जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदाच व्हाव की इम्रान हाश्मी आणि एका झटक्यात एक घाव दोन तुकडे.>> शुभांगी, आदे जर इम्रान हाश्मी झाला तर इम्रान हाश्मी सद्गदित होऊन ढसाढसा रडेल आणि चंबूगबाळं ( जे काय असेल ते) काखोटीला अडकवून पार हिमालयात निघून जाईल... अब तुम्हारे हवाले वतन साथीयो म्हणत... मेघनाच्या भेदरलेल्या डोळ्यांचे भिरभिरे शॉकने एकाजागीच स्थिरावेल... हीच काय ती जमेची बाजू!

फेल झालीस तर? इतका टुकार विनोद केल्यानंतर मेघना आदे ला मारायला धावते हे इयत्ता माँटेसरीतलं वर्तन आहे.>> काय बाई डायलॉग लिहीतात ते!! कोण म्हणायचा तो संवादलेखक?? याचेपण संवाद विजया (मधुगंधा) लिहीते की क्कॉय??

आणि तिने तो अशा जागी लपवुन ठेवलाय कि कुणालाही सहजच सापडेल>> मेदेकडून कित्ती अपेक्षा करावी ती!! मेद भरलाय डोक्यात नुस्ता!!! जा बाई स्वतःच नेऊन ठेव एकदाचा सुमोच्या हातावर आणि लाडेलाडे सांग... माई रिइइइलरिईएइइइली सॉर्री पण माझं किनाई आदूवर खूप प्रेम होतं नाही म्हणजे आहे... नाही म्हणजे अजून ते ठरवायचंय... आता ते अपेक्षित वळण येईलच इतक्यात मग ठरवून सांगते इकडे वळणार की ती तिकडे... तोपर्यंत मला, या पेटार्‍याला आणि या पेटार्‍यातील माझ्या आदूला तुमच्या घरात एक छोटीशी जागा द्या... काय ओ माई... द्याल ना हो? तुमचा मुलगा माझा बेश्ट फ्रेंड आहे की नाई??

नुसतं खोटं बोललो खोटं बोललो चा जप करत बसलेत. ती पेटी उघडून त्यातलं सामान फेका, जाळा काहीतरी करा हे आता प्रेक्षकांनी सांगायचं का? Uhoh

आणि अगदीच सामान फेकणं वगैरे नसेल जमत तर किरण कडे नेऊन द्यावं ना.

आदेला वाटेल हिच्या मनात आन आहे म्हणून पेटी सुरक्षित जागी जपून ठेवलीये. कधी तरी टाकून देईल आणि आपल्याला चान्स मिळेल.
आनला वाटेल हिच्या मनात आता आदे भरला म्हणूण पेटी देऊन टाकली... तरी फेकून नाही दिलीये म्हणजे माझा अजुनही चान्स आहे तर Wink

अशा तर्‍हेने दोघंही ट्राय करत रहातील. दोघांचंही अटेंशन मिळेल आणि दोघांनाही गुंडाळता येईल आणि मध्येच कधी किरण आवडायला लागला तर त्याच्याकडे निघुन गेली तरी चालेल... त्याला फक्त पटवून द्यायचं की माझा तुझ्यावर किती विश्वास आहे म्हणून आणून दिली तुझ्याकडे पेटी मी Proud

किमान त्या पेटीपुराणातुन घरचे आणि आम्ही तरी सुटू.....

इथल्या कोणाच्याच टीव्हीला ऑफची बटणे किंवा इतर चॅनेल्स नाहीयेत का? उगाचच का जुनी डबडी वापरतायत सगळे?

बिचारे आन, आदे आणि मेदे!

इथल्या कोणाच्याच टीव्हीला ऑफची बटणे किंवा इतर चॅनेल्स नाहीयेत का?>> इतर चॅनेल्स आहेत्च हो... तेच पाहते सध्या!!! पण इथल्या अपडेट्सचं काय करावं ? बाकीचे धागे आहेतही इथे... पण इथे इंटरेस्टींग अपडेट्स येतात ना मग कीबोर्ड बडवायची खुमखुमी कशी दाबावी??

बेफी? आणि मज्जा??? मदत समितीकडे गंभीरपणे मदत मागताहेत ते गंभीर अभिप्राय देण्यासाठी Proud पण मी गंमतच करतेय हो Wink

हो मी करते माझ्या टीव्हीच्या रिमोटचा सुंदर वापर. सून, रेशीमगाठी बघायचं सोडून दिलं. जास्त सार्फिंग करते, फक्त दोन-तीन मालिका बघते दुसऱ्या channelच्या नाहीतर न्यूज, डिस्कव्हरी, तत्सम बघते, नाही आवडलं तर टीव्ही बंद आणि मस्तपैकी गाणी ऐकत वाचन किंवा नेट.

ती मेदे कोणा माबो आयडीच्या फ्रेंड सर्कल मधे होती ना? >>>
जुयुरेगा मधली मेदे कशी माबो आयडीच्या फ्रेंड सर्कलमध्ये असेल?
तुम्हाला प्राजक्ता माळी म्हणायचे आहे का?
जर प्राजक्ता माळी माबो आयडीच्या फ्रेंड सर्कलमध्ये असेल तर लगेच तिला ही लिंक ईमेल करा.:)

कालचा भाग सर्वात निर्बुद्ध भाग होता वाटते , अरे काय एकाच दिवशी सर्व पैसे काय काढायला जातात .. मग घरातले पैशे संपतातच काय , त्यावर सुमो चे ज्ञान .. अरेरे , अर्धा तास फुकट गेला आयुष्यातला Sad

अरे बापरे त्या प्राजक्ता माळी बी ए, एम ए (नृत्य) आहेत. Uhoh त्यांची स्वतःची नृत्य अकादमी आहे. मग त्या 'संवार लु' यावर अश्या लहान मुलीसारख का बरं नाचल्या असाव्यात?
असो पण वरती कुणीतरी म्हणलय ना त्याला माझी सहमती आहे की त्यांनी एकवेळ नाच केला तरी चालेल पण गाण्याच्या वाटेला अजिबात जाऊ नये.

बन्या, पण सुमो चे लॉजिक चांगले होते त्यामागचे की कुणाजवळच पैसे नाहित आणि काही संकट आले तर? असो पण एकाच वेळी कुणाकडेही पैसे नसावेत हे पटले नाही.

अश्या लहान मुलीसारख का बरं नाचल्या असाव्यात?>> एक्स्पर्ट डॅन्स दाखीवलान असता तर तो आदे क्लासची चौकशी करताना कसा दाखवता आला असता?? तर मग त्या बास्केटबॉल चॅम्पीयन वाल्या पॉण्ड्स च्या अ‍ॅड सारखं दाखवायला लागलं असतं...

या गोलगप्प्याला नोकरी करायला सुचवलेलं ना सुमोने? मग अजून ढिम्मासारखी घरी कशी? बरं आणि कितव्या वर्षाची परीक्षा दिली म्हणे हिने?

आणि त्या फॅशन डिझायनरकडेही नाहीत म्हणे का पैसे? तिचे तर म्हणे कुठे कुठे एग्झिबिशन्सपण होत ना... मग तिच्याकडेही पैसे नसतात?

असू शकतं बरं का असं. एखाद्या दिवशी खडखडाट असू शकतो. पण कालच्या भागात गिरिश ओक यांनी एकच वाक्य टाकलं पण बहार आली. एपिसोड पाहिल्याचं सार्थक झालं. Happy

कालच्या भागाचे अपडेट्सः

१. मेघनाच्या वाढदिवसाला गिफ्ट काय द्यायचं ह्यावर मोठा भाऊ, मेव्हणा व आदित्य ह्यांची चर्चा!

२. मेघना स्वतःच्या स्टाईलने केलेली पोळी भाजी आदित्यला डब्यात देते व ते त्याला ओळखता येते त्यामुळे ती हरखते.

३. तिला तिच्या आईकडे जायचे असते पण जायला पैसेच नसतात आणि आदित्यकडे पैसे मागायची तिला लाज वाटते. अख्ख्या जन्माचा संयम आदित्यकडे मागू शकणार्‍या मेघनाला चार पैसे मागायची लाज वाटण्यात पब्लिकला विरोधाभास जाणवेल हे लेखकाच्या मस्तिष्कात आलेले नाही.

४. माईंकडे पैसे मागावेत का ह्याचा विचार करत ती बावळटासारखी माईंच्या खोलीत येते आणि कुठूनतरी पैश्यांचा विषय काढायचा म्हणून नैसर्गीक बायकी शैलीने 'माई तुम्ही नोकरी करायचात का हो' असे अतर्क्य लांबचे वळण लावून संवाद योग्य दिशेला येण्याचा प्रयत्न करू लागते. पण माई ह्या नैसर्गीक सासूच्या थाटात तिलाच एक लेक्चर देतात आणि सांगतात की स्त्रीने आर्थिक सबलीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे. आधीपेक्षाही अधिक बावळट चेहरा करून ती परत निघून जाते पण स्वतःच्या खोलीत न जाता एका जिन्यावर बसून गोंधळात पडण्याचा अनुभव घेत राहते.

५. नाना ए टी एम मध्ये जातात पण तीन ए टी एम मशीन्स तीन वेगळ्या कारणांनी बंद किंवा निरुपयोगी असतात. त्यामुळे ते पैसे काढून आणू शकत नाहीत व ते ऐकून माई वैतागतात. ह्या प्रसंगापर्यंत माई, नाना व मेघना तिगेही आजमितीला कफल्लक असल्याचे पुढे येते.

६. त्यातच गॅसवाला येतो व पाठीवरील सिलिंडर 'नुकत्याच शिकारीत मारलेल्या रानडुकरासारखा' जमीनीवर आदळतो. त्याला पाहून माई वचकतात व मोठ्या सुनेला त्याचे पैसे देऊन टाकायला सांगतात. मोठ्या सुनेकडे आज पैसेच नसतात व जवळपास सगळे घर दिवाळखोरीत निघाल्याचे स्पष्ट होते. गॅसवाला मध्येच 'गॅऽऽऽऽऽऽस' असे जोरात ओरडतो. त्याला ह्यांच्या चर्चेशी सोयरसुतक नसते. माई त्याला 'हो रे बाबा' असे म्हणून मेघनाला बोलावून तिला त्याचे पैसे द्यायला सांगतात. ती केव्हाचीच फकीरासारखी हिंडत असते घरात! ते समजल्यावर गॅसवाला धमकी देतो, 'गॅस हवाय का घेऊन जाऊ?'. त्यावर त्याला 'घेऊन जा' असे सांगण्यात येते. मुलीकडे पैसे मागण्याचा प्रसंग दाखवलेला नाही किंवा मी तेव्हा इतर काहीतरी करत असेन.

७. संध्याकाळी वयाप्रमाणे व लिंगाप्रमाणे सर्वांना वेगवेगळे उभे करून माई सांसारीक अकलेचे मोफत वाटप केंद्र काढतात. झापल्या गेलेल्या बायकांपैकी अर्चू फार डिझारयेबल दिसते. मेघना नेहमीसारखीच दिसते ह्यावरून ती नेहमीच झापली जात असणार असे मनात येते. नाना त्या लेक्चरवर एक फुसका विनोद करतात आणि लेक्चरमधील हवा घालवतात.

८. त्यानंतर माई मोठ्या सुनेला आपली राजवस्त्रे परिधान करायची आज्ञा देतात व 'मी ह्यापुढे घरातील काहीही बघणार नाही' अशी चांगली बातमी देतात. मोठी सून हरखलेली दाखवलेली आहे.

हासिल-ए-एपिसोड प्रसंगः

आदित्यला आदल्या दिवशी मेघनाने बजावलेले आहे की उद्यापासून मला झोपेतून लवकर उठव. तिचे हे उच्च संस्कार पाहून घाबरून आदित्य दुसर्‍या दिवशी सकाळी तिला हाका मारतो. आता एकाच पलंगावर झोपत असते तर 'पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची मिठी सैल झाली' हा किती सोप्पा उपाय मिळाला असता झोपेतून उठण्याचा! पण रेशमाच्या मिठीआधी रेशीमगाठी जुळणे आवश्यक असल्याने दोघे पृथ्वीपासून निरनिराळ्या अल्टिट्यूडवर झोपतात. मेघना आदित्यच्या लाजर्‍या, कुजबुजत्या, नाजूक हाकांनी उठत नसल्याने तो संकोचून एक स्टीलचे भांडे हातात घेतो व भीत भीत ते तिच्या कानापाशी पाडतो. त्या आवाजाने भडकून व संतप्त होऊन मेघना जागी होते व आदित्याल धमकी देते की ती आयुष्यात त्याला पुन्हा झोपेतून उठवण्याचे काम सांगणार नाही. ह्यावर स्वप्नील डोळे करत आदित्य विचारतो?

"आयुष्यात?"

कालच्या ह्या भागानंतर इतके लक्षात आले आहे की संधी दिली तर निर्माता, दिग्दर्शक, लेखक, पटकथालेखक व अभिनेते हे कोणत्याही क्षणी ही मालिका सुखान्त दाखवून गुंडाळू शकतात ह्या पातळीला आता मालिका आलेली आहे. फक्त ही मालिका संपल्यावर काय हे ठरलेले नसल्याने रेशीमगाठी सर्व बाजूंनी ताणल्या जात आहेत.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Pages