Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अ मॅन कॉल्ड ओटो - फायनली
अ मॅन कॉल्ड ओटो - फायनली बघितला.
आवडला.
तरी पुस्तकाची मजा दसपटीने जास्त आहे
ओटो आणि त्याच्या मित्राची गाड्यांची एकंदर आवड, वेगवेगळ्या ब्रॅन्ड्सवरचं प्रेम, इतर ब्रॅन्ड्स त्यापुढे अगदी फालतू हे एकमेकांना पटवण्याची एकही संधी न सोडणे - या मुद्द्यांवरून पुस्तकात खूप बारीकसारीक subtle मजा मजा आहे. ते वाचायल धमाल येते. त्यांची मैत्री त्यातून दिसते. त्यामुळे त्यांच्यातला अबोलाही भिडतो आणि शेवटी ओटो त्याच्या पाठीशी उभा राहण्यामागची त्याची भावनाही भिडते. ते सिनेमात नीटसं आलेलं नाही (किंवा घेतलेलं नाही)
ओटोचा ग्रम्पीनेस सुद्धा सिनेमात थोडा टोन-डाऊन केल्यासारखा वाटला.
Merry Christmas पाहिला नेफिवर
Merry Christmas पाहिला नेफिवर..
छान आहे...थोडा वेगळा...संवाद फार नाहीएत...एका रात्रीत घडतो पिक्चर... बॅकग्राऊंड म्युझिक जुन्या काळात असायचं तस आहे...
विजय सेतुपती आवडतोच...पण कतरिना ही छान....
मला तिची छोटी मुलगी फार आवडली specially तिचे मोठे मोठे डोळे..
अश्विनी, मेरी ख्रिसमस बघायचा
अश्विनी, 'मेरी ख्रिसमस' बघायचा होता. आता सेतुपती आवडायला लागला आहे आणि संप्रति यांनी आचार्यांच्या एका धाग्यावर उल्लेख केला होता. धन्यवाद.
'अ मॅन कॉलड् ऑटो' मलाही आवडला.
दो पैसे की धूप चाराने की
दो पैसे की धूप चाराने की बारीश >>> खूपच आवडला. अस्मिता, रेकोबद्दल धन्यवाद.
मनिषा कोयराला आजपर्यंत कधी आवडली नव्हती. यात मात्र खूप सुंदर अभिनय केलाय, त्या सटल मेकअपमध्ये सुंदर पण दिसली आहे. रजीत कपूर नेहमीच आवडतो, पण या सिनेमात सगळ्यात जास्त आवडला तो काकू! नुसता चेहरा वापरून या वयात अभिनय करणे कठीणच असते. मुद्दाम त्याच्याकरता क्रेडीट्स बघितली - सनज नवल म्हणजे दिप्ती नवलचा मुलगा आहे का?
उलट मळकट आहे. >>> म्हणून जास्तच आवडला. उगाच चकाचक करायच्या नादात हल्ली सामान्यपण सिनेमात अभावानेच पहायला मिळतं. आणखी एक जाणवलं म्हणजे अंधार, सावल्या यांचा वापर. सिनेमा हा छायाप्रकाशाचा खेळ असतो पण हल्ली प्रकाशाच्या लखलखाटात सावल्या अभावानेच दिसतात.
सनज नवल म्हणजे दिप्ती नवलचा
सनज नवल म्हणजे दिप्ती नवलचा मुलगा आहे का?
>>>> दीप्ती नवलच्या भावाचा मुलगा आहे बहुतेक.
छान वाटले वाचून, माधव. दुसऱ्या परिच्छेदासाठी अनुमोदन.
माधव, मागे तू 'द आऊटफिट'
माधव, मागे तू 'द आऊटफिट' बद्दल लिहिलं होतंस, तेव्हा नाव नोट करून ठेवलं होतं.
नुकताच तो पाहिला. आवडला. त्याची स्टोरीच भारी आहे.
एखाद-दुसरा दुकानाच्या बाहेरचा शॉट सोडला तर सगळा सिनेमा इनडोअर्स आहे, अमिताभच्या 'आंखें'सारखा.
त्यामुळे ते विंटरी वातावरण खूप परिणामकारक वाटतं.
पाश्चात्य देशांमधल्या विशेषत: कडक हिवाळ्याचा कथानकात असा वापर करून घेतलेला मला फार आवडतो.
या आठवड्यात आवडलेले हिंदी
या आठवड्यात आवडलेले हिंदी सिनेमे
1.An action Hero नेटफ्लिक्स हिंदी
मानव एक सुपरस्टार ऐक्शन हिरो, त्याच्या कडून एकाचा मर्डर होतो आणि मानव फक्त पोलिंसांपासूनच नव्हे तर एका माथेफिरू पॉलिटिशियन पासून पण लपून राहण्याचा थ्रीलींग प्रयत्न करत असतो, ऐक्शन, कॉमेडी आहे, चांगला आहे सिनेमा.
2.Freddy hot star, हिंदी.
एक एकटा डेंटिस्ट फ्रेडी जीवनसाथी कि तलाश में, शोधता शोधता अडकतो एका गुंत्यात त्यात तो अडकतो कि इतरांना अडकवतो, बघा सिनेमात मस्त थ्रीलर सिनेमा, सुरूवातीला संथ वाटू शकतो पुढे ग्रिपींग आहे.
3.Soni, Netflix हिंदी
दिल्ली पोलिस क्राईम ब्रांचच्या दोन महिला पोलिस अधिकार्यांचा सोशल आणि वैयक्तीक पातळीवरचा दैनंदिन संघर्ष, वेगळा सिनेमा आहे, क्राईम सिनेमा म्हटले कि मारधाड, खुनखराबा असतं,तसलं काही नाही, वैचारिक सिनेमा, थोडा इमोशनल करणारा सिनेमा.चांगला आहे
I'm Thinking of Ending Things
I'm Thinking of Ending Things, based on the 2016 novel by Iain Reed, Netflix .
एक मुलगी, तीच्या बॉयफ्रेंडबरोबर त्याच्या पेरेंट्सना भेटायला जाते, पेरेंट्सचं वागणं, बॉयफ्रेंडचं, त्यांच्या कुत्र्यांचं वागणं सगळंच अचंबित करणारं, तिथून ती शक्य तितक्या लवकर सटकायला बघते तर परतीच्या प्रवासात पुन्हा सगळ्या strange गोष्टी, सिनेमा खिळवून ठेवणारा आहे पण काय चाललंय कळत नाही, सिनेमा संपल्यावर थोडा कळला मग गुगलून अजून थोडा कळला,पूर्ण नाही कळला, कुणी पाहिला असेल किंवा पाहिल्यानंतर कळल्यावर कळवणे.
मी पण बघितला आहे हा सिनेमा.
मी पण बघितला आहे हा सिनेमा. पूर्णपणे डोक्यावरून गेलेला.
हि पोस्ट इथं टाकली कि नाही
हि पोस्ट इथं टाकली कि नाही आठवेना....
His house इंग्रजी नेटफ्लीक्स
आफ्रिका सुदान वारमधे वाचलेले आणि निर्वासित झालेले जोडपे असायलम च्या आधारे इंग्लंड मधे पाठवले जाते..तिथं त्यांना खूप सार्या टर्म्स आणि कंडिशन्स वर एका घरात ठेवले जाते..त्या घरात गेल्या दिवसांपासून घडायला लागतात स्ट्रेन्ज गोष्टी.. हॉरर, मिस्ट्री, सायकोथ्रीलर सिनेमा
चांगला आहे..
Under the shadow पर्शियन, इंग्रजी त नेटफ्लीक्स.
नायिका आपल्या सहा वर्षाच्या लेकीसोबत आईच्या घरी राहायला जाते..आई हयात नसते आणि घरात दोघीच राहणार आहेत....युध्दजन्य परिस्थिती आहे..भोंगा वाजला कि बंकरमधे जाऊन लपावं लागतंय..एक एक करून सगळे बिल्डिंग मधले लोक घर खाली करून इतरत्र निघून जातात..दोघी मायलेकी पण जाणारच असतात पण मुलीची बाहुली सापडत नसते आणि बाहुलीशिवाय हट्टी मुलगी हलायला तयार नसते..थ्रीलर, हॉरर, मिस्ट्री सिनेमा..
Merry Christmas पाहिला नेफिवर
Merry Christmas पाहिला नेफिवर -? राघवन कडुन अजुन अपेक्शा होत्या. जोनी गद्दार, एक हसीना थी, अन्धाधुन च्या तोडिचा नाही वाटला.
मी पण Merry Christmas पाहिला.
मी पण Merry Christmas पाहिला. ठीक आहे वन टाइम वॉच. प्लॉट मधली एक विशिष्ट आयडिया कुठून तरी सुचल्यानंतर त्याच्या भोवती बळेच बाकी कथा विणली असावी असे वाटते.
मी पण Merry Christmas पाहिला.
डबल.
नेटफ्लिक्स -
नेटफ्लिक्स -
मेरी ख्रिसमस मलाही नाही आवडला. अतिशय संथ आहे, तासभर तर पकडच घेत नाही. कटरीनाला एका मर्यादेपर्यंतच अभिनय येतो, तिनं जीव तोडून प्रयत्न केलेत पण मजा येत नाही. सेतुपती चांगले काम करतो. ९६ सारखं इथेही रात्रभर हिरोईन सोबत गावभर हिंडतो आहे. लूप होल्स भरपूर आहेत. जमला नाही सिनेमा.
स्पेसमॅन (ॲडम सॅन्डलर) बघू नका. एकतर ॲडम सॅन्डलर कायम हायस्कूल ड्रॉप आऊट, उथळ, फ्लर्ट वाटत आलेला आहे. इथं बुद्धिमान, विचारी, गंभीर, फक्त बायकोवरच निरतिशय प्रेम करणारा- ती दुरावल्यावर व्यथित होऊन तिची आर्जवं करणारा ॲस्ट्रॉनॉट आहे. तो प्रांत टॉम हॅन्क्सचा, ॲडम सॅन्डलर तर पटापट 'मूव्ह ऑन' होणारा वाटतो. त्याला फार तळमळताना बघणं अनैसर्गिक वाटत होतं. काहीच झेपलं नाही. शिवाय सिनेमाही अतिशय विचित्र आणि कंटाळवाणा आहे. पार्श्वसंगीत चांगलं आहे, psychedelic वाटलं. पण तेही Interstellar च्या तोडीचं नाही.
मला सुरुवातीला अॅडम सँडलरचं
मला सुरुवातीला अॅडम सँडलरचं अॅक्टिंग आवडल्याचं आठवतं आहे आणि मग कधीतरी तो आवडेनासा झाला.
मला त्याचा हातखंडा असलेल्या
मला त्याचा हातखंडा असलेल्या कॉमेडी जॉन्रात तो आवडतोच. तो आणि अक्षय कुमार सारखेच वाटतात. दोघांनाही नेटफ्लिक्सने दत्तक घेतले आहे.
मी सँडलरचा एकच सिनेमा बघितलाय
मी सँडलरचा एकच सिनेमा बघितलाय, uncut gems. त्यात त्याची गंभीर भूमिका आहे, आणि काम चांगले केले आहे त्याने.
यातही काम वाईट आहे असे नाही
यातही काम वाईट आहे असे नाही पण सिनेमा विचित्र आहे. Uncut gems बघितलेला नाही.
ॲडम सॅन्डलरचा ‘Spanglish’
ॲडम सॅन्डलरचा ‘Spanglish’ पाहिला नसेल तर माझ्याकडून शिफारस.
बघितला आहे, तीनदा.
बघितला आहे, तीनदा.
(No subject)
नाही बघितला, बघतो.
नाही बघितला, बघतो.
मेरे पास पैसा है, बंगला है,
मेरे पास पैसा है, बंगला है, कार है, नौकर चाकर है ,फिर भी मै पैदल चलता हू , किराये के मकान मे रहता हूं.
असं झालंय... एव्हढ्या सबस्क्रीप्शन्स आहेत पण युट्यूबवर डब्यात गेलेले सिनेमे बघतो.
स्पेसमॅन बद्दलच विचारणार होते
स्पेसमॅन बद्दलच विचारणार होते, डाळ शिजली नाही हे कळले, तर पुढे पाहु की नको? बरं झालं सांगितलंत.
ओपानहायमर पहाताना कंटाळा आला.
एव्हढ्या सबस्क्रीप्शन्स आहेत
एव्हढ्या सबस्क्रीप्शन्स आहेत पण युट्यूबवर डब्यात गेलेले सिनेमे बघतो. >>> माझंही असं होतं बर्याचदा. काल सगळे इतर पर्याय सोडून "सौ साल बाद" हा रामसे-पट (किंवा तत्सम) पिक्चर पाहणार होतो. हा "बीस साल बाद" च्या पाचपट हॉरर असेल तर मजा येइल.
९६ सारखं इथेही रात्रभर हिरोईन सोबत गावभर हिंडतो आहे >>> काहीकाही कॉमेण्ट्स ओळखायला आयडी चेक करावा लागत नाही, तशीच ही आहे
सॅण्डलर बद्दल सहमत आहे (मी स्पँगलिश बघितल्याचे आठवत नाही). उद्या गोविंदाला संजीव कुमारचा रोल दिला तर तो करेलही नीट पण आपल्यालाच तो अवघडल्यासारखा वाटेल सॅण्डलर बद्दल माझे मत बिग डॅडी (२-३ वेळा), हॅपी गिल्मोअर किंवा वॉटरबॉय - दोन्हीपैकी कोणता पाहिला आहे ते आठवत नाही, मि. डीड्स, ५० फर्स्ट डेट्स, क्लिक असले पिक्चर बघून झालेले आहे. आता त्याचा कोठेतरी मी न पाहिलेला एकदम ऑस्करवर्दी रोल असेलही. माहीत नाही.
९६ सारखं इथेही रात्रभर हिरोईन
९६ सारखं इथेही रात्रभर हिरोईन सोबत गावभर हिंडतो आहे
>>>>>>
नुसते हिरोईन नाही तर दुसऱ्याच्या बायकोसोबत
शेवट झाल्यावर मला क्षणभर
शेवट झाल्यावर मला क्षणभर कळलेच नाही की पिक्चर संपला.. रात्रीचे तीन वाजले होते. मला वाटले माझा डोळा लागला की काय.. म्हणून मागे नेऊन पुन्हा पाहिला. मग कळले की हाच शेवट होता. आपण समजून जायचे काय ते..
गोविंदाला संजीव कुमारचा रोल
गोविंदाला संजीव कुमारचा रोल
>>> 'किसी डिस्को में जायें' संजीव कुमार वर चित्रित झालेलं कल्पनेत बघूनही थरकाप उडाला. अशा वेळी इलाकातल्या स्पष्टतेचं महत्त्व पटतं. इलाकाची थट्टा केल्याने अद्दल घडली.
दुसऱ्याच्या बायकोसोबत>>> तेच तर, निघाला आपला. तिचा हेतू होता, हा आपला उगाच. मला तर रिव्हर्स करूनही कळलं नाही बरंच.
- स्पॉइलर अलर्ट -
- स्पॉइलर अलर्ट -
..
मला कळले ते असे की तो आपल्याकडे असलेले पाकीट दाखवतो म्हणजे आरोप स्वतःवर घेतो. कतरिनाला वाचवतो. त्याबदल्यात ती त्याची रिंग आणि त्याचे प्रेम स्वीकारते. पुन्हा सात वर्षे सजा भोगून आल्यावर म्हणजे टोटल चौदा वर्षे वनवास भोगून कतरीनाशी लग्न करेल..
मेरी ख्रिसमस बद्दल सेम टू सेम
मेरी ख्रिसमस बद्दल सेम टू सेम
येस ऋन्मेष मी ही तसाच अर्थ काढला.
किती संथ आहे पण सिनेमा. फारच रटाळ होतो मधेमधे. नाही आवडला एवढा.
Pages