पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका फॅमिली ग्रुपवर दर श्रावण सोमवारी या शुभेच्छा यायच्या..सॉलीड्ड पॉवरफुल...नशिब यात शन्कराने तिसर नेत्र नाहि उघड्ल..
FF9E1616-09B5-4CFA-B35E-FD2A7EFA62FB.gif

फारच गोंडस शंकर आहे. ऐनवेळी शंकर न सापडल्यामुळे रामाच्या कॅरॅक्टरला शंकराच्या ॲक्सेसरीज दिल्यासारखा. आणि नाग गुप्तधन बरोबरच घेऊन फिरत असल्यासारखा.

नाग गुप्तधन बरोबरच घेऊन फिरत असल्यासारखा >> Lol
या प्रकारच्या निरिक्षणामुळे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या असतील. Wink

ह घ्या

सकाळ तर रोज च येते, रोज नवे फूल >> मी आहे ती.. काही विशिष्ट गृप वर करते पण कधी उपदेश नाही केला सकाळी सकाळी कुणाला

लै डेंजर शंकर आहे हा! >>> हो स्क्रोल करताना दचकले होते मी.
फारच गोंडस शंकर आहे. ऐनवेळी शंकर न सापडल्यामुळे रामाच्या कॅरॅक्टरला शंकराच्या ॲक्सेसरीज दिल्यासारखा. आणि नाग गुप्तधन बरोबरच घेऊन फिरत असल्यासारखा.>>> फार भारी निरिक्षण..

माझेमन, हो. माझी आई मला दरवर्षी मुद्दाम बैलपोळ्याच्या शुभेच्छा देते... मी काय ते गपगुमान समजून घेतो.

>> आमच्या घरी पोळ्याच्या दिवशी घरातल्या वृषभ राशीच्या लोकांसाठी (३-४ आहेत) पुरणपोळी केली जाते. आम्ही पण काय ते समजून जातो Lol

आजकाल केलेला पदार्थ किती खुसखुशीत झाला आहे हे दाखवण्यासाठी तो तळहातावर घेऊन मूठ आवळून त्याचा चुरा करता येतो हे दाखवायची ट्रेंड यु ट्युबर्समध्ये आली आहे. चकली, चिरोटे, पराठे, चपाती. एकाने केलं की बाकीचेही तेच करतात.

भरत, मलाही ते नेहमी बोचतं. पराठे, इडली, डोसा काहीही असलं, तरी असं चुरगळून दाखवतात. घरी असं कधी करतो आपण? कसतरीच वाटतं बघायला.

भरत.. हो अगदी.
मला असे वाटते की ते तेलकट हात आता ही धुणार की नाही?

पदार्थ किती खुसखुशीत झाला आहे हे दाखवण्यासाठी तो तळहातावर घेऊन ...... अगदी.खायच्या पदार्थाच्या नाशाबद्दल वाईट वाटते.

तसचं आडवी सुरी फिरवून दाखवतात , करकरीत तळलेत म्हणून.
कुठल्याही गोष्टीच unboxing करताना , आपला मेकप करताना त्या cosmetics वर ई.ई. हाताच्या बोटांनी तबला वाजवणे हा एक irritating प्रकार झालायं.

हल्ली insta वर pregnancy news revel and reactions , geneder revel इ गोष्टींनी उच्छाद मांडलाय. तरल भावनांचे जाहीर प्रदर्शन उबगं आणतयं. काही वेळेला मराठी जोडपीही डोहाळे जेवणाच्यावेळी 'राधा' की क्रुष्ण करताना दिसताय. आपल्याकडे पेढा की बर्फी प्रकार अगोदरही होताच पण आता हे सगळे gender revel प्रकाराची अनुकरण वाटते. "आम्हाला वाटलं राम येणार (ईथे डोजेतले फूटेज) पण आमच्या घरी आली एक सुंदर लक्ष्मी "
मध्यंतरी कोणा एका जोडप्याने डोजेमध्ये थेट सहभागी होण्यासाठी आमंत्रण post केल होत. म्हणजे संध्याकाळपासून समारंभ live cast करणार होते.

कुठल्याही गोष्टीच unboxing करताना , आपला मेकप करताना त्या cosmetics वर ई.ई. हाताच्या बोटांनी तबला वाजवणे हा एक irritating प्रकार झालायं. >> १००++

गेले चार पाच दिवस इंडियन एक्स्प्रेसचं फेसबुक अकाउंट मला ए आर रेहमानच्या डायव्होर्स संबंधी बातम्या दाखवतंय. मी इंडियन एक्स्प्रेसला फॉलो करतो पण यातल्या एकाही पोस्टमधल्या लिंकवर क्लिक केलं नाही , लाइक केलं नाही. एका पोस्टवर जाऊन तुम्ही फिल्म फेअर आणि मायापुरीचं काम का करताय असं विचारलं.
त्यांच्या ( इं ए) च्या अकाउंटवर क्लिक केलं तर मला इतर बातम्याही दिसताहेत. विशेषतः महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या. या बातम्या मला
माझ्या फीडमध्ये दिसत नाहीत.

स्वस्ती डोजे,बारस तरी ठिक आहे मधे एक चोर ओटिचा सुद्धा मोठा फक्शन केलेला व्हिडियो पाहिला...जी गोस्ट गुपचुप करायची प्रथा आहे त्याचाच गाजावाजा, धन्य ते रिल्स.
एक बाई साडी नेसुन बसायच कस ,चालायच कस्,कॉफी कशी प्यायची, रुमाल कसा उचलायचा ह्याचे रिल्स करते..

भरत ईंडियन एक्सप्रेस्स न्युज फीड बद्दल +१. पॉसिबल बॉलीवूड अफवा पण दाखवतात हे चॅनल वाले. Sad मैं क्या नाचू? Wink

कुरकुरीत पदार्थ चुरडण्यापेक्षा मग ते सुरि फिरवून करकर आवाज काढुन दाखवतात ते तरी बरे Happy

unboxing करताना , आपला मेकप करताना त्या cosmetics वर ई.ई. हाताच्या बोटांनी तबला वाजवणे>> म्हणजे? त्याने काय साध्य होते? मी ते थोडा प्रॉडक्ट रिस्ट ला लाऊन कॅमेरापुढे धरतात, दुसरा हात मागे पडद्या सारखा धरून ते पाहिलेय. ते पण कशाला दाखवतात काय माहीत! जसं काय त्यांनी क्रियेट केलाय तो प्रॉडक्ट.

प्राजक्ता Lol लोकांना लई वेळ आहे असली रीळं करत बसतात.. ती १ बाई कपाळावर पुढे केस आणुन "न" ला "ण" म्हणत टिकली ची अ‍ॅड करते "घ्या णा खूप छाण आहे" असं म्हणते. ती डोक्यात जाते पण फीड तरीही दिसतो मला. इंस्टा वर डीसलाईक ऑप्शन नाहिये ना ..

घ्या णा खूप छाण आहे"
>>>> Lol ते लोक तण, मण आणि धण अर्पूण व्हिड्यू करत आहेत आणि तुम्ही अशा चुका काढता. Wink

आशू, ती निधी देशपांडे आहे
बिंदियाज ऑनलाईन शॉप वाली.
सगळं सारकास्टिक आहे. मुद्दाम म्हणते ती न ला ण!
असे काही प्रॉडक्ट वगैरे नाहीये.
Happy

((इंस्टा वर डीसलाईक ऑप्शन नाहिये ना))
पोस्टच्या वरच्या बाजूला तीन dots असतात तिथे क्लिक करून मेन्यू येतो. त्यात Not interested असा option आहे. तो क्लिक केला की त्या प्रकाराचे मेसेज दिसत नाहीत.
तसंच आवडत नाहीत ते अकाउंट unfollow करुन टाकले की दिसत नाहीत.

जर आम्ही "केल्या गेले " विदर्भी नमुना म्हणून चालवून घेतो, तर तुम्ही न ला ण आणि ण ला न मराठवाडी ठसका म्हणून का चालवून घेऊ शकत नाही?

न ला ण आणि ण ला न म्हणणार्‍यांना हसणे हे माझे पेट पीव्ह आहे. याबद्दल एक लेख मी कधीतरी शेअर केला होता.

हे मजेत पण आहे आणि सिरियस पण. कोणी पर्सनली घेऊ नका.

नॉन सॅन्सीकल अर्ग्युमेंट्स आजकाल डोक्यात जातात .

माझा इस्त्रीवाला ड्रेसला खिसा असेल तर त्या खिशाचा जो आतून जोडलेला भाग असतो तो इस्त्री करत नाही . मग तो चुरगळलेला भाग ड्रेस चा तेव्हढाच एरिया पण चुरगाळतो . मी इस्त्रीवाल्याला म्हटलं अहो तुम्ही ते आतून इस्त्री करीत जा . .. तो म्हटला नाही ना मॅडम आपण करतच नाही . मी म्हटलं कळलं मला , पण आता मी सांगतेय तर करा . त्यावर तो म्हटलं नाही ना पण कुणी (कोणताच इस्त्रीवाला ) करतच नाही ना .
या अर्ग्युमेण्टला काय लॉजिक आहे कोणी सांगेल का ?

एक मित्र टोटल २ ८ फॅमिली मेंबर्स ना घेऊन राजस्थानला गेला होता त्यात लहान मोठे वयस्क सगळे होते . मी त्याला म्हटलं होतं कि जरी नोव्हेंबर असला तरीही बाहेर उन्ह असतात . तुझ्या बरोबर वयस्क लोक आहेत तेव्हा निदान आई वडिलांसाठी टोप्या आणि पाण्याच्या बॉटल्स बरोबर नक्की ठेव . तिथे गेल्यावर एक दिवस त्याच्या आईला उन्ह बाधली, आणि मला समजलं कि टोप्या नव्हत्या नेल्या त्यासाठी मिळालेली स्पष्टीकरणे अशी
टोप्या नव्हत्या म्हणून नेऊ शकलो नाही . टोटल २ ८ जण होते आम्हीच फक्त टोप्या कशा घालणार ? कोणीच नव्हत्या घातल्या .
आणि उन्हाचा तडाखा पहिली १ ० मिनिटे जाणवतो नंतर सवय होते . आम्हाला शरीराचे लाड करायला आवडत नाहीत . शरीराला सवय व्हायला हवी . (आई वडील ७ ५ च्या आसपास च्या वयाचे आहेत )

Pages