पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ASAP , TGIF ही आणि अशी लघुरूपे आता सवयीची आहेत. त्यांचं मराठीकरणही सवयीचं झालंय. पण वरच्या प्रतिसादांत आलेल्या लघुरूपांचं तसं नाही. आणि ती लघुरूपं करणारे काही तरुण नाहीत. हे तारुण्याचं लक्षण असेल यापेक्षा अधिक चांगली लक्षणं बरीच आहेत. भूतकाळात रमणं सोडणार का?

नवनवीन लरू ओळखण्यासाठी बुद्धीला जी चालना मिळते त्यामुळे अडि होण्याची शक्यता ६७.०२ टक्क्यांनी कमी होते.

लघुरूपे वापरणे ही माबोची ओळख आहे, राच्याकने ला तसा काही अर्थ आहे का?
पण आपण वापरतोच की!
मला तर आवडते बुआ!
नाही समजलं तर गेलं उडत नंतर कधीतरी समजत किंवा म्हणजे काय हा विचारायचा पर्याय आहेच ना

Lol अरे रॅंडम लरु करू पण ती रुढ पण करायची आहेत. क्रिप्टिक नाही लिहायचं आहे.
बेला, बाव, पुपो, पाभा, सुभा, स्वजो ... ही आता रुढ आहेत. एक समुह बनला की त्याची त्याची भाषा बनणारच ना? तेच नैसर्गिक नाही का?

जेवायला गेलात की वेटिंग स्टाफ विचारायला आला की जेवण कसं आहे? तर 'बसिंन! नो कॅप' म्हणा आणि त्याच्या/ तिच्या चेहर्‍यवरचे भाव बघा. मजा येते. कोणी काही चांगलं केलं/ कोणा पेक्षा चांगलं केलं की 'यु आर कुकिंग' म्हणा.
बाकी जे जे आवडतं ते करावं. मला जे वाटतं ते सांगितलं. सक्ती अर्थात नाही.

एकदा मी एक मोठ्ठा प्रतिसाद प्रत्येक र्‍हस्व इकार आणि उकार दीर्घ करत लिहिला होता. कारण काही लोक न चुकता असं चुकीचं लिहीत असतात. पण माझा तो प्रयत्न वाया गेला . एका मायबोलीकराला वाटलं की माझ्या पीसीमध्ये बग आलाय. Lol

तसं एक दिवस सगळीकडे फक्त लघुरूपं वापरून लिहावं का? Lol

अडि.
अडि ने माझ्याशी अढी घेतली आहे.

अमितव, तुम्ही लिहिलेली लघुरूपं आता सवयीची झाली आहेत , हे खरं. समूहाची भाषा हेही मान्य. रच्याकने स्वीकारलंच आहे. जरी मी ते लिहीत नसलो तरी. पण कधी कधी फ्लो अडकतो, हेही खरं.

माझ्याही डोक्यात प्रकाश पडेपर्यंत खूवे गेला. मग मलाच अडि झालंय का वाटू लागलं आणि पाडलं त्या प्रकाशला एकदाचं.

हो हो! हे असं खूवे लिहिलं की फ्लो अडकणारच. उगाच करायचं म्हणून करायचं ला काहीच अर्थ नाही, ते आपोआप हळूहळू घडतं. दिवाळी फराळ विषय निघाला की पापोचि, बेला, शंपा अशी कडी जुळते. लघुरुपं अशी रानोमाळ पडली तर अर्थबोध अर्थात अगम्यच असेल. पण संदर्भाने समजतं. ती योग्य प्रमाणार वापरणे, ओव्हरबोर्ड न करणे ही कला आहे हे ही खरंच आहे.

"गुजा, बव, मुडाखि .. असली अनेक लघुरुपे सगळ्यांना माहिती असायला हवीत हा कसला अट्टाहास?>> मला नाही माहित. 'दिवे घ्या ' म्हणजे काय ह्याचाही मी थोडा विचार करून बघितला मग सोडून दिलं."
हे वरचं सगळं मी म्हणणार होते.... पण..,

लघुरुपे आवडत नसलेले लोक मी म्हातारे समजतो. >>
हे वाचल्यावर सोडून दिले.

तरी सतत मायबोली वर असल्यामुळे बरेचसे शब्द आता कळायला लागलेत.

अडि ने माझ्याशी अढी घेतली आहे.>> अल्झायमर्स डिसीज.
अडि अडचणीला कामाला येणे म्हणजे अडि झालेल्यांना लरु ऐका/वाचायला लावुन ओळखायला लावुन त्यांच्या बु ला चा देण्यास मदत करणे.

शर्मिलाआर, Lol हे थोडं बदलुन आणखी थोडं नॅरोडाऊन करुन लिहिलं. Happy
लघुरुपे आवडत नसलेले आणि ते वाईटच आहे, त्याला विरोधच केला पाहिजे असं म्हणणारे लोक मी म्हातारे समजतो.

मायबोलीवर वापरल्या जाणार्‍या विशिष्ट शब्दांचा अर्थ असा एक धागा आहे. तो अद्यावत करा. हल्ली मायबोलीवर एखाद्या शब्दाभोवती भिंग दिसू लागायचं. (गेलं वाटतं). अशा लघुरूपांभोवतीही ते भिंग दिसावं आणि त्यात शिरून ' त्या' धाग्यावर नेमक्या त्या धाग्याशी जाता यावं.

ते भिंग एआयचा नमुना आहे. रॅंडमली कधी अवतीर्ण होईल सांगता येत नाही. मात्र माबोलिंगो आलं की ते दाखवणं ही कल्पना मला फार आवडलेली आहे. ते करणं ही सोपं असावं. वेमा वाचत असतील तर बघा करता आलं तर. बेला न लिहिता @बेला असं वेक वर्ड टाईप लिहुन आपण त्या भिंग अल्गोरिदमला जागं करायचं असेल तरही सुरुवातीला हरकत नाही.

Chrome नका वापरू त्यात येत भिंग.
Private broweser वापरा
डकडकगो चांगलं आहे त्यात ads चा पण त्रास नाही

मी नुकतीच चारचाकी चालवायला लागले होते, तेव्हाची गोष्ट...
एकदा आम्हा मैत्रिणींना कुठे तरी जायचं होतं.
मी सगळ्यांना माझ्या गाडीने न्यायचं असं ठरवून तसा मेसेज व्हाट्सअप वर टायपला.
मैत्रिणींचे प्रत्युत्तर येत गेले, NP.

माझ्याबरोबर कुणालाच यायचं नाही असं वाटून (कारण मी अर्थ घेतला होता - not possible ) शेवटी मी विचारलं, गाडी कोण घेतंय म्हणून.
तेव्हा उलगडा झाला, ते -
No Problem होतं.

लघु रूपे हे एक प्रकारचे जार्गन आहे. हे अशासाठी वापरतात कि आपण काय बोलतो आहोत हे कंपू बाहेरच्यांना कळू नये.
Grow up man.
कंपू बाहेरही अफाट जग आहे.
संत तुकाराम म्हणूनच महान होते.

विरंगुळा करण्यासाठी दोन कामांच्या मध्ये लिमिटेड वेळ मिळालेला असताना प्रतिसाद टंकन करताना लघुरूप वापरून माझा जो वेळ वाचतो तो मी अजून एक दोन धागे वाचून तिकडे सुद्धा प्रतिसाद द्यायला वापरते.

दुसऱ्या एका धाग्यावर मी दिलेला प्रतिसाद इथे दाकावती.

"पूर्वी तार खात्यात ठराविक संदेशांसाठी क्रमांक असत.
१)क्रमांक ८ वधु वरांना शुभेच्छा. म्हणजे आपण आठ क्रमांक तारेने पाठवला कि तिकडे वधु वरांना शुभेच्छा जात असत.
तद्वत प्रतीसादानाही क्रमांक असावेत. म्हणजे २ दाबले कि "छान" असा प्रतिसाद आपोआप उमटेल. त्यामुळे "छान" असे टंकायला जे अपार कष्ट होतात ते वाचतील!
२)प्रतिसादांची शब्द संख्या मर्यादित करावी. उदा से १८०. जर कुणाला तेव्हढ्या शब्दात गूज मनीचे सांगता येत नसेल तर १८०० शब्दातही कसे सांगता येईल?"

कसला कूल प्रतिसाद आहे.
(कूल हे लघुरूप नाहीये, उगीच डोकेफोड करत बसू नका. कूल = cool )

वैयक्तिक घेऊ नका, पण लघुरुपे हे टाईप करायचा आळसातुन चालू होऊन भाषेचा भाग बनणे सतत घडत आहे. .......+१.
पण भारत यांची तळमळ पोहोचली.स्तुत्य आहे.

>>>>>त्यामुळे अडि होण्याची शक्यता ६७.०२ टक्क्यांनी कमी होते.
Happy हाहाहा

लघुरुपांचा त्रास करुन न घेता बरेचदा इग्नोर मारते.

मला वाटलंच होतं की अचानक ४० नवीन पोस्टी आहेत म्हणजे काहीतरी वाद असणार Happy

भरत - पॉइंट पोहोचला, आणि मान्य आहे. जेथे एखादे लघूरूप प्रचलित नाही त्या धाग्यावर ते काहीतरी सिक्रेट असल्यासारखे वापरू नये हा एक एटिकेट आहे - एखाद्या ग्रूप मधे सर्वांना येत असलेलीच भाषा वापरावी, यासारखाच. पण ज्या - बहुतांश वाहत्या - धाग्यांवर अनेक वेळा वापरून लघूरूपे प्रचलित झालेली असतात तेथे काहीच प्रॉब्लेम नाही. तेथे अमितचे "समूहाची भाषा" लागू होते. उदा: वाड्यावर "बेला", बेकरीत "सातुमोला" आणि टीपापावर "टचेआले". ( यातली नंतरची दोन बर्‍याच दिवसांत चर्चेत आलेली नाहीत त्यामुळे - "सातुमोला = साजूक तुपातील मोतीचूर लाडू" आणि "टचेआले = टण्याचे आवडते (म्हणजे प्रत्यक्षात नावडते) लेखक" (पुलं) ).

आका बद्दल - मध्यंतरी चित्रपटाच्या दोन्ही धाग्यावर (मराठी व हिंदी/जनरल) आशा काळे बद्दल आका हे खूप कॉमनली वापरले जात होते. तिचे नाव इतक्या वेळा लिहीले जायचे की आका लिहीणे सोपे होते. तेव्हा तेथे असलेल्या बहुतेकांना ते माहीत असावे. सुभा व स्वजोही तसेच.

भरत - कधीकधी वाहत्या बाफवरची भाषा साधारण त्याच लोकांशी बोलताना इतर बाफवर स्पिल ओव्हर होते. पण त्यात हे आमचे काहीतरी भारी सिक्रेट आहे अशा आविर्भावाने ते नाही. बहुतांश लोकांना ऑलरेडी माहीत आहे या समजुतीतून केलेले आहे. पण तरीही लक्षात ठेवेन Happy (केकू - जार्गनच्या उल्लेखाबद्दलही हेच. (इथे तुम्हाला केकू म्हणणे इतपत चालून जावे Happy ) )

Pages