चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुगल ते गुगल Lol
ती एवढी उंच होती का पाच नऊ वगैरे

तेरी बातोने उलझा दिया चा ट्रेलर बघून कैच्याकै असेल असं वाटलेलं. पण प्रत्यक्षात सुखद धक्का. वन टाईम वॉच हलकाफुलका मूव्ही आहे.
क्रितीताई अशक्य सुंदर दिसल्यात. आतापर्यंतची सर्वात सडपातळ आणि फिट हिरॉईन म्हणावी का ही? एक इंच इकडचा तिकडे नाही. (रोबोटीक चेहेर्‍याचा) अभिनयही जमलाय. डान्स पण जमतोय. नंबर वनकडे घोडदौड चालेली दिस्तएय.
पोलिस स्टेशनातला सीन एकदम फनी.

तिचा बर्फी सोडला तरी पंकज त्रिपाठी बरोबर ती सर्रोगेट मदर वाला चित्रपट होता, त्यात छान काम केलेय.

पानिपत मधे ही तिने बिचारी ने सुरेख मुद्राभिनय केलाय पण समोर लिटरल मठ्ठ मूर्तिमंत ठोकळा होता म्हणल्या वर तिचा ही नाईलाज झालाय.

इथली चर्चा वाचून तेरी बातो..... पाहिला. क्रिती अशक्य सुंदर दिसली आहे . तिची फिगर बघून कॉम्प्लेक्स च येतो आहे . शाहीद कपूरचे डान्स स्टेप ही मस्तच !! One time watch movie.

एखादा महिना वाले सबस्क्राईब मिळत असेल तर घेऊन टाक, हाऊस, बिग बँग, पंचायत आणि 'तेरी बातो मे ऐसा बघून 1 महिन्याने रद्द कर

किल्ली 'तेरी बातो मे AI सा मध्ये युट्युब वर दिसत होता बघ. कसे काय ते कळाले नाही.
क्रितीचे smile छान आहे.

ते हिंदी वाले यू च्या ऐवजी आय वापरतात स्पेलिंग मधे त्यामुळे झाले असेल. अबतक छप्पन की कोणत्यातरी पिक्चर मधे नाना पाटेकर त्याच्या ज्युनियरला तो "वैशाली" शब्दाचा उच्चार काही हिंदी भाषिक करतात तसा करतो त्यावरून झापतो ते आठवले Happy बहुधा दिल्लीचे इंग्रजी मिडियम वाले असतील. कारण तो एक वेगळा अ‍ॅक्सेण्ट जाणवतो.

क्रिती च नाव आहे तिचे.
एका मुलाखतीत म्हणाली होती ती.
किल्ली 'तेरी बातो मे AI सा मध्ये युट्युब वर दिसत होता बघ>>नाव ते आहे, सिनेमा वेगळा आहे बहुतेक कबीर सिंग असावा

क्रिती च नाव आहे तिचे.
>>>
गूगल केले तर बहुतांश ठिकाणी कृती दिसत आहे.
पण मी स्वतः तिला क्रिती बोलतो. मला ते छान वाटते.

कौतुक होतंय म्हणजे नक्कीच चांगला असणारे सिनेमा
आता prime कुणाकडे आहे ते बघावं लागेल.>>@ किल्ली
Amazon app असेलतर ओपन करुन बघ, एक महिना फ्रि subscription दिसतेय का. असेलतर घेऊन टाक.

मामी, जुगल ते गुगल प्रवास कोटी रघु आचार्यांची आहे.
मला ती कळायला मागचे पान चाळावे लागले, मग मयुरी कानगो कोण ते कळले (कधी नाव ऐकले नव्हते.)
मग तिच्या नवर्‍याचे नाव शोधले पण ते तर जुगल नाही.
मग तिचा जुगल नावाचा चित्रपट आहे का हे शोधले. नाहीय. पापा कहते है दिसला. त्यात जुगल हंसराज नाव दिसले. तेव्हा ट्युब पेटली.

मयुरी कानगो माहीत नाही?इथे आ वासलेली बाहुली. ती त्या काळात दहावी बोर्डात आलेली आणि पापा कहते है(मॉरिशस शूटिंग वगैरे) म्हणून बरीच प्रसिद्ध होती.

मला आज पर्यंत पापा कहते है हे गाणं माहीत होतं फक्त.
पिच्चर पण आहे आज कळलं Proud
मला आज पर्यंत पापा कहते है हे गाणं माहीत होतं फक्त.
पिच्चर पण आहे आज कळलं Proud
1994 ते 2016 मी परग्रहावर राहायचो, कधीतरी पृथ्वीतलावर यायचो तेव्हा टायटनिक, मुन्नाभाई एमबीबीएस, लगान, 3 इडियट्स वगैरे थोडे चित्रपट पाहिले.

मयुरी कांगो फार प्रसिद्ध नव्हती.
आणि दहावी बोर्डात आलेले सेलिब्रिटी नाही तर बारावी नापास झालेले जास्त प्रसिद्ध होतात.

त्यामानाने जुगल हंसराज जास्त फेमस होता असे वाटते.
पदार्पणात मासूम चित्रपटातील बालकलाकार म्हणून आणि नंतर शाहरूखसोबत मोहोब्बते मधून..

आमच्या गावी कन्या शाळेच्या प्रसिद्ध मुख्याध्यापिका होत्या, दुर्गा "कानगो." इंग्रजी स्पेलिंग Kango असले तरी उच्चार कानगो होता त्यांच्या आडनावाचा.
ही त्यांच्या नात्यातली की काय ठाऊक नाही, पण उच्चार कानगो असावा बहुतेक.

मयुरी कांगो आमच्या दोनतीन बॅच पुढे होती आणि मेरिट मधे आलेली होती. औरंगाबादची आहे ती. तिचे आईबाबा डॉक्टर आहेत बहुतेक. तिनं सिनेमात फारसं काम केलं नसलं तरी तिथंच रेटत राहून उगा बी- सी ग्रेड सिनेमे किंवा प्रोड्युसरशी लग्न करण्याऐवजी वेगळीच वाट निवडून त्यात यशस्वी झाली याचं कौतुक वाटतं.

काही दिवसांपूर्वी ओपरा विनफ्रीच्या मुलाखतीची क्लिप बघितली. त्यात समोरच्याने तिला तुझा हा टॉक शो चालला नाही तर तू काय करशील असं दोनदा नकारात्मक पद्धतीने विचारले असता तिने शांत आवाजात 'मला वाटतं हा शो चालेलच आणि नाही चालला तरी मी आयुष्यात काहीतरी उत्तम करेनच' असं सांगितलं. हा तीस वर्षांपूर्वीचा इंटरव्ह्यू होता. बंदी में दम था/ है .... Happy

मला हातवळणे मुलं त्यांचं पुस्तक घरी असल्याने माहीत आहेत.शिवाय अती गरीब परिस्थितीतून बोर्ड पास झालेला म्हणून मंगेश म्हसकर पण.आणि कानगो बद्दल कोणत्या तरी फिल्म मॅगेझीनमध्ये वाचल्याने.

Pages