लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे.
आठवेल तसे संपादित करत जाइन.
एकंदरीत अति आग्रह प्रकार मला
एकंदरीत अति आग्रह प्रकार मला फारसा झेपत नाही. +१०००
पूर्वी लाडू, केक वगैरे गोड पदार्थ कधीतरीच खायला मिळायचे तेव्हा आग्रह थोडा क्यूट होता. इतक्या लांब आमच्या घरी आलात तर एक तरी लाडू खाच! आजकाल कुणाच्याही घरी फ्रीज उघडला तर कुणीतरी दिलेले लाडू, सोन पापडी, केक वगैरे असतात. शिवाय गोड पदार्थ तुलनेने स्वस्त झाले आहेत पण तरीही काही लोकांना खोड असते आग्रह करायची. (बहुदा जुने लाडू खपवायला)
साखर, मैदा व डालडा हे इतके वाईट आहेत की हा आग्रह व 'इतक्या लांब आला आहत तर दोन सिग्रेटस ओढाच, किंवा थोडा जर्दा /गुटखा घ्याच. अगदीच काही नाही तर दोन विड्या ओढाच, नव्या सुनेने हौसेने वळल्या आहेत' यात फरक नाही.
एवढे प्रतिसाद पहाता धाग्याचे
एवढे प्रतिसाद पहाता धाग्याचे नाव "भरपेट पीव्हज" करायला हरकत नसावी.
… दोन विड्या ओढाच, नव्या
… दोन विड्या ओढाच, नव्या सुनेने हौसेने वळल्या आहेत ..
“हे-ते संपवून टाक, थोडसंच
“हे-ते संपवून टाक, थोडसंच उरलयं” हा प्रकार !! माझे पोट काय तुमच्याघरचे डस्टबीन आहे का ? तुम्हाला नको असलेले ओतायला ?
“If you must waste food, waste it OUTSIDE your body” हेच माझे तत्व. यावरून अनेकांचा राग-अबोला ओढवून घेतलाय पण नो रिग्रेट्स.
माझे पोट काय तुमच्याघरचे
माझे पोट काय तुमच्याघरचे डस्टबीन आहे का ?“If you must waste food, waste it OUTSIDE your body” हेच माझे तत्व.
>>> अगदी अगदी. पोट आहे का मोट हा प्रश्न मी माझ्याच घरात विचारला आहे.
साखर, मैदा व डालडा हे इतके
साखर, मैदा व डालडा हे इतके वाईट आहेत की हा आग्रह व 'इतक्या लांब आला आहत तर दोन सिग्रेटस ओढाच, किंवा थोडा जर्दा /गुटखा घ्याच. अगदीच काही नाही तर दोन विड्या ओढाच, नव्या सुनेने हौसेने वळल्या आहेत' यात फरक नाही. >>> फुटलो टोटल.
“If you must waste food, waste it OUTSIDE your body” >>> हे परफेक्ट आहे! घराघरांत लावायला पाहिजे भिंतींवर
पोट आहे का मोट हा प्रश्न मी माझ्याच घरात विचारला आहे. >>>
साखर, मैदा व डालडा हे इतके
साखर, मैदा व डालडा हे इतके वाईट आहेत की हा आग्रह व 'इतक्या लांब आला आहत तर दोन सिग्रेटस ओढाच, किंवा थोडा जर्दा /गुटखा घ्याच. अगदीच काही नाही तर दोन विड्या ओढाच, नव्या सुनेने हौसेने वळल्या आहेत' यात फरक नाही.>>>
पटलं.. तसच काहीसं होतं आजकाल माझ्याकडून..
म्हणजे उगाच भारंभार पदार्थ बनवून वाटणं अगदी नको वाटतं..
नकळत घरी आलेल्या पाहुण्यांना... आग्रह करणे बाजूलाच पडते उलट हवं असेल तरच / तब्येतीला चालत असेल तरच घ्या असा प्रवाह सुरू झाला आहे.
किंवा एखादे डायबेटिस असलेले पाहुणे वरचेवर गोड किंवा तत्सम जास्त पदार्थ घेतात तेव्हा मला guilt यायला लागत पण त्यांचं निवांत सुरू असते...
आपल्याला नसलं तरी चालतंय ".
आपल्याला नसलं तरी चालतंय ".
Submitted by मी कल्याणी on 26 August, 2024 - 08:48>>>
असा सो कॉल्ड त्याग सुनेनेही करावा ही अपेक्षा.>>>
टिपिकल पुरुष प्रधान संस्कृतीच लक्षण आहे.
लहान पणी काही विशिष्ट कुटुंबात बघितलं होत तेव्हा तर राग आलाच होता
पण आता काही दिवसांपूर्वी असाच काहीसा अनुभव घेतला ..
आरामात गप्पा टप्पा करत कित्येक वेळ चाललेल्या पुरूष मंडळींच्या जेवणाच्या वेळी त्यांना गरम गरम वाढून ... मग कधीतरी बायकांनी जेवयला घेतले ... अर्थात त्यावेळी ही पुरुष मंडळी बायकांना वाढायला/ पदार्थ गरम करून द्यायला आली नव्हती... ते आरामात पायावर पाय टाकून गप्पा ठोकत बसले होते..
त्या बायका पुरुष आणि एकंदर पूर्ण परिस्थिती डोक्यात गेली होती ...
इथे चाललेल्या विषयाला
अरे/अगं किती बारीक आहेस अजूनही? आई खाऊ पिऊ घालत नाही का नीट?>>>>>>>> मी माझ्या मुलासाठी ऐकते नेहेमीच. स्पेशली अशा आया बोलतात ज्यांच्या मुलांचा आहार दुप्पट तिप्पट आहे आणि ते प्रॉपर जाड कॅटेगरीत मोडतात. आताशा वेळ आली की मी पण बोलून दाखवते तुमच्या मुलाचा आहार जरा जास्तच आहे नाही का वयाच्या मानाने. बघा पुढे त्रास होईल. मग गप्प बसतात. वाईट वाटतं पण मरुदे आय डोंट केअर नाऊ!
https://www.instagram.com/reel/C_AO8prpFqA/?igsh=eXV1eGJnOHczb252
इतक्या लांब आला आहत तर दोन
इतक्या लांब आला आहत तर दोन सिग्रेटस ओढाच, किंवा थोडा जर्दा /गुटखा घ्याच. अगदीच काही नाही तर दोन विड्या ओढाच, नव्या सुनेने हौसेने वळल्या आहेत >>>
विकु उदाहरण एकदम सॉलिड आहे
विकु उदाहरण एकदम सॉलिड आहे
ओळखा पाहू वाल्या पेट पिव्ह वर
ओळखा पाहू वाल्या पेट पिव्ह वर पुलंचा एक लेख आहे. त्याचं त्यांनी आकाशवाणीवर एकदा वाचन केलं होतं. धमाल होता तो लेख.>>> त्याची लिंक आहे का??
अगदीच काही नाही तर दोन विड्या
अगदीच काही नाही तर दोन विड्या ओढाच, नव्या सुनेने हौसेने वळल्या आहेत' >>> विकु मधूनच धूमकेतु सारखे उगवतात आणि विकेट काढून जातात
अंजली_१२ जे करता ते योग्य च
अंजली_१२ जे करता ते योग्य च करता. कीप ईट अप.
त्या बायका पुरुष आणि एकंदर पूर्ण परिस्थिती डोक्यात गेली होती >> छंदी फंदी ह्या धाग्याच्या कुठल्याश्या पाना वर हे बोलले गेलेय. गेट टूगेदर ला बायका विभाग (किचन मधे) वेगळा, पुरुष विभाग वेगळा. डोक्यात जाणारी गोष्ट..
तो 'धोतर सोडा', 'मुंबई सोडा'
तो 'धोतर सोडा', 'मुंबई सोडा' वाला ना?
कुठे होता आठवत नाही.सापडला तर बघते.
गंगाधर गाडगीळ बंडूकथा पण धमाल आहे याबाबत.
विकू
विकू
अगदीच काही नाही तर दोन विड्या
अगदीच काही नाही तर दोन विड्या ओढाच, नव्या सुनेने हौसेने वळल्या आहेत' >>>
ह्या धाग्यावरील प्रतिसाद बघता मला वाटते की मनुष्याच्या वागण्यातील बऱ्याच गोष्टी ह्याला किंवा त्याला डोक्यात जाणाऱ्या वाटू शकतात......
ओळखा पाहू वाल्या पेट पिव्ह वर
ओळखा पाहू वाल्या पेट पिव्ह वर पुलंचा एक लेख आहे. >>> मी आणी माझा शत्रुपक्ष मध्ये आहे ते. ओळखा पाहु ही कोण? एक्झ्याक्टली लाईक काननबाला ऑर दुर्गा खोटे.
नाही नाही, शत्रुपक्ष नाही.
नाही नाही, शत्रुपक्ष नाही. ओळखा पाहू या concept वर त्यांचं पूर्ण स्केच आहे. फोन करून मी कोण बोलतोय ओळखा किंवा अचानक रस्त्यात गाठून काय ओळखलं का विचारणारे लोक. मग अश्यांना कसं उत्तर द्यायचं वगैरे आहे त्यात.
कुठल्या पुस्तकात किंवा युट्यूब वर आहे का माहीत नाही. सापडलं तर सांगतो.
वर लिहिलेल्या बऱ्याच गोष्टी
वर लिहिलेल्या बऱ्याच गोष्टी अगदी रीलेट होणाऱ्या आहेत. वजन, रंग, दिसणे वगैरे वर तर बरेचदा पोच न ठेवता बोलतात. नात्यातील एका नुकत्याच अवघड बाळंतपण झालेल्या मुलीला तिच्या चुलत सासऱ्यांनी, आता वजन वगैरे कमी करायचं बघा, असा शेरा मारला होता. तो माणूस माझ्या मनातून कायमचा उतरला.
लहानपणी रोज अंथरूण ओलं करायचा किंवा अमका तमका लंगोट किंवा चड्डी घालायला इतका त्रास द्यायचा, असले शेरे त्या व्यक्तीच्या पोरा बाळांसमोर किंवा मित्रमंडळींसमोर मारणारे लोक डोक्यात जातात.
आत्ता बरेच वर्षांनी एक
आत्ता बरेच वर्षांनी एक शाळूमित्र संपर्कात आला, त्याने मला विचारून शाळेच्या whatsapp ग्रुप मधे add केलं. मग वेलकम वगैरे झालं आणि एक जण मला फारच प्रश्न विचारू लागला पर्सनल. हा कोण आहे ते कळेना म्हणून त्याला मी विचारलं तू कोण आहेस? तर म्हणे ओळख बरं!
त्याचा डिपी कोणता तरी गुड मॉर्निंगचा मेसेज असलेला पोस्टर, डिस्प्ले नेम good vibes only! याला कसं ओळखु मी? मग मी नाही माहीत म्हणाले तर ऑफेंडच झाला. मग प्रायवेट मेसेजेस करून त्याने मला खूप झापलं तोपर्यंत हे माझं पेट पिव्ह नव्हत पण आता झालंय
अजूनही तो कोण हे मला कळलेलं नाही आणि गंमत म्हणजे तो कोण आहे हे मला add केलेल्या मित्राला किंवा माझ्या संपर्कातल्या इतर कोणाला पण माहीत नाहीये
ते भेटल्या भेटल्या जाडच झाली, काळीच झालीस, केसच गेले तुझे म्हणणारे मात्र माझा मूड ऑफ करतात. अरे तुम्हाला माहीत आहे का माझ्या आयुष्यात काय काय घडलं आहे ते? जज काय करताय मला? मी करते आहे का जज तुम्ही किती नोजी झालाय त्यावरून. ही माझी भळभळणारी जखम आहे. जाऊ देत बांधून ठेवते.
वजन हि अशी गोष्ट आहे कि
वजन हि अशी गोष्ट आहे कि जिच्यावरून अगदी ९ ९ % जनता आधीच सेल्फ जज्ज करत असते . त्यात हे लोक अजून तेल ओततात .
कोणाचीही लिमिटेशन्स लक्षात न
कोणाचीही लिमिटेशन्स लक्षात न घेता सल्ला देत सुटणारे लोक आजकाल पैशाला पासरी झालेत . त्यामुळे कोणाशी काही शेअर पण करावं वाटत नाही आजकाल .
मला ऑफिस ते घर या परतीच्या प्रवासाला आता खूप जास्त उशीर लागतो . मला ३ बॉस आहेत पैकी एका बॉस चे अप्रूव्हल घेऊन मी शिफ्ट आउट टाईम एक तासाने कमी करून घेणार आहे. बोलणं झालं आहे आता फक्त मेलची फॉर्मॅलिटी राहिली आहे . तोवर दुसरा बॉस म्हणतो तू सरळ ऑफिस एरियात का शिफ्ट नाही होत ?
आपण प्रत्येक प्रॉब्लेम कडे तो सॉल्व्ह होणारच या दृष्टीने पहिले पाहिजे , नवीन एरिया , नवीन फ्रेंड्स . .. ब्लाह ब्लाह अरे किती बडबड ?
इतक्या लांब प्रवास करत जाऊन एकच नोकरी करतोय त्याला काहीतरी कारण असेल ना ? शिफ्ट होत नाही त्याला काहीतरी कारण असेल ना ? मग नोकरीच बदल , तुझा बोईलिंग पॉईंट्च कसा येत नाही , वगैरे गोष्टींवर लेक्चर मिळते . काय करायचं अशा लोकांचं ?
अरे बाप रे. या विषयावर मला,
अरे बाप रे. या विषयावर मला, आई - बाबा, बहिणी, सासु-सासरे, ते रँडमली दूरचे कुणी नातेवाईक - ओळखीचे लोक यांनी एवढे पिडले आहे की विचारू नका.
आयुष्यात कधीतरीच येणाऱ्या लोकांसाठी ते वर्षातून एक दोनदा येणाऱ्या लोकांसाठी मी सिकंदराबाद स्टेशनच्या आसपास घर घ्यायला हवे होते. मावशीचे घर फारच लांब १८ किमी, इतक्या लांब कोणी घर घेत का? एका शहरात राहूनही पटकन जाऊन भेटता येत नाही. आणि ही काय फिरतीची नोकरी. फिरतीवर नोकरी करणारे आम्हीही पाहिले आहेत पण एवढे फिरणे? सांगायचं स्वच्छ मला नाही जमत आता दुसऱ्या कुणाला पाठवा. दुसरी नोकरी बघ की तुला काय सहज मिळेल. तुमच्या कंपनीची पुणे / नागपूरला ब्रँच नाही का? त्यांना सांग ना की पुणे/नागपूरला बिझिनेस डेव्हलप करतो तिकडे ब्रँच काढू. त्या यांचे ते, त्यांच्या जावई असाच दिल्लीला का कुठर होता आधी. मग नागपूरला ब्रँच निघाली आणि आला इकडे.
आणि त्यात वैताग आणणारी एक घटना. मला बघायला आले होते मुलगी आणि आईवडील (कुणा ओळखीच्यांकडे ते गुजरातहुन आले होते, लग्नाचा मुलगा आहे कळल्यावर मग हा पहाण्याचा कार्यक्रम ठरला होता.). तर त्यांचा आल्या आल्या मुद्दा काय तर किती लांब घर! आणि इतक्या लांब घर का घेतलं? मी कारण सांगितलं तरी, पण एवढ्या लांब? आणि त्यात आई बाबाही मग फितूर होऊन त्यांची री ओढायला लागले. अजून आम्ही एकमेकांचे चेहरेही नीट पाहिले नाही, पसंत करू का ते ही माहीत नाही आणि हे अर्धा तास घर किती लांब, काय काय किती लांब पडतं आणि कुठं घ्यायला पाहिजे यावर पीडत होते. अनेकदा उठून निघुन जावं असं वाटत होतं. शेवटी थांबवला मी विषय.
कॉर्नर करणे/ पंचनाम्यास
कॉर्नर करणे/ पंचनाम्यास घरातले ५ पंच बसणे हा गर्हणिय प्रकार मी अनुभवलेला आहे. भयंकर तिरस्कार आहे मला जेव्हा घरचे सर्वजण एका मुद्द्यावर पिळत बसतात. तिडीक जाते माझी डोक्यात.
आणि हे असे प्रसंग डिफायनिंग मोमेन्टस असतात माझ्याकरता तरी.
@दक्षिणा @मानव >>>> अगदी
@दक्षिणा @मानव >>>> अगदी रिलेटेबल आहेत किस्से. लोकांना फार चाकोरीबद्ध जगायला आवडतं आणि तसं कुणी वागत नसेल तर ते त्यांना झेपत नाही.
आम्ही हनिमूनला जायला ट्रेनचे तिकीट काढले तर लोकांनी आम्हाला वेड्यात काढले. म्हणे प्लेनने का नाही जात? अरे आम्हाला मस्त गप्पा मारत जायचे आहे तर तुम्हाला काय प्रॉब्लेम?
>>>>>>>. तर लोकांनी आम्हाला
>>>>>>>. तर लोकांनी आम्हाला वेड्यात काढले.
काय आचरटपणा आहे
आम्ही लग्न व्ह्यायच्या आधी
आम्ही लग्न व्ह्यायच्या आधी पिक्चरला गेलेलो. जो अजिबात रोमँटिक इ. न्हवता. त्यावर हा कुठला पिक्चर बघायला गेलात म्हणून बायकोची मावशी म्हणाली. म्हटलं पिक्चर कोण बघत होतं! असं चारचौघात म्हटल्यावर परत नाही कोणी विचारलं
अर्थात यात पीव्ह्ज वगैरे काही नाही. अशा लोकांना उत्तरं द्यायला मला मजा येते.
टिपिकल पुरुष प्रधान संस्कृतीच
टिपिकल पुरुष प्रधान संस्कृतीच लक्षण आहे.>>> अगदीच सहमत.
अजून एक आजकाल डोक्यात जातं ते म्हणजे व्हाट्सअँप ग्रुपवर स्वतःच्या पोराबाळाचे ढीग फोटो टाकणे. मग ते अगदीच बालवाडी असो किंवा कॉलेजला जाणाऱ्या पोरांच्या अचिव्हमेंट. आणि इतरांनी मात्र काही पोस्ट केलं की त्यावर अजिब्बत रिऍक्ट न करणे. त्यातून या पोरांचे युट्युब चॅनल असतील तर पालकच जास्त चेकळतात
म्हटलं पिक्चर कोण बघत होतं! >
म्हटलं पिक्चर कोण बघत होतं! >>> अमित हे एकदम "काय रे, नेपोलियनचा जन्म कधी झाला?" "त्याची आई बाळंत झाल्यावर" लेव्हलचे आहे.
"तेव्हापासून पाहुणे येणार म्हंटल्यावर मला आधीच वेगळे जेवायला वाढत असतः" - पुलं - बिगरी ते मॅट्रिक
Pages