अंदाज किती घ्यावा?

Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51

बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतकं पूरे होईल >> धन्यवाद म्हाळसा!
सामोसे पर पर्सन किती घेणार. कमी आहेत. ट्रे किती साइज >> १ सामोसा पर पर्सन. फुल ट्रे २० ३/४" X १२ ३/४" चा असतो. ढोकळे प्रत्येकी ४ पाउंड देणार आहे
लोक ७५ आणि सामोसे ७० ? बहुत नाईन्साफी है... ;-);-);-) >> ७५ सामोसे ऑर्डर केले आहेत. ७० घाई घाई ने Type झालं
व्हाइट ढोकळा आणि खमण एकाच बिरादरीतले आहेत. >> दुसरा अजून काय करता येईल. इडली चा विचार केला होता पण कॅन्सल केल्या
इतका भारी मेनू असलेल्या ठिकाणी आपल्याला जाता येईल का - ह्याचा 'अंदाज कसा घ्यावा'? >> हरचंद पालव & अश्विनी११ मायबोलीकर are always welcome !

समोसे मे बी कापुन अर्धे करुन ठेवा. तुमच्याकडचं माहित नाही पण इकडे पंजाबी समोसा अशक्य मोठा असतो आणि एकाच समोश्यात निम्मं पोट भरुन जातं.
रंपा नाही का? Wink

समोसे मे बी कापुन अर्धे करुन ठेवा. ">> अगदी अगदी , तुम्ही म्हणताय 70 पुरणार नाहीत पण मोठा असेल तर प्रत्येकी एक नाही संपणार.

आमच्याकडे साबुदाणा वड्याच ही हेच होतं, प्लेट मध्ये रक देता येत नाही, अर्धे करून ठेवता येत नाहीत. बाकीचे पदार्थ ही असतील तर प्रत्येक जण एक वडा बाजूला काढून ठेवतो. निम्मे वडे आपल्या गळ्यात पडतात. नंतर ते विकतचे चेंडू च्या साईजचे वडे घरी ही कोणी खायला मागत नाही. त्यामुळे मी बरेच वेळा हल्ली साखि च आणते वडे न आणता. पोर्शन देणं सोपं पडतं. पुन्हा लागली तर थोडीशी वाढता ही येते. बाकीचे पदार्थ असतील तर तीन प्लेट चार पाच जणांना मस्त पुरते. आणि फार उरत ही नाही.

हे असलं कोब्रा ना बरोबर सुचतं ( हलके घ्या )

हे असलं कोब्रा ना बरोबर सुचतं ( हलके घ्या )>>> हलके कशाला घ्या ?? फॅक्ट आहेत हे फक्त त्यानाच सुचत.
वरचा मेनु देशस्थाना शोभेल असा आहे, उरल तरी चालेल (आलेल्या पाहुण्याना बरोबर देतिल) पण कमी पडायला नको हा एकच विचारच त्याच्या डोक्यात पहिले असतो.

खमण किंवा ढोकळा एकच ठेवा. खुप होईल नाहीतर.>> हो, माझा पूर्वीचा अनुभव आहे की लोकं मंचुरिअनवर तुटून पडतात.. एखादा ढोकळ्याचा ट्रे कमी करून मंचुरिअन वाढवलं तरी चालेल

उरल तरी चालेल (आलेल्या पाहुण्याना बरोबर देतिल) पण कमी पडायला नको हा एकच विचारच त्याच्या डोक्यात पहिले असतो.>>>
मी तर दुसऱ्या दिवशी किचनमध्ये घुसायला नको हाच विचार करून जरा जास्तच स्वयंपाक करते. Wink

बाकी सगळ्यांना अनुमोदन. ढोकळा आणि खमण दोन्हींतील एकच काहीतरी ठेवा.

दुसरा अजून काय करता येईल>> खमण ठेऊन जोडी ला समोसा तर आहेच. अगदिच हवे असल्यास शेव पुरी सोपा पदार्थ असतोय, सर्व फक्त ऐन वेळी करायचा.
किंवा फ्रूट चाट.

दुसरा अजून काय करता येईल >> या मेनु मधे सगळे ड्राय पदार्थ आहेत. मन्चुरिअन ग्रेव्ही वाले असणार आहे का ?
नसेल तर फ्राईड राईस सोबत जाइल असे काही ठेवता येतंय का बघा... पनीर्/व्हेजीज इन स्वीट सोअर ग्रेव्ही वगैरे.

11 लोकांच्या पावभाजी साठी खालील गोष्टींचे प्रमाण किती लागेल ?
Aloo
Simla mirch
Couliflower
Beans
Tomato puree
Onion
Ginger
Garlic
Amul butter
Amul pav bhaji masala

रिया मला वाटते
बटाटा अर्धा किलो
फोडणीला कांदा अर्धा किलो
वरुन घालायला पाव किलो
टोमॅटो अर्धा किलो
फ्लॉवर अर्धा किलो
सिमला मिरची पाव किलो
बीन्स पाव किलो
आले 100 grm
लसुण 150 grm
Amul बटर chi 100 grm chi 3 पाकिटे
1 फोडणीला 1 वरुण घालायला 1 पाव भाजायला
पावभाजी मसाला अर्ध पाकीट लागेल म्हणजे 30 grm

रिया ,
https://www.maayboli.com/node/72251 हे प्रमाण ९० लोकांसाठी पकड . ( मी सिरिअर सिटीझन पकडून १०० लोकांसाठी पकडते , आतापर्यन्त य वेळा यशश्वी झालीय . ) त्या हिशोबात कमी जास्त कर .

दोन किलो मटकी, दोन किलो फरसाण, अर्धा किलो बारीक शेव, दोन किलो कांदे बारीक चिरून, ५-६ लिंबे, १० पाव लादी, ३ लिटर दुधाचे दही लावून मठ्ठा

नमस्कार .. मला ५० माणसांसाठी मिसळ बनवायची आहे . सर्व भारतीय आहेत पण कमी जास्त तिखट खाणारे .. म्हणून मध्यम तिखट रस्सा आणि अती तिखट तर्री बनवेन. कृपया प्रमाण ठरवण्यासाठी मदत करा.. त्याआधी अपेटायझर म्हणून चिकन पोपर्स , कांदा भजी , चिप्स आणि boiled अंडी असतील..

हाय
70 ते 80 प्लेट पापु बनवायची आहे. एक प्लेटमध्ये 6 पुऱ्या.20 ते 30 प्लेट चुरा पुरी म्हणजे फुटल्या काही पुऱ्या तर त्या ही ऍडजस्ट होऊन जातील. तर चिंचगुळाच्या चटणीसाठी अंदाज हवा आहे. एक किलो चिंच , एक किलो गूळ, अर्धा किलो खजूर हे प्रमाण योग्य राहील का? जेवढी चटणी होईल ती पुरेल का? मी घरात नॉर्मली करताना एक वाटी चिंच, एक वाटी गूळ, अर्धी वाटी खजूर हे प्रमाण घेते. खाणारे मेम्बर्स एक प्लेट भरून दिली तर वरून गोड पाणी /तिखट पाणी घाला अशी फर्माईश करू शकतात.

१ किलो चणाडाळ त्यात अर्धा किलो गुळ आणी अर्धा किलो साखर अस प्रमाण असेल तर नेहमिच्या पोळी साइझ ने साधारण ३२ फुलका साइझ ने ३८ पुरण पोळ्या होतिल.
माझ्या २ कप मेजरिन्ग कपाच्या मापाने साधारण १८ पोळ्या झाल्या.

नाही प्रिसाइझ नाहिये ...साधारण ३२ किवा ३८..खरतर पुरण किती ठासुन भरता यावरच पोळ्या किती होतील हे ठरत...बार्क्या गुजराथी स्टाइल केल्या तर ४० पण होतिल...देशस्थी स्टाइल केल्यास ३०-३५ होतिल मधे पुरणाच्या आरत्या,नैवेद्याच्या पानावर सुपारी एवढे ठेवायचे,५ खिरित एक पुरणाची खिर वैगरे१० भानगडी. ...कोकणस्थी स्टाइलने केल्यास तर...नाही नाही नो वरी त्याच्याकडे एवढे घोळच नसतात...सठीसहामासी वाटिभराच पुरण केल तरी पुरे...एक किलो??

बाप रे! अजूऽऽऽन हे असे जातीपातीवरून विनोद करतात देशस्थांच्यात? कठीण आहे!

च म्मत ग आहे हो! याच माय्बोलिवर कोकणस्थानी देशस्थाना य वेळा नाव ठेवली आहेत...गणपती आले की आख्खा सोमी मोदक उकडीचे की तळणिचे यावर भरुन जातो...टेक इट लाईटली.

Pages