Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Mazeman, छान लिहिले आहे.
Mazeman, छान लिहिले आहे.
अनु, अगदी अनुमोदन.
‘स्वातन्र्यवीर सावरकर’
‘स्वातन्र्यवीर सावरकर’ साहेबाच्या देशात पाहीला.. आवडला.... हिन्दु ची व्याख्या आवडली.
सावरकरांचे रॅशनल विचार विविध प्रसंगांतून ठसवले आहेत. -> अजुन थोड दाखवायला हव होत... देव न मानण, गोमान्स वर्ज्य नसण, शिक्षणावर भर इत्यादी.
भगतसिंग व सावरकरांची भेट आणि सुभाषबाबू व सावरकरांची भेट-> ह्या बद्दल माहिती नही पण एवढा अभ्यास करुन अश्या चुका कश्या आणि का करतात?
नफ्यात जावा,जास्तीत जास्त मराठी अमराठी लोकांनी पहावा, आवडावा ही तर मनातली इच्छा.-> खरय... रणबीर चा बाजीराव कसा का असेना त्यानिमिताने त्याचे कर्तुत्व खुप अमराठी लोकाना कळल्याच समजल आणि शनिवार वाडा बघायला पण खुप लोक पुण्याला आलेली किम्बहुना जो I T मधे काम करणारा अमराठी वर्ग पुण्यात रहायला होता तो बघायला गेला तस काहीस व्हाव.
जास्तीत जास्त मराठी-अमराठी
जास्तीत जास्त मराठी-अमराठी लोकांनी ते पहावेत.
>>>> अगदी अगदी.
आमच्या कोअर ममव भागात संध्याकाळचे २ शोज आहेत व ते वीकेन्डला तरी भरलेले आहेत. अर्थात मराठी जनता जास्त होती. पण जवळच्या ४ही थिएटर्समधे सावरकरचे शोज आहेत.
त्यांचे देव न मानणे इ. जास्त दाखवायला हवे होते. >>> असं मलाही वाटलं. पण ऑलरेडी पिक्चर ३ तासाचा आहे.
महाराष्ट्राबाहेर प्रसिद्धीवर जास्त भर दिला पाहिजे.
कोथरूड सिटी प्राईड मध्ये
कोथरूड सिटी प्राईड मध्ये कोणीतरी सावरकर टीशर्ट पण विकतंय. चांगले दिसले.अनादी मी अनंत मी अवध्य मी आवडला.कदाचित घेऊ एखादा. एकदम अजेंडा मिरवल्यासारखा फोटो वाला नाही, पण एखादं सटल मनाला पटणारं वाक्य असलेला.
'ये गांधी इतना बडा कब से हो
'ये गांधी इतना बडा कब से हो गया ' हे वाक्य खरेच सिनेमात आहे ? सावरकरांवर सिनेमा बनवताना ते गांधींपेक्षा थोर होते असे दाखवण्याचा अट्टाहास का करतात निर्माते? त्यांचे जीवन पुरेसे नाट्यमय आहेच की. मागे सुधीर फडकेंनी निर्माण केलेल्या सिनेमातही असाच एक सावरकर गांधी भेट प्रसंग होता.
त्यांचे देव न मानणे इ. जास्त
त्यांचे देव न मानणे इ. जास्त दाखवायला हवे होते.
>>>>>
देव न मानणे याला आपल्याकडे एक निगेटिव्ह शेड आहे.
सावरकर पाहिला. मांजरेकर
सावरकर पाहिला. मांजरेकर त्यातून बाहेर पडले हे बरेच झाले नाहीतर काहीतरीच बघायला मिळाले असते असे वाटले. हाती असलेल्या विषयाबाबत योग्य sensitivity ठेऊन सिनेमा काढला आहे. निर्माता हुड्डाने घेतलेल्या risk ला दाद. अभिनेता म्हणूनही लाजवाब, उत्कृष्ट ! सिनेमा बघताना माझ्याबरोबर , आमच्या इथे सावरकरांच्या धाकट्या बहिणीचे नातू आणि नातसून राहतात ( ८५-९० च्या घरातले, ठणठणीत आहेत ) ते होते, स्वातंत्र्यवीरांपासून सर्व सावरकर मंडळींना घरगुती पाहिलेली, अनुभवलेली, त्यांना 'तात्या' म्हणणारी ही मंडळी आहेत त्यांना रणदीपचा वावर, बोलणे फार realistic वाटले, तसे वाटले नसते तर त्यांनी निश्चित नावे ठेवली असती. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून हुड्डाचे कौशल्य, strategy, पटकथा, कॅमेरा अतिशय आवडले. भारताला ज्या अनेक गोष्टींमुळे स्वातंत्र्य मिळालं त्यातल्या सावरकरांच्या बाजूला या चित्रपटाच्याद्वारे न्याय मिळाला असे म्हणता येईल. सुधीर फडक्यांचा सिनेमा इतका आवडला नव्हता, dull / नीरस वाटला होता, आता आठवत नाही. हा काळाला धरून ( म्हणजे तरुण बघतील असा) आणि जोशपूर्ण आहे, सावरकरांच्या व्यक्तित्वाला साजेसा. भगतसिंग - सावरकरांना रत्नागिरीत प्रत्यक्ष भेटले नसले तरी स्वप्नात, पत्रातील संवादात, मनातल्या मनात भेटले ( जे न देखे रवि ते देखे कवि - आणि सावरकर कवि आहेतच ) असा मी तरी अर्थ लावून घेतला, मग खटकले नाही, म्हणून ते आले ते रात्रीच्या अंधारात, गांधी प्रत्यक्ष भेटायला आले हे दिवसाउजेडी - तेव्हा इतर पात्रेही आहेत. आणि ३ तासांत त्यांचे सगळे कर्तृत्व cover करणे अशक्य गोष्ट आहे, मला वाटते Attenborough गांधी पण ४ एक तासांचा मोठा आहे आणि तरी तुकडे तुकडे बघत आहोत असे वाटते, पण इलाज नाही. सावरकर पुन्हा एकदा नीट बघायचा आहे.
'ये गांधी इतना बडा कब से हो
'ये गांधी इतना बडा कब से हो गया ' हे वाक्य खरेच सिनेमात आहे ? >>
हो हे वाक्य सावरकरांच्या तोंडी आहे सिनेमात ( अर्थात सावरकर प्रत्यक्ष असे काही बोलले असते तरी त्यांचे भाषाप्रभुत्व लक्षात घेता ते जास्त stylized बोलले असते) . बाकी चित्रपटाची भाषा आणि काळ चांगला आहे.
या वाक्याबद्दल - असा विचार करा की सावरकर नाहीतरी गांधी, त्यांची विचारधारा यांना अजिबातच मानत नाहीत, त्यांच्या प्रत्येक भेटीत एक विचित्र awkwardness आहे. तेव्हा गांधींबद्दलची असूया समजा किंवा गांधी सांगत असलेल्या मार्गावर बहुजन जात आहेत याबद्दलचे वैषम्य ( कारण त्यांच्या मते ते राष्ट्राला नेभळट करीत आहेत) यातून असे उद्गार येऊ शकतात. एक चांगले आहे की एकांतवासाची शिक्षा भोगताना, किंवा सश्रम \ कोलू चालवताना, शरीराप्रमाणे एक माणूस म्हणून मानसिक स्थित्यंतरेही दाखवली आहेत आणि चांगली दाखवली आहेत.
सिनेमा सावरकरांचा असल्याने त्यात गांधी कसे मोठे हे दाखवण्याचे प्रयोजन नाही, गांधींची बाजू कदाचित अधिक चांगली मांडता आली असती पण कथानायकाचेच सगळे दाखवणे ३ तासात जेमतेम होईल तर दुसरी बाजू पुरेशी कुठून दाखवणार.
'ये गांधी इतना बडा कब से हो
'ये गांधी इतना बडा कब से हो गया '
>>>>
हो. हे वाक्य आहे सिनेमात.
मला असे वाटले की दोघेही समकालीन आहेत. व सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा मिळेपर्यंत टिळक, गोखले इ. नेते वरच्या फळीत होते. गांधीजींच्या भारतातील कार्याला नुकती सुरूवात झाली होती. अंदमानमध्ये सुरूवातीच्या काळात तरी सावरकरांना भारतातील बातम्या मिळण्याचा काही सोर्स नव्हता. आपल्या समकालीन माणसाचा राजकिय पटलावर एवढा उत्कर्ष झाला आहे किंवा तेच निर्विवाद नेतेपदाला पोहोचले आहेत याबद्दल आश्चर्य नक्कीच वाटू शकते. त्यांचा स्वतःचा भाऊदेखिल गांधी टोपी घालत आहे, गांधीजींचे महत्व मानत आहे असे सुक्ष्म बदलही दाखवले आहेत.
बाकी ‘वाट्टेल ते’ म्हणतात तसे सावरकर असे काही म्हणालेच असते तर त्यांचे भाषाप्रभुत्व लक्षात घेता ते जास्त सोफिस्टिकेटेड व जास्त खोचक असू शकले असते.
बाय द वे, गोखल्यांचे चित्रीकरण आवडले नाही. ते मवाळ होते, बावळट नव्हते.
छान लिहिले आहे वाट्टेल ते आणि
छान लिहिले आहे वाट्टेल ते आणि माझेमन. चर्चा/रसग्रहण आवडले.
'रंगरसीया' पासून रणदीप हूडा भयंकर आवडतो. वीर सावकरांविषयीही अतोनात आदर आहेच. तरीही सिनेमा बघायची उत्सुकता वाटली नव्हती. ध्रुवीकरणाच्या लाटेत काही पर्सनल/ पॉलिटिकल अजेन्डा असलेले चित्रपट बघायला नको वाटतात. ऐतिहासिक विषय म्हटलं की कुणाचा तरी अहंकार सुखावण्यासाठी , कुणाबद्दल तरी मन कलुषित करण्यासाठी असलेलं 'सेलेक्टिव्ह नॅरेशन' असण्याची शक्यता असते म्हणून सोडून दिले आहे. अजून पक्कं नाही पण तुम्हा दोघींचे प्रतिसाद वाचून बघायला हरकत नाही असं वाटतंय.
मांजरेकरांबद्दलही+१ वाट्टेल ते. सुंठी वाचून खोकला गेला.
मला असे वाटले की दोघेही
मला असे वाटले की दोघेही समकालीन आहेत. व सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा मिळेपर्यंत टिळक, गोखले इ. नेते वरच्या फळीत होते. गांधीजींच्या भारतातील कार्याला नुकती सुरूवात झाली होती. अंदमानमध्ये सुरूवातीच्या काळात तरी सावरकरांना भारतातील बातम्या मिळण्याचा काही सोर्स नव्हता. आपल्या समकालीन माणसाचा राजकिय पटलावर एवढा उत्कर्ष झाला आहे किंवा तेच निर्विवाद नेतेपदाला पोहोचले आहेत याबद्दल आश्चर्य नक्कीच वाटू शकते. ->+१. टिळकान्च्या निधनानन्तर गान्धिजीन्चा उदय ज्या झपाट्याने झाला याबद्दल अत्रे यान्च्या आत्मचरित्रात पण उल्लेख आहे. जो जन समुदाय काल पर्यन्त टिळकान्बरोबर होता तो सगळा गान्धी मागे गेला . गान्धिजी त्यावेळेस लोकप्रियतेच्या शिखरावर होते.
बाकी ‘वाट्टेल ते’ म्हणतात तसे सावरकर असे काही म्हणालेच असते तर त्यांचे भाषाप्रभुत्व लक्षात घेता ते जास्त सोफिस्टिकेटेड व जास्त खोचक असू शकले असते.-> "ये गांधी इतना बडा कब से हो गया हे" म्हणजे टिपिकल बम्बइया छाप वाटते.
अस्मिता +१.
अस्मिता +१.
भारतीय ऐतिहासिक/ बायोपिक बघायचे नाही ठरवलं आहे. त्यात लोक थिएटरला जा असा आग्रह करत आहेत, कुणाला तरी सपोर्ट करायला जा असलं भावनिक सांगत आहेत. ते सरळ सरळ रेड फ्लॅग आहेत. सो सध्यातरी थिएटरला जाणार नाही. वाट्टेल ते, माझेमन तुमच्या पोस्ट मेरिटवर आहेत त्यामुळे आवडल्या. सावरकर आवडले म्हणून उठून थिएटरला हिंदी/ भारतीय सिनेमा बघायला जाणे हे जीभ बरीच पोळून घेतल्याने काही तितकं पुरेसं कारण माझ्यासाठी नाही. बघू.
सुधीर फडक्यांचा "वीर सावरकर"
सुधीर फडक्यांचा "वीर सावरकर" त्यातल्या तृटींसकट आवडला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं व्यक्तीमत्वंच इतकं उत्तुंग आहे कि त्यांचं व्यक्तिचित्रण ३-४ तासांत बांधणं कठिण आहे. हा चित्रपट देखील बघणार, आवर्जुन मुलांना दाखवणार.. कला, शास्त्र, दूरदृष्टि, देशप्रेम, नेत्रुत्व या गुणांचा मिलाफ स्वातंत्र्यवीर सावरकरां व्यतिरिक्त शोधुन सापडणार नाहि...
बहुधा चित्रपट प्रॉपागंडा
बहुधा चित्रपट प्रॉपागंडा नसावा अशी आशा.बरीच गर्दी आणि शो फुल दिसत होते.सावरकरांची हिस्टरी(प्रसिद्ध समुद्र उडी आणि पोहत जाणे सोडून बाकी फार तपशीलात वाचलं नाहीये.)त्यामुळे नवं काही पाहिल्या प्रमाणे वाटेल.असाच एखाद्या ऑड डे ला बघायचाय.
"सुधीर फडक्यांचा "वीर सावरकर"
"सुधीर फडक्यांचा "वीर सावरकर" त्यातल्या तृटींसकट आवडला होता.", "कला, शास्त्र, दूरदृष्टि, देशप्रेम, नेत्रुत्व या गुणांचा मिलाफ स्वातंत्र्यवीर सावरकरां व्यतिरिक्त शोधुन सापडणार नाहि" +१११
कला, शास्त्र, दूरदृष्टि,
कला, शास्त्र, दूरदृष्टि, देशप्रेम, नेत्रुत्व या गुणांचा मिलाफ स्वातंत्र्यवीर सावरकरां व्यतिरिक्त शोधुन सापडणार नाहि...
>>>> खरंच. तेजस्वी होते ते.
त्यात लोक थिएटरला जा असा
त्यात लोक थिएटरला जा असा आग्रह करत आहेत >>
जो येतो तो सिनेमा - बघितलाच पाहिजे, तो चालवणे हे आपले कर्तव्य आहे, घरचे कार्य असल्यासारखं जायलाच पाहिजे इ. इ. गोष्टी वाचून, या सिनेमाला जातानाही आपण या propaganda ला बळी पडलो की काय अशी मला शंका येत होती, पण विचारांती असे लक्षात आले की खरंच कसा केलाय हे बघण्याची उत्सुकता आहे, आणि विषयात रस आहे, म्हणून theatre ला जाणे ठीक वाटले. कारण असा गेल्या काही काळात आलेला एकही चित्रपट पाहिलेला नाही.
बहुधा चित्रपट प्रॉपागंडा नसावा अशी आशा >
propaganda नाही असे म्हणता येणार नाही, आहेच. पण अशा प्रकारचा, कोणत्याही बाजूचा आणि propaganda नसलेला सिनेमा, नाटक दाखवा, कोणत्यातरी एक बाजूलाच झुकलेले असते कमी जास्त प्रमाणात. शेवटी सिनेमा करणाऱ्याच्या नजरेतून, त्याचे इंटरप्रेटेशन आहे. गांधी वि सावरकर यांचे तौलनिक चित्र - असला काही प्रकार कुठे असतो ?
>>> सुधीर फडक्यांचा "वीर
>>> सुधीर फडक्यांचा "वीर सावरकर" त्यातल्या तृटींसकट आवडला होता
मला नव्हता आवडला.
हाही चित्रपट वर आलेल्या कारणांसाठीच बघायची इच्छा होत नाही.
पिक्चर चांगला असेल तर बघेन.
पिक्चर चांगला असेल तर बघेन. सामाजिक कार्य म्हणून नाही
सावरकरांबद्दल - एक क्रांतीकारक म्हणून सुरूवातीचे प्रयत्न व नंतरचे सामाजिक प्रयत्न - दोन्हीबद्दल दोन्ही बाजूने भरपूर वाचले आहे. सगळे एकत्र केल्यावर तरीही त्यांच्याबद्दल आदर वाटतोच. पण त्यांना थोर दाखवायला गांधींचे कार्टून केले असेल तर अजिबात आवडणार नाही. या रोल करता रणदीप हुडाने भयंकर मेहनत घेतली आहे असे वाचले, सीन्स मधून दिसते. त्याकरता तरी बघायचा आहे.
स्वातंत्र्य मिळवण्याच्या पद्धतीबाबत सावरकरांची भूमिका ही होती पण गांधींचे विचार वेगळे होते. असे काहीतरी दाखवले तर आवडेल. पण आपल्याकडे बायोपिक्स मधे आमच्या चरित्रनायकाला सगळे काही आधीचे नंतरचे कळाले होते पण इतर तत्कालीन लोकांना ते काहीच समजले नाही, नाहीतर काय बिशाद होती मोगलांची, इंग्रजांची ई. एकदम रंगवून दाखवायची खोड असते. त्यात मग इतरांचे कार्टून झालेले नुसते चालतेच असे नाही, तर यावर माना डोलावणार्या पब्लिकला ते आवडते.
“ पण त्यांना थोर दाखवायला
“ पण त्यांना थोर दाखवायला गांधींचे कार्टून केले असेल तर अजिबात आवडणार नाही” +११
“आपल्याकडे बायोपिक्स मधे आमच्या चरित्रनायकाला सगळे काही आधीचे नंतरचे कळाले होते पण इतर तत्कालीन लोकांना ते काहीच समजले नाही“ - टोटली सहमत!
बालपण छान होते.
बालपण छान होते.
गांधीजी हे महात्मा आणि राष्ट्रपिता होते.
सावरकर हे स्वातंत्र्यवीर होते.
दोघांबद्दल आदर होता.
आताही आहे.
फक्त एकाचवेळी या दोघांबद्दल आदर असू शकतो हे हल्ली काही जणांना पटत नाही.
सोमिवर तुंबळ युद्ध पेटले आहे.
काही जण वाढवून चढवून कौतुक करून चित्रपट बघायला सांगत आहेत.
तर काही जण विरोधकांच्या लाडक्या महापुरुषाचा चित्रपट फ्लॉप गेला म्हणून आनंद व्यक्त करत आहेत.
त्यामुळे चित्रपट एक कलाकृती म्हणून कसा आहे हे खात्रीने कळणे अवघड. कारण नेमका कोणावर विश्वास ठेवायचा.
तसे ऐतिहासिक चित्रपट मी कमीच बघतो. इतिहास माझ्या आवडीचा विषय नाही.
पण सावरकरांबद्दल फार कमी माहीत असल्याने हा ओटीटी वर आल्यावर बघेन.
त्यांच्या आणि माझ्यामध्ये एक साम्य तर माहीत आहे.
ते सुद्धा देवाला मानायचे नाहीत
आत्ता थिएटरला जायला जमणार
आत्ता थिएटरला जायला जमणार नाही तेव्हा आयपी टिव्हीवर आला की बघू.
"कला, शास्त्र, दूरदृष्टि,
"कला, शास्त्र, दूरदृष्टि, देशप्रेम, नेत्रुत्व या गुणांचा मिलाफ स्वातंत्र्यवीर सावरकरां व्यतिरिक्त शोधुन सापडणार नाहि" +१११
बघायचि खुप इच्छा आहे पण जवळपास कुठेच आलेला नाही त्यामुळे वाट बघणे आले...
दोघांबद्दल आदर होता.
दोघांबद्दल आदर होता.
आताही आहे.
फक्त एकाचवेळी या दोघांबद्दल आदर असू शकतो हे हल्ली काही जणांना पटत नाही. >> परफेक्ट पोस्ट लिहितो आहेस असे म्हणणार तेव्हढ्यात शेवटचे शेपूट "त्यांच्या आणि माझ्यामध्ये एक साम्य तर माहीत आहे." आलेच.
माझेमन, छान पोस्ट. मला बघायला
माझेमन, छान पोस्ट. मला बघायला एरवी आवडला असता, पण सध्याचं टायमिंग पाहता आणि रणदीप हुड्डाच्या मुलाखती पाहता तो प्रपोगंडणीयच असेल असा वाटला. मुलाखतींमध्ये तर त्याने उघडपणे तसा स्टँडही घेतला आहे. शिवाय ट्रेलरमध्ये आपल्या सर्वच इतर बायोपिकांप्रमाणे यातही मुख्य पात्र सगळ्यात हुशार आणि बाकीचे अगदीच येडे दाखवणारे संवाद दिसले. त्यामुळे असली कुठलीच बायोपिकं बघायची इच्छा होत नाही. गांधींची मतं खोडून काढणं इतकं सोपं होतं, तर ते करायला सावरकर कशाला हवे होते? कुणीही सोम्यागोम्या त्यांना गप्प करू शकला असता. जर सावरकर भारी दाखवायचे आहेतच ना तुम्हाला, तर निदान प्रतिस्पर्ध्याचा युक्तिवाद तुल्यबळ दाखवा ना, म्हणजे मग ह्यांनी काय भारी विचार केला वगैरे निदान पटेल तरी!
मुख्य पात्र सगळ्यात हुशार आणि
मुख्य पात्र सगळ्यात हुशार आणि बाकीचे अगदीच येडे दाखवणारे संवाद दिसले>>>
भारतिय बायोपिकच्या बाबतीत सगळे आक्षेप समजण्यासारखे आहेत. म्हणून मी पहा/नका पाहू वगैरे रेकमेंड केलं नाही.
सिलेक्टीव नॅरेशनबाबत म्हणाल तर कथानायकाला जास्त फुटेज व इतरांना कमी या दृष्टीने सिलेक्टीव आहे. तसं असण्याला माझा आक्षेप नाही. कारण सगळ्यांना सेम फुटेज द्यायचे झाले तर चित्रपट सावरकरांविषयी न राहता भारतिय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास होईल.
मी ट्रेलर व हुडाच्या मुलाखती पाहिल्या नाहीत म्हणून कल्पना नाही. पण यांत प्रत्येक पात्राचे विचार कन्सिस्टंट आहेत. जे मला पटलं नाही ते वर लिहिलच आहे. ‘गांधी’ चित्रपटाशी मी तुलनाच करणार नाही. पण इथे जेव्हा गांधीजी फाळणीविषयी म्हणतात ‘ओव्हर माय डेड बॉडी’ ते एकदम भिडलंच. आत्तापर्यंत हा फक्त संवाद आणि काहीशी चेष्टा/टीका झालेला संवाद होता माझ्यासाठी.
सामाजिक कार्य/सावरकरांना सपोर्ट/इमोशनल ब्लॅकमेल इ.साठी नकाच पाहू. सावरकर या सर्वांच्या पलिकडचे आहेत.
कुणी स्वेच्छेने पाहिला आणि लिहावंसं वाटलं तर जरूर लिहा. प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन वाचायला जरूर आवडेल.
इथे कदाचित औचित्यपूर्ण ठरणार नाही पण सावरकरांविषयी पु. ल. देशपांडे यांचे हे भाषण मला फार आवडते. वेळ असल्यास व ऐकले नसल्यास जरूर ऐका.
हाही प्रतिसाद आवडला.
हाही प्रतिसाद आवडला.
बायोपिक मधे स्वातंत्र्य
बायोपिक मधे स्वातंत्र्य घ्यावं का? किती घ्यावं यावर कुणी तरी धागा काढावा. बायोपिक असला तरी चित्रपट म्हणून कसा झालाय हे सांगा. ऐतिहासिक व्यक्ती / महापुरुष यांची त्यांच्या अनुयायांना थोडीफार माहिती असतेच. तिला छेद देणारी किंवा त्या माहितीला ग्लोरिफाय करणारी मांडणी चित्रपट कोण बनवतं यावर अवलंबून असते.
इतिहासाशी फारशी छेडछाड न करता बनवलेल्या भारतीय नेत्यांवरच्या बायोपिक पैकी रिचर्ड अॅटनबरोचा गांधी हा उत्तम सिनेमा होता. वेशभूषा, वातावरण निर्मिती, निर्मिती मूल्ये, समूहदृश्ये प्रभावी होती. बायोपिक म्हटल्यावर खासगी क्षण, कौटुंबिक व्यक्ती म्हणून नायक कसा होता हे दाखवायचा मोह होणारच.
तोडीस तोड नसला तरी पीरियड फिल्म म्हणून जब्बार पटेलांनी आंबेडकर चित्रपटावर मेहनत घेतली होती. मामुट्टीने सुद्धा लूक्स, देहबोली, अभिनयातून नायक उभा केला होता.
पण दोन्ही बायोपिक उत्तम असून कंटाळवाणे होते. चरित्र समजून घ्यायला पुस्तक आणि डॉक्युमेंट्रीज उपयोगी पडतात.
शाहीर साबळे तर फसलाय असेच वाटते ह
चरित्रनायकाचे दोष दिग्दर्शन करणाऱ्या सिनेमाला प्रेक्षक म्हणून कोण येणार हा पण कळीचा मुद्दा आहे. शिवाय अनुयायांकडून विरोध होण्याची भीती असते.
ज्यांना आकस आहे ते प्रेक्षक म्हणून सिनेमा पाहतात का? सिनेमॅटिक लिबर्टी अशा थोर पुरुषांच्या बाबतीत घेतली तर लोकांना आवडेल का?
आदरणीय समाजसेवक हाजी मस्तानजी यांच्या चरित्रावर आधारित दीवार हा सिनेमा आला होता. तो देशभरात खूपच लोकप्रिय झाला. एव्हढी लिबर्टी चालेल का? हाजी मस्तानजी यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधीही हातात पिस्तूल धरले नव्हते. त्या वेळी लोक बायोपिक हा चित्रपट आहे असे समजून पाहत होते का? तेव्हाचे प्रेक्षक अधिक समंजस आणि प्रगल्भ होते का?
काल लापता लेडीज पाहिला.
काल लापता लेडीज पाहिला.
मस्त आहे, चुकवू नका.
किरण राव चा धोबी घाट अब्स्त्रॅक्ट होता पण आवडला होता. हा सरळसोट सटायर आहे. रूढी परंपरांना अन् समाजमान्यतांना इतके चिमटे घेत कथा जाते की ज्याचं नाव ते.
सगळ्या कलाकारांचा अभिनय छान झालाय. रवि किशन तर फारच मस्त.
किरण राव नी आणखी सिनेमे बनवायला हवे.
लापता लेडीज- propaganda movie
लापता लेडीज- propaganda movie?
Pages