चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>>>>क्या बात है सामो! बेष्ट. डन करा की.
धन्यवाद हपा Happy
>>>>>>>पण आपण डंकायुगात आहोत याचा विसर पडुन कसे चालेल.
होय ६५ वी कला आहे जाहीरातबाजी Happy

कोणी तरी इथे विरोधी लिहित आहे हे फार लागले दिसते, एकदम पर्सनल शिव्याच द्यायला लागला की. >> शिव्या कुठे दिल्या रे बाबा ? का पीळ पाडतो आहेस ?

सामो Happy
'डंकीपुढे वाचली गीता , कालचा 'ॲनिमल' बरा होता'

धन्यवाद सुनिधी. Happy
हो, अगदी लाऊड हावभाव असतात बोमन इराणीचे. उंचाई बघितला, सिनेमा अशक्य कंटाळवाणा वाटला. पण अनुपम खेर, अमिताभ बच्चन, डॅनी आणि नीना गुप्तापुढे बोमन फारच वाईट दिसला. NSD ची सफाई वेगळीच असते. शिवाय अभिनिवेश भलताच आहे.

Happy थॅंक्स अंजूताई, हल्ली बंडल पिक्चर बंद करून सिरीज बघायचा विचार करत आहे. तिथे मी भलतीच मागे पडले आहे.

अक्षयकुमारचा खिलाडी (१९९२) बघितला, वादा रहा सनम गाणे आवडते म्हणून पाहिला. चांगला आहे. फक्त त्या लोकांना दुःख कसं होत नाही हा प्रश्न पडत राहिला.

जाता जाता, माकडाला कोलीत देऊन ते आग विझू देईल अशी अपेक्षा मायबोलीवर लोक अजूनही करतात याचे आश्चर्य वाटते. आणि ज्यांच्या हातात हे आग विझवणे आहे त्यांचे एकूण वर्तन पाहता, या आवडत्या माकडाच्या चेष्टा ते लोक देखील एन्जॉय करतात की काय अशी शंका वाटते.

खिलाडी (१९९२) बघितला, वादा रहा सनम गाणे आवडते म्हणून पाहिला. चांगला आहे. >>>
एंटरटेनमेंट थ्रिलर म्हणून खिलाडी चांगला आहे. सुरूवातीचा टिपीकल बॉलिवुडी मसाला, ड्रॅग ड्रेस वगैरे भरताड काढून टाकून अजून कथानक अजून बांधेसुद करता आलं असतं. पण त्यावेळी ३ तासापेक्षा कमी पिक्चर अशी कन्सेप्टच नव्हती.

खिलाडी हा खेल खेल मे वरून बनवला होता.
तो आणि कशावरून बनवला होता ते माहीत नाही.
पण दोन्ही मस्त होते.

"९९ होम्स" - माय्कल शॅनन लीड रोल असलेला सिनेमा - शोज ब्रुटल रिअ‍ॅलिटी ऑफ अमेरिका. अ‍ॅज मेनी ऑफ यु नो बाय नौ, अमेरिका इज नॉट इझी अ‍ॅज इट साउंड्स. माय्कलच्या तोंडि एक वाक्य आहे - "अमेरिका वाज बिल्ट टु बेल आउट विनर्स नॉट लुझर्स".. माबोकरांना हे स्टेटमेंट वॅलिडेट करायचं असेल तर - गो वॉच द मुवि, नेफिवर आहे...

बाय्दवे, अ‍ॅनिमल चित्रपटाच्या संदर्भात रामूचा हा इंटर्व्यु गेल्या आठवड्यात पाहिला. इथे राम गोपाल वर्मा काहिंना माहित नसेल तर त्यांच्याकरता - हि वाज द वन हु ब्रोक स्टेटस को ऑफ हिंदि सिनेमा; कश्यप वगैरे नंतर आले. त्याचे विचार इथल्या काहिंना झेपणार नाहित याची क्ल्पना असुनहि हि लिंक देतोय फॉर द बेनिफिट ऑफ फ्यु ओपन माइंडेड फोक्स.. एंजॉय...

थ्री ऑफ अस बघितला. अतिशय आवडला. एकदम तरल, सूक्ष्म भावना व्यक्त केल्या आहेत सगळ्यांनी अभिनयातून. शेफाली शाह आवडतेच. जयदीप अहलावतने कमालीचं काम केलंय. स्वानंद किरकिरे हा सुखद धक्का. बाकी संजय मोने, सुहिता थत्ते, शर्वरी लोहोकरे, नीना कुलकर्णी यांना छोट्या छोट्या भूमिकेत का होईना, बघायला छान वाटलं. कादंबरी कदमचंही काम मस्त.
कोकणाचं चित्रण अस्सल आहे. मला कोकण म्हणून उगाचच लालचुटुक कौलं, हिरवीगार झाडी, पांढरेशुभ्र चकचकीत कपडे वगैरे कृत्रिमपणे दाखवलेलं अजिबात आवडत नाही.

खूप दिवसांपासून बघायचा राहिलेला 'सोसायटी ऑफ द स्नो ' सिनेमा पाहिला. अप्रतिम घेतला आहे.

वर र. आ. नी उल्लेख केलेला ' रहस्य ' सिनेमा मागे पाहिला होता. तगडी स्टार कास्ट आहे पण मला प्रचंड बोअर झाला. आता तरी काहीतरी घडेल, ह्या आशेने बघत बसले आणि सिनेमा संपला.

शनिवारी 'आर्टिकल ३७०' पाहिला. उत्तम चित्रपट काढला आहे. सत्य घटनांवर आधारित असूनही कुठेही डॉक्युमेंटरी/ प्रीची वाटत नाही. आख्खे पंतप्रधान आणि गृहमंत्री असूनही सिनेमा स्त्रीपात्रप्रधान आहे. घटना दाखवताना अतिशय संयत पण रोखठोक घेतल्या आहेत. ते भावले. पटकथा मस्त बांधली आहे.

सर्व अभिनेत्यांनी उत्तम कामं केली आहेत. यामी गौतम गुणी आहेच. राजमणीने देखिल फार छान साथ दिली आहे. मेकअप आणि गेटअप एकदम परफेक्ट. रिअल लाईफ लोकांना साकारताना योग्य पात्रं निवडली आहेत. लकबी, देहबोली, कपडे या सर्वांतून ते छानच उभे राहतात. याबद्दल स्पेशल कौतुक.

फक्त एकच गोष्ट खटकली ती म्हणजे झाकीर नायकू या व्हिलनला उगाचच ग्लोरिफाय केलंय. मारामारीच्या प्रसंगी तो येताना स्लो मोशन, मागे म्युझिक, त्याने हाताने मारामारी करणे इ. मसाला गोष्टी टाळायला हव्या होत्या. अशाप्रकारे व्हिलन्सना romanticize करणं बंद केलं पाहिजे.

हॉल फुल्ल होता आणि योग्य जागी वेळोवेळी टाळ्या वगैरे वाजत होत्या.

Martian पाहिला hotstar वर
Mat डीमोन चा
मंगळावर गेलेल्या मिशन मध्ये एका आपत्कालीन परिस्थितीमध्ये एक अंतराळवीर तिथेच राहतो.
त्याची वाचण्याची धडपड आणि त्याला वाचवण्याची धडपड अशी स्टोरी असलेला चित्रपट.
आवडलाच.
जुना आहे, बऱ्याच जणांनी पाहिला असेल आधी.

'आता वेळ झाली' हा चित्रपट.
दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी आहेत.
इच्छामरण हा विषय आहे, आणि संयतपणे मांडलाय. म्हातारपणाचे बरेच नवीन ॲस्पेक्ट्स लक्षात आले, जाणवले. बघण्यासारखा आहे.

the outfit- नेटफ्लिक्स.

बऱ्याच दिवसात इतका झकास उत्कंठावर्धक, रोमांचक चित्रपट पाहिला नव्हता. नक्की बघा, ( चित्रपट नेटफ्लिक्सवर फार थोड्या दिवसांसाठी उपलब्ध आहे)

'आर्टिकल ३७०' पाहिला , खूप आवडला , यामी गौतमी नेहमीच आवडते (दस्वी , बाला वैगेरे .. ) , इथे सुद्धा खूप चांगला अभिनय केला आहे ..
दिग्दर्शन आणि कॅमेरा-वर्क पण खूप छान आहे.. सर्वच कलाकारांचे काम आवडले

मासा नावाची शॉर्ट फिल्म काल पाहीली. ज्योती सुभाष व अमृता सुभाष काय सुंदर काम केलेले आहे. अभिनेत्यांवर तोंडसुख घेणे सोपे आहे पण ते हुकमाचे ताबेदार असतात. दिग्दर्शक सांगेल तसं डिलीव्हर करणार. लाऊड अभिनय करा म्हटलं केला.
मासा मध्ये फार सटल काम आहे. संगीतही मस्त आहे. फिल्म फार आवडली.
https://www.youtube.com/watch?v=orayV2fpOmY

ड्यून २ बघितला. सिनेमॅटिक मास्टरपीस. खरेतर ड्यून कादंबरी पडद्यासाठी अवघड आहे. पाहिला सिनेमा किंचित धिमा होता, कारण पहिल्या पुस्तकातले सगळे मटेरियल कव्हर करायला दोन सिनेमे लागणार होते. पहिल्या सिनेमात पार्श्वभूमी तयार केली गेली. ह्या सिनेमात मिथक सुरू होते. ड्यून मालिकेची प्रमुख थीम आहे - संपूर्ण लोकसंख्येला पेटवू शकणारा नेता खूप हानिकारक ठरू शकतो. ही कल्पना विस्ताराने मांडण्यासाठी इस्लामशी समांतर असा काल्पनिक धर्म आणि त्या धर्माचा मसिहा पॉल अर्टेडीस उर्फ मु'आदीब आणि त्याच्या वंशजांची जीवनकथा ह्या मालिकेत येते. अतिशय थरारक सिनेमा. पहिला बघितला नसेल तर पहिला बघून मग हा आवर्जून बघणे सुद्धा वर्थ इट आहे हेमावैम.
आता ड्यून मसायाची वाट बघणे आले. (पुढचा भाग.)

Yes yes dune 2 is awesome. Watch it on imax only. I am a true dune fan . The action pieces are awesome. Acting terrific. Paul and chani look so good together.

शेवटी काल 12 th फेल बघितला. मस्त आहे! सगळ्या प्रकारचे लोक दाखवले आहेत.
एक शंका आहे, त्यात तो गौरी भैय्या जे म्हणतो, की आपल्यापैकी एक जरी यशस्वी झाला, तरी तो आपल्या सगळ्यांचा विजय असतो, हे खरोखर असतं का? अशी एकी म्हणा, बंधुभाव म्हणा, असतो का? असेल तर चांगलंच आहे. अर्थात जळणारेही असणारच. (माझा यूपीएससी/एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी कधीच काहीच संबंध आलेला नाही त्यामुळे मला माहिती नाही म्हणून हा प्रश्न पडला.)

https://youtu.be/-uK1DlPc-gE?si=POGaDFmP8ImtBH1-
दिग्दर्शक संजय गुप्ता यांची ही मुलाखत..
छान आहे..
चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे म्हणून या धाग्यावर देतोय..

Pages