Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जिमी किमेल चा मोनोलॉग फार
जिमी किमेल चा मोनोलॉग फार काही भारी वाटला नाही. केटी ब्रिट वरची एक कोपरखळी सोडली तर
आणि तात्याचा फीडबॅक
आणि तात्याचा फीडबॅक
त्याचे ट्विट ना? हो
त्याचे ट्विट ना? हो
पियू तुझा डायलॉग आवडला
पियू तुझा डायलॉग आवडला
फार पूर्वी ते कोसला पुस्तक आवडलं नाही, बोअर वाटलं तरी वाचून संपवलं होतं (कोसला प्रेमींनो माफ करा मला) आणि बाजीराव मस्तानीही बोअर झाला तरी बघून संपवला ते आठवलं एकदम.
तसं लहानपणी दूरदर्शन वर अनेक पिक्चर बोअर होऊनही असेच बघितलेत हेही आठवलं.
दूरदर्शन वर अनेक पिक्चर बोअर
दूरदर्शन वर अनेक पिक्चर बोअर होऊनही असेच बघितलेत >>> आता लक्षात आलं कि त्या पिढीकडे एव्हढी सहनशक्ती कुठून आली ?
आत्ताच्या जेन झी कि काय पिढीला पुन्हा रविवारचे सिनेमे पाहणे सक्तीचे केले पाहीजे आणि निवडणुकीचे निकाल व्हीव्हीपॅटवर मोजत चोवीस तास सिनेमे दाखवले पाहीजेत.
कशालाही तोंडं वेंगाडतात.
लागोपाठच्या रविवारी अन्नदाता, उसपार, अरविंद देसाई को गुस्सा क्यूं आता है आणि ज्वालाडाकू पाहिलेली पिढी अद्याप आहे.
झिल के उसपार का
झिल के उसपार का
तेव्हा पूर्ण एरियात एखाददुसरा tv असायचा, आम्हासारख्या पामरासाठी दरवाजे उघडे ठेवायचे बापडे ते, बघू द्यायचे हे उपकारच खूप होते, इंटर्व्हल झाल्यावर गपगुमान घरी बसायचं सोडून नंतर काहीतरी चांगलं मिस्ड झालं तर, या आशेवर परत जायचो बघायला आम्ही पोरं टोरे.
धीरज कुमार होता बहुतेक.
धीरज कुमारविमो , मौच होते त्यात. .मी लिहिलेला बहुतेक विनोद
मी लिहिलेला बहुतेक विनोद मेहरा, मौशमी वाला, पुसट आठवतंय, गुगल चेक करते.
नाही धर्मेंद्र मुमताज आहे.
तुम्ही आणि मी एकाच
तुम्ही आणि मी एकाच पिक्चरबद्दल बोलतोय, नाव तुम्ही लिहिलेलं बरोबर आहे, कलाकार मी आधी लिहिलेले बरोबर आहेत.
Sad end होता बहुतेक. मी ही बघितला आहे उसपार.
झिल के उसपार वेगळा तो धर्मेंद्र मुमताज वाला.
काल 'अमलताश' पाहिला. खूप
काल 'अमलताश' पाहिला. खूप आवडला. अनेक दिवसांनी इतका down to earth, सहजसुंदर सिनेमा पाहिला.
साधी सोपी कथा. तुमच्या आमच्या कोणाच्याही जीवनात घडू शकणारी. सहज हळूवार फुललेली. एकातून दुसरी घटना उलगडत जाते. उत्तम स्टोरीटेलिंग.
सर्वच पात्रं एकदम चपखल बसलीये. अकृत्रिम वावरतात आणि बोलतात. मानवी पात्रांसोबतच यात दुकान, घरं आणि परीसरही धरा. राहुल देशपांडे आणि त्याच्या बहिणीचं घर तर इतकं मस्त आहे! त्या छोट्या जागेला अफलातून व्यक्तिमत्त्व बहाल केलंय. ते घर, घरातले आणि बाहेरचे पण घराशी निगडीत असलेले लोकं यांचा एक सुरेख मेळ दिसतो.
राहुल देशपांडेंनी छान काम केलंय. पण पल्लवी परांजपेनं तर 'दिल छू लिया!' डिंपलचं काम केलेली त्रिशा कुंटेही सुरेख. इतर सर्वजणही एकदम चोख काम करतात.
मला शेवट जSSSरा खटकला. खटकला म्हणण्यापेक्षा बाकी थेट, सरळ असणार्या कथेत जरा abrupt वाटला.
>>सेतुपती पण बखवास वाटतो.
>>सेतुपती पण बखवास वाटतो.
१०० टक्के सहमत. त्याचा हिंदी मधला अभिनय अॅट मॅक्स अबोव अॅवरेज म्हणता येईल. त्याचे तामिळ सिनेमे मी पाहिले नाहीत. कदाचित भाषेमुळे अभिनयावर परिणाम होत असावा
लागोपाठच्या रविवारी अन्नदाता,
लागोपाठच्या रविवारी अन्नदाता, उसपार, अरविंद देसाई को गुस्सा क्यूं आता है आणि ज्वालाडाकू पाहिलेली पिढी अद्याप आहे. >>>>
अन्नदाता बरा होता बहुतेक
अन्नदाता बरा होता बहुतेक.त्यात ते ओ मेरी प्राण सजनी चंपावती आजा नावाचं विचित्र गाणं आहे ना?
तरी इथे कोणी इलेक्शन मतमोजणीत देवानंद चा बनारसी बाबू बघून स्वतःचा छळ करून घेतलेला दिसत नाही.
उस पार वगैरे लहान असताना
उस पार वगैरे लहान असताना पाहिले आहेत.
विनोद मेहरा - धीरज कुमार, लीना चंदावरकर - मौशुमी यांच्यात कन्फ्युजन असायचं. यातला फक्त ज्वाला डाकू आठवतो.
त्यात तो डोंगरमाथ्यावरून घोड्यावरून चाललेला असतो. मधेच दरी येते. समोरच्या डोंगरावरचं शिखर जास्त उंच असतं.
जोगिंदर सिंग ब्रेक मारून थांबलेला असतो.
तो घोड्याला शपथ घालतो "तुम्हे काली माता कि कसम"
घोडा ओळखतो असंही मरायचे आहे, तसेही.
तो उडून समोरच्या शिखरावर जातो. हे उड्डाण करताना सगळं चित्र काळं होतं. मधे मधे प्रकाश. त्यात घोडा स्लाईड हलवल्यासारखा वाकड्या तिकड्या लोकसचा पाथ घेतो.
पुढे लोकस समजून घेताना हा सीन कामी आला.
काल युट्युबवर चक्क HD कॉपी
काल युट्युबवर चक्क HD कॉपी मिळाली जवान चित्रपटाची...
अगदीच भारी नाही पण पठाणपेक्षा हा चित्रपट चांगला वाटला. जरा वेगळी स्टोरी आहे. पठाण अगोदर जर पाहिला नसता तर हा चित्रपट अजून जास्त आवडला असता असे वाटले. दोन्ही शाहरूखंनी चांगले काम केले आहे. बाकी कुणाला तितका स्कोप नाही. विजय सेतूपती व्हीलन ऐवजी कॉमेडीअन जास्त वाटतो. दिपिकाचा छोटा रोल आहे यामुळे चित्रपट जास्त बरा वाटतो. (पठाण हिच्यामुळे जास्त कंटाळवाणा वाटला). शाहरूखच्या टिममधल्या मुंलींपैकी काहींना चांगले फुटेज मिळाले आहे. नशीब की प्रत्येक मुलीचा फ्लॅशबॅक दाखवत बसले नाहीत ते.
कंटाळवाणे सीन पुढे ढकलत पाहिला त्यामुळे चित्रपट आवडला असे म्हणेन. सुरूवातीचा मेट्रो हायजॅकचा सिन चांगला वाटला. काही सिन्स खटकले ही.. उदा. ५ गोळ्या खाऊन, अतिशय उंचावरून विमानातून डोक्यावर पडून ही शाहरूख जिवंत रहातो. पण चालवून घेतले. इतर हिरोंचे आपण चालवून घेतोच मग शाहरूखचे का नाही? ओवरऑल एकदा बघणेबर चित्रपट वाटला. थेटरात पाहिला नाही याचाही आनंद या मागे होताच...
दूर दर्शन वर राती १० ला
दूर दर्शन वर राती १० ला सिनेमा असे. बातम्या, संसद समाचार वगैरे कसेबसे पाहून सिनेमा सुरु होणार तोच ..
'कुछ कारण वश हम आपको पूर्व निर्धारित फिल्म शोले नहीं दिखा सकते. आइये देखते है प्रधानमंत्री की नेपाळ यात्र पर फिल्म्स डिविजन की प्रस्तुती. मग प्रधानमंत्री नेपाळ ला जात, 'रंगारंग संस्कृतिक कार्य्क्रम' व मग त्यांच्या प्रधान मंत्री सोबत स्लॅम बूक वर सह्या.
दिपिकाचा छोटा रोल आहे यामुळे
दिपिकाचा छोटा रोल आहे यामुळे चित्रपट जास्त बरा वाटतो.
>>> हो योगी. त्यातही पाऊनवेळ डबडबलेल्या डोळ्यांनी मेकअप केलेल्या म्हारक्या म्हशीसारखी सेतुपती आणि त्याच्या पंटरांकडे बघत होती.
थेटरात पाहिला नाही याचाही आनंद या मागे होताच...>>>>
मामी , छान पोस्ट. 'अमलताश' कुठं बघितला. ट्रेलर आवडले होते. खूप रिअल वाटले, एखाद्या डॉक्युमेंटरी टाईप. पोस्टरही पेंटिंग सारखं चार्मिंग वाटलं.
आचार्य, धमाल पोस्टी.
"मेरी ख्रिसमस" वर उतारा
"मेरी ख्रिसमस" वर उतारा म्हणुन हा मल्याळम, हिंदि डब्ड "अन्वेशिप्पिन कंडेथम" (होप आयॅम सेइंग राइट) सिनेमा पाहिला. मस्त आहे, निराशा अजिबात करणार नाहि.. नेफिवर आहे...
अमलताश बघायचा आहे मलाही.
अमलताश बघायचा आहे मलाही. राहुल देशपांडे साठीच. इथे येईल वाटत नाही थिएटरला वगैरे.
आयपीटीव्ही वर चांगल्या क्वालिटीत आला तर.
डबडबलेल्या डोळ्यांनी मेकअप
डबडबलेल्या डोळ्यांनी मेकअप केलेल्या म्हारक्या म्हशीसारखी सेतुपती आणि त्याच्या पंटरांकडे बघत होती.>>> अर्रे यार! आता मला हा सीन शोधून दे, मला पहायचाय त्यासाठी मी नाय बघणार जवान ..
तो सीन ना, साधारण पिक्चर
तो सीन ना, साधारण पिक्चर पळवून 1 तास 19 मिनिट ते 1 तास 40 मिनिट या दरम्यान मिळेल (ऑफिस कामाचं सोडून बाकी गोष्टीत फोटोग्राफिक मेमरी)
पिंजर - अमृता प्रीतमच्या
पिंजर - अमृता प्रीतमच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली कथा चाणक्य फेम चंद्रप्रकाश व्दिवेदीनी पडद्यावर आणली. २००३ साली आलेला हा चित्रपट आत्ता का आठवला विचाराल तर काल सोशल मीडियावर दिवसभर सीएएच्या निमित्ताने फाळणी, तीत उद्ध्वस्त झालेली कुटुंबे अश्या चर्चा सुरु होत्या. एक पोस्ट नेहरू लियाकत कराराविषयी होती. त्यातलेच एक कलम होते - अपहृत/मागे राहिलेल्या स्त्रियांची सुटका व परत त्यांना त्यांच्या कुटुंबात नेऊन सोडणे. साधारण अशाच थीमवरचा हा चित्रपट शिंडलर्स लिस्ट किंवा सेविंग प्रायव्हेट रायनसारखा आहे. एकदा पाहिला की विसरता येत नाही. ही गोष्ट फाळणीचीही नाहीये खरं तर. फाळणीचा फक्त बॅकड्रॉप. तोही नंतर कधी तरी सुरु होतो.
काय आवडलं?
निर्विवादपणे कथेचा पहिला नंबर लागेल.
स्क्रिनप्ले - याविषयी मतमतांतरे आढळतील. पण मी आधी चित्रपट पाहिला व नंतर पुस्तक वाचले. तेव्हा जाणवले कि कथाच इतकी चित्रदर्शी आहे कि फार काही करावे लागले नसते.
संगीत: गुलझार यांची गीते व उत्तम सिंग यांचे अस्सल पंजाबी संगीत. मला विशेष आवडले ते वडाळी बंधूंचे ‘दर्दा मारेया’, जगजीत सिंह यांनी गायलेले 'हाथ छुटे भी तो' आणि 'वतना वे'
कलाकार - पुरोच्या मुख्य भूमिकेत ऊर्मिला मातोंडकरने कमाल केली आहे. इतर चित्रपटात ती मला लाऊड वाटते. पॅट्रिआर्कीकल पंजाबी बाप कुलभूषण खरबंदा, नेहमी काहीश्या ग्लॅमरस अवतारात पाहिलेल्या लिलेट दुबेची ट्रॅडिशनल आई, संजय सुरीचा शांत संयत अभिनय, छोटाश्याच भूमिकाही आपल्या अभिनयाने रंगवणाऱ्या दिना पाठक, सुधा शिवपुरी, फरीदा जलाल, सीमा विश्वास, प्रियांशु चॅटर्जीचा रागीट आणि बहिणीच्या काळजीत विमनस्क झालेला भाऊ हे सगळेच या चित्रपटाची जमेची बाजू आहेत.
पण सगळ्यांच्या मांदियाळीत लक्षात राहतो तो मनोज बाजपेयी. पुरोचा पाठलाग करणारी त्याची नजर, ती आजारी पडल्यावर हवालदिल झालेला रशिद, कापणीला आलेले उभे पीक पुरोचा भाऊ जाळून टाकतो तेव्हाचा, लाजो आणि पुरो बोलत असताना कानोसा घेत तिला आपल्याविषयी काय वाटतेय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणारा रशिद आणि शेवटी ती भारतात जातेय म्हणून कोसळलेला रशिद मनोज वाजपेयी डोळ्यातून दाखवतो.
सेट आणि वेशभूषा - पंजाबी दाखवण्याच्या नादात सगळेच चकचकीत करण्याचा मोह कटाक्षाने टाळला आहे.
काय आवडले नाही -
काही उपकथानकं छाटून चित्रपट अजून छोटा करता आला असता.
दोष म्हणता येणार नाही पण येता जाता कधीही बघण्यासारखा चित्रपट नाही. मूड आधीच खराब असेल तर अज्जीबात बघू नका.
पाहिलाय पिंजर.आता फार कथा
पाहिलाय पिंजर.आता फार कथा आठवत नाही.पण उर्मिला, संदाली सिन्हा आणि मनोज वाजपेयी आणि इतर सर्वांचीच कामं चांगली झाली होती.
अशी झालेली सर्व लग्ने रद्द करून घर वापसी व्हायची, की मुलीला जर लग्नात राहायचे असेल तर राहू दिले जायचे?
MazeMan पिंजरचे परीक्षण
MazeMan पिंजरचे परीक्षण आवडले. मी आधी कथा वाचलेली आणि नंतर सिनेमा पाहिलेला. फार क्वचित वेळा पुस्तकावर बेतलेला सिनेमा आवडतो, हा माझ्यासाठी असाच एक सिनेमा आहे जो कथेला न्याय देतो असं वाटलं. अमृता प्रीतमच्या सिद्धहस्त लेखणीची कमाल वाटते, पिंजर ही अतिशय चित्रदर्शी कथा चुकवू नये अशीच आहे.
सेतुपती आणि थलपती यात माझा
सेतुपती आणि थलपती यात माझा गोंधळ होतो, फर्जीमधे कोण आहे. तो एखाद दुसरा सीन वगळता फार नाही आवडला, त्याच्या हाताखालचा अभिनयात त्याला मात देतो असं वाटलं, अजूनही आठवला तर त्याचं स्मोकींग आणि ड्रीकींगच आठवतं जास्त. आता सेकंड सीझन आल्यावर (कधी येणार माहीती नाही) आवडला अभिनय तर जरुर सांगेन.
बाय द वे लहानपणापासून दुरदर्शनवर आधीचं छायागीत, दाखवतील ते मराठी, गुजराथी, साउथ सर्व पिक्चर्स बघितले दुसरीकडे जाऊन. घरी टीव्ही आल्यावर वेळ मिळेल तेव्हा मनोभावे सगळं बघितलं, आमच्याघरीही मुक्त प्रवेश होता सर्वांना, अगदी रात्री ओल्ड फॉक्स बघायलाही यायचे, जबरी होती मालिका, भाषा काही समजत नव्हती. बालचित्रवाणी, किलबिल, संताकुकडी (आई गुजराथची असल्याने). मागे बिल्वानेच (मे बी मी चुकत नसेन) कुठेतरी लिहीलेलं ना की आम्ही ताटात पडेल ते खायचो आणि दुरदर्शन दाखवेल ते बघायचो अशा आशयाचं, अगदी डीट्टो.
फर्जीमधे आहे तो सेतुपती.
फर्जीमधे आहे तो सेतुपती.
साईडने चेहरा पाहिला कि थ अक्षर दिसते तो थलपती.
आता बहुतेक येणाऱ्या नव्या विजयला उचापती म्हणतील.
Raghu aacharya pratisaad
Raghu aacharya pratisaad liked
अशी झालेली सर्व लग्ने रद्द
अशी झालेली सर्व लग्ने रद्द करून घर वापसी व्हायची, की मुलीला जर लग्नात राहायचे असेल तर राहू दिले जायचे?
>>>
सरसकट लग्ने व्हॉइड केली नव्हती. मुलीची इच्छा असेल तर राहू द्यायचे. अर्थात अशा जबरदस्तीच्या लग्नाचा डेटा त्याकाळी मिळणे अशक्यच होते.
सरकारी आवाहने, काही गुड समारिटन्सची मदत मिळवत जी मुलगी कॅम्पमध्ये पोहोचली ती परत येऊ शकायची. अर्थात किती मुलींना आपण आपल्या देशात परत जाऊ शकतो याची माहिती मिळाली असेल/किती जणींना आपल्याला आपली फॅमिली ऍक्सेप्ट करेल याबद्दल खात्री असेल/ज्यांनी अपहरण केले आहे ते मुलींना सहजी सोडतील याबद्दल साशंकता आहे. पण सरकारी पातळीवर फार उशिरा का होईना प्रयत्न केले गेले होते.
अधिक काही बोलणे म्हणजे या धाग्यावर राजकारणाचा नेहमीचा वितंडवाद सुरु होईल.
हो जाऊच दे विषय.धाग्याचे
हो जाऊच दे विषय.धाग्याचे कात्रज होईल(पुलं फ्रॉम चौकोनी कुटुंब)
र आ मस्त च
र आ मस्त च
Pages