पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रील पाहिले,काही कळले नाही.>>>>>
अमितच्या रील मधली व्यक्ती इथे जेन झी जसे बोलतात तसे मुद्दाम ड्राईव थ्रू मधे बोलते आणि त्यामुळे मुली बाबांनी लाज आणली मोडमधे.
रच्याकने जेन झी स्लँग गाईड

अंजली कूल मग माझा बॉस सेम तशी उत्तरे देतो . ईमेल्स तो चेक नाही करत , इम्पॉर्टन्ट सगळं whatsapp कर म्हणतो . केलं कि फक्त येस ऑर नो इतकंच उत्तर देतो . मग मी पॉईंट वाईज मेसेज पाठवला तर १ , ३ ५ ची उत्तर देईल २ -४ चे देणार नाही . त्यातूनही क्लियर तुला कळेल तर शपथ. पण हे लोक खूप ऑक्युपाईड असतात मला कळू शकते .

दुसरा एक पेट पिव्ह म्हणजे लोक सूचना नीट देत नाहीत अजिबात . उदा . कोणाला घराचा पत्ता देताना . आजूबाजूची खूण सांगताना , अमुक अमुक ठिकाणाहून पुढे या . . म्हणजे तिथे दुतर्फा रस्ता असला कि बोंबलाला माणूस .

माझ्या एका मित्राने मला होमिओपॅथी डॉक्टर कडे जबरदस्तीने पाठवले . पहिली अपॉइंटमेंट मोठी असते , त्यात ते हिस्ट्री विचारतात तू जास्त वेळ काढून ये , ते औषधे नंतर घरी पाठवतात , ती कशी घ्यायची त्याची चिट्ठी त्या औषधतच असते , नंतर ते पैसे बँकेत ट्रान्सफर करायचे असतात हे मला नंतर कळलं . . नुसतंच पाठवून दिले त्यांच्याकडे .

आपल्याला असलेला अनुभव लोकांशी शेअर करायला काय जाते ? मी कोणत्याही दुकानात किंवा कुठेही गेले तर तिथे आलेले अनुभव आणि तिथल्या वेळा पार्किंग आहे कि नाही , फोने नंबर अधिकच्या सूचना सगळं देते समोरच्याला . समोरचा कधी कधी म्हणतो मी काय मूर्ख आहे का ? पण अशी माहिती देऊन आपण त्यांचं लाईफ सोपं करतो हे त्यांच्या डोक्यातच येत नाही . त्यांच्या अक्कल हुशारीवर शंका घेतोय हाच आरोप .

मागे टिम लंचला, एकदा नवीन असते वेळी स्टेक रेअर, मिडीअम की वेल डन असे वेटरने विचारले असता, इंग्रजी उच्चार न कळल्याने मी येस असे उत्तर दिलेले.>>
Pedicure करण्याच्या आधी त्याने मला काहीतरी विचारले. उच्चार नं कळल्याने मी 'no ' सांगितलं.
Free back (chair cha mode switch on करायचा होता.) मसाज ला मुकले.

"तिथे कुणालाही विचारा. कुणीही माझा पत्ता सांगेल.">>>>>

हल्लीच मला एकाने असा पत्ता दिला. मी इमाने इतबारे ‘तिथे’ पोचल्यावर जो पहिला ‘कुणीही’ दिसला त्याला विचारले. तो ‘कुणीही’ म्हणाला मीच इथे नवीन आहे. मग फोन करुन त्या पत्ता देणार्‍याला मनातल्या मनात आधी चार शिव्या घातल्या आणि उघड मी जिथे उभी होते तिथे ये म्हणुन फर्मावले. लोक स्वतःला काय समजतात देव जाणे.

कागद किंवा पुस्तके वाचताना, नोटा मोजताना थुंकी लावणे. खरेच किळसवाणे, अन हायजिनिक व कोविडोत्तर जगात घातक आहे. आपण ज्या नोटा मोजतोय त्या कुठे कुठे जाऊन आल्या आहेत याचा तरी विचार ? आपले अमित शहाही करतात, नुकतेच बायडेन यांनीही केले.

या धाग्यावर पूर्वी आले आहे की माहित नाही.
रेल्वे स्थानक, मेट्रो स्टेशन अशा सार्वजनिक आणि घाईगडबडीच्या ठिकाणी escalator वर उजव्या बाजूला उभे राहून उजवी बाजू अडवून ठेवणारे लोक माझ्या डोक्यात जातात. मुंबई मेट्रो १ (वर्सोवा - घाटकोपर) च्या escalator जवळ सूचना सुद्धा लिहिलेली आहे की 'डाव्या बाजूस उभे राहा, उजव्या बाजूने चाला' म्हणजे उजवी बाजू चालणाऱ्यासाठी मोकळी सोडणे अपेक्षित आहे, पण हे मूर्ख लोक उजव्या बाजूला देखील उभे राहून दुसऱ्याचा खोळंबा करतात.
मॉलमध्ये esacalator वर कुठेही उभे राहणे समजू शकतो, कारण तिथे माणसे timepass करण्यासाठीच येत असतात, पण रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन वर उजवी बाजू चालण्यासाठी मोकळी सोडलीच पाहिजे!!!

घाईगडबडीच्या ठिकाणी escalator वर उजव्या बाजूला उभे राहून उजवी बाजू अडवून ठेवणारे लोक माझ्या डोक्यात जातात. >>>> करोडो अनुमोदन .
आणि आपण excuse me म्हटलं की काय अपमान केला माझा असे भाव चेहर्यावर. सिनीअर सिटीझन्स , नवखे लोक समजू शकतो. रोजचे प्रवासी पण. कॉलेज मधली मुलं घोळका करून उभे रहातात.

अंजली कूल- तो व्हॉट्सअ‍ॅप संवाद सेम माझाच नवरा Uhoh
मी-अमुक तमुक ठिकाणी उद्या जायचं की परवा?
तो- ओके
Angry

४ ओळी लिहिल्या तर १ अक्षर वाचणार नाही असा काही अनसेड नियम असतो काही लोकांत Lol

>>>>>>>>escalator वर उजव्या बाजूला उभे राहून उजवी बाजू अडवून ठेवणारे लोक माझ्या डोक्यात जातात.
पण अमेरीकेत, एस्कलेटरवरती आपली डावी बाजू फ्री ठेवायची असते. उजव्या बाजूला उभे रहायचे असते. भारतत उलटे आहे का? असू शकते.

Metro changeover असला तर दुसरी मेट्रो पकडायची म्हणून लोक एका मेट्रो तून उतरून धावत सुटतात , घाईने escalator वरुन उतरायला लाईन लावतात . अशावेळी बरेचदा पहिली दोन माणसं ढीम्म हलत नाहीत. त्यामुळे बाजू च्या जिन्याने उतरणारी लोक भराभरा उतरून बाकीच्यापेक्षा पुढे जातात. Escalatorsवरची मागची लोक चळबुळत राहतात.

आपल्याकडे या गोष्टी तुलनेने नवीन आहेत. पब्लिकला यातले एटिकेट्स म्हणा किंवा सर्वांना सोयीचे होतील असे नियम म्हणा - माहीत नसतात. त्यात एकूण सिव्हिक सेन्स कमीच. पण जन्ता व्हॉट्सअ‍ॅप पाहात असते त्यावर सरकारने किंवा इतर कोणी एक दोन मिनिटांच्या क्लिप्स तयार करून पाठवल्या तर मग ते बघून बघून हळुहळू लोक तसे करून लागतील. इव्हन परदेशातील क्लिप्स सुद्धा दाखवता येतील. मी लंडन मधे पाहिले होते - ऑफिस अवर मधे स्टेशनमधे आलेल्या प्रचंड मोठ्या झुंडी एस्कलेटर वर क्षणार्धात एका "फाइल" मधे मर्ज होतात व थांबणारे उजव्या बाजूला थांबतात आणि त्यांच्या डावीकडून काही जण धावत पुढे जातात.

जेथे रांग आहे तेथे त्याच्या तोंडाशी कोंडाळे तयार होईल असे उभे राहणे, काउंटर वर कोणी ऑलरेडी असेल तरी तेथे जाउन बिनदिक्कतपणे आपले घोडे दामटणे, पर्सनल स्पेस वगैरेची कल्पना नसणे, विमान थांबले की आपल्या पुढच्या रांगेच्याही पुढे घुसून उतरायचा प्रयत्न करणे हे प्रकार त्यातून कमी होतील.

अमेरिकेत कोणत्याही पब्लिक सर्विस च्या ठिकाणी काउंटरवरच्या माणसाने बोलावल्याशिवाय तेथे जायचे नाही ही एक फार चांगली पद्धत आहे. काउंटर पुढे दोन तीन लोक लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत आहेत व मागची व्यक्ती ढिम्मपणे खाली मान घालून दुर्लक्ष करत आहे असले प्रकार त्यातून होत नाहीत. रांगेत उभे राहून मग बोलावल्यावर जाणे ही कर्मचारी व पब्लिक, दोघांच्या दृष्टीने डिग्निफाइड पद्धत आहे.

या डिक्शनरीमुळे लेक अगदी प्रेमाने ऐकत असलेल्या ‘फेडेड’चा अर्थ समजला आणि ‘ऑं’ झाले. ऍलन वॉकरच्या शोची लेकीसाठी तिकीटं काढायचा विचार करत होते. आता कॅन्सल…तरी तिला अर्थ माहित नाहीये अजून.

पर्सनल स्पेस वगैरेची कल्पना नसणे >>>> हा अगदी पेट पीव्ह आहे. पाठी शंभर मीटर जागा मोकळी असली तरी रांगेत अगदी चिकटायला येणाऱ्या बायकांचं काय करावं असं होतं. बरं जवळ आल्यामुळे काउंटरवरचा माणूस यांना आधी केटर करणार आहे का?

ट्रायल रूम मध्ये 4 कपडे घेऊन जाऊन प्रत्येक कपडा घालून बाहेर जाऊन मैत्रीण किंवा प्रिय नवऱ्याशी विचार विमर्श करणाऱ्या बायका

डिक्शनरी भारीच!
पत्ता सांगणाऱ्यांमध्ये मला एकाने, अचानक मंडळा जवळ कसबा पेठ पुणे, असा पत्ता सांगितला. आसपासची दुसरी खूण सांगा म्हटल्यावर कुठल्यातरी किराणा दुकानाची खूण सांगितली. प्रत्यक्षात पाहिलं तर ते दुकान टपरीपेक्षा मोठं म्हणावं एवढंच होतं.

एकदा एकीने असाच पत्ता आंगताना मला "उधर से सिध्धे गये तो लेफ्ट मे मंदिर गिरता, वो किसका है की क्या की, उधर से राईट लेने का" असे सांगतीले होते.
मी तिथे गेलो बराच पुढे गेलो तरी मंदिर गिरे ना, परत मागे आलो आणि मग एका दुकानात विचारले मंदिर कुठाय? तर त्याने "ओ क्या उधर है ना!" म्हणुन दाखवले. ते रस्त्याच्या बाजुला बांधलेले तीन फुट उंच, कुठल्या देवीचे चित्र तिन्ही बाजुने काढलेले मंदिर होते.

>>ट्रायल रूम मध्ये 4 कपडे घेऊन जाऊन प्रत्येक कपडा घालून बाहेर जाऊन मैत्रीण किंवा प्रिय नवऱ्याशी विचार विमर्श करणाऱ्या बायका>>
गिल्टी. आमच्या मेसीत फिटिंग रुम्सच्या बे बाहेर मस्त सोफे, खुर्च्या वगैरे वाली वेटिंग रुम आहे. असाच सेटअप पुरुषांसाठीही आहे.

विचार विनिमय करायला हरकत नाही, पण भारतात त्या ट्रायल रूम पुढे रांगेत विकेंड ला 10 बायका असतात.अश्या वेळी प्रियकर किंवा प्रिय मैत्रिणीशी रूम मधूनच व्हिडिओ कॉल करून किंवा सेल्फी काढून बोलावे की नाही?आत कपड्याचा ढीग ठेवून प्रत्येक वेळी ट्रायल रूम्स सेट च्या पूर्ण मोठ्या खोलीबाहेर, रांगेसमोरून.मग नवरा समोर 30 फुटावर.त्याच्याशी चर्चा.मग परत आत.असं 4 वेळा.मग एक कपडा फायनल झाला की ओरिजिनल कपडा घालून बाहेर यायचा वेळ.

ट्रायल रूम मध्ये 4 कपडे घेऊन जाऊन प्रत्येक कपडा घालून बाहेर जाऊन मैत्रीण किंवा प्रिय नवऱ्याशी विचार विमर्श करणाऱ्या बायका>>>> :तोंड लपवणारी बाहुली: Lol

Pages

Back to top