पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमाल आहे. वयोवृद्ध आईवडिलांनी टोप्या घातल्या तर इतरांना काय प्रॉब्लेम असणार आहे? आणि यात शरीराचे लाड काय? उष्माघात होऊन शरीराचे नुकसान झालेले चालते का?

इतरांना काय प्रॉब्लेम? त्यांनाच असेल .
आयुष्यभर आईवडिलांना टोप्या घालताना काही वाटत नाहीं आणी ह्या टोप्या घालताना लाज वाटते.आपल्या आरोग्यापेक्षा काही महत्वाचं नाही आणि त्याची काळजी घेण्याची जबाबदारी आपलीच आहे हेच लोकांना कळत नाही.किमान स्कार्फ ,ओढणी तरी बांधून उन्हाचा त्रास टाळता आला असता.

>> १ बाई कपाळावर पुढे केस आणुन "न" ला "ण" म्हणत टिकली ची अ‍ॅड करते "घ्या णा खूप छाण आहे" असं म्हणते>> Lol वर सांगितलं आहेच पण ती सोटी पोरगी/निधी देशपांडे. तिचं चिंचपेटीचं रिल एकदम टीपी आहे. लाईव्ह करणारी लोकं असं बोलतात.

भरत, मराठवाडी ठसक्यानुसार मी स्वतः सुद्धा बरेचदा 'ण ला न' म्हणते पण 'न ला ण' म्हणत नाही. तरीही मला ते लिहीलेले वाचून गंमत वाटलीच. Happy आम्ही घरी प्रमाणभाषेत बोलत नाही, लिहिताना मात्र प्रमाण भाषेतच लिहीते. करायले, खायले वगैरे. Happy

मी मजेतच लिहीले आहे. हे आणि ते दोन्ही. तुमचा लेख वाचायला आवडेल. Happy

विदर्भात सुद्धा काही न चा ण करणारे आहेत.
मी विदर्भाचे वैशिष्ट्य समजत होतो, मराठवाड्यात तसे करतात हे माहीत नव्हते.

मराठवाड्याची भाषा हा एक रोचक विषय आहे.
प्रत्येक जिल्हा वेगळी भाषा बोलतो, जसे की लातूर आणि नांदेड एकदम वेगळं आहे.
पुण्या मुंबई पेक्षा तिकडे भाषा loud आहे, मोठ्या आवाजात बोलतात आणि fast बोलतात.
ऐकायला फार मजा येते.
मी तिरुपती ला गेलेले तेव्हा मला दक्षिणभारतीय कमी आणि नांदेड परभणी लातूर ची भाषा जास्त ऐकायला मिळाली.

मराठवाड्यातच करतात का ते माहीत नाही. केल्या गेले हे विदर्भी म्हणून मी मराठवाडा म्हटलं. बिग बॉस मराठीत रितेश देशमुख कडून ऐकलं. म्हणून म्हटलं असेल मराठवाड्याचं. तसं त्याचं शिक्षण मुंबईच्या दक्षिण़ टोकाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झालंय.

कलर्स / ई टीव्ही च्या कुकरी स्पर्धेची एक विजेती की फायनलिस्ट सुद्धा न चा ण आणि ण चा न करायची. ती कुठली होती आठवत नाही.

देवाभाऊ मुख्यमंत्री झाले तेव्हा न ला न म्हणणारा मुख्यमंत्री मिळाला असं वाचलं. ते संस्कृतीला सन्स्कृती म्हणतात.

केल्या गेले >> हे सुद्धा शुद्ध मानलं जाईल तिकडे, वेगळं असतंय अस्मिता लिही गं मला नेमकं आठवना गेलंय

आम्हाला शरीराचे लाड करायला आवडत नाहीत . >>>>

मग राजस्थानला कशाला मरायला गेले होते? डोळ्यांचे इतके लाड शोभत नाहीत हो.. आणि जेवण वगैरे तसेच कच्चेच खात असतील. पदार्थ शिजऊन मऊ करणे हे दातांचे लाड आणि ते चवदार करणे हे जिभेचे लाड. वर पचायला सोप्पे असले तर मग झालेच… पचनसंस्थेचे इतके लाड???? उद्या गॅस मिळायचा बंद झाला मग?? तेव्हा कसे शिजऊन खाणार? त्यापेक्षा कच्चे खायची सवय केलेली बरी…..

साधना Proud

मायबोलीवर आपण अधिकतर विरंगुळा म्हणूनच लिहितो. संवाद साधण्यासाठीही लिहितो. तो एक वेगळा भाग. पण जेव्हा विरंगुळा म्हणून लिहितो, तेव्हा शब्दांची आणि नावांची लघुरूपे वापरून नक्की काय साध्य होतं? वेळ वाचतो म्हणावं तर तुम्ही वेळ घालवायलाच लिहिताय.
बटाटा वडा ला ब वडा , आशा काळेला आ का, इ. आता लेटेस्ट लाइक आणि सब्स्क्राइबला ला व स लिहिलेलं वाचलं. यातून नक्की काय साध्य होतं?

हे सगळं लेखात आलं तर संदर्भावरून कळतं तरी. पण प्रतिसादांत आलं की हे काय ते आठवण्यात वाचणार्‍याचा वेळ जातो. कारण इथे कोणी एकच एक धागा फॉलो करत नाही. मायबोली कुरणात आपण वेगवेगळ्या धाग्यांवर चरत असतो. असं चरताना विशिष्ट धाग्यावरची चर्चा डोक्यात ठेवून रिकलेक्ट करून नवा प्रतिसाद वाचा, असं विरंगुळा टाइप धाग्यांवर आणि प्रतिसादांवर मी तरी करत नाही.

नावांची लघुरूपे!!
अशी लघुरूपे आली कि मी पोस्ट सोडून पुढे जातो.

चांगला मुद्दा भरत.
लखुरूपीकरण बऱ्यापैकी संसर्गजन्य आहे असे वाटते आणि सुरवातीला त्यावर टोमणे मारत मलाही काही प्रमाणात संसर्ग झाला आहे. ही पोस्ट त्यावर प्रतिजैविक ठरावी.

खरे आहे!
यात टायपायचा कंटाळा नसून जादाचा आगाऊपणा दिसतो असे मला तरी वाटते.
गुजा, बव, मुडाखि .. असली अनेक लघुरुपे सगळ्यांना माहिती असायला हवीत हा कसला अट्टाहास?

यात टायपायचा कंटाळा नसून जादाचा आगाऊपणा दिसतो असे मला तरी वाटते. >> + १
आणि लोक इतके कोडगे आहेत की मुद्दाम बेसनलाडू लिहिण्याऐवजी बेला लिहितात, जणू काही ३-४ अक्षरे जास्तीची लिहिली तर वेळ वाया जाईल.
याच धाग्याच्या पान २५ वर, मी अश्या आचरट अपभ्रंश वापरण्याबद्दल लिहिले होते.

लघुरुपे आवडत नसलेले आणि ते वाईटच आहे, त्याला विरोधच केला पाहिजे असं म्हणणारे लोक मी म्हातारे समजतो. समाजाशी कनेक्ट तुटलेले होण्याच्या मार्गावरचे. वैयक्तिक घेऊ नका, पण लघुरुपे हे टाईप करायचा आळसातुन चालू होऊन भाषेचा भाग बनणे सतत घडत आहे. त्याला नाके मुरडणारे लोक जातात, लघुरुपे वापरणारे आहेत तोवर रहातात.
मी इंग्रजी लघुरुपे मुद्दामुन माहित करुन घेऊन ती जमेल तशी वापरुन तरुण रहायचा प्रयत्न करतो. हास्यास्पद वाटेल पण पुढच्या पिढीशी कनेक्ट होण्याचं ते अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. Happy

ती लघुरूपं लिहिणार्‍याचे काही सेकंद वाचत असतील, पण त्यांचा अर्थ लावताना प्रत्येक वाचकाचे किती सेकंद खर्च होत असतील? मग त्यासाठी आधीचे प्रतिसाद परत वाचा, संदर्भ आठवा किंवा शोधा असे सगळे उपद्व्याप करावे लागतात.

लघुरुपे एक भाग झाला. जुन्याशब्दांचे नवे अर्थ आणि सर्वस्वी नवे शब्द आणि ते खुबीने वापरणे हे फॅसिनेटिंग आहे. मुलाला ते झटकन वापरताना बघुन मी अचंबित होतो आणि ते आपल्याला कसे वापरता येतील ते बघतो.

पुढच्या पिढीशी कनेक्ट होण्याचं ते अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. >> हाहाहा, तरी बरं की सगळे टीपापाकर म्हातारेच आहेत. Lol

Pages