पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनीमोहोर, कोण बोलल्या जातो बोलला तर मी त्याच्या भागात असेच बोलले जाते म्हणुन गप्प बसते. पण हेमा हे नाव स्त्रीलिंगी असताना जर कोणी तो हेमा आला, हेमा इथे बसला असे बोलत असेल तर ते खटकते. कारण ते भाषेच्या दृष्टीकोनातुन चुक आहे. हेमा हा शब्द कुठल्याही बोलीभाषेत किंवा प्रमाणभाषेत स्त्रीलिंगीच राहणार आहे. मी शुद्ध मराठीत बोलतेय म्हणुन ती हेमा म्हणते आणि उद्या मालवणीत बोलले तर तो हेमा असे बोलणार असे होणार नाही.

किरण हा शब्द सुर्याच्या बाबतीत वापरला तर बहुतेक वेळा नपुंसकलिंगी वापरतात. किंवा कदाचित सुर्याचे किरण कायम अनेक/बहुवचनी असल्यामुळे ‘ते’ हे अनेकवचन वापरत असावेत. मला नक्की माहित नाही. पण मुलामुलीचे नाव ठेवले असेल तर तो किरण किंवा ती किरण असे होते. हे सगळे बरोबरच आहे.

व्यक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे. मग ती व्यक्ती पुरुष असो वा स्त्री. ‘एक व्यक्ती आली होती ‘ही वाक्यरचना कोणी एक व्यक्ती आला होता अशी केली तर ते चुक. प्रमाणभाषेत व्यक्ती स्त्रीलिंगी आणि बोलीभाषेत पुल्लिंगी असे होणार नाही. बोलीभाषेत कदाचित हा शब्द नसेलही.

माझेही पेट पीव्ह - मला सतत खाण्याच्या गप्पा मारणाऱ्या व्यक्ती बोअर होतात . २४ तास घरकाम , खाणे पिणे याविषयी बोलत रहाणे जमत नाही . अश्या व्यक्तीशी कधीच नाळ जुळत नाही . तेवढ्याच तेवढं बोलणे होते .

तसंच काहीसं माझंपण. एकावेळचं खाणं चालू असताना पुढच्या खाण्याची चर्चा करायला मला आवडत नाही. एकंदरीत घरकाम/स्वैपाक हा आयुष्याचा केंद्रबिंदू करणं आवडत नाही.

साधना, अग आमच्या कोकणातल्या स्त्री कामवाल्या मी गेलो मी च्या पितोय अस म्हणतात. आपल्याला सवय नाही म्हणून विचित्र वाटतं. एवढच कशाला आमची ठाण्याची कामवाली ही स्वतः विषयी बोलताना, मी केर काढतो वगैरे म्हणते. असो.

जाई ला अनुमोदन... मला ही दुपारी जेवताना रात्री काय करू या अश्या चर्चेचा उबग येतो. कोकणात विशेषतः खुप माणसं जमली असतील तर हे खुप चालत... जेवणे आणि खाणे ह्या शिवाय दुसरं आयुष्य नाही असं वाटत.

ममो हे मीही ऐकले आहे. आमच्या शेजारी एक कोळी कुटुंब होते त्यातल्या काकी नेहमी स्वतःचा उल्लेख मी आलो , मी गेलो असाच करत पण साधना आली असे म्हणत. साधना आला, बसला असे बोलत नसत. आता ऑफिसात माझ्यासोबत एक आग्री पोरगा होता मुरुडचा. त्याचे बोलणेही असेच असायचे. पण ही बोलीभाषा.

भाषांना कोणतेच नियम नको म्हटले तर एंग्रजी बोलताना त्यात मराठी हिंदी शब्द घालुन बोलायला लागले तर नोकरीच्या इन्टर्व्युमध्येच नापास करणार. भाषा तुम्हाला जमते तशी बोला, व्याकरणाची गरज नाही म्हटले तर आपल्याकडे पहिलीपासुन बारावीपर्यम्त भाषा विषय अभ्यासक्रमात आहे, त्यात पास कसे होणार? मायबोली फेसबुक बनुन राहिल, मराठीतच बोला, लिहा हा आग्रह कशाला हवा असे लोकांना वाटेल. असो.

मला वगैरे ऐवजी वै लिहितात ते विचित्र वाटतं.

एकंदरीत घरकाम/स्वैपाक हा आयुष्याचा केंद्रबिंदू करणं आवडत नाही >>> +१ . सतत खाण्यापिण्याच्या गप्पा मारणं आवडत नाही

माझी तक्रार - भूभू मांडीवर घेवून गाडी चालवणारी मंडळी!
कॅरीयर / सेफ्टी हार्नेसची सोय असताना चालत्या गाडीत भूभू मोकळा ठेवतात ते मला एकूणच पटत नाही, त्यात तो ड्रायवरच्या मांडीवर म्हणजे अजूनच. अशाने स्वतःची, भूभूची आणि इतरांची सुरक्षितता धोक्यात येवू शकते हे कळत कसे नाही ?

किरण हा शब्द सुर्याच्या बाबतीत वापरला तर बहुतेक वेळा नपुंसकलिंगी वापरतात >> चूक. किरण हा मराठीत पुल्लिंगी आणि हिंदीत स्त्रीलिंगी आहे. नपु अजिबात नाही.

तो किरण - ते अनेक किरण

सूरज की किरने (अनेकवचनी) याचं मराठीत चुकून सूर्याची किरणे/किरणं असं केलं जातं. पण मराठीत ते (ती हे अनेकवचनी सर्वनाम) नपु सारखं अनेकवचन आहे आणि त्यांचं एकवचन काय करणार? सूर्याचं एक किरण पडलं होतं? छ्या काहीतरीच.

(तो किरण याचं अनेकवचन ती किरणे होत नाही. असा कुठलाच पुल्लिंगी शब्द चालत नाही. करून बघा - तो खोका - ती खोके, तो हात - ती हाते, तो प्रतिसाद - ती प्रतिसादे, तो हरचंद - ती हरचंदे)

चूक. किरण हा मराठीत पुल्लिंगी आणि हिंदीत स्त्रीलिंगी आहे. नपु अजिबात नाही>>>>>

मला हेच म्हणायचे होते की ‘ते’ सुर्यकिरण ऐकुन माझा गै स झाला असणार.

सुर्यकिरणांचे व्याकरण अजब आहे. ती सुर्यकिरणे हा शब्दप्रयोग खुप ऐकलाय.

हिंदीत पुलिस हा शब्द स्त्रिलिंगी आहे. हा असा का असावा कळत नाही. मुळात हा इंग्रजीमधुन आलाय, त्यात ज्या काळात आलाय त्या काळात कोणी स्त्री पोलिस असयाची शक्यता शुन्य आहे. मग हा शब्द असा का? ( की त्याचे मुळ इंग्रजी नसुन दुसरेच काही, हिंदीला इन्ग्रजीच्या आधीच परिचीत असे आहे?)

अच्छा. बरोबर, तो प्रयोग गोंधळात टाकतो खरा. जुनी गाणी त्या बाबतीत व्यवस्थित आहेत.
कोटी कोटी किरण तुझे (अनेकवचन. तेजोनिधी लोहगोल गाण्यात)
सूर्यकिरण सोनेरी हे (अनेकवचन) कौमुदी ही हसते आहे (आनंदी आनंद गडे फेम)

हिंदीत पुलीस हा एकवचनी शब्द नाही. पूर्ण पोलीस फोर्सला पुलीस संबोधले जाते. जसे सेना. त्यामुळे स्रीलिंगी.

मराठीतला व्यस्त व हिंदीतला व्यस्त हे वेगवेगळे अर्थ असलेले शब्द आहेत >>>> मला ही अस्ता व्यस्त म्हणुन मेस्सी असा अर्थ वाटला मराठीत, बरोबर आहे का? की व्यस्त हा शब्द च नाही मराठीत?
मला बोलीभाषा वैविध्य खटकत नाही..ती एक एक मुलूख आणि व्यक्ती ची स्टाईल असते .. IMO

आपल्याकडे पहिलीपासुन बारावीपर्यम्त भाषा विषय अभ्यासक्रमात आहे, त्यात पास कसे होणार? >> आमच्या शाळेत एका नववीच्या विद्यार्थ्याने " वडील " ह्या शब्दाला समानार्थी शब्द " आईचा नवरा" लिहिला होता.

न्नुसता व्यस्त हा शब्द मराठीत ऐकला नाही, मी समग्र मराठी ऐकले नाहीय त्यामुळे अद्याप ऐकला नसावाही. आता मोबाईल कंपन्यांच्या कृपेने ऐकायला मिळतोय ते सोडा…

एका नववीच्या विद्यार्थ्याने " वडील " ह्या शब्दाला समानार्थी शब्द " आईचा नवरा" लिहिला होता>>>>

Happy Happy त्याच्या कल्पनाशक्तीचे कौतुक करायला हवे. सहजी सुचणार नाही Happy

मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता
- ग्रेस ( ती गेली तेव्हा )
किरण-किरणे दोन्ही बरोबर असावं कदाचित.

Pages