अंदाज किती घ्यावा?

Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51

बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाढत्या मापाचा रोग (हो. बरोबर) मलापण आहे. ४ लोकं + आम्ही २ असे ६ लोकांना मिळून १ किलो बिरीयानी + २ किलो पाभा वर काही स्वीट. त्यात तो बिरीयानी वाला १ किलो तांदुळाची बिरीयानी करतो हे ज्ञान पातेलं घरी आल्यावर समजलं. मग काय? बोलावलं समस्त सिक्युरीटीच्या लोकांना हाऊसकिपिंगच्या लोकांना... बबौ, तरीही दुसर्‍या दिशी आम्ही ती दुपारच्या जेवणात खाल्ली!

वाढत्या मापाचा रोग (हो. बरोबर) मलापण आहे. ४ लोकं + आम्ही २ असे ६ लोकांना मिळून १ किलो बिरीयानी + २ किलो पाभा वर काही स्वीट. त्यात तो बिरीयानी वाला १ किलो तांदुळाची बिरीयानी करतो हे ज्ञान पातेलं घरी आल्यावर समजलं. मग काय? बोलावलं समस्त सिक्युरीटीच्या लोकांना हाऊसकिपिंगच्या लोकांना... बबौ, तरीही दुसर्‍या दिशी आम्ही ती दुपारच्या जेवणात खाल्ली!

मला इकडे कुलकर्णी pattern आढळून आला आहे>> समस्त कुलकर्णी" कमी पडल तर ??" या सिन्ड्रोमने ग्रासलेले असतात शिवाय मेनु सुटसुटित करण त्याच्या मनाला आतुन पटलेल नसत त्यामुळे कुणी कितीही छान हिशोब केला तरी वाढिव करणे काही सुटत नाही.

मला इकडे कुलकर्णी pattern आढळून आला आहे >>> Lol माझी एक कुलकर्णी मैत्रीण खरंच अशी आहे. पण हा कुलकर्णी पॅटर्न आहे हे ठाऊक नव्हतं.

काही वर्षांपूर्वी योकुंनी दिलेल्या मापानुसार मी शिरा केला होता. सगळ्यांना देऊन परत आणखी डबे भरून दिला. अक्षरशः खपवला. वाईट इतकेच वाटलं की त्यात आंब्याचा रसही घातला होता,त्यामुळे विनाकारण वाया गेला.ठीक आहे कमी पडला नाही हे समाधान.
मलाही कमी पडता नये म्हणून जास्त करायची सवय आहेच.

एक प्रतिसाद पुरला नाही तर म्हणून योकु प्रतिसाद पण दोन दोन देतायत....... Lol

मलाही आहे हा 'कमी पडलं तर?' सिंड्रोम
विशेषतः पाहुणे आल्यावर.
वाढीव स्वयंपाक माझ्यामुळे होतो आणि मग मला "गिळ आता राहिलेलं सगळं" अशी शिक्षा मिळते.

आम्ही पण त्यातलेच... अंदाज परफेक्ट व्हावा असच वाटत खर तर पण नसेलच होणार परफेक्ट तर कमी पडल तरी चालेल थोडं पण फार उराउरी नको.
बाहेर फूड ऑर्डर केलं तर वरण रस्सा भाजी वगैरे इतकं देतात की काय करायचं प्रश्न पडतो.

मी कुठूनही कुलकर्णी नसून पण दोन्ही कॅटेगरी मधली आहे. कमी पडायला नको पण उरायलाही नको. मग स्वयंपाक करणारा वैतागतो.
आज काल आम्ही कमी पडायला नको पण २ दिवस लोळत राहिला नको वर सेटल झालोय. आम्हाला दुसऱ्यांना डब्बे भरून द्यायची आणि त्यांनाही दोन वेळेला पुरलं पाहिजे इतकं द्यायची सवय आहे.
परवा गणपती बसले त्या दिवशी १२ जणांसाठी ४० मोदक केले पण संपले नीटच.

मी सासरची कुलकर्णी...आमच्याकडे पण कायम गुडघ्याच्या मापात स्वयंपाक..कमी पडलं तर हा कधीच बरा न होणारा syndrome आहे Happy

आई कुलकर्णी नव्हती, लागू आडनांव तरी इतकं करणं की बास रे बास आणि तिच्या आग्रहाने वाढण्याची आठवण आमचे सर्व नातेवाईक अजूनही काढतात, स्पेशल बडोदा आग्रह म्हणायचो आम्ही. आता तिच्याशिवाय काही करायला घेतो आम्ही बहीणी तर पुरुन उरेल असं बघतो पण अति आग्रहाने वाढणे आम्हाला नाही जमत.

आम्ही पाटील, अन पाटलांच्या घरी अचानक जरी कोणी आले तरी भरपेट जेवायला हवेच, हाच नियम आहे त्यामुळे नेहमीच जास्तीचे जेवण केले जाते.
इकडे आपण उरलेले दुसऱ्या दिवशी खातो पण गावी सरळ गॅसात किंवा जनावरांना टाकले जाते.

एकदा असेच रात्री बारा वाजता गावावरून ७-८ जण आले, आम्हाला फक्त दोन जण येणार हेच माहिती होते, तरी मम्मी ने जास्तीचा स्वयंपाक केला होता. फक्त भाताचा कुकर लावावा लागला बाकीचे पुरले, इतके जास्तीचे जेवण बनायचे, त्यामानाने हल्ली जेवण कमी म्हणजे मापात बनते

आम्ही पाटील, अन पाटलांच्या घरी अचानक जरी कोणी आले तरी भरपेट जेवायला हवेच, हाच नियम आहे >>> +१ सेम हियर.
कधी कधी येणार्या पाहुण्याचं नातं इतकं लांभण असतं की कोणाचा कोण सांगता दुपार होईल, पण तो शिरा पुरी चापून ढेकर देऊन जाईल. Happy

Lol खरं आहे.
माझ्या साबा पण कमी पडलं तर, या भीतीनेच वाढीव प्रमाण घेतात. कारण वेळीअवेळी जेवायला आलेल्यांची सोय झाली पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा. सासरच्या नातेवाईकांचा गोतावळाही मोठा असल्याने, सण- समारंभाच्या वेळी अंदाज घेताना पण जरा जास्तच व्हायचं. मला तर नवीन असताना खूप नवल वाटायचं आणि नंतर अन्न वाया जाताना बघून वाईट पण वाटायचं. मग हळूहळू त्यामागील कारणं कळत गेली. कधीतरी त्यांचं म्हणणं खरं पण व्हायचं.
आणि आता असं झालंय की, दोघींनाही एकमेकींचे गुण लागलेत. कधी माझा अंदाज जास्त होतो आणि कधी त्यांच्या अंदाजाने कमी पडतं.

कमी कुठे? प्रत्येकाला तीन आले की!>>>> आवड व साईज सापेक्ष
फार पूर्वी आमच्या सोसायटीत गणपती बसवायचो लहान मोठे मिळून ,४०-४५ लोकल्स असायचो. एक कुळकर्णीबाई बेसनाचेच लाडूच दरवर्षीच आणायच्याच व दरवर्षीच उरायचेच..माणसं मोजून वर दोन लाडू अशी लाडवांची संख्या! मला त्यांच्याकडून कंच्या (गोट्या) एवढे लाडू कसे वळायचे शिकायचच राहिलच Happy

लंपनच्या पुस्तकात एक वाक्य आहे 'संप्याच्या आईने दिलेला लाडू खेळायच्या गोटीपेक्षा नक्की मोठा होता आणि गोटीपेक्षा मऊही होता!' तसं होतं का कुळकर्णीबाईंचं?

Pages