चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही वावे. मी पण कालच १२ थ फेल बघितला.
फारच आवडला. एक दोन सीन्सना बाष्पगदगदीत झालो. विक्रांत मेसी भयंकर आवडला.
एकी/ बंधुभाव पेक्षा, आपली पूर्ण न झालेली स्वप्नं आपल्यासारख्याच अतीसामान्य परिस्थितीतून वर आलेल्याने पूर्ण करणे हा भाव मला जास्त वाटला. आणि तसं झालं तर तो इतर अतीसामान्य मुलामुलींसाठी पथदर्शक ठरेल असेही भाव त्या संवादात वाटले.

आयपीटीव्ही वर बाप ल्योक (परत एकदा मंजुळेचा) बघितला. फार आवडला.

शशांक शेंडे वडिलांच्या भूमिकेत आहे आणि बाकी कोणीही कलाकार ओळखीचे नाहीत पण कामं अफाट सुंदर केली आहेत.
वडील आणि मुलाचे संबंध काही कारणांनी ताणलेले असणं आणि केवळ बाहेरगावी त्याच्या लग्नाचं पत्रिकावाटप करायला जातानाच्या प्रवासात एकमेकांच्या सहवासात नाईलाजाने येणं आणि त्यातून बर्‍याच गोष्टी उलगडत जाणं /सुकर होत जाणं/ समजणं असा हा प्रवास. नक्की का जमत नाही आपलं यावर दोघांनी मोकळेपणाने बोलणं हे जरी शेवटी घडतं तरी त्यांचा तो प्रवास आपणही एंजॉय करतो.

या दोघांच्या नात्याबरोबरच इतरही नाती किती जपावी लागतात, त्यांचं आपल्या जिवनात काय स्थान वगैरे याही गोष्टी अनुषंगाने येतातच.
पण या बापकेलांनी जी सुरवातीला तिरसटपणे वागून जी धमाल उडवलीये ती बघण्यासारखीच आहे. थोडा विनोद, थोडा गंभीर असा हा सिनेमा आहे.
मधे जरा प्रेडिक्टेबल आहे पण तरीही आवडलाच.

नेटफ्लिक्स्वरती लव्ह इज ब्लाईंड ६ वा सीझन पाहीला. बराच पाहीला नंतर कंटाळा आला. सी ग्रेड सेलेब्रिटी शिट!!! वेळेचा अपव्यय आहे आणि मेंदूकरता टॉक्सिक आहे. काय तो थर्ड ग्रेड ड्रामा, इमोशनल रोलर कोस्टर. बिंज वॉचिंग सोडुन दिले मध्येच.

हे खरोखर असतं का? अशी एकी म्हणा, बंधुभाव म्हणा, असतो का? असेल तर चांगलंच आहे>> +१ ही शन्का मलाही मुव्हि बघताना जाणवुन गेली पण निट बघितला तर मुव्हित सतत एक आशावाद पॉझिटिव्हीटी दाखवली आहे. बस मधे सगळे पैसे मारले गेल्यावरही हॉटेल वाल्यानी त्याला फ्रि जेवण देण, कुणीतरी रुम देवु करण सगळच त्यामुळे त्याच्याशी सुसगत अस सगळ दाखवल आहे...

जाता जाता, माकडाला कोलीत देऊन ते आग विझू देईल अशी अपेक्षा मायबोलीवर लोक अजूनही करतात याचे आश्चर्य वाटते>>> +१११

रहस्य तिस्का चोप्रा चा फार आधी पाहीला होता. मला तरी खूपच आवडला, धक्का तंत्र छान वापरलेय & खूप वेळ परिणाम/छाप सोडून जातो.

इंद्राणी मुखर्जी चा चित्रपट्/सिरीज आली आहे, नाव माहित असल्यास सांगणे.

अं बाणी पुत्राच्या प्री वेडिं ग मध्ये नाचणार्‍याने राम चरण ला इडली वडा म्हटले. सो कॅजुअली रेसिस्ट टुवर्ड्स द साउथ. णि शेध.

>>इंद्राणी मुखर्जी चा चित्रपट्/सिरीज आली आहे, नाव माहित असल्यास सांगणे.<<
द इंद्राणी मुकर्जी स्टोरी - बरीड ट्रुथ. चार एपिसोड्स्ची मिनि सिरीज आहे, चांगली बनवली आहे. बर्‍याच गोष्टी मिडिया ट्रायलमुळे आधिच माहित होत्या, त्यात थोडी भर पडली. मुकर्जीबाई अजुन बेलवर बाहेर आहेत, निकाल काय लागेल तो लागेल परंतु या बाई खोटारड्या आहेत हे दिसुन येतं.. नेफिवर आहे...

बघितली...पहिला अर्धा तास ड्रामा क्रियेट करायचा प्रयत्न आहे....बाई प्रचन्ड निर्ढावलेली आहे, कशाच काहिही न वाटणारी...तरी एकतर पुराव्या अभावी किवा कुठले तरी लुप होल वापरुन सुटेल...वकिल म्हणतो की मी एकही केस हरलेलो नाही.

मी तिचे एक दोन इन्टर्व्ह्यु पाहिले आहेत. सिरीजमध्ये काही वेगळं हाती लागायचं नाही. तिला काहीही शिक्षा न होता ती आत्ता जशी उजळमाथ्याने वावरतेय तशीच वावरेल.

तिला काहीही शिक्षा न होता ती आत्ता जशी उजळमाथ्याने वावरतेय तशीच वावरेल.>> पण ह्या गोष्टी चं समाधान वाटतय की तिची काही (७-८ ??) वर्ष जेल मधे गेलीत..नाही तर अजून एखादे लग्न केले असते

शोगुनचे पहिले दोन एपिसोड बघितले. आवडले. फ्युडल जपान मधली सत्तासंघर्षाची गोष्ट आहे. Hotstar किंवा hulu वर आहे.

दो पैसे की धूप चाराने की बारीश
नेटफ्लिक्स
दिग्दर्शक -दीप्ती नवल
मनिषा कोईराला, रजित कपूर (तो कॅरिस्मॅटिक रजत कपूर नाही, व्योमकेश बक्शी मधला साधासरळ)

अतिशय सुंदर चित्रपट आहे. जगावेगळ्या कथानकाला जाणून घ्यायची आवड असेल तर नक्की बघा. मला फारच आवडला. दीप्ती विदुषीच वाटत आली आहे कायम. मला तिनी काहीही केलं तरी आवडतंच. चित्रपटसृष्टीत बस्तान बसवण्यासाठी संघर्ष करणारा एक मनस्वी गीतकार, जो समलिंगी आहे. त्यामुळे एक वेगळा वैयक्तिक संघर्षही तो समांतरपणे करत आहे. मनिषाच्या नवऱ्याने मूल अपंग आहे, हे लक्षात आल्यावर जबाबदारी झटकून काढता पाय घेतला आहे. तिला उत्पन्नाचा कुठलाही मार्ग उरला नसल्याने ती वेश्याव्यवसाय करते आहे. पण मूल अपंग आणि हिचेही वय वाढत चालले आहे. त्याचा परिणाम म्हणून तिचे उत्पन्न कमी होते आहे. हे दोघेही आपापल्या आयुष्यात दिशाहीन आहेत. योगायोगाने ह्यांची भेट होते व नाईलाजाने एकत्र रहायला लागतात, कारण तो गे असल्याने त्याला घर भाड्याने मिळणं कठीण होतं आणि परिस्थितीही विशेष नाही. मग तो तिच्या अपंग मुलाला सांभाळायला लागतो. त्याला खाऊपिऊ घालतो अगदी मजेदार मावशी सारखी माया करतो. त्यांचं नातं सुरेख बहरत जातं. आईची ओढाताण आणि मुलाची तगमगही थांबते. फार निरागस आणि निर्व्याज नातं होतं तिघांमधेही.

ती तिच्या अडाणीपणामुळे त्याला 'बरं' करायचे प्रयत्न करते. नंतर सहजपणे स्विकारतेही. भावभावनांचे आविष्कार आणि गाण्यांच्या ओळीही सुरेख आहेत. झगमगाट काहीच नाही, उलट मळकट आहे. पण काही तरी छान बघितल्याचे समाधान मिळाले.

हो मी बघितलाय तो. सुंदर आहे सिनेमा.
टायटल अगदी त्या काळच्या दुरदर्शन सिरीअल सारखं वाटलं आणि सादरीकरण पण.

उलट मळकट आहे. पण काही तरी छान बघितल्याचे समाधान मिळाले
>>
अगदी
कुणाल गांजावाला च्या आवाजातलं टायटल साँग पण मस्त आहे...

बादवे
रजित कपूर आहे यात (व्योमकेश), रजत कपूर फस गये रे ओबामा वाला

ॲंन्की, शंका होतीच मला. पर्फेक्ट. थॅंक्स. Happy
'मैं मौसम बेचता हुं' हे गाणं छानच आहे. मी आज पुन्हा बघितलं.

अमित व सायो , वेळ काढून बघा.

'मैं मौसम बेचता हुं'
>>
यावरून मला नेहमी बारिशकर आठवतो, थोडासा रुमानी मधला...

बारिशकर आठवतो, थोडासा रुमानी मधला >> अहाहा! काय आठवण काढलीस! वही बारिश जो आसमान से आती है, बूंदों मैं गाती है, पहाड़ों से फिसलती है, नदियों मैं चलती है...

Pages