Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51
बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरगुती गेट टुगेदरसाठी १ किलो
घरगुती गेट टुगेदरसाठी १ किलो कोळंबी भात करायचं योजलं आहे.साधारणपणे किती प्रमाणात साहित्य लागेल याचा कोणी अंदाज देऊ शकेल का ?
जाई एक किलो तांदळाचा भात
जाई एक किलो तांदळाचा भात करायचा आहे का? त्या प्रमाणात साहित्य हवे आहे का ?
होय सामी , एक किलो तांदूळ
होय सामी , एक किलो तांदूळ
बिर्याणीचं माप (एक किलो, दिड
https://m.youtube.com/watch?v
https://m.youtube.com/watch?v=sR2FrZ1jieY
ही रेसिपी 1/2किलो तांदुळाची आहे. लागणारे जिन्नस पण दिले आहेत. दुप्पट प्रमाण घेऊन करता येईल.
धन्यवाद सियोना
धन्यवाद सियोना
Need help for planning dinner
Need help for planning dinner for 30 people
Menu is
- panner butter masala
- masale bhaat
- aloo gobi
- chane usal
- poli
- koshimbir
Please suggest quantity !!
Thank you
मला अंदाज नाही तज्ञ सांगतीलच
मला अंदाज नाही तज्ञ सांगतीलच
मी अवांतर सांगते मसालेभात आहे तर एखादी उजवी बाजू कमी केली तर चालेल ... त्याऐवजी ताक/कढी प्रकार करता येईल
मंजुताई +1
मंजुताई +1
आलू गोभी आणि चण्याची उसळ दोन्ही जड आहेत एक वगळा आणि त्याऐवजी मठ्ठा/कढी/टोमाटो सार अस करू शकता.
पोळी म्हणजे चपात्या का?
पोळी म्हणजे चपात्या का? कोशिंबीर कसली?
मसाले भाताला सव्वा दोन किलो तांदुळ लागतील.
पोळी छोटी असेल तर प्रत्येकाला 2 धरा. मीडियम असेल तर 1.5 .
आलू गोभिला 2 किलो बटाटे आणी 2 फ्लॉवर चे मोठे गड्डे. 1 किलो कांदा .टोमैटो घालत असाल तर 1किलो.
पनीर 2 किलो, कांदा 1.5 किलो, टोमैटो 2.5 किलो , अमूल बटर 200 grm, अमूल फ्रेश क्रीम 200 ml .
2 भाज्या असताना परत चणे उसळ का हविये.?
कोशिंबीर आमटीच्या 6 वाट्या लागेल .
आलू गोभी आणि चण्याची उसळ
आलू गोभी आणि चण्याची उसळ दोन्ही जड आहेत Lol एक वगळा आणि त्याऐवजी मठ्ठा/कढी/टोमाटो सार अस करू शकता.>>> +11111111
मसाले भाताला मठ्ठा किंवा कढी हवीच.
कोशिबिर पेक्षा बुन्दी रायता
कोशिबिर पेक्षा बुन्दी रायता करा
३ भाज्या /करी आहेत तर जिरा राइस / प्लेन राइस करा
किवा एक भाजी ड्रोप करुन मसाले भात आणी मठ्ठा ठेवता येइल.
गोडात काय आहे?
पोळी म्हणजे चपात्या का? <<
पोळी म्हणजे चपात्या का?
<<
फुलके बाहेरून ऑर्डर करणार आहे
फुलके बाहेरून ऑर्डर करणार आहे..
धन्यवाद अंदाज आणि बदल सुचवल्याबद्दल .
खालील मेनू कसा वाटेल ?
हल्दीराम कचोरी ( साईड ला snack item)
पनीर बटर मसाला
आलू - गोबी सुक्की भाजी
फोडणीचे वरण
भात
पापड (लहान मुलांसाठी )
बुंदी रायता
गोड - मोदक आणि जमल्यास खीर
अमुपरी धन्यवाद
अमुपरी धन्यवाद
छान सुटसुटीत मेन्यू
छान सुटसुटीत मेन्यू
पण पापड फक्त लहान मुलांना कसे सर्व्ह करणार? तापलेल्या तेलात अजून 20-30 पापड तळून घ्या. ताट अजून छान आणि भरलेलं दिसेल. (हे मा वै म)!
आमच्याकडे यंदा पण गणेशोत्सवात शांतता आहे. नाही तर किमान 40 ते कमाल 80 लोकं असतात. दोन वर्षात असे मोठे स्वयंपाक न केल्याने आत्मविश्वास कमी झाला आहे!
नम्रता, सुटसुटीत मेन्यू आवडला
नम्रता, सुटसुटीत मेन्यू आवडला.
मेन्यू चांगला आहे. मोदक
मेन्यू चांगला आहे. मोदक ,कचोरी असल्यामूळे आणी लहान मुले असल्याने आलू गोभी ची भाजी थोडी कमी केली तरी चालेल.
मला वाटते पनीर बटर मसाला कमी
मला वाटते पनीर बटर मसाला कमी करावी.पचायला जड म्हणून मोठे कमी खातात.म्हातारी माणसं पनीर म्हणजे मांसाहार असल्यासारखे धाडकन 'मला कोणत्याही डिश मध्ये शक्यतो पनीर नको,माझा पनीर तुम्ही घ्या' म्हणून फतवा काढतात.
मुलांची पनीर ची आवड अजिबात नाही ते अतिशय या स्पेक्ट्रम मध्ये कुठेही असते.
सुकी आलू गोबी थोडी कमी तिखट केली तर लहान मुलं आवडीने खातील.
अनु, अगदी! पनीर च्या बाबतीत
अनु, अगदी! पनीर च्या बाबतीत माझाही हाच अनुभव आहे. महाराष्ट्रीयन माणसांना फारसे पनीर आवडत नाही!
आणि मोदक आहेत...तर शक्यतो...पारंपारीक मसालेभात, सुकी बटाटा भाजी (किंवा फ्लॉवर बटाटा सुकी ही ठीके), मठ्ठा किंवा टोमॅटो सार, मिक्स भजी /आळु वडी/ कोथिंबीर वडी काकडी कोशिंबीर, लोणचे असेच ठीक राहील. पहा.......
दोन भाज्या आहेत तर पनीर ची
दोन भाज्या आहेत तर पनीर ची भाजी ही कमी केली तर चालेल.
म्हातारी माणसं पनीर म्हणजे
म्हातारी माणसं पनीर म्हणजे मांसाहार असल्यासारखे धाडकन 'मला कोणत्याही डिश मध्ये शक्यतो पनीर नको,माझा पनीर तुम्ही घ्या' म्हणून फतवा काढतात. हो! आणि सोया चंक्स आणि मशरूमसुद्धा!
आणि सोया चंक्स आणि
आणि सोया चंक्स आणि मशरूमसुद्धा!>>माझ्या आजीला तर पनीर आणि मश्रुम दोन्ही खूप आवडतात
आमच्या घरात पण म्हातारी लोकां
आमच्या घरात पण म्हातारी लोकां पासुन ते लहान मुलां ना पनीर आवडते. पनीर ची भाजी अजिबात शिल्लक रहात नाही.
पण काही काही लोकाना पनीर आवडत ही नाही. मी एकदा बहिणी च्या भावजय च्या मुली च्या वाढदिवसाला जेवायला गेलेले. आणी तिथे पनीर ची भाजी होती. मला तिच खुप आवडली.
आणी नंतर त्यानी सांगितले की ती भाजी कुणाला आवडली नाही. शिल्लक राहिली.मला तर आश्चर्य वाटले.
ओल्ड लोक जास्त होते बहुतेक त्या कार्यक्रमाला.
माझ्या आई बाबांना पण पनीर
माझ्या आई बाबांना पण पनीर आवडते. खास करून पालक पनीर.
म्हातारी माणसं पनीर म्हणजे
म्हातारी माणसं पनीर म्हणजे मांसाहार असल्यासारखे धाडकन 'मला कोणत्याही डिश मध्ये शक्यतो पनीर नको,माझा पनीर तुम्ही घ्या' म्हणून फतवा काढतात.>>> very true
हो मशरूम पण.
हो मशरूम पण.
त्यामुळे कोणत्या फाईन डाईन ला सिनियर सिटीझन घेऊन गेल्यावर अर्ध्या डिश पनीर मुळे, अर्ध्या मशरूम मुळे, उरलेल्या 10% 'चावायला खूपच जास्त बै' म्हणून कटाप होतात.
(शुगर नसलेल्या) सिनियर सिटीझन्स ना खुश करण्याचा हमखास मार्ग: डेझर्ट मध्ये गाजर हलवा किंवा आईस्क्रीम मागवणे.
एकदा बहिणी च्या भावजय>>
एकदा बहिणी च्या भावजय>>>म्हणजे तुमची पण भावजय च ना???अंदाज काय घेऊ मध्ये जरा मला हे कोडे पण सोडवून द्या :
बहिणीची जाऊ म्हणायचंय तिला
बहिणीची जाऊ म्हणायचंय तिला
म्हणजे तुमची पण भावजय च ना??
म्हणजे तुमची पण भावजय च ना???अंदाज काय घेऊ मध्ये जरा मला हे कोडे पण सोडवून द्या >>
अरे मी चुकून लिहले. बहिणी च्या सासर मधले रिलेटिव.
नात्याचे नाव सुचेना म पटकन भावजय लिहले चुकून
त्यात इतके च सांगायचे होते की मला आवडलेली पनीर ची भाजी उरली
Pages