चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुकट ओटीटीवरही नाही म्हणजे नाही.
>>>>

ओटीटीवर चित्रपट फुकट नसतात. आपण त्याचे पैसे भरले असतात. आणि त्याच पैशातून चित्रपटांचे हक्क त्यांनी खरेदी केलेले असतात. म्हणजे एखादा चित्रपट (उदाहरणार्थ Dunki) आपण बघू किंवा नाही तरी त्याचे पैसे आपण एका अर्थी मोजलेले असतातच. ते सुद्धा त्या लोकांसाठी ज्याना तो बघायचा आहे. म्हणजे ज्याना चित्रपट आवडला ते फायद्यात. आणि नाही आवडला किंवा नाही बघितला त्यांचा पैश्याचा लॉस Happy

लॉजिक चुकत असेल तर सांगा.
मी या विषयात फार कच्चा आहे.

गंमतच आहे! हेच लोक हास्यजत्रेत भारी वाटतात. ते मोटे- गोस्वामींचे खरे क्रेडीट असावे म्हणजे! Happy

हास्य जत्रा स्किट करणे वेगळी गोष्ट आणि चित्रपटात विनोदी अभिनय करणे वेगळी गोष्ट असते.
हे मराठीच नाही तर हिंदी कॉमेडी शो मधील लोकांबाबत सुद्धा या आधी अनुभव घेतला आहे.

ऋन्मेष, तुला काय म्हणायचं ते म्हण, काय समजायचं ते समज आणि कितीही शाहरुखचं प्रमोशन करायचं ते कर. पण आम्ही त्याचे चित्रपट ओटीटीवरही बघणं पसंत करत नाही. फुकटचा शब्दशः अर्थ न लावता फुकट= गाडीने न जावं लागता, तिकीटाचा खर्च न करावा लागता असा आहे.

हास्यजत्रेच्या लोकांनी काम केलेले पिक्चर पडद्यावर चालत नाहीत असं वाटतंय. त्यातल्या बर्‍याच जणांना हल्ली चान्स मिळतोय असं दिसतंय. पण सगळाच मसाला जमून यायला हवा.

चित्रपट हा आधी दिग्दर्शकाचा असतो. तो चांगला की वाईट हे पटकथेवर ठरते. त्यात अभिनय करणारे कलाकार त्यानंतर येतात. मग तो शाहरूख असो की हास्यजत्रा कलाकार. त्यामुळे अमुक तमुक अभिनेता बघून हा चित्रपट बघायचा किंवा बघायचा नाही हे ठरवू नये.

शुभरात्ते...

ओटीटीवर चित्रपट फुकट नसतात. आपण त्याचे पैसे भरले असतात. आणि त्याच पैशातून चित्रपटांचे हक्क त्यांनी खरेदी केलेले असतात. >> क्रांतीकारी माहिती आहे. या गोष्टी मायबोलीवर कुणालाही माहिती असण्याची शक्यता नाही. क्षमा असावी मागच्या प्रतिसादात आपणास नाही नाही ते बोललो. आपणाकडून पहिल्यांदाच अनेक गोष्टींचा खुलासा होत असतो. जसे कि चितपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. हे वाक्य आयुष्यात पहिल्यांदाच वाचले.

लॉजिक चुकत असेल तर सांगा.
मी या विषयात फार कच्चा आहे.
>>> अब बच्चे कि जान लोगे क्या ? लाजवताय तुम्ही ! मायबोलीने आपणास ओळखले नाही. हे म्हणजे साक्षात पं.भीमसेन जोशींनी श्रोत्यांना गाण्यात काही चुकत असेल तर सांगा, मी या विषयात फार कच्चा आहे असे म्हटल्यासारखे झाले...

या आधीच्या प्रतिसादात देखील प्रमाद घडला माझ्याकडून.
चित्रपट हा उद्योग आहे हे खरंच आहे. आता कार विकत घेतल्यावर कुणी तक्रार केली कि मी त्याला हेच सांगणार. वाहननिर्मिती एक उद्योग आहे. तुझी कार बनवणार्‍याने ती फायदा व्हावी म्हणून बनवली आहे..

काही जण तर बनियन चड्डीला लवकर भोकं पडतात म्हणून नावे ठेवत असतात. तिथे सुद्धा हे लॉजिक लागू होईल.
या एकाच प्रतिसादात सर्वच मायबोलीकरांकडून क्षमा मागतो. आपण माफ कराल ही अपेक्षा आहे.

मुद्दा कळत नसेल तर सोडून>>> माझा मुद्दा असा होता की पिक्चर आवडणे सापेक्ष असते काही लोकांना नसेल आवडला तर तो सगळ्यांना आवडला नाही असे म्हणणे बरोबर नाही. मला नाही आवडला असे स्पष्ट म्हटले तर मी काहीच म्हणणार नाही. तुला पटत नसेल तर जाऊ दे

>> त्यामुळे अमुक तमुक अभिनेता बघून हा चित्रपट बघायचा किंवा बघायचा नाही हे ठरवू नये.>> आम्ही शाहरुख असेल तर बघायचा नाही हे आधीच ठरवतो. स्टोरी गेली तेल लावत. तसेही चोप्रा, मल्होत्रा आणि राज आ म्णि राहुल पलिकडे बॉलिवूडची मजल जातेय कुठे!! Wink

डंकीचा डंका वाजवुन झाला असेल तर आता डन (म्हणायचं) का? Happy
>>>>

नाही इतक्यात नको
चित्रपट न आवडलेले प्रतिसाद धाग्यावर जेव्हा जास्त आणि हिरीरीने येतात तेव्हा चित्रपट आवडलेले लिहायचे टाळतात असे एका निरीक्षणं आहे. त्यामुळे काही काळ वाट बघूया Happy

मग मी कालपासून डंकी बद्दल काय सांगतोय! शाखा ठीकठाक आहे त्यातला पण पिक्चरच बंडल आहे त्याला तो काय करणार. Happy
>>>>>

हो, मला ज्याच्या त्याच्या मताचा आणि आवडीचा आदर आहे. पण मला तो खरेच इतका बंडल नाही वाटला. मी थिएटर मध्ये बघितल्या नंतर पुन्हा ओटीटी वर संपूर्ण पाहिला याचा अर्थ माझे मत प्रामाणिक आहे. अर्थात शाहरूख हिराणी जोडी बघून तयार झालेल्या अपेक्षांना खरा उतरला नाही हे देखील आहे.

या वर्षी मी जवान पठाण डांकी तिन्ही थिएटरला बघितले.
त्यापैकी पठाण पुन्हा ऑटीटी वर बघावासा वाटला नाही. बाकी दोन्ही पाहिले पुन्हा. जवान तर पुढे मागे पुन्हा बघेन.. धमाल होता. मजा थिएटरलाच होती. फुल्ल टाळ्या शिट्ट्या माहौला होता. शाहरूखने अजून एक असा पिक्चर करावा नक्की..

सामो Happy

पण आपण डंकायुगात आहोत याचा विसर पडुन कसे चालेल.

अस्मिता, डंकी बद्दल मस्त लिहिले आहेस. बोमन इराणी बद्दल १०० टक्के मला जे वाटतं ते लिहिलं आहेस. त्यामुळे मला तो कधीच कलाकार म्हणुन भावला नाही.
डंकीतला शारुक नॉर्मल दिसणारा, वागणारा असेल तर मलाही पहायला आवडला असता पण ते होणे नव्हतं.

डंकीचा डंका वाजवुन झाला असेल तर आता डन (म्हणायचं) का? Happy >>>>> आपण लाख म्हणू हो ….. ठरवणारे आपण कोण… ठरवणारा तो *एकची भक्त*

थांबवायची तर थांबवा डंकीची चर्चा.. माझी काही हरकत नाही.
पण ते जमवणे ईतके सोपे नाही.
लोकांना आवडते शाहरूखबद्दल आणि त्याच्या चित्रपटांबद्दल बोलायला..
पण चला मी थांबतो Happy

50 प्लस मेसेज आलेले बघून उत्साहाने धागा वाचतोय तर धागा
फिरून फिरून गंगावेशीतच येतोय ( कोपु व्हर्जन)
फिरून फिरून भोपळे चौकात ( पुणे व्हर्जन )

रहस्य म्हणून एक चित्रपट बर्‍याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसत होता. के के मेनन, टिस्का चोप्रा साठी पाहिला.
के के मेननचं जितकं कौतुक होतं तितका उच्च कोटीचा अभिनय वाटत नाही. सफाईदार काम करतो मात्र. मागे काही वेळा त्याचा अंडरप्ले प्रभावित करायचा. आता ते सवयीचं झालं आहे.
टिस्का अजूनही सुंदर दिसते आणि सुंदर काम करते.
इतर कलाकारात आशिष विद्यार्थी, मिता वसिष्ठ , अश्विनी काळसेकर असे कलाकार एकत्र घेतले कि दिग्दर्शकाला मी काहीतरी वेगळा आहे हे दाखवायची सुरसुरी येत असावी. अगदी आर्ट फिल्म प्रमाणे सुरूवातीचे कॅमेरा वर्क, संथ हालचाली बघून एखादा बंद करून टाकेल. नंतर क्लायमॅक्सला कलाटण्याच कलाटण्या. एक पे कायम रहो. तू विधू विनोद चोप्रा बनना चाहता है या अब्बास मस्तान ?

धक्केच द्यायचे तर अब्बास मस्तानने एव्हढे दिलेत कि आता जोर का धक्का धीरे से भी नही लगता. आणि प्रेक्षक आधीपासूनच अंदाज बांधून मोकळा झालेला असतो.
एंगेजिंग आहे पण क्लायमॅक्स कलाटण्यांच्या function at() { [native code] }इरेकाने फसला आहे.
क्राईम पॅट्रोलचा एखादा एपिसोड पोलीसी चातुर्यकथेची भूक भागवण्यासाठी पुरेसा आहे.

माझा मुद्दा असा होता की पिक्चर आवडणे सापेक्ष असते काही लोकांना नसेल आवडला तर तो सगळ्यांना आवडला नाही असे म्हणणे बरोबर नाही>> माझ्या पोस्ट मधे मी "किमान माझ्यापुरता" हे चित्रपटापुरते नि " बहुतांशी" हा शब्द प्रयोग शाहरुखकडून लोकांछ्या अपेक्षा ह्याबद्दल केलेले आहेत. दोन्ही पोस्ट्स वेगळ्या केल्या मुद्दामहून . (परत बहुतांशी हे मायबोलीपुरते हे ही सांगितले आहे) ह्यावरूनही तुला फरक कळत नसेल तर तुझा हिरानी मधला डंकी झालाय असे म्हणून शकतो रे फार तर Lol . असो

लाल भोपळ्याला वरून छिद्र पाडून आतला मालमसाला खरवडून काढावा आणि ते छिद्र मोठं करून त्यातून दुधी भोपळा आत खुपसावा. आता बाजूने छोटी छिद्रे पाडून त्यातून हवा तसा मीठमसाला आत टाकून लालभोपळ्याला बाहेरून वड्याचे बॅटर लावावे आणि तो उंच शिंकाळ्यात ठेवावा. शिंकाळ्याच्या खाली उदबत्ती लावावी आणि दुभोला शिजायची वाट पहावी.
जेवायला बोलावलेल्या पाहुण्यांना तोपर्यंत चिकवावर पोस्टी टाकायला सांगाव्यात.

Pages