पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहसा अमेरिकेत ट्रायल रूम बाहेर 'तोबा गर्दी' नसते म्हणून चालून जावे. भारतात मात्र वीकेन्ड ला प्र चं ड गर्दी असते.

हो हे माझं ही पेट पिव्ह आहे. आमच्याकडे एकेक कपडा घालून बाहेर येणं सोडाच, पण पूर्ण सिलेक्षन झाल्यावर बाहेर आले की नवरा शोधण्याची वेळ येते, तो बाहेर गायबलेला असतो.

खरेदी आणि फिटिंगरूम वर चे पेट पीव्हज वाचताना एक गंमत आठवली... ऑफिस गॉसिप म्हणू या हवं तर..

माझी एक सहकारी एकदा तावातावाने सांगत होती तिसऱ्या एका मुलींविषयी, जी दिल्लीकडची होती - अर्थात खूपच छान आणि नीट नेटकी राहणारी... वेगळ्या लीगची.
तर हिला ती नुकतीच एका मॉल मध्ये भेटली होती पाटीसह..
" मॅडम नुसत्या चाललेल्या, आवडेल तो पोशाख उचलायची, आणि नवऱ्याकडून द्यायची, नवरा ह्या सगळ्या hanger खाली दबलेला...."

आता हिचा मुद्दा तिने स्वतः चे कपडे स्वतः घेऊन फिरायला काय झालं... नवऱ्याला काय एकदम नोकरासारख वागवत होती... आणि त्याचा ही राग आला होता ... की काय सेल्फ respect च नाही..

माझ्या लक्षात राहिलं कारण
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे... आणि त्यावरून कुणाला मनस्ताप..

आमच्याकडे एकेक कपडा घालून बाहेर येणं सोडाच, पण पूर्ण सिलेक्षन झाल्यावर बाहेर आले की नवरा शोधण्याची वेळ येते, तो बाहेर गायबलेला असतो.>>> Lol Lol Lol

आवडलं

पण पूर्ण सिलेक्षन झाल्यावर बाहेर आले की नवरा शोधण्याची वेळ येते >> Lol म्हणजे हे ही एक प्रकारचं वरसंशोधन म्हणता येईल

काल 2 नवे शॉर्ट फॉर्म कळले
एका मुलाने चॅट वर PTAL लिहिलं.आम्ही कॅड बद्दल बोलत होतो त्यामुळे मला वाटलं PTC ने काही नवं काढलं की काय.त्याला विचारलं PTAL म्हणजे काय, तो म्हणाला please take a look.लोक मला PTAL म्हणतात आणि मी त्यांना LGTM म्हणतो(म्हणजे looks good to me)
माझी धाव अजून फक्त fyi वापरण्याच्या कुंपणापर्यंत आहे.

घाईगडबडीच्या ठिकाणी escalator वर उजव्या बाजूला उभे राहून उजवी बाजू अडवून ठेवणारे लोक माझ्या डोक्यात जातात.>>>
अशा वेळी अस्सल मुंबईकर 'मच्छी का पानी' करुन ओरडतो. तुम्ही करता की नाही?....

हे एखादवेळेस रेल्वे स्टेशनवर करू शकतो, मेट्रो स्टेशनवर नाही, मेट्रोमधून मांस - मासे (कच्चे, न शिजवलेले) नेण्यास बंदी असते.

देवा! _/\_ नवीन दिसताय मुंबईत!
मच्छी का पानी ओरडायला कोळीण व्हायची गरज नसते.

ट्रायल रूम मध्ये 4 कपडे घेऊन जाऊन प्रत्येक कपडा घालून बाहेर जाऊन मैत्रीण किंवा प्रिय नवऱ्याशी विचार विमर्श करणाऱ्या बायका>>>>

आणि एवढं करून नवर्‍याला आवडलेलं घेतील तर शपथ !!!!

देवा! _/\_ नवीन दिसताय मुंबईत!..
नाही ओ, माझा जन्म मुंबईचा (अगदी जन्म प्रमाणपत्रही बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेले), लहानाचा मोठाही मुंबईत झालो, अजूनही आणि यापुढेही मुंबईतच राहीन!
तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही.
मच्छी का पानी ओरडायला कोळीण व्हायची गरज नसते, हे मलाही माहित आहे. पण मेट्रोमध्ये मासे वा तत्सम मृत प्राणी नेण्यास बंदी असल्याने तिथे असे काही ओरडले तर आपल्यालाच बाजूला घेऊन आपल्या सामानाची कसून तपासणी होईल!
म्हणजे escalator वर पटापट चालता यावे म्हणून 'मच्छी का पानी' ओरडून काही सेकंद वाचवायच्या नादात किमान १५-२० मिनिटे जातील!!

https://www.mmmocl.co.in/ticket-carriage-rules.html
Prohibited items in Mumbai Metro.JPG

तरीही ओरडा बिनधास्त मच्छी पानी.
कुणी वरील नियम दाखवून आक्षेप घेतला तर म्हणा "मी कुठे 'मरी हुई मच्छी का पानी' म्हणालो? जिवंत मासे घेऊन जाऊ नये असे कुठे लिहलंय?"

माझ्या लक्षात राहिलं कारण
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे... आणि त्यावरून कुणाला मनस्ताप.. >> यासाठी मराठीत एक मस्त म्हण आहे,
कोणाची म्हैस आणि कोणाला उठबैस Lol

अनंत चतुर्थी ऐकायची सवय झाली होती. आज नरक चतुर्थी ऐकलं. तेही मुंमग्रंसच्या ताईंकडून.
--
मायबोलीवर वाटेल त्या विषयावरचे, स्वरूपाचे धागे ललित लेखन या ग्रुपात उघडले जाणे. तेही जुन्या जाणत्या सदस्यांकडून किंवा नियमित लेखन करणार्‍यांकडून.

मुंमग्रंसच्या म्हणजे?

“अनंत चतुर्थी ऐकायची सवय झाली होती. आज नरक चतुर्थी ऐकलं." - Uhoh ४ आणि १४ त काहीच फरक नाहीये!!

सर्वपित्री अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा डोक्यात जातात. लोक उठसूट कधीही हार्दिक शुभेच्छा देतात.

मलापण सर्वपित्री अमावस्या म्हणजे नक्की काय माहित नाही/आठवत नाहीय.

एखाद्या दिवशी (बाहेर, जिथे शुभेच्छांची फॉर्मलिटी पाळली जाते तिथे) कुणी माझ्यासमोर "आज सर्वपित्री अमावस्या आहे बरं का!" असे म्हटले तर मी ही "हो का? शुभेच्छा!" म्हटले असते.

सर्वपित्री अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा???
>>> रिअली? मी आत्तापर्यंत संकष्टी चतुर्थीच्या, कुठल्या तरी एकादशीच्या, नाग पंचमीच्या (मला कशाला?) शुभेच्छा ऐकल्या होत्या. पण सर्वपित्रीच्या? हे म्हणजे गुड फ्रायडेच्या शुभेच्छा देण्यासारखे झाले.

मानव Lol

मानव Happy

माझेमन, हो. माझी आई मला दरवर्षी मुद्दाम बैलपोळ्याच्या शुभेच्छा देते... मी काय ते गपगुमान समजून घेतो.

Lol

लोक उठसूट कधीही हार्दिक शुभेच्छा देतात >>>हो हो. एका गृपवर सोमवारच्या, मंगळवारच्या वगैरे पण शुभेच्छा येतात.

नाग पंचमीच्या (मला कशाला?)>>> माझेमन Lol
एका गृपवर सोमवारच्या, मंगळवारच्या वगैरे पण शुभेच्छा येतात.>>> +१ आणि सकाळ तर रोज च येते, रोज नवे फूल & नवा गुळपाडू मेसेज. किती तो वेळ लोकांना.

Pages