Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रघू आचार्य भारी कमेन्ट,
रघू आचार्य भारी कमेन्ट, हाहाहा.
माझेमन, पिंजर कुठे बघायला
माझेमन, पिंजर कुठे बघायला मिळेल?
माझेमन, पिंजर कुठे बघायला
माझेमन, पिंजर कुठे बघायला मिळेल?
>>>>
भारतात प्राईमवर आहे. यूट्यूबवर पार्टसमधे आहे. आणि सलग पार्टस अव्हेलेबल आहेत.
छान लिहिले आहे, माझेमन.
छान लिहिले आहे, माझेमन.
पिंजर कधीतरी शेवटचा अर्धा तास बघितला होता. तेव्हाही उच्च वाटला होता. मनोज वाजपेयीची ती परत जातेय का राहतेय या निर्णयामुळे होणारी घालमेल लक्षात आहे.
अमृता प्रीतम वरून आठवलं.
मनमर्जींया बघितला होता. आवडला होता. अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल तिघांची कामं आवडली. तापसीचे पात्र अत्यंत लहरी, थोडंफार बंडखोर, बेधडक आहे. विकी कौशल उथळ , छपरी तरीही अहंकारी वाटावा असा पर्फेक्ट पंजाबी मजनू. अभिषेक एकदम शांत, दुसऱ्यांना स्पेस देणारा, समजदार वगैरे वगैरे आहे. तापसीचे काही वेळा स्वैराचार वाटावं इतकं विचित्र आणि रिस्की वागणं आहे. तिने फार चांगले काम केले आहे.
कथा अमृता प्रीतम यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित आहे. त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांची प्रकरणं.
अनुराग कश्यप दिग्दर्शक आहे.
आचार्य,
आचार्य,
मनमर्जीया >>> येस्स. हा
मनमर्जीया >>> येस्स. हा पहायचा आहे. अमृता प्रीतमचे कनेक्शन माहित नव्हते. मी समजत होते की हा जरासा अनुराग कश्यप स्टाईलमधला 'हम दिल दे चुके सनम' आहे. आता बघणे मस्ट. तसाही विकी कौशल आवडतोच. तापसी पण चांगली आहे.
पिंजरचा शेवटचा सीन यूट्यूबवर पाहिला परत. उर्मिला थोडी लाऊड वाटते आहे. पण तेवढी खपवून घेऊ.
अनुराग कश्यप स्टाईलमधला 'हम
अनुराग कश्यप स्टाईलमधला 'हम दिल दे चुके सनम' आहे.
>>>> शेवटपर्यंत अनुरागचाच आहे, शेवटी एकदम संलिभच्या शेवटाचं ठिगळ लावलं आहे. तरीही बटबटीत वाटला नाही.
तिचं पात्र स्वैराचारी वाटलं तरीही कुठेही अप्रामाणिक वाटत नाही. उलट प्रामाणिकपणे लफडी करता येत नाहीयेत, मनासारखं इन्टेन्स जगता येत नाहीये आणि समाजाच्या चौकटीतही बसता येत नाहीये, हाच तिचा खरा कोंडमारा आहे. ते ज्या पद्धतीने दाखवलं त्यामुळे मला अमृता प्रीतम यांची बाजू समजून घेता आली असं वाटलं. हेच त्या कथेचं/सिनेमाचं यश आहे.
मनमर्जिया बघितलेला. अमृता
मनमर्जिया बघितलेला. अमृता प्रीतम कनेक्शन माहित न्हवतं.
धन्यवाद माझेमन. बघतो.
पिन्जर साठी माझेमन ला अनुमोदन
पिन्जर साठी माझेमन ला अनुमोदन! फार सुन्दर चित्रपट.
पंकज कपूर यांचा 'धर्म' नावाचा
पंकज कपूर यांचा 'धर्म' नावाचा सिनेमा पाहीला आहे का कोणी? नसल्यास युट्युबवरती आहे. जरुर पहा - https://www.youtube.com/watch?v=tgSm7IFugFk
धर्म बघितलाय..छान आहे.
धर्म बघितलाय..छान आहे.
पिंजर खूप आधी बघितलाय.
सामो, मृणाली >>> ‘धर्म’बद्दल
सामो, मृणाली >>> ‘धर्म’बद्दल थोडं लिहा ना.
‘खुदा के लिए’ नावाचा पाकिस्तानी चित्रपटही चांगला आहे. ‘ज़िंदगी गुलज़ार है’ फेम फवाद खानची छान भुमिका आहे. नसीरुद्दीन शाहचीही छोटीशी भुमिका आहे.
धर्म
धर्म
पिंजर पाहिला आहे. आवडला होता. अशीच एक पाकिस्तानी दूरदर्शन मालिका आहे - दास्तान
सनम बालोच, समीना पीरजादा , फवाद खान (जिंदगी गुलजार है च्या आधीची मालिका असावी)
पिंजरसाठी +१
पिंजरसाठी +१
त्यात ईशा कोप्पीकरपण आहे ना.
पिंजर - function at() {
पिंजर - function at() {
[native code]
}इशय आवडता सिनेमा...
(अरे यार! कोडर्सपैकी कुणीतरी या नेटिव्ह कोडचं काय करायचं सांगा... :कपाळावर हातः
'अ-स्पेस-ति-लेफ्ट अॅरो-बॅकस्पेस-राइट अॅरो-शय हा एकच मार्ग मला माहिती आहे.)
पिंजरची चर्चा वाचून पुन्हा पहावासा वाटायला लागला. उर्मिला मातोंडकरला अशा भूमिका फार कमी मिळाल्या. मनोज वाजपयीचं त्यातलं ट्रान्स्फॉर्मेशन :बदामः
त्यात ईशा कोप्पीकरपण आहे ना.
त्यात ईशा कोप्पीकरपण आहे ना. >>> हो पण तिला फारसा स्कोप नाहीये. त्यामानाने संदली सिन्हाला चांगला रोल मिळाला आहे.
मनोज वाजपयीचं त्यातलं ट्रान्स्फॉर्मेशन >>> मला नाही वाटत की मनोज वाजपेयीचे ट्रान्सफॉर्मेशन झाले. तो तसाच आहे. त्याची सद्सद्विवेकबुद्धी जागृत आहे. सूड आणि आकर्षण या प्रचंड विरोधी भावनांच्या आधारे जाऊन त्याने उर्मिलाचे अपहरण केले तर खरे. पण त्या अपराध भावनेचे ओझे घेऊनच तो जगतो आहे. उर्मिला आणि तिच्या नातेवाईकांना मदत करण्याची त्याची कृती ही जवळजवळ क्षमायाचनाच आहे. तरीही तो तिला मुक्त करू शकत/इच्छित नाही जोपर्यंत त्याला तिच्या वेल्फेअर विषयी खात्री पटत नाही. प्रेम तर आहेच.
त्याचे कॅरॅक्टर स्टेडफ़ास्ट आहे जसे संजय सूरी आणि प्रियांशुचेही आहे. पण त्यांचे रोल एकांगी आहेत. मनोजला उत्तम भूमिका मिळाली आहे आणि त्याने तिचे सोने केले हे निश्चित.
मला वाटते ट्रान्सफॉर्मेशन उर्मिलाच्या कॅरॅक्टरचे झालेय. प्रचंड राग, परिस्थितीचा नाईलाजास्तव केलेला स्वीकार, लादलेल्या संसाराच्या जबाबदाऱ्या आपसूक उचलत जाणे, स्वतःच्याही नकळत रशिदच्या रूपात सखा शोधणे आणि आपले आत्ताचे विश्व् तोच आहे हे जाणणे हा तिचा ग्राफ फार सुंदर आहे.
अर्थात चांगल्या कलाकृतीचे यश हेच कि प्रत्येकाचे इंटरप्रिटेशन निराळे आणि सर्वानाच आनंद मिळतो.
बाय द वे, मनोज वाजपेयी मला झुबेदा मध्ये :बदाम: :बदाम: वाटला आहे.
सामो, खूप खूप वर्षांपूर्वी
सामो, खूप खूप वर्षांपूर्वी पाहिलेला.
आवडलेला.
पिंजर chyaa theme madhe "
पिंजर chyaa theme madhe " woman in the dunes " शी parallel काढता येईल का? (डिटेल्स वाईज नाही, विक्तीम च्यa मानसिकते मधला बदल)
आतून हळूहळू येत जाणारा बदल/acceptance
पिंजर, धर्म दोन्ही सुरवात
पिंजर, धर्म दोन्ही सुरवात थोडी बघितली, अपील झाले दोन्ही. नक्कीच बघणार दोन्ही.
धर्म सिनेमात, एका कर्मठ
धर्म सिनेमात, एका कर्मठ ब्राह्मणाकडे (पंकज कपूर), एक बाई एका बाळाला आणुन ठेवते. आणि त्या बाळाच्या मोहात पंकज कपूरची पत्नी अडकते. बरं बाळाची आई गायबच होते. मग पुढे काय होते ते फार सुंदर आहे.
हिंदू-मुस्लिम दंग्याची पार्श्वभूमी लाभलेला सिनेमा.
मेरी ख्रिसमस बघितला.
मेरी ख्रिसमस बघितला.
विजय सेतुपथी आणि कतरिनाला घ्यायची गरजच होती का? मी सगळा सिनेमा सबटायटल वाचुन बघितला, कारण त्यांचं हिंदी मला समजतच न्हवतं. राधिका आपटे आल्यावर आता वाचायची गरज नाही म्हणून हुश्श केलेलं तर ती दोन मिनिटांची धनी ठरली.
***************************स्पॉयलर*************************
संजय कपुर त्याचा जुना बॉस आणि राधिकाचा नवरा असं काही होता होता राहिलं का? का काळसेकर चौदा वर्षे लग्नाला झाली सांगते आणि राधिका मरुन ७ वर्षे झालेली असतात. म्हणजे राधिक त्याच वेळी दुसरी बायको असते... आणि संसार वाचवायच्या नादात उगा मारली जाते असा तो स्मार्ट xxx प्रकार होता का? ते मला कळलं पण सेतुपतीच्या कधीकधी माशी न हलणार्या चेहेर्याला समजलं का? स्मजलं असेल तरी त्याला समजलंय हे मला समजलं नाही.
शेवट तर अगदीच लेट डाऊन करणारा झाला. पोट्टी शेवटी बोलणार हे ती बोलू शकत नाही हे सांगितल्यावरच समजलेलं.
शेवट कमितकमी त्या बोलणार्या पक्ष्याची बॅटरी संपते आणि पोट्टी बोलू लागते असा करायचा.
एकुण उत्कंठावर्धक होता. पण अशा भयाण उच्चारांनी माती केली. मला अंधाधुन सारखे आयुष्यमान आणि राधिका आवडले असते लीड मध्ये बघायला. सेतुपथीने कुठेकुठे चांगलं काम केलंय, पण एकुण तो आणि कतरिना टोटल फेल.
नानबा : 'वूमन इन ड्यून्स'
नानबा : 'वूमन इन ड्यून्स' नाही पाहिला .
संजय कपूर चा रोल मला जसा
संजय कपूर चा रोल मला जसा दाखवला तेवढाच ( एकदम फ्लॅट) वाटला. अमित तुझी थिअरी कळाली पण तेवढे डीप काही असायचा संभव वाटला नाही. मलाही अजून त्या सेतुपतीचा ग्रेटनेस कळलेला नाही. फर्जी पूर्ण पाहिली नव्हती, बोअर झाली होती. जवान बघणे अशक्य झाले त्यामुळे त्यात काही ग्रेट केले असेल तर माहित नाही.
अमित अगदी अगदी
अमित अगदी अगदी
कॅटरिना ने काहीतरी ऑपरेशन केलं असावं.
आधी तिचे उच्चार इंग्रजाळलेले का होईना, स्पष्ट कळायचे. आता काहीच कळत नाही.सेतुपती चा नाचाचा सिन आवडला आणि खरा वाटला.शिवाय तो हेराल्ड असा विदेशी लुकिंग का होता?संजय कपूर ची अशी एकही हिस्टरी नसावी.तो फक्त फेसबुकवर j1 झालं का विचारून मैत्री करणाऱ्या विवाहित पुरुष मंडळींसारखा, आणि त्यातून सभ्यपणाचा बुरखा ठेवत आपसूक काही लाभ झाला तर बघावा या मानसिकतेचा.तो कॅट च्या घरातून पोलिसांबरोबर जाताना 'खाया पिया कुछ नही ग्लास तोडा बारा आना' पुटपुटतो.
श्रीराम राघवनचा आहे त्यामुळे
श्रीराम राघवनचा आहे त्यामुळे काहीतरी स्मार्ट असणार असं परत परत बायकोला (खरंतर मलाच) सांगून मी न समजलेले हिंदी संवाद परत मागे जाऊ जाऊ कान देऊन ऐकत होतो. त्यात हे एक स्मार्ट असू शकेल असं दिसलं. आता त्याला पण नाही नका म्हणू! ...
मला ही सेतुपथी अजुनतरी कुठे ग्रेट वाटलेला नाही. त्याने हिंदीत नीट संवाद साधला नाही तर यापुढे तर अशक्य आहे त्याला बघणं.
कदाचित इतर तेलगू हिरो अभिनयच करत नाहीत त्यांच्या तुलनेत ग्रेट असं काही असेल. मागे वावे म्हणालेली तसं मराठी इतर सिनेमा पेक्षा गुजा बरा होता तसं.
मला आवडला होता सेतुपती फर्जी
मला आवडला होता सेतुपती फर्जी मधे. पहिल्या एक दोन भागात विशेष वाटला नाही. पण नंतर त्याचा डेडपॅन ह्यूमर मस्त वाटला होता.
गुलाबजाम नाही अमित, झिम्मा.
गुलाबजाम नाही अमित, झिम्मा.
नानबा : 'वूमन इन ड्यून्स'
नानबा : 'वूमन इन ड्यून्स' नाही पाहिला >>
वाचा, बघू नका.
फार भारी आहे.
कुणाला arrival आवडला का?
कुणाला arrival आवडला का?
स्टोरी ऑफ your life आधी वाचलेलं का?
मला स्टोरी ऑफ युअर लाईफ अफाट आवडलेली. मग arrival घाबरत बघितला.. पण कथा वाचल्यावर अनेक वर्षानी. तो पण आवडला.
कथेतील काही गोष्टी tweak केल्यात, सगळ्या concepts cover केल्या नाहीयेत.
पण तरीही आवडला.
तो हेराल्ड असा विदेशी लुकिंग
तो हेराल्ड असा विदेशी लुकिंग का होता?
>>>> सिनेमा पाहून मलाही हा प्रश्न पडला होता पण थोड्या विचारांती कोडं सुटलं.
ते हेराल्डचं प्रेत म्हणजे फुलसाईज डॉल आहे. ती परदेशातून मागवली असणार म्हणून कॉकेशियन लुक आहे.
Pages