चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा चित्रपट
२०१० साली आलेला आणि बॉक्स ऑफिस वर आपटलेला "भूत अँड फ्रेंड्स". चित्रपटाची स्टोरी लहान मुलांभोवती फिरते. लहान मुले किल्ल्यात दडलेला खजिना शोधतात इत्यादी. चित्रपटात श्री जॅकी श्रॉफ भुताच्या भूमिकेत आहेत पण हे भूत खूपच फ्रेंडली आहे.

लहान मुलांसोबत बघण्यास अगदी धमाल चित्रपट, मुले चित्रपट खूप एन्जॉय करतात. (मुख्यतः आमची सुटका बाहुबली 2 पासून झाली). आता याची किती पारायणे होतील माहिती नाही.

मोठ्यांनी आपल्या रिस्क वर हा चित्रपट बघावा. छोट्यानी अगदी मजा घेत चित्रपट बघावा. मोठ्यातील छोट्यानी छोट्यांसोबत बघावा. चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध आहे.
https://en.m.wikipedia.org/wiki/Bhoot_and_Friends

https://youtu.be/hrvyEAq59UM?si=yQY75sWbatOaoWBq

हा जग्गू दादा भूत असलेला पिक्चर मी पाहिला आहे बहुतेक... पण आता फारसे आठवत नाही. पण तेव्हा आवडला होता असे आठवत आहे. कदाचित मी सुद्धा तेव्हा लहान असल्याने असेल.. आता कसा वाटतो चेक करायला हवे..

वर्मा बाणं, राम बाणं
सुअरवीर कुमार वर्मा की जय

कसे आहात मित्र आणि मैत्रिणींनो, पिंडारी आज दुपारीच आमच्या घरी आलेत. कुंतल देशाची राजकुमारी देवसेना कितीही सुंदर असली आणि महिष्मतीचा राजकुमार बाहुबली कितीही शूरवीर असला तरी त्याच्या कधी तरी कंटाळा येतोच, तर अनेक वेळा रिपीट वर बघता येतील आणि लहान मुलांना आवडतील असे चित्रपट सुचवा.

नाध्वे, मनिबंध, बहिर्मुखं
जय महिष्मती!

भक्त प्रल्हाद, शामची आई, गोपाळ कृष्ण, कण कण मे भगवान, जय संतोषी मां, माय फ्रेण्ड गणेशा, घटोत्कच, हर हर गंगे, बाल गणेश,

फ्रोझन, आईस एज, द गुड डायनासोर, ज्युरासिक पार्क मोआना, मार्ले ऍंड मी

आमच्याकडे फारसा कळला नाही तरी पी एस १ व २ पण आवडीने बघितला.
युट्युबवर खूप छान ॲनिमेटेड सिरीज पण आहेत. त्यात एक महिषासुर मर्दिनी व विष्णूचे अवतारवाली सिरीज आमच्याकडे आवडली होती.
शेरशहा आवडला होता.

मंकी मॅन पडद्यावरती पाहीला - अतिरक्तरंजित कै च्या कै अ‍ॅक्शन मुव्ही आहे.
मुलीला पहायचा होता म्हणुन गेलो, मी तर पहील्या काही मिनीटातच, उठून मॉलमध्येच फिरायला गेले.

इतकी वर्षं 'डेड पोएट्स सोसायटी' बघायचा राहिला होता, तो काल बघितला. (हॉटस्टारवर आहे)
थ्री इडियट्स, दिल चाहता है, तारे जमीं पर - अशा बर्‍याच हिंदी सिनेमांमध्ये डेपोसोमधले काही ना काही कण आहेत असं लक्षात आलं.

मजा मा ... प्राईम.. माधुरी दीक्षित..
LGBTQ वर अजून एक पिक्चर.. पण यात चक्क माधुरी दीक्षित त्यात L दाखवली आहे. पिक्चर बघायला घेताना मला याची कल्पना नव्हती. पिक्चर थोडावेळ बघून बदलणार होतो.. पण हा ट्रॅक सुरू झाला आणि आवडत गेला. जरूर बघा.

क्रीती सेनन रोबोट म्हणून फार सुंदर दिसते.>>> ती ह्युमन म्हणुनही सुंदर च दिसते Wink

पहिल्यांदा मुलाला सुद्धा थिएटर मध्ये नेले होते. तो सुद्धा थ्री डी. दहा मिनिटात चष्म्याला वैतागला आणि पुढचा पिक्चर त्याने चश्मा काढून टू डी मध्ये पाहिला.>>> Rofl

प्राईम वर मेरे वतन के सारा ला बघून इच्छाच मेली बघायची.. काहितरी बरे शोधत आहे आता. मेन मस्त हिंदी वाले चित्रपट नेटफ्लिक्स च खाऊन टाकतो..प्राईम वर टाकाऊ असतात.

कुठली तरी एक हिरॉईन पाच फूट नऊ इंच उंची मुळे चालली नाही ( पायावर नाही). पण आता गुगल मधे मोठ्या पदावर आहे.
कुणाला माहीत आहे का नाव ?

“पण आता गुगल मधे मोठ्या पदावर आहे.” - मयुरी कानगो/कान्गो विषयी बोलताय का? ‘घर सें निकलतें हीं’ वाली? शरिरीक उंचीचं माहीत नाही, पण अभिनयातली खोली पहाता, तिनं योग्य निर्णय घेतला असं म्हणावं लागेल. Happy

मयुरी कानगो का?
क्रिती सेनॉन गोड दिसते. 'तेरी बातो मे ऐसा उलझा जिया' पाहिला.1 तासानंतर मस्त मजेशीर होतो.क्रिती आणि शाहिद दोघांचं काम आवडलं.आणि बाकी शाहिद च्या कुटुंबाचं पण.
धक धक करने लगा वरचा डान्स पण मस्त केलाय.

पण अभिनयातली खोली पहाता, तिनं योग्य निर्णय घेतला असं म्हणावं लागेल >>> Lol अभिनय कसा करतात्/कशाशी खातात हे गूगल वर शोधायला गेली का? Happy

मयुरी कानगो चांगली होती की.पुढे आली असती. पापा कहते है पहिला नाही आणि बेताबी मधला मयुरी चा अभिनय (म्हणजे पिक्चरच) आठवत नाहीये.
सेलिना जेटली ची अजून छान दिसणारी बहीण वाटायची.सध्या झांवी, क्रिती खरबंदा, अनन्या यातरी कुठे सुरुवातीला अभिनय करत होत्या?(आता करतात की नाही का बिकट प्रश्न आहे, उत्तर चाहत्यांवर सोडते.)

झकासराव+१
क्रिती सॅनन मलाही आवडते. सुंदर आहे व अभिनयही येतो. 'तेरी बांतो में' पहिले दोन तास आवडला. रोमॅन्स भलताच गोड आहे, इतका गोड फक्त रोबोटशीच होऊ शकतो. टायटल साँग तर एकदम भन्नाट आहे. शेवटचा अर्धा तास मामेसासऱ्यांना खेटून माधुरीसारखं मादक धकधक व हनुमानासारखं लंकादहन केले आहे. टाईमपास आहे.

पण अभिनयातली खोली पहाता, तिनं योग्य निर्णय घेतला असं म्हणावं लागेल >>> Lol
अभिनय कसा करतात्/कशाशी खातात हे गूगल वर शोधायला गेली का? >> Lol

जुगल ते गूगल प्रवास केला तिने.

कांगो वरचे जोक्स भारीच Lol

सॅम बहादूर पाहिला
छान वाटला
विकी कौशल character मध्ये संपूर्ण एकरुप झालाय.
नेहरूंची चीन युद्धात फक्त इमोशनल बाजू दिसली.
इंदिराचा करारीपणा दाखवायला ऍक्टरेस कमी पडली.
सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण हे आपण ओळखून घ्यावे लागले. त्यातही यशवंतराव चव्हाण कुठेतरी मॅडम च्या हो ला हो म्हणतात असे थोडेसे नेभळट character वाटले. किंवा त्यांचा ग्राफ तसाच दिसला. हे खरेतर असे नाहीये.
चीन युद्धावेळचा डिफेन्स मिनिस्टर पाताळयंत्री वाटला.
त्यावेळी आपली शून्य तयारी होती हे वाचून आहेच.
बऱ्याच गोष्टींना स्पर्श करत चित्रपट जातो.

चीन युद्धावेळचा डिफेन्स मिनिस्टर पाताळयंत्री वाटला.>>> व्ही के कृष्ण मेनन पाताळयंत्री म्हणण्यापेक्षा अहंकारी व आउट ऑफ डेप्थ होते. कुठल्याही मंत्र्याच्या/जबाबदारीच्या पोझिशनवर असलेल्या माणसासाठी व संबंधित संस्थेसाठी मृत्युघंटा ठरू शकणारा संयोग.

Pages