चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेटफ्लिक्सवर “द लिटल थिन्ग्ज” एक नंबरवर दिसला, Denzel Washington आणि Rami Malek नावे वाचुन पाहिला पण अगदीच बंडल होता. फारच हळु. ते दोघे उगीचच सारखे मनातल्या मनात उसासे सोडत फिरतात सिनेमाभर. Jared Leto हा तिसरा उसासेवाला पण काम चांगलं केलंय जो काही रोल होता त्यात.
पाहिला नाही तरी चालेल काय पळेल.

सुनिधी, सावरकर चित्रपटावरची पोस्ट फार आवडली.
मला महात्मा गांधी आणि वीर सावरकर या दोघांबद्दलही सारखाच आदार आहे. लोकं जेंव्हा त्यांची एक्मेकांशी तुलना करुन अनादर करतात तेंव्हा किती मुर्खपणा आहे हा हेच वाटत रहातं. हेच दोघे कशाला मला पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दलही आदर वाटतो. यातल्या प्रत्येकाने जे केलं आहे ते करणं सर्व सामान्य माणसाचं काम नाही. असो!
सिनेमा पहायची खुप इच्छा आहे पण अंदमानातले प्रसंग अंगावर येउन मानसिक हेल्थ बिघडण्याची भिती वाटते आहे त्यामुळे बघावा की नाही हा विचार करते आहे

>>>>>>पण अंदमानातले प्रसंग अंगावर येउन मानसिक हेल्थ बिघडण्याची भिती वाटते आहे त्यामुळे बघावा की नाही हा विचार करते आहे
नको बघूस. मलाही हा इश्यु आहे . नेहमी असतो.

ते दोघे उगीचच सारखे मनातल्या मनात उसासे सोडत फिरतात सिनेमाभर. Jared Leto हा तिसरा उसासेवाला
>>>> Lol धन्यवाद सुनिधी.

मला झी मराठी वरील 'आभाळमाया' आठवते. डेंझेल वाशिंग्टन म्हणजे सुकन्या कुलकर्णी. त्यात सुस्कारे झाले की उसासे, उसासे झाले की उमाळे पुन्हा रिपीट. टिआरपी कुठल्याकुठे. बघणार होते पण तो वाचलेला वेळ दुसरा बंडल सिनेमा बघून सत्कारणी लावेन.

डेंझेल वाशिंग्टन म्हणजे सुकन्या कुलकर्णी. त्यात सुस्कारे झाले की उसासे, उसासे झाले की उमाळे पुन्हा रिपीट. टिआरपी कुठल्याकुठे. बघणार होते पण तो वाचलेला वेळ दुसरा बंडल सिनेमा बघून सत्कारणी लावेन. >>>> Lol म्हणतेच आहेस तर निदान आकाचा एखादा पिक्चर बघ.

क्रू पहिला आणि पहिल्या दिवशी याला 30 कोटी बिझनेस मिळवून देणाऱ्या सर्व प्रेक्षकांची दया आली.एक चांगली होऊ शकणारी कथा 3 बायकांच्या क्लिवेज(किंवा कथेपेक्षा हॉट फॅक्टर) जास्तीत जास्त वेळा दाखवण्यावर भर देऊन गुंडाळण्यात आली आहे.बरेच लूज एण्ड्स आहेत.शेवट अचाट आहे.
थिएटरमध्ये 6 चा विचित्र वेळेचा शो असल्याने फक्त 7 प्रेक्षक होते. अर्थात आम्ही हसून मजा केली.
पोलिसीण बाईचा रोल आवडला.तिन्ही बायका, विशेषतः कृती चांगल्या दिसल्या आहेत.

आभाळमायात सुकन्या पण वैतागली असेल मग Lol

अर्र मीअनु, क्रु चांगला नाही वाचुन निराशा झाली. इथे आम्ही बायांनी जायचे ठरवले होते.

क्रु मला पण बघायचा आहे. नेटफ्लिक्स वर येईल बहुतेक लवकरच.
अनु ६ चा शो विचित्र कसा? Wink आधी मला आठवतंय ३-६-९ एवढेच शो असायचे ना आणि हो मॅटीनी पण!

नेफ्लिवर रणबीर चा कपिल शर्मा शो एपि ओके वाटला. त्या सुनिल ग्रोव्हर आणि कपिलचं भाडण मिटलेलं दिसतंय. तो पण आहे आता त्यात.

प्राईमवर हॉटेल साल्व्हेशन नावाचा सिनेमा पाहिला.
गंगाघाटावर एक असं ठिकाण आहे की जिथे मुक्ती /मोक्ष मिळावा यासाठी वयस्कर मंडळी तिथे येऊन राहात असतात की जिवनाची अखेर इथेच व्हावी पण मृत्यू कोणाच्या हातात नसतो त्यामुळे राहायला आल्यापासून १५ दिवसात जर तुम्ही गेला नाहीत तर रुम दुसर्‍यांसाठी रिकामी करायची.
तिथे एक मुलगा (आदिल हुसेन) आपल्या वडिलांना घेऊन तिथे येतो कारण त्यांची तशी इच्छा असते. पुढे ते तिथे कसे राहतात, त्यांना तिथे मरण येतं का? याबद्दलचा हा सिनेमा आहे. ठीकच वाटला. मला बरेच प्रश्न पडले.
मुलाला तिथे कोणत्या बेसिसवर राहायला देतात? तिथे राहणार्‍या एका आज्जींबरोबर त्याच्या वडिलांचे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित होतात ते ठीक पण एका प्रसंगात त्यांचं एका खोलीत झोपणं जरा विचित्र वाटलं, बाकी कोणी कधीही येऊन तिथे राहतं स्पेशली मुलाची फॅमिली वगैरे. त्या आजी अनेक वर्ष तिथेच राहतात मग १५ दिव्सांचा नियम कशासाठी? जिथे नोकरीत बॉस कटकट्या असतो तिथे मुलगा काम धाम सोडून इतके दिवस वडिलांसोबत येऊन राहिल वाटत नाही तेही वडील धडधाकट असताना, एका प्रसंगात ते आजारी पडतात तेव्हा मुलाला वाटतं आता शेवट जवळ आला म्हणून त्यांच्यात भावबंध तयार होतात का तेही नीटसं कळलं नाही.

Hotel Salvation बघितला होता. तितका आवडला नव्हता. फार अंधार आहे सिनेमात. तू म्हणतेस तसं काही प्रश्न अनुत्तरित राहतात.

उर्मिला, अष्मित पटेल, डिंपल, राज बब्बर, नसिरुद्दीन शाह यांचा 'बनारस' खूप आवडला होता. नसिरुद्दीन शाहचा एक पायऱ्यांवरचा सीन एपिक आहे. 'देऊळ' मधल्या दरोडेखोराचा आणि हा. तेवढा पुन्हा पुन्हा बघितल्या जातो.

दर्शन जरीवाला यांची 'मुंबई वाराणसी एक्स्प्रेस' ही शॉर्टफिल्मही चांगली वाटली होती. यात बहुतेक चितेच्या लाकडांची घासाघीस, दहनाच्या जागेचा सत्तासंघर्ष आणि 'डोम किंग' वगैरे राजकारण सुद्धा आलं आहे.

ही शॉर्टफिल्म बघते.
चितेच्या लाकडांची घासाघीस, दहनाच्या जागेचा सत्तासंघर्ष>>>>>>>>> या विषयांबाबत मसान सर्वच बाबतीत सरस वाटला होता.

हो, माझेमन बघेन. Happy

चांगली होऊ शकणारी कथा 3 बायकांच्या क्लिवेज(किंवा कथेपेक्षा हॉट फॅक्टर) जास्तीत जास्त वेळा दाखवण्यावर भर देऊन गुंडाळण्यात आली आहे.बरेच लूज एण्ड्स आहेत.शेवट अचाट आहे.
>>>>
ही पोस्ट 'जोई' स्टाईल वाटेल पण ते क्लिव्हेजही 'डिजिटली एनहान्सड्' वाटलं. खास करुन तब्बुचे. मला सिनेमा नेटफ्लिक्सवर आल्यावर बघायचाच आहे. ट्रेलर आवडलं होतं. क्रूचे ट्रेलर व करीना बघून 'वीरे दी वेडिंग' आठवला होता. तो तितका जमला नव्हता पण झिम्मासम चिकफ्लिक बघणाऱ्या ममव मनाला सीमांत पूजनाला 'स्वाईप किये टिंडर पे सौ सौ, तब जाके मिला मुझे बंदा एक राईट' बघून भरून आले. Wink

डिजिटल आहे की नाही याकडे लक्ष नाही गेलं Happy
6 चा शो विचित्र या अर्थी की ऑफिस मधून जायचं तर 5 ला निघावं लागतं(आयटी च्या भाषेत 'हाफ डे'), त्या मानाने 7.3० किंवा 8.15 चा शो बारा पडतो.

एकदा बघायला आवडेलही बऱ्याच जणांना.आम्हीही हसत होतोच, एन्जॉय केला नाही असं नाही.पण जरा कायच्याकाय पणा आहे.

काल लागोपाठ दोन पिक्चर पाहिले.
रॉकी राणी की प्रेम कहाणी
सत्यप्रेम की कथा

रॉकी राणी छान वाटला. फार चांगले ऐकून नसल्याने इतके दिवस बघितला नव्हता. पण आवडला. बरेच काही सामाजिक संदेश करण जोहर स्टाईल होते. लग्नाआधी एकमेकांच्या घरी राहणे हा प्रकार आवडला.

सत्यप्रेम की कथा सुद्धा बरा होता.
रॉकी राणी संपल्यावर सुरू झाला. कधी नाव ऐकले नव्हते पण कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी कडे बघून काँटिण्यू केला.
यातही Pink चित्रपटासारखे नो means नो असा संदेश होता. जो व्यवस्थित पोहोचला.

दोन्ही चित्रपटात एका चांगला बॉयफ्रेंड किंवा नवरा कसे बनावे किंवा कसे असू नये हा कॉमन फॅक्टर आढळला. अश्या प्लॉट चे पिक्चर मला आवडतात. त्यामुळे बॅक टू बॅक बघायला छान वाटले.

आम्ही Kung Fu Panda 4 बघितला. लेकीला सुट्टी सुरु झाल्यावर Kung Fu Panda: The Paws of Destiny हि सिरीज रोज दोन भाग अशी दाखवली होती. मग सतत आमच्या घरी पो, फॅन टॉंग , जिंग , बाओ यावर चर्चा सुरु असते . बाबा ओरडले कि ते लगेच जिंदाओ (व्हिलन ) होतात . ड्रॅगन मास्टरस वर चर्चा चालूच असते. हा मुव्ही तिला दाखवायचाच होता. कॅमेलिऑन कॅरेक्टर बद्दल माहित होते तिला .
आम्हाला तिघांनाही मुव्ही आवडला . झेन (क्युट कोल्हीण आहे ) हे नवीन केरेक्टर ऍड झालाय . आता पुढच्या भागात ती नवीन Dragon Warrior होईल.

Kung Fu Panda 4 छान आहे. आमच्या घराचे गेलेले. त्यांनाही आवडला.

काल तेरी बातो मे उल्झा जिया पाहिला..
रोबोट प्रेमकथा पहिल्यांदा बघितली.. त्यामुळे आवडला.
स्टोरी लाईन पाहता.. अजून विनोदी करायचा स्कोप होता.. पण नाही केले ते चांगलेच झाले. त्यात लव्हस्टोरीची मजा कमी होते. क्रीती सेनन रोबोट म्हणून फार सुंदर दिसते.

काल इंग्लिश पिक्चर फॉल सुद्धा पाहिला.. खिळवून ठेवतो. टीव्हीचा रिमोट हरवल्याने मी लॅपटॉप वर पाहिला. पण थिएटरचा मोठ्या पडद्यावर बघायला आणखी मजा आली असती.

आमच्या सोसायाटी मधील मुलीच्या मैत्रीणी शैतांन बघायला गेल्या. ते बघून मुलीने सुद्धा हट्ट धरला. पण आम्ही असा पिक्चर दाखवणार नाही म्हटले. वशीकरण का उगाच दाखवावे मुलांना..पण मैत्रीणी गेल्या तर मी का नाही हे पटवणे अवघड असते. मग मध्यम मार्ग म्हणून दुसरा पिक्चर बघूया म्हटले. त्या नादात किंगकोंग आणि गोडजिला पाहिला. काही सिरपैर नसलेला पिक्चर होता. मला तरी नाही आवडला. पहिल्यांदा मुलाला सुद्धा थिएटर मध्ये नेले होते. तो सुद्धा थ्री डी. दहा मिनिटात चष्म्याला वैतागला आणि पुढचा पिक्चर त्याने चश्मा काढून टू डी मध्ये पाहिला.

'तेरी बातो मे ai सा उलझा लिया ( नाव हेच आहे वाटतं )
पाहिला काल.
बरा आहे. काही विनोद छानच, काही ठिकाणी अतर्क्य पण overall आवडला
एकदा बघू शकतो
शाहिदचे मस्त स्मूथ डान्स , डिम्पलचे दर्शन छान, टिपिकल बॉलिवुडीअतरंगी फॅमिली, धरम पाजी वयस्कर झालेला बघून आपल्याला काल चक्र फास्ट पळतय ह्याची जाणीव होते. क्रिती फार सुंदर दिसली आहे. एकदम डोळ्यात बदाम. ती कसली स्लिम आहे.
गाणी फार लक्षात राहण्यासारखे वाटले नाहीत.

क्रिती फार सुंदर दिसली आहे. एकदम डोळ्यात बदाम. ती कसली स्लिम आहे.>>>क्रिती गोडच आहे, बरेली की बर्फी मधे पण आवडली होती...काम पण छान करते.

Pages