पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्रॉम ह .पा. >>
तो किरण - ते अनेक किरण

मला यावरून सूर्य किरण सोनेरी हे कौमुदीही हसते आहे (आनंदी आनंद गडे )
हे आठवलं. यातल्या सोनेरी हे यामुळे किरणचे अनेकवचन किरणच रहात असावं असं वाटत होतं पण किरणे असं अनेकवचन सर्रास वापरलं जातं ना?

ग्रेसांनी ते वृत्तात बसवायला केलेलं असावं का?
ती गेली तेव्हा रिमझिम हे उद्धव (२ ८ ४) वृत्त आहे
किरण लिहिले असते तरीही बसलेच असते कदाचित .. (ओळीतील शेवटचे अक्षर कायम गुरू या नियमाने )

मग अडकली ऐवजी अडकले किरण असे करावे लागले असते ना?>> होय तुमचं बरोब्बर आहे स्वाती२ मीही हाच विचार करत होते.. पण प्रतिसाद कोणत्या धाग्यावर लिहिला आहे काय आठवेना अजिबात.. फारच जास्त अवांतर नको व्हायला.. धागाकर्ती किरण फेकून मारेल... हाहा !!

विचित्र स्वप्ने पडणे त्याचा अर्थ न लागणे, एखादी घटना घडून जाणे आणि मग त्या स्वप्नाचा अर्थ लागणे ह्याने वैताग आलाय.
समजतच नाही तर स्वप्न आगाऊ का पडतात?
असंही मी ना सावध होउ शकत आणि ना काही action घेऊ शकत. देवाचं असं म्हणणं आहे का की मी तर warn केलं होतं तुला कळलं नाही त्याला मी काय करू वगैरे

अशा लोकांना फिलीप के डिक - सुप्रसिद्ध साय फाय लेखक - Precog म्हणतो. Precognition! देवाची देणगी आहे. develop करा. योग्य वापर करा.

माझ्या डोक्यात जाणाऱ्या गोष्टी म्हणजे पुण्याची ट्राफिक.
--सिग्नल तोडून जाणे,
--फूटपाथवरून स्कूटर मोटारबाईक चालवणे,
--रस्त्याच्या उलट्या बाजूने स्कूटर मोटारबाईक चालवणे,
--अरुंद फूटपाथवर गप्पा मारत उभे रहाणे,
--तिथेच बाजूला पचकन थुंकणे.
--जनरल उर्मटपणा.

Noted केकू. धन्यवाद.
कसं develop करतात काय माहिती.
बघते.
.
पूर्वी मला पुण्याच्या traffic चा एवढा राग यायचा नाही.
कार चालवायला लागल्यावर मात्र डोक्यात जायला लागली बेशिस्त.
एकतर आपल्याला काही खास येत नाही आणि लोकं एकही नियम पाळत नाहीत. कसं करायचं

हपा, बर्याच लोकांनी किरणांवरून ‘सूर्याला गवसणी‘ घातली असल्यामुळे, मी जरा ‘खोक्यांविषयी’ लिहितो. Happy

‘ती खोके’ असं जरी म्हणत नसले तरी, ‘ती रिकामी ‘खोकी’ ठेवली आहेत / ती ‘खोकी’ उचला’ ई. ऐकलं, वाचलं, लिहिलंय. त्यामुळे खोक्यांच्या बाबतीत तरी ते खोकं, तो खोका आणि ती खोकी हे तिनही शब्दप्रयोग कॉमन आहेत. (त्यामागचं व्याकरण माहित नाही).

Happy
बंगाली भाषेत खोका म्हणजे लहान मुलगा!
अती अवांतर: असामी भाषेत पण सेम अर्थ आहे का, माहीत नाही!
नाही, गुवाहाटी ला मध्ये फार उलाढाल झाली ना, खोक्यांची!
Lol

लेटेस्ट डोक्यात जायला लागलं आहे ते म्हणजे gbu. कोणी कुणाला hbd gbu लिहिलं की डोक्यात सणक जाते. तसंच vovels वगळून स्पेलिंग लिहितात ना चॅटिंग करताना तेही होपलेस आहे राव. I m cmn. Snd ur add., असा मेसेज प्रोफेशनल संदर्भात मिळाला आहे आजच

I dnt undrstd wht u r syng असे उत्तर पाठवून द्या.

ghost bless you

God bless you असावे बहुधा. मलाही माहीत नाही, मी पण उत्सुकतेने सर्च इंजिनवर शोधले आत्ताच.

HBD GBU HA वगैरे शॉर्टफॉर्म लिहून जो प्रचंड वेळ वाचतो त्याचं हे लोक काय करत असावेत ?

जस्ट आपली एक उत्सुकता

I dnt undrstd wht u r syng असे उत्तर पाठवून द्या.>>>>> Lol

ते खोकं, तो खोका आणि ती खोकी >> छान मुद्दा. हो. ह्यात ते खोकं नपु आहे आणि त्याचं अनेकवचन ती खोकी असं होतं. पुल्लिंगी तो खोका असेल तर अनेकवचन ती खोकी होत नाही, ते खोके होतं. असो. ही असली चर्चा ह्या धाग्यावर होणे हा लोकांचा पेट पीव्ह होईल. त्यामुळे ही मा या वि शे पो.

ते खोकं, तो खोका आणि ती खोकी >> हो. ह्यात ते खोकं नपु आहे आणि त्याचं अनेकवचन ती खोकी असं होतं. पुल्लिंगी तो खोका असेल तर अनेकवचन ती खोकी होत नाही, ते खोके होतं. असो. ही असली चर्चा ह्या धाग्यावर होणे हा लोकांचा पेट पीव्ह होईल. त्यामुळे ही मा या वि शे पो.

मी हा धागा आता बघितला. १७०+ पोस्टी......
विकु, अमित Lol
विकु , तुम्ही हे याआधीही लिहिले होते ना? याच धाग्यावर बहुधा. तेव्हा हसायचे राहून गेले होते. Happy
चिन्मयी , वाईट अनुभव.

“ असली चर्चा ह्या धाग्यावर होणे हा लोकांचा पेट पीव्ह होईल. त्यामुळे ही मा या वि शे पो.” - होईलच हपा, कारण ‘शे पो‘ सुद्धा ड पो झालीय. Happy

असो, तो आणि ते खोकं ही उकल छान आहे.

अजून १.
आपण अगदी दिवाळी, दसरा, गुढी पाडवा वगैरे चा फॉरवर्ड च पण छान मेसेज किंवा फोटो पाठवावा & समोरच्याने.. STU.
(सेम टू यु चा शॉर्ट पाठवावा)... हिरमोड होतो अगदीच..

रीप्लाय न देणारे/उशिरा देणारे डोक्यात जातात का? घाऊक सण वार मेसेज ना नाही पण काहीतरी महत्त्वाचे विचारले आहे, किती वाजता अमुक जागी पोहोचाल असे .. त्यावर पुढचा कार्यक्रम अवलंबून असेल , मेसेज वेळेवर न पाठवता आधी पाठवलाय १ दिवस. तरी लोक मेसेज वाचून उत्तर न देता इतर काम करत राहतात.
हल्लीच अनुभव घेतला. मुलीच्या प्लेडेट बद्दल मुलीच्या मैत्रिणी ला दिवस, वेळ देऊन जमेल का विचारले. २ दिवसांनी त्या दिवशी संध्याकाळी क्लास आहे असं उत्तर आलं. सुटी १ वीक आहे, तर मुलीच्या कटकटीला कंटाळून दुसरा दिवस, वेळ विचारली. नो उत्तर, ३ दिवस झाले. आता मी उत्तर दिले तरी कंफर्म करणार नाही.
बरेच लोकांना दुसर्‍याच्या वेळ, शेड्युल ची पर्वा नसते.

Pages