणून चक्क पालक पनीर किंवा मक्के दी रोटी आणि सरसों दा साग
पण मेघनाला डबा रोज घासावा लागेल त्यामुळे पाठ आणि कम्बर दुखणार
मग मेघना रडायला लागेल ,आदु ला म्हणेल की आपण घरकामाला बाई ठेवूयात
पण आदु कड़े पैसे नाहियेत त्यामुळे दोघांचे भांडण
मग मेघना पुन्हा रडत बसेल तिचा परम मित्र अर्थातच आ,दे , तिला रडताना पाहुन तिची चौकशी
करायला येईल
मग ही बया त्याला सगळ सांगेल , ते ऐकून आ,दे अस्वस्थ
मग तो मेदू ची मदत करायची ठरवेल
आदे सी. ए . आहे नेमकाच एक फिल्म प्रोड्यूसर आदे चा क्लायंट असेल
प्रोड्यूसर कानडी असेल ( आदे अधून मधून बंगलोरला कामासाठी जातो )
तेव्हा आदे त्याला सांगेल की महाराष्ट्रात आदु नावाचा एक अतिशय उत्तम संगीतकार आहे
त्याला संधि दे हीच माझी फी
त्याला सांगेल की माझे नाव आदु ला कळता कामा नये
मग एक दिवस अचानक आदुला बंगलोरहून फोन ( त्या प्रोड्यूसर कड़े आपला नंबर कसा आला
अशी शंका आदुच्या मनात एकदाही येणार नाही )
मग मेदु अगदी आनंदी
आणि मेदुला आनंदी पाहुन त्यागमूर्ति आदे सुद्धा आनंदी

पण एक दिवस नेमकाच आदु प्रोड्यूसरच्या ऑफिस मधे असताना आदे चा फ़ोन
आणि प्रोड्यूसर तिथे नसल्यामुळे त्याचा फोन आदु उचलणार पलिकडून आदे चा आवाज
आदु रागाने तिथून बाहेर पडणार
इकडे मेघना बाजारात चाललेली असताना वाटेत चक्कर येऊन पडणार आणि आदे त्यावेळी तिथे
असल्यामुळे तो मेघनाला दवाखान्यात घेऊन जात असताना नेमकाच बंगलोरहून परतलेला आदु
त्या दोघांना एकत्र दवाखान्यातून बाहेर पड़ताना बघणार
आणि मग संशयकल्लोळ
मेघना घरी आल्यावर मेदुच जोरदार भांडण
मग मेघना रडत रडत तिच्या माहेरी ( देसायांच्या घरी )
आदेला सगळ कळल्यावर तो आदु कड़े जाऊन त्याला समजाउन सांगण्याचा प्रयत्न करणार
पण आदु काहीही न ऐकून घेता त्याला हाकलून देणार
आणि इकडे मेघना रडत रडत वाकड्या तोंडाने आदु जप सुरु ठेवणार
शेवटी आदुच्या मनातला संशय कस दूर करण्यासाठी आदे विष पिणार
आणि नेमका त्याच वेळी आदु तिथे आलेला असणार
आदे मरता मरता त्याला सांगणार की मेघना अगदी पवित्र आहे

आणि आदे मेल्यावर मेघनाला अचानक जाणीव होईल की तीच आदु वर नाही तर आदे वर प्रेम होत
लेट करंट
त्यामुळे आदु निघून जाईल
मग मेघनाची कायम रडारड
तीच रडण थांबवण्यासाठी माई अर्चुला साजुक तुपातला शिरा करायला सांगणार
तो शिरा माई मेघनाला भरवत असताना अचानक मेघनाला काहीतरी होऊन फायनली ती आटपणार

आणि स्वर्गात आदे आणि मेघना भेटणार (दोघेही शुभ्र पांढऱ्या कपड्यात आजु बाजूला पांढरा धुर आणि ढग )
दोघे एकमेकाला मिठी मारणार
मागे बॅकग्राउंड ला गाणे स्वर्गात जुळल्या गाठी
म्हणतात ना, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात

आणि प्रेक्षकांची सुटका

सॉरी मी हे काय लिहिलय ,मलाच कळत नाहिये

Pages