जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मदर्स डे ला आईला कोंडून मग पुन्हा दार उघडून मग तिला भेटवस्तू देऊन वर पुन्हा 'थँक यू हं आई, तू आहेस म्हणून आम्ही आहोत' हे म्हणून आईचे चुंबन घेण्याची थिल्लर संस्कृती कोणत्या देशातून आलेली आहे?

हे मदर्स डे, वूमन्स डे वगैरे अक्षरशः कचर्‍यात फेकून द्यायला हवे आहेत. ज्यांना प्रेम व्यक्त करायला वर्षातील एखादा विशिष्ट दिवस यायची गरज भासते ती माणसे नसून पशू आहेत.

मदर्स डे ला आईला कोंडून मग पुन्हा दार उघडून मग तिला भेटवस्तू देऊन वर पुन्हा 'थँक यू हं आई, तू आहेस म्हणून आम्ही आहोत' हे म्हणून आईचे चुंबन घेण्याची थिल्लर संस्कृती कोणत्या देशातून आलेली आहे? >>>>>>>>>> खरं म्हणजे आई वर आपले किती ही प्रेम अस्ले तरी आपण ते बोलुन दाखवु शकत नाही कधी कधी...किंवा आई वडिलांची काळजी वाटते हे आपण एक्सप्रेस नाही करु शकत कितीदा... मला वाटते तेच दाखवण्यासाठी हा डे असतो..तुम्ही म्हणताय ते पटतय...पण थिल्लर वगैरे विशेषण मला चुकीच वाटलं...प्रत्येकाची संस्कृती निरनिराळी असते...आणि तस बघाल तर कित्तेतरी गोष्टी आपण परकीयांच्या कॉपी करतोच ना???

ला वाटते तेच दाखवण्यासाठी हा डे असतो..तुम्ही म्हणताय ते पटतय...पण थिल्लर वगैरे विशेषण मला चुकीच वाटलं...प्रत्येकाची संस्कृती निरनिराळी असते...आणि तस बघाल तर कित्तेतरी गोष्टी आपण परकीयांच्या कॉपी करतोच ना???<<<

अनिष्का,

ह्या विषयावर तुम्ही ज्या तर्‍हेने अभिप्राय देत आहात ती बघता तुम्ही तूर्त तरी फार कॅज्युअली बोलत आहात असे वाटत आहे. तसेही, हा धागा मालिकेवरील असल्याने येथे ताणण्यात अर्थ नाही.

आई वडिलांची काळजी वाटते हे एक्स्प्रेस करता न येणार्‍यांच्या सोयीसाठी इतर संस्कृतींमधून आपल्याला असा एक दिवस आयात करावा लागणे हे लांच्छनास्पद आहे. ह्या विषयावरील हे माझे या धाग्यावर शेवटचे पोस्ट!

ह्या विषयावर तुम्ही ज्या तर्‍हेने अभिप्राय देत आहात ती बघता तुम्ही तूर्त तरी फार कॅज्युअली बोलत आहात असे वाटत आहे. तसेही, हा धागा मालिकेवरील असल्याने येथे ताणण्यात अर्थ नाही.

आई वडिलांची काळजी वाटते हे एक्स्प्रेस करता न येणार्‍यांच्या सोयीसाठी इतर संस्कृतींमधून आपल्याला असा एक दिवस आयात करावा लागणे हे लांच्छनास्पद आहे. ह्या विषयावरील हे माझे या धाग्यावर शेवटचे पोस्ट!>>>>>>>>>>>>> मी तुम्हाला उ;लट उत्तर देत नाहीये बेफिकीर...पण आपण आई वडिलांवर किती प्रेम करतो हे नाही कधी कधी सांगता येत किंवा दाखवता येत....म्हणुन हे लिहील.....माझ्या बोलण्याचा गैरसमज करुन घेउ नये....

हे धत्तड तत्तड! बै सायबांचा निर्णय झाला वाट्टे! ती तिच्या त्या चमचा मित्राला फोनवर सांगत होती "माझा अदूशी काही संबंध नाही आणि नसेल!" आता निदान ते निर्णय घेणे प्रकर्ण तरी पुन्हा कानावर येऊ नये!

"माझा अदूशी काही संबंध नाही आणि नसेल!"
बहुदा मेघनाला पडलेल्या स्वप्नात ती असे काहीतरी बोलत असेल; किंवा कदाचित मालिकेत आणखी बदल करणार असतील.
पण झी मराठीची मालिका इतक्या लवकर संपणे अशक्य. मालिकेच्या निदिले (निर्माता-दिग्दर्शक-लेखक) यांच्यासाठी नामुष्की.
मेघना इतक्यात तरी कोण आदित्य हे ठरवणे अशक्य आहे. एकदा आदे ठरला आणि मालिका पुढे चालु राहिलीच तर मग…
पाण्यात कथा घाला…

२५ नोव्हेंबर, २०१३ - या दिवशी मालिका सुरु झाल्यावर सुरुवातीच्या एक दोन आठवडयात आदे आणि मेघना यांचे लग्न झाले. २५ मे २०१४ होऊन गेले. तेव्हापासुन गेले पाच साडे पाच महिने मेघनाचे आदे कि आदु चालु आहे. इतक्यात तर एखादा आंतरराष्ट्रीय प्रश्नदेखिल सुटला असता!

मालिका संपणार क्किकॉय? >>> छे, छे. आत्ताशी त्यांची प्रेमकथा सुरु झालीय. ती हळूहळू फुलवण्यात कितीतरी भाग खर्ची पडतील. त्यानंतर तो पँडोराचा बॉक्स उघडणे बाकी आहे. बहुतेक ते काम मेघनाची आगाऊ नणंद किंवा मुलांपैकी कोणीतरी करेल. ते वादळ शमवण्यात अजून बर्‍याच भागांची तजवीज होईल.
आत्तापर्यंत आदूला तसे काहीच काम नाही. घरातले वादळ शमले की तो आहेच अजून भाग वाढवायला. शिवाय उपकथानकं असतातच. वाडीतली सैनिकाची बायको, आदुला सेटल करणे, घरातले अनपेक्षित प्रॉब्लेम्स, नवीन पात्रांचा शिरकाव वगैरे वगैरे.

मालिकेच्या धाग्यावर हा विषय ताणायला नको हे पटतंय. म्हणूनच एकच पोस्ट टाकून थांबणार आहे.

ज्यांना प्रेम व्यक्त करायला वर्षातील एखादा विशिष्ट दिवस यायची गरज भासते ती माणसे नसून पशू आहेत.

>>> आपणही बहीणभावाचं प्रेम व्यक्त करायला वर्षातले दोन विशिष्ट दिवस पाळतो. नवराबायकोचं प्रेम व्यक्त करायला वर्षातला एक विशिष्ट दिवस पाळतो. या धरतीवर अन्य दिवसांकडेही बघा. म्हणजे असा तणतणाट होणार नाही.
(एका वर्षी फ्रेण्डशिप डे निमित्ताने होणार्‍या फ्रेण्डशिप बेल्टच्या खरेदीच्या विरोधी सूर मी लावला, तेव्हा चिरंजिवांनी शांत शब्दांत मला ऐकवलं होतं, की "राखी घ्यायला ऑब्जेक्शन नाही, तर याला का?" खरं सांगते, मला ते मनोमन पटलं होतं.)

विषयांतराबद्दल क्षमस्व.

त्या मेदे च्या काल्जेचा सेट किती हास्यास्पद आहे, तिचा तो एकच मित्र नेहमी इकडे तिकडे फिरत असतो
एक त्या पादु चा मित्र , किरण .. चायला एवढा मोठा घोडा झाला तरी ती पाचवीतल्या पोराची ब्याग खांद्याला लाऊन फिरत असतो . आणि त्याला माहितेय मेदे आता लग्न करून गेलीये तरी काय चू सारखा तिला फोन लावतो Lol

मालिका संपवण्याआधी त्या बिचाऱ्या किरणची सुध्दा सोय करावी लागेल. शेवटी आदु आणि मेघना यांच्यातला एकमेव आणि अनावश्यक दुवा आहे तो!

मालिका संपवण्याआधी त्या बिचाऱ्या किरणची सुध्दा सोय करावी लागेल. शेवटी आदु आणि मेघना यांच्यातला एकमेव आणि अनावश्यक दुवा आहे तो!>>>>>>>>.. ती शेजारीण आहे ना.....तीचं ही काहीतरी करा

शेवटी आदु आणि मेघना यांच्यातला एकमेव आणि अनावश्यक दुवा आहे तो! >> Lol Rofl अनावश्यक हा शब्द खूप आवडला. ही मालिकाच अख्खीच्या आख्खी अनावश्यक आहे खरं तर.

काय आगाऊ आहे ही मेघना... तो आदित्य अगदी मुळमुळीत नवर्‍यासारखा लाडे लाडे गोग्गोड काय बोलतो, हसतो काय, हिची सतत (चुकीची) बाजू काय घेतो... अमितच्या हापीसातल्या कलिगच्या बायकोचे अफेअर आहे म्हणे. हा विषय घरी चर्चीला जात असतो आंतरराष्ट्रीय प्रश्नासारखा... देसायांच्या गोलमेज परिषदेत... विजया म्हणते, "प्रेम आहे तर आडून आडून लपवाछपवी कशाला, सांगावं नवर्‍याला आणि जावं निघून प्रियकराकडे!" तर मेघनाचे डोळे भीतीने हे मोठ्ठे एवढाले भोकरासारखे होतात... आदे नेहमीप्रमाणेच... बाजू सावराया धावूनि येतो... "सोप्पं नसतं ना ते.... "

हा नंतर तो विषय आठवून हसत असतो तर ही बया वर तोंड करून विचारते हा विषय हसण्यासारखा आहे का!! (__/\__) निर्लज्जं सदा सुखी!!
तो म्हणतो आपलंही असंच आहे ना ते रिलेट करून ... तर हा गोलगप्पा तोंडाचा गप्पा करून रूसून बसतो, म्हणे आपलं काय रिलेट... तरी तो आदे मिळमिळीत पणे "अगं असं नाही गं उलट तुझं कौतुक वाटलं खरं बोलायला हिंमत लागते.." वगैरे (तो पल्लव पडला तेव्हा का हिने ५० गोलगप्पे एकदम तोंडात भरलेले? हुप्प्यासारखी बसलेली ते काजळ्पाणी वाले डोळे भिरभिरवत!!! तेव्हा नाही खरं बोलता आलं)
तर गोलगप्पा पुरीसारखा टम्म!! म्हणे मला अज्जिबात आवडलेलं नाही माझी तुलना त्या बाईशी केलेली"
_______________/\___________________ नमो नमो... भीषण आहे!!!

नवरा म्हणाला... काय बुळचट आहे हा... मी बॅग हातात दिली असती आणि रस्ता दाखवला असता.. बाई गं तू तुझ्या आदु कडे जा नाहीतर पादुकडे जा... माझ्या डोक्याला रोज भुंगा नकोय (त्याला मेघना गुट्रगूं करते माहीत नाहीये Happy )

तर काय्य!! या मेघना या 'पात्रा'चा अतोनात राग यायला लागलाय.... तांबडेबाबाचाही इतका आला नव्हता... Angry

सोनाली येस्स माझा पण तोच अंदाज... फक्त कोणीतरी च्या ऐवजी मला अर्चूची शंका जास्त येतेय फिदीफिदी>>>>

पण ती नसतांना तिचा वस्तू उघडून पाहण्याचा चोमडेपणा करायचाच का????अस जर दाखवल तर जरा अतीच होइल असे वाटते.
अस हि त्यांचा घरात 'प्रायव्हसि' ला आजिबात 'प्रायव्हसि' नाहि मिळत.
त्या अदे ,मेदे चि खिडकि सदा उघडी असते...बाकिच्या खोल्यांना त्या चौकोनि खिडक्या ज्याला ना दांड्या आहेत ना दरवाजे....आणी प्रत्येक भिंतिला अशि एक मोठि खिंड आहे.म्हणेजे कोणीजी कुठून हि उडी मरून कोणाचा हि खोलित निम्म्यापर्यंत शिरायच आणी 'मि डिस्टर्ब केल का' म्हणून विचारायच...

Pages