Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे हा तर एकदम 'नवनीत २१
अरे हा तर एकदम 'नवनीत २१ अपेक्षित 'मुलाखतीत काय विचारवे?' ' (आता मी नेस्टेड सिंगल कोट्स पण पूर्ण केलेत! ) पुस्तकातला प्रश्न आहे. यच्चयावत सगळे मुलाखतकार याला बळी पडलेले असतील. तुम्ही यंव झाला नसता तर काय केलं असतं!
1994 ते 2016 मी परग्रहावर
1994 ते 2016 मी परग्रहावर राहायचो, कधीतरी पृथ्वीतलावर यायचो तेव्हा टायटनिक, मुन्नाभाई एमबीबीएस, लगान, 3 इडियट्स वगैरे थोडे चित्रपट पाहिले.
>>> मानवदादा.
तुमचा 'धमाल' राहिला आहे, त्यात 'आदी' आणि 'मानव' आहेत. मानवाने मानवासाठी एवढं केलंच पाहिजे, नाही तर लोक माणुसकी राहिली नाही म्हणतील.
हातवळणे आम्हालाही वाचायला दिले होते. 'बघा बघा' करून हिणवण्यासाठी याचा वापर जास्त झाला असावा. प्रेरणा वगैरे काही मिळाली नाही.
अरे हो. बघायचाय धमाल,
अरे हो. बघायचाय धमाल, विसरलोच ते.
हातवळणे चं लाल कव्हर प्रचंड
हातवळणे चं लाल कव्हर प्रचंड आवडणे आणि त्यातली मुलं कशी विचलित होतात त्याची उदाहरणं आवडणे यांच्या पलीकडे माझी पुस्तक वाचून झालेली उन्नती गेली नाही.
अजूनही 12 वी ची पुस्तकं, त्यातले अति किचकट विषय पाहिले की आपण पुढे आलो म्हणून हुश्श होतं.
चुकून पुस्तकाच्या धाग्यावर
चुकून पुस्तकाच्या धाग्यावर आलो कि काय असं वाटलं क्षणभर
ते हिंदी वाले यू च्या ऐवजी आय
ते हिंदी वाले यू च्या ऐवजी आय वापरतात स्पेलिंग मधे>> ते उच्चार सुद्धा क्रि असाच करतात, गुज्जु क्र करतात आणि आपण Kru करतो. पण लिहिताना सगळे कृ असंच लिहितो. पण क्रीती छान वाटत असेल तर ठीक आहे. तसंही ऋतु पेक्षा रितु चांगलं वाटतं.
धमाल न पाहिलेल्यांना वेणुगोपाल अय्यरचं पूर्ण नाव, तेही श्वास न घेता म्हणायला लावलं पाहिजे. तीच शिक्षा त्यांना योग्य राहील
मयुरी भालचंद्र कानगो आणि
मयुरी ही डॉक्टर भालचंद्र कानगो आणि प्रतिमा (may be मी नाव चुकत नसेन, त्याही डॉक्टर आहेत का ते आठवत नाहीये) यांची मुलगी ना. तिचे आई वडील आधीपासून फेमस होते, कम्युनिस्ट ना. मी लहान असल्यापासून दूरदर्शन वर कुठल्या ना कुठल्या चर्चेच्या निमित्याने बघितलेत, आई नाटकात वगैरे पण काम करायची. औरंगाबादचेच हे.
ती आली तेव्हा पेपरात वगैरे ह्या दोघांची मुलगी असंच वाचलेलं, मला तिचे केस आवडायचे. घर से निकलतेही गाणं आवडायचं, पिक्चर बघितला नाही.
घर से निकलते ही
घर से निकलते ही
कुछ दूर चलते ही
रस्ते मे है उसका घर
गाणं फेमस झालेलं की फार
जे तेव्हा फक्त दूरदर्शन बघत असत त्यांना माहिती असणार हे गाणे.
मयुरी अकॅडेमिक इतकी हुशार आहे हे नव्हतं माहिती.
माबोमुळे ज्ञान वाढते ते असे.
आमच्या आईबाबांना हातवळणे माहीत नसल्याचा फार फायदा झाला आम्हाला.
नो टॉर्चर दहावीत.
डोक्याला ताप नसणारा हलकाफुलका
डोक्याला ताप नसणारा हलकाफुलका सिनेमा पहायचा होता म्हणून 'टिकेट टू पॅरडाइज' बघायला सुरुवात केली. जॉर्ज क्लूनी, ज्युलिया रॉबर्ट्स. माहितीही चांगली वाटली होती.
पण अर्ध्या तासात बोअर झाले.
घटस्फोट झालेले मध्यमवयीन नवरा-बायको, पण त्यांच्यातली भांडणं आणि संवाद फारच फुटकळ वाटले.
तो इंडोनेशियन तरुण अॅक्टर आवडला, पण सिनेमा पूर्ण करू शकले नाही.
क्रीती सनन नाक फेंदरले जाते
क्रीती सनन नाक फेंदरले जाते हसताना. चेहरा चप्पट आहे, गालच नसलेला. आता ह्या मूवीत फिल्लर्स वाटताहेत(आता, सगळेच दिसण्यावर चर्चा करताहेत...)
अभिनय बराच बरा जमायला लागलाय....
टिकेट टू पॅरडाइज - जॉर्ज
टिकेट टू पॅरडाइज - जॉर्ज क्लूनी, ज्युलिया रॉबर्ट्स पण पाट्या टाकतात हे कळले
क्रिती ताईंना इतक्या बारकाईने
क्रिती ताईंना इतक्या बारकाईने पाहिले नाही.पण सध्याच्या मंडळींमध्ये छान वाटते उंची, फीचर्स चांगले आहेत.वेस्टर्न आणि एथनिक दोन्ही कपडे चांगले दिसतात(पोर कॅटरिना ची गादी चालवणार हो.जॅकलीन ने चालवायचा प्रयत्न केला पण गंडली.)
लले, टिकिट टू पॅरडाइज हा
लले, टिकिट टू पॅरडाइज हा बालीला जायचं इन्स्पिरेशन म्हणून पहा. सिनेमा यथातथाच आहे पण बाली खूप सुंदर दाखवलाय त्यात.
मंदारने म्हटल्याप्रमाणे जॉर्ज क्लूनी ज्युलिया रॉबर्ट्स दोघेही अगदीच सुमार वाटले आहेत. त्यांची मुलगी झालेली Kaitlyn Dever कायमच गोंधळलेली वाटते - याच सिनेमात तिला खूप वाव नाहीये. पण अनबिलिव्हेबल सारख्या खूप सशक्त मालिकेत ती खूप कंटाळवाणी वाटली आहे. तिने साकारलेल्या मुलीची व्यथा जाणवलीच नाही - इतका तिचा अभिनय कंटाळवाणा वाटला होता.
क्रिती इंजिनिर, तेही
क्रिती इंजिनिर, तेही इलेक्ट्रॉनिक्स, आहे म्हणून मला उगाच एक soft corner आहे तिच्याबद्दल.
तिचा मिमी आवडला होता.
बाकी एवढी काय fan होण्यासारखी आजकाल नटी नाहीच कुठली!
१० वी बोर्डवाला मदन नागरगोजे
१० वी बोर्डवाला मदन नागरगोजे गाजला होता चाटे क्लास मुळे. चाटे जे करत होते ते आता सगळे करतात.
कृती सेसन मला बरेली की बर्फी मुळे आवडायला लागली. दिसते छान आणि कामही व्यवस्थित करते.
बाकी एवढी काय fan होण्यासारखी
बाकी एवढी काय fan होण्यासारखी आजकाल नटी नाहीच कुठली!>>>>>
हो न.. झांवी अनन्या सुहाना वगैरेंच्या चेहर्यावर स्वतःबद्दल इतका रुबाब निथळत असतो की भुमिकेची काय गरज आहे हे त्या विसरुन जातात. मला कटरीना खुप आवडायची पण तिने चेहर्याचे भजे करुन घेतल्यापासुन नकोसे वाटते बघायला. दीपिका कधीच आवडली नाही.
बाकी एवढी काय fan होण्यासारखी
बाकी एवढी काय fan होण्यासारखी आजकाल नटी नाहीच कुठली!
>>>
प्राजक्ता माळी
हिरॉईन आवडायला अभिनयच जमायला
हिरॉईन आवडायला अभिनयच जमायला हवा असा हट्ट कश्याला..
क्रिती सोबत आलिया, कियारा, यामी, सारा या साऱ्या नव्या पोरी आवडतात मला..
>>>>>क्रीती सनन नाक फेंदरले
>>>>>क्रीती सनन नाक फेंदरले जाते हसताना
हाहाहा मलाही तेच दिसते
यामी बेष्ट आहे.
यामी बेष्ट आहे.
क्रिती सेनॉन बघून बघून सवयीची
क्रिती सेनॉन बघून बघून सवयीची झाली. तिच्या आडनावावरून एक कुठलं तरी गाणं अर्धवट आठवतं...
मला ती कंपनी सेक्रेटरी वाटते.
(टॉपची हिरवीन झाल्यामुळे आमच्याकडे अर्ज करण्याची शक्यता कमी आहे. पुढे मागे कानगो प्रमाणे लहर फिरली तर आमच्याकडे व्हेकन्सी आहे).
तिच्या आडनावावरून एक कुठलं
तिच्या आडनावावरून एक कुठलं तरी गाणं अर्धवट आठवतं... सन , सॅनोन न न, सन सॅनोन न .. जा जा रे जा रे जा री पवन
सन , सॅनोन न न, सन सॅ न न ..
सन , सॅनोन न न, सन सॅ न न .. जा जा रे जा रे जा री पवन >>>
तिच्या होणार्या नवर्याचं नाव पवन असावं.
तिच्या आडनावावरून एक कुठलं
तिच्या आडनावावरून एक कुठलं तरी गाणं अर्धवट आठवतं...
>>
सन सनन सांय सांय हो रही थी रेत में...
#बनारसी बाबू
बनारसी बाबू चं पाहिलं गाणं
बनारसी बाबू चं पाहिलं गाणं आता.
पण ते असोका मधलंच आठवतं. पहिलं बरोबर आहे.
जेवढे बारीक = तेवढे सुन्दर हे
जेवढे बारीक = तेवढे सुन्दर हे समीकरण हल्ली सगल्ळ्या बायकांच्या डोक्यात फार फिट बसले आहे. इतके की बहुतांशी बायका सतत असमाधानी असतात दिसण्यावरून..
(क्रिती सनोन चा सिनेमा पा हिला नाहिये अजून.. सो ती चान्गली दिसते का फार बारीक ते माहित नाही, जनरल निरिक्शण आहे. अगदी ६५ च्या बायका पण जाड बारीक मध्येच अडकलेल्या दिसतात अनेकदा ( तब्येतीकरता नव्हे - दिसण्याकरता) आणि फार आश्चर्य वाटते!
पुरे झाली कृतिची चर्चा.. उगाच
पुरे झाली कृतिची चर्चा.. उगाच तिला लेडी शाहरूख बनवू नका. चित्रपट कसा वाटला यावर बोलूया.
द ग्रेट इंडियन फॅमिली पाहिला प्राईमवर.
एका पुजारी कुटुंबातील भजन सम्राट मुलाला एके दिवशी समजते की तो आपल्या आईबापाचा खरा मुलगा नसून मुस्लिम आहे.
हिरो विकी कौशल आहे त्यामुळे अभिनयाचा प्रश्न नाही. एकूणच टिपिकल हिंदू मुस्लिम भाईचारा असलेला छान चित्रपट आहे. या देशात हिंदू मुस्लिम आपापले मोहल्ले बनवून सुखाने समाधानाने आणि शांततेत नांदतात जोपर्यंत त्यांचे रस्ते एकमेकांशी वाकडे होत नाहीत. अश्याच एरियात बालपण गेल्याने वातावरण निर्मिती रीलेट झाली.
मयुरी कांगो आमच्या दोनतीन बॅच
मयुरी कांगो आमच्या दोनतीन बॅच पुढे होती आणि मेरिट मधे आलेली होती. औरंगाबादची आहे ती. तिचे आईबाबा डॉक्टर आहेत बहुतेक. तिनं सिनेमात फारसं काम केलं नसलं तरी तिथंच रेटत राहून उगा बी- सी ग्रेड सिनेमे किंवा प्रोड्युसरशी लग्न करण्याऐवजी वेगळीच वाट निवडून त्यात यशस्वी झाली याचं कौतुक वाटतं.>>> तिचे वडील कॉम्रेड भालचंद्र कांगो. ते कम्युनिस्ट नेते आणि हमाल किंवा रिक्षा चालकांच्या युनियन चे काम करायचे. आई, सुजाता कांगो शिवाजी हायस्कूल, औरंगाबाद मध्ये शिक्षिका होती. नाटकात काम करायच्या त्या.
मयुरी दोन वर्षे ज्युनियर होती आम्हाला.
तिचे आई बाबा माझ्या आई बाबांचे मित्र म्हणून, तिच्या लग्नाच्या रिसेप्शन ला गेले होते मी. ती काही खूप उंच बिंच नाहीये. साधारण उंची आहे.
मयुरी कांगो चं आयटम साँग
मयुरी कांगो चं आयटम साँग:
https://m.youtube.com/watch?v=LOjKkBpiUSs
ऐकवत नाही जस्पिंदरच्या आवाजात
ऐकवत नाही जस्पिंदरच्या आवाजात सुरू झालं की.
Pages