Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51
बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किन्वा खिचडी जरा भगरीसारखी
किन्वा खिचडी जरा भगरीसारखी लागते, साबुदाणा खिचडीसारखी नाही लागत.
२ आमटीच्या वाट्या साबुदाणा, १ वाटी कूट आणि १ मध्यम बटाटा एवढ्या सामानाची खिचडी ३ जणांसाठी पुरते. इतर काही पदार्थ नसताना.
साबुदाण्याऐवजी किनवा वापरणे
साबुदाण्याऐवजी किनवा वापरणे म्हणजे प्रॉजेक्टचे बजेट पाचपट वाढणे.
सर्वांना धन्यवाद!
४ जणांत साधारण अडीच वाट्या
४ जणांत साधारण अडीच वाट्या साबुदाणा आणि एक मध्यम बटाटा पुरतो. तेव्हा आठ माणसांना त्याच्या दुप्पट.
अर्थात, हे एकारान्त घरातलं प्रमाण. तुमचं आडनाव दुसर्या कुठल्याही स्वराने संपत असेल तर याच्या तिप्पट/चौपटसुद्धा जिन्नस घ्या आणि उरलेलं धडाधड फेकून द्या. हाकानाका!- स्वाती भिडे आंबोळे
(No subject)
अगगोबाई फेकायचे कशाला
अगगोबाई फेकायचे कशाला
उरले तर साबुवडे करायचे उद्या
Submitted by स्वाती_आंबोळे on
Submitted by स्वाती_आंबोळे on 9 September, 2021 - 20:24
अरे काय... मूळ पदावर आणायचा
अरे काय... मूळ पदावर आणायचा तर अजूनच गंमत-जंमत सुरू करता... ३.५ ते ५ वाट्या रेंज झाली. म्हणू नये पण मंडळी खादाड आहेत नि फारशी आरोग्यपूर्ण इ विचार करणारी नाही. बिना सा.खि काय करायचं दिर्घायुष्याचं.... ४-४.५ वाट्या टाकते. बघू, भिजल्यावर नजरेला अंदाज येईल...
बरं माझेही दोन आणे-
अमका-ढमका बॅक्टेरिया वाढतो म्हणून उरलेला साबुदाणा खात नाही. खळ करायची - कालपर्यंत यश चोप्राच्या सिनेमात शोभेलसा दुपट्टा एकदम थलैवी मध्ये कास्ट करता येईल इतका कडक होतो....
थालिपीठं लावायची मस्त खिचडी
थालिपीठं लावायची मस्त खिचडी हा फारच मूडी प्रकार आहे.
तिकडे समर बीमर चालू आहे तर पीठ उरलंच तर मस्त उपवासाच्या चकल्या घालता येतील गच्चीवर
दुपट्टा जास्त कडक झाल्यामुळे
दुपट्टा जास्त कडक झाल्यामुळे फाटला तर धुवून त्याच्या पिशव्या करा. त्याही फाटल्या की हातपुसणी, मग पायपुसणी.(आता वेमा/अॅडमिन यायच्या आत मी पळावं हे बरं. )
स्वाती ......
स्वाती ......
मग पायपुसणीच्या वाती करून
मग पायपुसणीच्या वाती करून रॉकेलच्या दिव्यात लावायची
मग त्यांची राख भांडी घासायला
अंदाज किती पेक्षा अंदाज अपना
अंदाज किती पेक्षा अंदाज अपना अपना चालू झालयं
अंदाज किती पेक्षा अंदाज अपना
अंदाज किती पेक्षा अंदाज अपना अपना चालू झालयं>>.
आज परत ज्वारीच्या कण्या
आज परत ज्वारीच्या कण्या केल्या,
पण आज कुकरात केल्या, पाणि दीड ग्लास घातले होते, पण कधीतरी ते संपले, एकहि शिट्टी झाली नाहि. म्हणून आत उघ्डुन पाहिले तर सगळे पाणि खलास झाले होते,
कण्या नीट शिजल्या आहेत , पण थोडे खालि करपले आहे, पण चव मात्र अगदी मस्त आलि आहे.
किति पाणि घालतात ? खालि स्टॅण्ड ठेवले नव्हते , मग एकावर एक डबे ठेवले तर चालते का ? कि पाणि कमी पडले ?
कामवाल्या, भिकारणी नासलेल्ं
कामवाल्या, भिकारणी नासलेल्ं दूध नेणार नाहीत कारण त्याचं काय करायचं हे त्यांना माहित नाही. कारण त्यांच्या घरात दूध उरून ते नासलं अशी परस्थिती कधी आलेली नसते.
<<
"डोमेस्टीक हेल्प" चे सल्ले ऐकण्याबद्दल एक शंका.
गेली ३०-३५ वर्षे स्वयंपाकाला घरी येणार्या व इतरही बर्याच उच्चभ्रू घरी स्वयंपाक करणार्या मावशींनी स्वयंपाकाबद्दल दिलेला सल्ला ग्राह्य धरावा की "डोमेस्टीक हेल्प चा सल्ला" या सदरात मोडावा? मावशींची फ्यामिलि व फ्यामिली हिस्टरी आजकाल सुखवस्तू म्हणता येईल याइतपत आहे. पण जुनं घर म्हणून अजूनही येतात.
आपल्या पोथ्यापुराणांत उपासाला
आपल्या पोथ्यापुराणांत उपासाला किनवा चालत नाही , असं लिहिलेलं नसल्याने उपासालाही चालेल.
साबुदाणा चालत नाही हेही पोथ्या पुराणांत लिहिलेला नसल्यामुळेच तो चालतो.
<<
यक्झॅक्टली.
जिथे कुठे उपवासाच्या पदार्थांची यादी साम्गितली असेल तिथे काय खाऊ "नये" अशी यादी असणार आणि बहुतेक सर्व स्टेपल फूड्स नको. फळं अन दूध चालेल इतपत सूचना असणारेत.
दक्षिण भारतीय लोकांना 'फास्ट' के लिये 'रोटी' चल्ता है असे ज्ञान माझ्या लहानपणी मिळालेले होते. पुन्हा लॉजिक तेच. मुख्यत्वे तांदूळ खाणार्या लोकांनी कधीकाळी चुकून मिळणारा गहू उपवासाला खाता येईल अशी सूट घेतली असावी.
बटाटा , हिरवी मिरची ,
बटाटा , हिरवी मिरची , साबुदाणा हे सगळेच पदार्थ परदेशी आहेत, ह्यांचा भारतीय इतिहास 300,400 वर्षांपेक्षा जास्त नाही
उपवासासाठी पवित्र कसे आणि कधी झाले ?
३०० वर्षांपुर्वी समोशात काय
३०० वर्षांपुर्वी समोशात काय घालत आणि सोबत काय तळुन खात?
कोबी घालत असावेत. व्हेज
कोबी घालत असावेत. व्हेज समोसा म्हणतात तो.
बटाटे वाला पंजाबी समोसा. सोबत पुदिन्याची, आले चिंच घालुन केलेली चटणी. छान लागते.
पुण्यात पोहे घालतात, आणि वरुन
पुण्यात पोहे घालतात, आणि वरुन आमटी घेतात.
300 वर्षापूर्वी मटण खीमा घालत
300 वर्षापूर्वी मटण खीमा घालत असतील.
दक्षिण भारतीय लोकांना 'फास्ट'
दक्षिण भारतीय लोकांना 'फास्ट' के लिये 'रोटी' चल्ता है असे ज्ञान माझ्या लहानपणी मिळालेले होते. >>>उपवासाचे नियम भयकर मजेशिर प्रकार आहे जस काही ठिकाणी काही उपवासाला (उपवास भाजणि नाहि नेहमिच्या थालिपिठाची)भाजणिचे थालिपिठही चालते, ३ पिठाच्या दशम्या आणी भोपळा भाजी नवरात्रीच्या उपवासाला चालते, शकराच्या उपवासाला भगर खात नाहीत तिथे साबुदाणाच लागतो, माझ्या जावेच्या माहेरी कोथिबिर उपवासाला चालत नाही म्हणजे एकच फायबर वाला पदार्थ तोही चालत नाहि.
सगळ्यात मजा म्हणजे शेंगदाणा
सगळ्यात मजा म्हणजे शेंगदाणा चालतो.पण शेंगदाणा तेल चालत नाही.
300 वर्षापूर्वी मटण खीमा घालत
300 वर्षापूर्वी मटण खीमा घालत असतील.
नवीन Submitted by mrunali.samad on 12 September, 2021 - 09:42
<<
अॅक्चुअली ती सामोश्यांची ओरिजिनल रेसिपी आहे.
येस देवकी, ही एक मजाच आहे.
येस देवकी, ही एक मजाच आहे.
नात्यात एकजण मंगळवारी उपवास करतात. म्हणजे दिवसभर काहीही खाल्ले तरी चालते पण रात्री फक्त दही पोहे खायचे. अगदी सहा वाजता समोसा खातील, पण डिनरला दहीपोहे खाल्ले की झाला उपवास.
दहा जणांना जेवणासोबत जिलबी
दहा जणांना जेवणासोबत जिलबी घरी करायची आहे. जिलबीला किती मैदा आणि दही लागेल?
अर्धा किलो मैदा , दही पाव
अर्धा किलो मैदा , दही पाव किलो लागेल साधारण 30 जिलबी ना
लहान मुलाच्या वाढदिवसासाठी
लहान मुलाच्या वाढदिवसासाठी मेनू ठरवलेला आहे. मिक्स व्हेज बर्गर आणि फ्रेंच फ्राईज ,२० मुलांसाठी करायचं आहे . तर अंदाजे किती किलो बटाटा गाजर वाटाणा फरसबी लागेल. चांगल्या जाड पॅटी बनवायचे आहेत. 50 व्हेज बर्गर व्हायला हवीत. फ्रेंच फ्राईज रेडीमेड आणणारे.
आणि मोठ्या माणसांसाठी व्हेज बिर्याणी करायची आहे. मोठी माणसे दहा आहेत. किती किलो तांदूळ द्यावा लागेल.
आमुपरी, थॅन्क्यू. अर्धा किलो
आमुपरी, थॅन्क्यू. अर्धा किलो मैद्याच्या जिलब्या बरोबर पुरल्या.
अरे वा मस्त गौरी
अरे वा मस्त गौरी
Pages