चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@मेरी ख्रिसमस -----पुढे चालू

मला फर्जी आणि ९६ मधे आवडला होता सेतुपती. यातही राग आला नाही. उच्चारांचा त्रास झाला नाही कारण पात्र दाक्षिणात्य आहे असं दाखवलं की ते न्याय्य होऊन जाते. कटरीना तोंडात गुटखा ठेवल्यासारखे बोलते. पण इथे दोघेही तोंडातल्या तोंडात बोलतात. ती एफर्ट घेऊनही प्रेक्षकांपर्यंत तिचं दुःख पोचत नाही. हा यडा तुरुंगातून सुटल्यादिवशी गावभर बोंबलत का फिरत होता. असंही थोर कवी म्हणून गेले आहेत 'उसं नारी का दास न बन जो राह चलत को राह भुलाये', गेला पुन्हा तुरुंगात. उगा टिनू आनंदची होममेड पित का बसला नाही. एवढा तंतोतंत मजला बांधून ही फक्त साक्षीदार शोधत होती हेच झेपलं नाही. ड्रग्स गोळा करून ठेवले होते, नवऱ्याला भट्टीत टाकायला हवं होतं. कुठल्या मजल्यावर येत आहोत हे येणाऱ्यांना जाणवलं कसं नाही.

सबस्टंस अब्यूज, चाईल्ड अब्यूज, डोमेस्टिक अब्यूज एवढे गंभीर विषय असूनही बघताना काहीही पोचलं नाही. जे कथानक कुठल्याही उंचीला गेलं नाही ते शेवटी खड्ड्यात घातलं आहे. अश्विनी काळसेकर अंधाधुंद मध्ये पैलवान- पोलिस नवऱ्याला रोज बारा अंडी खाऊ घालूनही गुणं उधळल्याचं कळल्यावर चवताळून मारायला धावते. इथं मात्र 'पती परमेश्वर लैच माझा भोळा' म्हणत होती. ती तशी वाटतच नाही. पोलिस टीम किती लेम. खूप वेळ संशय घेतला मी पण तो उपरोध नव्हताच कळल्यावर हताश वाटलं. प्रत्येकावर संशय घेऊन, आता काही तरी घडेल मग काही तरी घडेल करत बसलेलं सगळं असं वाया गेलं. राधिका आपटेने दोसा ताट चाटून पुसून खाल्ला तेवढं रिअल होतं.

अशाने प्रेक्षकांची फसवणूक केल्यासारखे झाले.

'मेरी ख्रिसमस'
श्रीराम राघवन दिग्दर्शक आहेत, म्हणून थिएटरला जाऊन बघितलेला‌. याआधी त्यांच्या 'अंदाधुन'मधली मर्डर मिस्ट्री फारच आवडलेली. 'मेरी ख्रिसमस' त्यामानाने थोडासा फिका आहे. पण आवडला मला.

जुन्या दिवसांतली मुंबई. त्या मुंबईतली ख्रिसमसची एक रात्र‌. त्या रात्रीतला एक मर्डर सस्पेन्स‌. हळूहळू चढत जाणारी रात्र, आणि त्या रात्रीबरोबर धीम्या गतीने एखादी मैफिल चढत जावी, तशी ही संथ लयीत सरकणारी कहाणी. काही लूप होल्स आहेत, तसे ते असतातच. काही प्रसंगांतली नर्मविनोदाची पखरण आवडली. (उदाहरणार्थ, सेथुपति जेव्हा दुसऱ्यांदा कॅतरिनाच्या घरी जातो, तेव्हा वाईनचा ग्लास रूमालाने हातात पकडतो, तो सीन Happy )

कॅतरिनाला स्क्रीनवर बघताना मला सुखद वाटतं.‌ आणि ह्यात तर तिचा अभिनयाचा परफॉर्मन्सही फारच सुधारलेला वाटला. लग्न मानवलेलं दिसतंय.
आणि विजय सेथुपति कसला कूल आहे.! ह्यात एकदम मितभाषी इंट्रोवर्ट सोशिक‌ टाईपचा आहे.! नियतीचा समंजस स्वीकार करणारे त्याचे डोळे ही त्याची सगळ्यात मोठी ताकद‌ आहे, आणि त्याला ते माहितीही आहे. त्यामुळे तोंडी संवादांपेक्षा तो डोळ्यांतूनच यातना लपवतो.‌ क्षणभर डोळ्यांत एक वेदना प्रकट होते, दुसऱ्या क्षणी गायब..! तो हे कसं करतो काय माहित. अजून एकदा करून दाखव म्हणणार होतो, पण थिएटरमध्ये काय बॅक घेता येत नाही, म्हणून राहिलं.
क्लायमॅक्सला तर त्याच्या डोळ्यांतला करूण गलबला बघून पोटात तुटायला लागलेलं.

{
अवांतर :
"दुःख सब को माँजता है, और -
चाहे स्वयं सबको मुक्ति देना वह न जाने,
किन्तु- जिन को माँजता है,
उन्हें यह सीख देता है कि सबको मुक्त रखें"

-- अज्ञेय
}

काय चाललंय संप्रति Happy
एकदाच आल्या आपल्या पोस्टी...

अज्ञेय यांची कविता उत्कट आहे. तेवढं दुःख काही जाणवलं नाही सेतुपतीच्या डोळ्यांत. दुःखी कमी आपल्याच नादात जास्त- वाटला. पुढच्या वेळी डोळ्यात डोळे घालून बघेन. Wink

ते हेराल्डचं प्रेत म्हणजे फुलसाईज डॉल आहे. ती परदेशातून मागवली असणार म्हणून कॉकेशियन लुक आहे. >> मामी तू विनोद करते आहेस का आपण वेगळे सिनेमे बघितले?
>>कुठल्या मजल्यावर येत आहोत हे येणाऱ्यांना जाणवलं कसं नाही. >> आम्रविकेत पहिल्यांदा आलो तेव्हा एका मॉल मध्ये कार पार्क केलेली. तो मॉल इतका मोठा होता (आता खरंच मोठा होता का पहिल्यांना इथले कांदे बटाटे पण भव्य वाटतात तसा मला वाटला कोण जाणे), की मॉल मध्ये फिरता फिरता मोठ्ठाच्या मोठ्ठा रस्ता ओव्हरपास सारखा क्रॉस करुन दुसर्‍या बाजुला कधी आलो समजलंच नाही. मॉल बंद व्हायची वेळ झाली आणि मी आपला मिळेल त्या दारातुन एक्झिट मारला. म्हटलं फार काय होईल, एक मॉलला गोल चक्कर मारायला लागेल गाडी शोधायला. त्यात अंडरग्राऊंड पार्किंग होतं. मग मी शोधतोय. पॅनिक बटण दाबुनही आवाज येईना. मग शेवटी परत मॉल मध्ये शिरुन ट्रेस बॅक केलं तेव्हा समजलं आपण रस्ता ओलांडलेला आहे. आम्रविकेतला दुसरा तिसरा दिवसच होता. रेंटल कार आणि ती चोरली ह्या कनक्लुजनला मी जवळजवळ आलेलो होतो.
तर सांगायचा मुद्दा मजला कुठला हे लक्षात न राहाणारं पब्लिक असतं. लिफ्ट मध्ये जाऊन बटणच न दाबता अजुन मजला कसा येत नाही असा विचार करणारं पब्लिक ही असतं. Wink

सेतुपथी -> नेटफ्लिक्स त्याचा वर सुपर डिलक्स नावाचा सिनेमा आहे. हिंदी मध्ये नाहीये पण sub titles वर दोनदा बघितला . (दुसऱयांदा बायकोला दाखवला तेव्हा) . त्याची रेन्ज मस्त आहे .
आणि त्यागाचा आणि राघवन चा विक्रम वेदा पण छान आहे
फर्जी पधे पण चान केलय काम

दुःखी कमी आपल्याच नादात जास्त- वाटला. पुढच्या वेळी डोळ्यात डोळे घालून बघेन. >>
Happy
जरूर..! इरफान खाननंतर एवढे 'डेंजर' डोळे या सेथुपतिचेच वाटले.

अमित Lol

एकाच घरात तीनदा आला हा मनुष्य, तिच्या सौंदर्यावर लुब्ध वगैरे होऊन चुकत गेला म्हणावं तर लुब्धही वाटला नाही, बावळट वाटला.

इरफान खाननंतर एवढे 'डेंजर' डोळे या सेथुपतिचेच वाटले.>>> इरफान तर देवच होऊन बसलाय माझा, ती जागा कोण घेणार आता. पण बघते कसं जमतं ते. Happy

सेतुपथी आवडत नाही, फर्जी मधे ही तो बण्डलच वाटला होता...त्यापेक्षा भारी काम द्रुश्य्म मधला कमलेश सावन्त करतो..

खूप दिवसांनी टिनु आनंदला बघुन छान वाटलं. त्याला फुकट दवडलाच त्याच्या होममेड वाईनला ही फुकट दवडलं. Happy
बाकी कतरिना सेतुपथी बरोबर बाहेर जाते तेव्हा ते सगळं फायर डिपार्टमेंट इ. मुंबई दर्शन झाल्यावर याचं घर बघायचं म्हणून आणखी वेळ कशाला दवडते? खून झालेला असतो. ती बाहेर आहे हे एसटॅब्लिश झालेलं असतं. आता केवळ आपल्याला चकवायचं म्हणून ती जर त्याच्या घरी जात असेल, की यांच्यात केमेस्ट्री तयार होते आहे ... तर ही चक्क फसवणूक आहे. चांगल्या मिस्ट्री मध्ये प्रत्येक गोष्टीला कारण पाहिजे. केवळ प्रेक्षकांची दिशाभूल करणे ही चीप मिस्ट्रीची ओळख आहे.
मिस्ट्री आणि के-मिस्ट्री वर जोक पाडायचा असेल तर दोन पैसे पाठवा. Proud

सेतुपती मस्त असं वाचून फर्जीमधे जास्त अपेक्षा ठेवली असावी मी, मला तो अजूनही त्यात सारखं फु फु फुकणारा आणि पिणारा आठवतोय, त्यात हेच जास्त केलं त्याने. एखाददुसरा सीन आवडला, ते मी त्यावेळी लिहीलं. हा आठवलं एक बाबा म्हणून त्याचा रोल मस्त आहेत त्यात, इमोशनल. ते एक दोन सीन्स आवडलेले.

>>नवऱ्याला भट्टीत टाकायला हवं होतं >> हो ना!
खोलीतलं १००% फर्निचर दुसर्‍या/ तिसर्‍या मजल्यावरुन जर ही एकटी खाली जाळायला आणणार होती, तर एक बॉडी आणणं काहीच मुश्किल न्हवतं. आम्हाला शिकवलेल्या हायस्कूल फिजिक्सप्रमाणे चेन सॉ ने बारिक तुकडे केले तरी वस्तुमानात फरक पडत नाही, आकारमान फक्त बदलतं.
आणि खोलीत इतकं सगळं डीटेलिंग केल्यावर फक्त तेवढी पुस्तकं का खोटी ठेवली? फोर्ट मध्ये रस्त्यावर दोन संच मिळाले नसते का? वर फाउंटनला फिरताना 'मेरी मॉ बचपन मे मेरे लिए किताबे इसी यहॉसे लेती थी'. असं सेतुपती ने म्हटल्यावर ही 'मैने कल ही खूब सारी किताबे ली...' म्हणून ओठ चावला असता. एक क्लू सक्सेसफुली प्लँटेड.

एकूण ती वर - खाली सेम अपार्टमेन्ट ही अयडिया कुठेतरी दिसली आणि आवडली आणि चला तिचा वापर करू या म्हणून हा प्लॉट बळेच त्याभोवती विणला असे फीलिम्ग आले मला. त्यामुळे इतकी सगळि लूपहोल्स हे काही आश्चर्य नाही.

मेरी ख्रिसमस पाहीला.

मामी बरोबर म्हणतेय , तो पुतळाच आहे असं वाटतंय.

------ स्पॉइलर -----
मुळात जो जेल मधून सुटून आलाय तो एक खून बघून पुन्हा त्या वाटेला जाणार नाही, अल्बर्ट पुन्हा परतून येणं अजिबात पटत नाही.
लिफ्ट मध्ये मजला चुकावा म्हणून मारिया मुद्दाम जवळीक साधते. दुसऱ्या वेळी पण तिने तेच केलं.
बाकी
यात टायमिंगचा खूपच प्रॉब्लेम आहे.
रात्री बाराच्या सुमारास अल्बर्ट आणि मारिया एकत्र असतात. मग तो जेरोम मेलेला दिसतो. अल्बर्ट घरी जायला निघतो.
त्यानंतर मारिया मुलीला घेऊन मिडनाईट मासला जाते. तिथून ते तिघे घरी येतात.
बाहेर जातात, पार्टीला जाऊन दोघे पुन्हा येतात. मग पोलीस येतात. ते चौकशी करून कुलूप लावून जातात. त्यानंतर सगळी तोडफोड , जळाजाळ वगैरे....
त्याच्या आधी दमून गप्पा पण मारल्या दोघांनी..
नक्की किती मोठी रात्र होती?

ती रूम एकदम साधी दाखवायला हवी होती. ज्यात फारसं फर्निचर वगैरे नाही अशी. ज्या प्रकारची रूम दाखवली आहे ती तशीच्या तशी सजवणं प्रत्यक्षात फारच अशक्य आहे. आणि सजली असेल तर मोडतोड करणही अशक्य आहे.

खून करायला gun ची गरज नव्हती.
ड्रग ओवरडोस ने पण मेला असता. असही तीने गोळ्या मिक्स केल्याच होत्या.

ते तिघे स्टेटमेंट देऊन पोलीस स्टेशन बाहेर निघतात. मुलगी पो स्टे मध्ये फक्त Santa इतकंच बोलते, आणि त्याच्या जस्ट आधीच अल्बर्ट बाहेर निघाला असतो. त्यामुळे तिथे हात दाखवत नाही.
वॉलेट बद्दल पो स्ते मध्ये काहीच बोललं जात नाही. ते वॉलेट रॉनी ला चर्च मध्ये सापडते
इथे सिनेमा संपायला हवा होता.
शेवटचा ट्विस्ट उगाच घेतला. त्यामुळे सिनेमा सामान्य होतोय जरा. त्यात तिला अंगठी दिली म्हणजे ती पण अडकणार हे झालंच.

आम्हाला शिकवलेल्या हायस्कूल फिजिक्सप्रमाणे चेन सॉ ने बारिक तुकडे केले तरी वस्तुमानात फरक पडत नाही, आकारमान फक्त बदलतं.
>>>>नको, रक्त पुसत बसावं लागणार. आजकालच्या सिरीज मधे ते पुसत बसलेलं दाखवतात. कंटाळा आला त्याचा. आणि पूर्ण खोलीतलं सामान जाळणं नको. त्यापेक्षा मोठ्या कचऱ्याच्या पिशवीत बांधून फरफटत न्यायचं. मुडद्याला असंही काय दुखापत होणार. स्वच्छता महत्त्वाची आणि पर्यावरणसुद्धा. How to get away with a (less aftercleaning and environmentally friendly) murder होतं आहे आता Lol

अरे! आमचा वॉल्टर व्हाईट केमिकलने बॉडी डिसइंटिग्रेट करतो. फक्त ते जेसी सारखं बाथटब मध्ये न करता पिंपात करायचं येवढं फक्त लक्षात ठेवायचं होतं.
माझ्या मनात ते कोरलेलं वगैरे आहे. ते आठवू नये!

@धर्म चर्चा -
धर्म चित्रपट अतिशय सुंदर आहे. दोनतीन वर्षांपूर्वी बघितला आहे. सर्वांचीच कामं सुरेख आहेत. कथानक ताकदीने उभे केले आहे. पंकज कपूरने मुस्लिम बाळाचा लागलेला लळा, नीतीअनिती मधे येणाऱ्या धार्मिक अपेक्षा व त्याची समाजात असलेली प्रतिष्ठा आणि स्वतःची महादेवावरील भक्ती या सर्वांचंच मानसिक द्वंद्व अप्रतिम उभं केलं आहे. आजकालच्या काळात अशा सिनेमांमधून येणाऱ्या दृष्टिकोनाची नितांत गरज आहे. संहितेचा कणा फक्त माणुसकी आहे, म्हणून ती झळाळते.

मागच्या आठवड्यात 'ताश्कंद फाईल्स' बघितला, अगदी अर्धापाऊण तास. जीव गुदमरायला लागला. विवेक अग्निहोत्री गडबड आदमी लगरा मेरेकू. Something is terribly wrong with this guy's perspective. तेवढंच नाही तर यामी गौतमचा नवरा आदित्य धर( Article 370) सुद्धा या पावलावर पाऊल ठेवत आहे की काय शंका येत आहे. (आदित्य धरचा उरी सोडून) मी या दोन्ही दिग्दर्शकांचं काही बघितलं नाहीये. हे फक्त इन्ट्यूइटिव लिहिलेय. या पार्श्वभूमीवर 'धर्म' सिनेमा अत्यंत तेजस्वी आहे. नक्की बघा.

सर्वांनी मेरी ख्रिसमस ची मस्त चिरफाड केलीय.
तो विदेशी लुकिंग पुतळा हेरॉल्ड, त्याचे कॅटरिना बरोबर फोटो पण आहेत भिंतीवर.
एकंदर नवरे मारणे हे प्रचंड खर्चिक आणि शारीरिक मेहनतीचे(फर्निचर उचलणे, कापणे, जाळणे, आधी खोली सजवणे इत्यादी.) काम आहे.
महिलाएं कृपया ध्यान दे |
हत्या से तलाक भली |

सगळे कहर आहात. Lol Lol
संप्रति, अस्मिता मस्त पोस्टी

संजय कपूर ची अशी एकही हिस्टरी नसावी.तो फक्त फेसबुकवर j1 झालं का विचारून मैत्री करणाऱ्या विवाहित पुरुष मंडळींसारखा,>>>. ह्याला जाम च हसू आलं. अ‍ॅग्री. संधी साधू मिड लाईफ क्रायसिस वाला टिपिकल नवरा आहे तो.. त्याचा राधिका शी संबन्ध जोडणे म्हणजे _/\_ देवा!

ती जागा कोण घेणार आता. पण बघते कसं जमतं ते >>>>
नसेल जमणार तर सोडून दे अस्मिता.. मी आहे ना इकडे डोळ्यात डोळे घालून बघायला Wink

बाकी इकडे आता How to murder husband for dummies’ सुरू झालंय.

डमीजच्या शिक्षणासाठी साठी का करायचा खून
स्वतःच्या आनंदासाठी करावा Happy (इथे आनंदा हे बॉयफ्रेंड चे नाव नाही)

इको फ्रेंडली मर्डर बद्दल अगदी सहमत अस्मिता.फर्निचर जाळणे, ग्रीन हाऊस ला पॉलिश केमिकल मुळं पडलेले भगदाड, फर्निचर ला मेटल पार्ट असतील(बीजागऱ्या डोअर हँडल) ते दुसऱ्या दिवशी भट्टीतून काढून पिशवीत घालून भंगारात विकायला जाणे,(त्यात दाराच्या काचा बिचा भंगारवाला रिसेल भाव नाही म्हणून रिजेक्ट करणार, त्या नीट लाल फुली मारून प्लास्टिक पिशवीत वेगळ्या काढून कचरा गाडी साठी ठेवणे, तोडमोड झाल्यावर खोली झाडून पुसून साफ करणे अशी अनेक कंबरमोडी कामं लक्षात घेऊन अंगावर काटा आला.ड्रग देऊन झाल्यावर विष देणे किंवा ड्रग ओव्हरडोस(ऍज सावली सजेस्ट्स) खूप बरा पडला असता.त्याला काही कामाने बेकरीत बोलावून तिथेच ड्रग दिले तर त्याला उचलून भट्टी पर्यंत घेऊन जायचे कष्टही वाचतील.(किंवा चाकाच्या खुर्चीवर बसवून लिफ्ट ने नेता येईल.आमचे आयटी वाले मॉनिटर सीपीयु तसेच नेतात.)
सगळे कंस बंद केलेत का?
अश्विनी कळसेकर पोलिसांसमोर नवरा भोळा चांगला साधा म्हणते.ते म्हणताना पण बरेच टोमणे आणि हिडन धमक्या दिल्या आहेत तिने(पुढच्या वेळी सरळ आजीकडे फॅमिली डिनरलाच यायचं वगैरे).घरी जाऊन चांगलं तासलं असणारच आहे.तो बायकोधर्म आहे.

काही कामाने बेकरीत बोलावून तिथेच ड्रग दिले तर त्याला उचलून भट्टी पर्यंत घेऊन जायचे कष्टही वाचतील.(किंवा चाकाच्या खुर्चीवर बसवून लिफ्ट ने नेता येईल.आमचे आयटी वाले मॉनिटर सीपीयु तसेच नेतात. >>>
पण मी म्हणते एवढे तरी कष्ट कशाला? भरतीच्या वेळी बॅण्ड स्टॅन्डला सेल्फी काढायला पाठवायचं. पावसाळा असेल तर उत्तम. किंवा पार्वती व्हॅलीत ट्रेकिंगला (अम्रिकेतल्या लोकांनी फोन व जीपीएस न देता कुठल्याही नॅशनल पार्कात) ..आपसूक गायब होतात माणसे...
फारच त्रास दिला असेल तर सरळ बर्थडे गिफ्ट म्हणून एव्हरेस्ट/मकालू/ल्होत्से (अम्रिकेतल्यानी सिटिझनशिप घेतली असेल तर के२) मोहिमेत पैसे भरून नाव नोंदवून टाकायचे.
टोटली इको फ्रेंडली.. हा का ना का?

अरे, लोकहो, तो जेरोम म्हणजे पुतळा नाही, ल्यूक केनी नावाचा कलाकार आहे. शेवटी क्रेडिट्समध्ये त्याचं नाव आहे.

ल्यूक केनी म्हणजे 'रॉक ऑन' सिनेमातला त्या बॅन्डमधला शेवटी आजारी पडलेला मित्र.

Pages