Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51
बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चक्का करण्यासाठी दही बांधलं
चक्का करण्यासाठी दही बांधलं की जे पाणी गोळा होत त्याचं काय करतात? >>>
निवळी फार आंबट झाली नसेल तर एक ग्लास निवळीला १-२ चमचे दही फेटून घालायचं आणि त्यात आलं, मिरची, जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि चिमूटभर हिंग वाटून घालायचं. आवडत असल्यास वर बारीक चिरलेली कोथिंबीर. आप्रतिम मठ्ठा बनतो.
तो पाव भाजी धागा मस्त आहे
तो पाव भाजी धागा मस्त आहे
कात्रीने पाव कापण्यावर काथ्याकूट तिथेच झाला होता ना?
मला वाटतं दूध लगेच खराब झालेलं असलं(म्हणजे तापवलं आणि नासलं, किंवा उन्हाळ्यात फ्रीज मधून काढल्यावर लूक बघून नासतंय वाटलं) तर पटकन लिंबू पिळून खळखळा उकळून फॉर्मली नासवून पराठे/कलाकंद जे काय आहे ते करावे.डोळ्यासमोर उकळल्याने आत जंतू चा धोका नाही.
दूध नासून खुप तास झाले असं फिलिंग असल्यास थोबाडाला/पायाला/झाडाला चोळून संपवलेले उत्तम.(आम्ही एकदा कुरकुरनाऱ्या बिजागऱ्याना एक्सपायरी झालेले थोडे उरलेले चंदन की केशर फेसक्रीम लावले होते.नंतर कधी कुरकुरल्या नाहीत त्या.)
आम्ही एकदा कुरकुरनाऱ्या
आम्ही एकदा कुरकुरनाऱ्या बिजागऱ्याना एक्सपायरी झालेले थोडे उरलेले चंदन की केशर फेसक्रीम लावले होते.नंतर कधी कुरकुरल्या नाहीत त्या.) >>>>>
याला म्हणतात resourcefulness .
मस्तच आयडिया
माधव, ही युक्ती छान सांगितलीत
माधव, ही युक्ती छान सांगितलीत.
प्रज्ञा, मी विनेगर वापरून दूधाचे पनीर बनवते. ते पाणीपण असेच वापरता येईल का?
४० माणसांसाठी पावभाजी बनवायची
४० माणसांसाठी पावभाजी बनवायची आहे. भाज्यांचे प्रमाण कसे घ्यावे? >>
४ लोकांसाठी प्रमाण -
४ बटाटे
३ मध्यम टोमॅटो ( मोठे असले तर २ च )
१ मोठी ढबु मिरची
१ वाटी मटार
१ वाटी फ्लॉवर ( मी बरेचदा घालत नाही. काहीही फरक पडत नाही )
कांदा फक्त वरुन घ्यायला.
जितकी माणसे असतील त्याप्रमाणात गुणाकार करायचा.
हे पण बघुन घ्या - https://www.maayboli.com/node/33502
हेब्बर ची रेसिपी एकदम बेस्ट आहे - https://hebbarskitchen.com/easy-mumbai-style-pav-bhaji-recipe/
दूध नासलं तर मी त्यात विरजण
दूध नासलं तर मी त्यात विरजण लावून दही झाल्यावर चक्का लावते..... मस्त होतं श्रीखंड....
कात्रीने पाव कापण्यावर>>>>>>>
कात्रीने पाव कापण्यावर>>>>>>> आठवलं आठवलं भारी चर्चा झाली होती त्यावर
Submitted by मेधावि on 7
Submitted by मेधावि on 7 September, 2021 - 23:59 >> +१
>> मी विनेगर वापरून दूधाचे पनीर बनवते. ते पाणीपण असेच वापरता येईल का?>>
मी वापरते ते पाणी. कणिक भिजवणे, भात्/पुलाव यात, तसेच पंजाबी ग्रेवीत साध्या पाण्याऐवजी वापरते.
मी पण चक्क्याचे पाणी उपमा, कढी, ढोकळा यात घालते.
ते नासलेले दूध आवरा आता लोकहो
ते नासलेले दूध आवरा आता लोकहो. नुस्तं नासकं दूध नै तर त्यातलं पाणी पण वापरायलेत लोक आता. लय झाली सेव्हिंग. उगा माड्या बांधाल तर मोदी सरकार इन्कम ट्याक्स नोटीस पाठवेल.
(श्रीखंडाचं भांडं विसळून बनतं त्या पाण्या/पेयाला काय म्हणतात बरे? :विसराळू बाहुला:)
नासलेले दूध फेकून दिलेले च चांगले.
यात माज बिज काहीही नाही.
उकळून सगळे जंतू मारून टाकलेत तरी त्यातले विष, टॉक्झिन्स तशीच रहातात. म्हणून आपण सडलेले मांस शिजवून खात नाही. (यासाठीच जुनी लोकं 'डब्यात' नॉन-व्हेज देत नाहीत, स्पॉइल होईल म्हणून. दिलंच तर त्यात कोळसा ठेवतात, 'दृष्ट काढण्यासाठी' जे सेन्सिबल आहे, कारण चार्कोल अॅडसॉर्ब्स मेनी पॉयझन्स.)
नासलेले दूध = सडलेला प्राणीजन्य पदार्थ. तेव्हा अगदीच गरीबीची परिस्थिती नसेल, तर फेकून दिलेले बरे. अन्यथा एन्जॉय. मीपण दोन-पांच रेसिप्या सांगतो नासकवणीच्या.
नको तिथे पैसे/अन्न वाचवायच्या डींग्या मारणे अन नको तिथे वस्तू फेकायचे सल्ले देणे असे सोशल मेडिया अॅप्रोप्रिएट रिस्पॉन्सेस आपण सगळेच देतो.
२५ रुपयांचे अर्धा लिटर नासलेले दूध एकाद्या भिकारणीला किंवा घरातल्या "डोमेस्टिक हेल्पर"ला विचारा नेणार का म्हणून?
उत्तरांची ऑडिओ डकवा इथे.
ता.क.
पोट बिघडल्यावर डॉक्टर/औषधांवर केलेला टोटल खर्चही सांगा. दुधाची किंमत मी लिहिली आहेच वर्ती
बाय द वे,
बाय द वे,
दूध पनीर बनवण्यासाठी 'फाडणे' अन ते आपोआप 'नासणे' यात फरक आहे.
अॅडसॉर्ब्स
अॅडसॉर्ब्स
<
अॅडसॉर्ब व अॅब्स्रोर्ब्स यात फरक आहे.
नासलेले दूध फेकून दिलेले च
नासलेले दूध फेकून दिलेले च चांगले.
यात माज बिज काहीही नाही.
>>>
धन्यवाद. घरात एका मोठ्या आजारपणासाठी ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांनी स्पेसिफिकली 'नासक्या दुधाचे पदार्थ खाऊ नका. घरीच बनवलेले पनीर खा कारण त्याची प्रक्रिया वेगळी आहे' हे सांगितल्यामुळे आम्ही अति माजाने खराब झालेलं दूध फेकून देतो.
ज्याला खायचं त्याने खाच. त्या बाबत माझं काहीही मत नाही.
मी अतिशय मजे मजेत ती कमेंट लिहिली होती तरीही त्याबद्दल कोणाला वाईट वाटलं असेल तर क्षमस्व.
अमा, सासर आपलं वाटतं का नाही वगैरे कमेंट तुमच्याकडून मला अपेक्षित नाही खरंच. इथे कोणालाच या प्रश्नाचं उत्तर देण्यास मी बांधील नाही पण तुमची गोष्ट वेगळी आहे. मला तुमचा प्रश्न आवडला नाही. तुम्हाला माझी कमेंट आवडली नसेल तर त्याबद्दल मी माफी मागितलेली आहेच.
---–-----------
शक्यतो पदार्थ वाया न जाऊ देण्याचा प्रयत्न करणे ह्यात वाईट काय आहे ?
आणि मस्तवालपणे वस्तू धडाधड फेकून देणे ह्यातही कौतुकास्पद काय आहे?
>>>
शक्यतो पदार्थ वाया न जाऊ देण्याचा प्रयत्न करण्यात काहीही वाईट नाही. वाया गेलेला पदार्थ खाणं हर जीवावर बेतू शकतं.
मस्तवालपणे चांगल्या गोष्टी धडाधड फेकून देणे अतिशय वाईट. अन्नाचा असा अपमान कधीही योग्य नाही. आमच्याकडे ताजे अन्न जास्त असेल तर आम्ही आमच्या घरी काम करणाऱ्या ताईच्या घरी तिच्या सोबत लगेच बांधून पाठवून देतो. कधी कधी शिळं अन्न उरतं ते दुसऱ्या दिवशी मी खाते. आईला शिळं अन्न खायला संपूर्ण पणे मनाई आहे.
आता विषय सुरू आहेच तर अवांतर
आता विषय सुरू आहेच तर अवांतर आहे तरीही लिहिते.
माझ्या आईची आई अशी नासकवणी बनवायची आणि ती माझी आणि माझ्या बहिणीची फेवरेट होती.
एक दिवशी बहीण साधारण 12 वर्षाची वगैरे असताना नासकवणी खाऊन तिला भयंकर त्रास झालेला. चेहरा, घसा सगळं इतकं सुजलं की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलेलं.
तिने नासकवणी त्या आधीही खाल्लेली अनेकदा पण त्यादिवशी फक्त तिलाच काय झालं ते कळालं नाही. डॉक्टरांनी सांगितलं त्यात निर्माण झालेल्या bad bacterias ने तिला allergy झाली. या आधी कधी असं झालं नाही म्हणून कधीच होणार नाही असं नाही असं ही ते म्हणाले होते.
कलाकंद माझा जीव की प्राण आहे, बाहेर दुकानात तो पण असाच नासक्या दुधाचा बनवत असतील का?
आ रा रा... परफेक्ट...नेहमी
आ रा रा... परफेक्ट...नेहमी प्रमाणेच कडक पोस्ट..
ता . क ला +१२३४५६७८९
मी नासक्या दुधाचं पाणी वापरते
मी नासक्या दुधाचं पाणी वापरते म्हणजे फक्त मुद्दाम 'फाडलेल्या' दुधाचंच वापरते. उन्हाळ्यात आपोआप नासलेल्या किंवा चुकून पिशवी फ्रिजात मागे सरकवली गेली नि तशीच राहिली आणि मग लक्षात आलं तेव्हा दूध तापवलं ते नासलं वगैरेचं पाणी वापरत नाही.
पनीर घरी करत नाही, रसमलाई साठी दूधात लिंबू किंवा व्हिनेगर घालते.
मस्तवालपणे चांगल्या गोष्टी
मस्तवालपणे चांगल्या गोष्टी धडाधड फेकून देणे अतिशय वाईट. अन्नाचा असा अपमान कधीही योग्य नाही.
<<
"बेस्ट बिफोर" डेट छापलेली म्हणून फेकून दिलेल्या आम्रविकन खाण्याच्या गोष्टि. (यूट्यूबवर डम्पस्टर डायव्हिंग वाले व्हिडिओ पहा एकदा)
अच्छा हुआ, बाबा ने खोद कर लाया नही तो पडे पडे एक्स्पायर हो जाता वाला 'मेड बाय हिमालयाज मिलियन्स ऑफ इयर्स अॅगो' वाला बेस्ट बिफोर डेट छापलेला पतंजली सैन्धा नमक.
विरुद्ध, 'नासलेला' पदार्थ.
नासणे हा शब्दच काहीतरी साम्गतो ना? 'आंबवलेलं' नहिये ते. 'नास्लंय.'
आरारा, उपयुक्त पोस्ट. लक्षात
आरारा, उपयुक्त पोस्ट. लक्षात ठेवेन .
श्रीखंडाचं भांडं विसळून बनतं
श्रीखंडाचं भांडं विसळून बनतं त्या पाण्या/पेयाला काय म्हणतात बरे?>>>पियुष का?
मस्त पोस्ट आ रा रा, (
रच्याकने तुमच्या पोस्ट वाचून तुम्ही अतिशय स्पष्टवक्ते पण थोडे खत्रुड असाल असं वाटतं नेहमी )
अन्नाचा अपमान? आता अन्नाला
अन्नाचा अपमान? आता अन्नाला मानवी भावना प्रदान करत आहात, तर अपमानामुळे भावना भडकून अन्न मंडळी पेटून उठेल ना, आंदोलनं करतील. गुलाबजाम जाईल सांबारात आणि इडली पाकात. पोळ्या भाकऱ्या उभ्या घरंगळत घरभर ओरडत फिरतील कूकचा राजीनामा मागत, नाहीतर अपमान करणाऱ्यावर कडीसे कडी कारवाई करा म्हणत. अजून काय काय मागण्या करतील.
टिपिकल माबो धागा झालाय.
टिपिकल माबो धागा झालाय.
रियाने मजेत कमेंट केली, ती हसुन सोडुन द्यायच्या ऐवजी ती रोज उठुन दोन-चार गॅलन दुध फेकते आहे समजुन लोकांनी लंबक पार एका टोकाला नेला.
मग आरारांनी नासलेल्या गोष्टी, कॉमन सेंस सोडून लोकं ब्लाईंडली दररोज स्टेपल फुड म्हणुन आहारात समाविष्ट करताहेत, आणि इंटरनेटवर एकही बारिकसा ही चुकीचा सल्ला देऊन/ वाचुन चालणार नाही म्हणत गोळीबार शैलीत लंबक पार विरुद्ध टोकाला नेला.
असो, परवा गणपती येत आहेत, तोवर (नासलेल्या) दुधाच्या कपातलं हे बारकं वादळ!
#चांगलेपदार्थहीपोटभरलंकीफेकुनद्यावेपोटउरलेलेपदार्थटाकायचीकुंडीनाही. #कळतंयपणवळतनाही #ममसंस्कार
रियाने मजेत कमेंट केली, >>
रियाने मजेत कमेंट केली, >> संबंध नसताना एकारांत आ ड नाव असलेले कसे काटकसरीत अगदी नासलेले दूध पण खातात, परत फुकट वाट्तेय तर ते दिवे घेउन धन्यवाद द्या कारण फुकट काही ही हे लोक घेतात ही एका व्यक्तिसमु हा बद्दल केलेली विनाकारण टीका अस्थानी आहे. घर चालवताना काट कसर करावी लागते आहे त्या रिसोर्सेस मध्ये सर्वांना समाधानी ठेवायचा विचार केला जातो. एखादी व्यक्ते जेव्हा तुम्ही टाकलेले थोडे खराब झालेले पदार्थ/ कपडे घेते किंवा आहे त्यात जगायचा प्रयत्न करते ह्यात हिणवण्या सारखे काय आहे त्यांची अगतिकता समजली नाही तर थोडी जाणीव डेव्हलप व्हायला हवी. निदान आता पोस्ट पँडॅमिक अनेक सुखवस्तू लोकांचे जॉब गेलेत व ते मुलांना प्राय्व्हेट शाळेतून काढून सरकारी शाळेत घालत आहेत. पैशाची चण चण हातावर पोट असलेल्या वर्गाला भेडसावते आहे. फर्स्ट वर्ल्ड मध्ये हा क्लास डिफरन्स तितकासा नजरेत येत नसेल पण म्हण जे तो नाही असे होत नाही.
माझे एक नातेवाईक युनो तर्फे घाना मध्ये काही महिने होते तर घरातला स्वयंपाकी कम मदतनीस कुठून तरी बेस्ट बिफोर डेट झालेले चिकन आणायचा व अर्धा तास उकळून घ्यायचा. उकळले की सारे काही खाण्याजोगे होते म्हणायचा. हे एक उदाहरण.
खरे एकारान्त व नॉन एकारांत सुद्धा रोज गरजे पुरतेच दूध आणतात व लगेच उकळून त्यावर झाकण ठेवतात. शक्यतो स्टील च्या भांड्यात.
त्यातल्य उरलेल्याचे दही लाव्तात. निगुतीने संसार करायचे ज्ञान पास ऑन होते ते असे. बाप्पा मोरया.
हं
हं
एक्सपायरी मेडिसिन स्टॉक असला की फार त्रास होतो
10 तारखेला पेशन्ट आला की 20 च गोळ्या द्यायच्या , 12 तारखेला आला की 18, 25 तारखेला आला की 5 च
पुन्हा 1 तारखेला या
कामवाल्या, भिकारणी नासलेल्ं
कामवाल्या, भिकारणी नासलेल्ं दूध नेणार नाहीत कारण त्याचं काय करायचं हे त्यांना माहित नाही. कारण त्यांच्या घरात दूध उरून ते नासलं अशी परस्थिती कधी आलेली नसते.
त्यांच्या घरात दुधाचा उकडा लावलेला नसतो. सकाळी चहापुरातं अर्धा ग्लास सुट्ं दूध घेऊन ते लगेच वापरून टाकतात. अनेकदा कोरा चहा पितात. दूध, दही, ताक हे पदार्थ त्यांच्या घरात होत नसतात. त्यामुळे नासक्या अथवा ताज्या दुधाबाबत डोमेस्टीक हेल्परचा सल्ला शिरोधार्य मानणे म्हणजे कासवाकडून मेरोथोन रेसचे धडे घेण्यासारखे आहे. अज्ञानामुळे हेच लोक पालेभाजीची निव्वळ पानं घेतात आणि कोवळे देठही टाकतात. शिवाय असे देठ वापरणे हा अतिशय कंजूसपणा आहे असंही वाटतं त्यांना. दुधी भोपळा, लाल भोपळा यांच्या साली वापरण्ं कमीपणाच्ं वाटतं. डोमेस्टीक हेल्पचे विचार ज्यांच्यासाठी वंदनीय असतील त्यांनी पालेभाजी चिरून मग धुवावी.
दूध पूर्णपणे खराब झालं असेल तर कोणीही वापरणार नाही. पण जर उकळायला ठेवल्यावर ते आवाज करायला लागलं आणि फाटतंय अशी शंका आली तर लगेच लिंबू पिळून ते वापरू शकतो.
शिवाय कधीतरी अत्यंत थोड्या प्रमाणात फारश्या न फाटलेल्या दुधाचा कलाक्ंद खाल्ला तर लगेच कोणीही आजारी पडलेलं मी ऐकलं नाहीये. अनेक वर्षानवर्ष्ं लोकं हे खात आलेले आहेत and they have survived it.
नासलेल्ं दूध खावे न खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न पण आम्ही ते फेकतो आणि बाकी भिकारडे (हा पण नेमका एकारान्त शब्द आहे बरं का त्यामुळे काही जणांना तो एकारान्ती आडनावांना समानार्थी वाटेल) ते वापरतात हा माजच आहे.
करेक्ट मामी.
करेक्ट मामी.
रियाची पोस्ट मजेमजेची अजिबातच वाटली नाही. "अस्सं माहेर रईस बाई आणि अस्सं सासर चेंगट बाई" टाईप होती. त्यातही एकारांतींनी फुकट घ्या वगैरे म्हणणे हा निव्वळ फालतूपणाच होता. त्याची काहीच गरज नव्हती. माझी एक मैत्रीण जिथे तिथे एकारांतींना नावं ठेवते आणि अपमानास्पद बोलते आणि स्वतः कसे पैसे उडवते वगैरे बढाया मारते पण सतत ह्याच एकारांतींसमोर हात पसरत असते. तिचीच आठवण झाली.
अरारांनी घेतलेली कडक शाळा पण एक वेळ चालेल कारण त्यात शास्त्रीय कारणमिमांसा आहे आणि एक प्रकारची कळकळही जाणवते.
आमच्याकडेही अनेक वर्षांपासून दूध डोळ्यासमोर नासलं आणि कवकवीत झालं नसेल तर पुनर्वापर होतो. आजवर कोणाला काही झालं नाही त्यामुळे परंपरा चालूच राहीली.
अरारांनी मांडलेला मुद्दा आधी लक्षात नव्हता आला. पण पटला. त्यामुळे ह्यापुढे विचार करीन.
८ लोकांसाठी साबुदाणा खिचडी
८ लोकांसाठी साबुदाणा खिचडी करायची असेल तर किती वाट्या साबुदाणा भिजवावा?
सोबत अजून काही पदार्थ आहेत का
सोबत अजून काही पदार्थ आहेत का?
धागा मूळपदावर आणण्यासाठी तू
धागा मूळपदावर आणण्यासाठी तू म्हणशील ते पदार्थ सोबत करते, केया
नाही ग - खोबर्याची वडी आहे आणि दही आहे. एखादा पदार्थ अजून करू शकेन. उपवासाचाच हवा असे नाही.
८ लोकांसाठी साबुदाणा खिचडी
८ लोकांसाठी साबुदाणा खिचडी करायची असेल तर किती वाट्या साबुदाणा भिजवावा?
३.५ (साडेतीन) वाट्या सपाट भरुन आणी त्यात टाकयला मध्यम आकाराचे ३ बटाटे.
bond is right : स्मित:
bond is right
धागा मूळपदावर आणण्यासाठी तू म्हणशील ते पदार्थ सोबत करते, केया Wink Happy>>>>: स्मित:
मागच्या तीन चार पानां वरील
मागच्या तीन चार पानां वरील चर्चेपासून प्रेरणा घेऊन अंदाज विचारला असला तरी मेन्युच बदलायला सांगतो. साबुदाण्याऐवजी किनवाची खिचडी करा. आपल्या पोथ्यापुराणांत उपासाला किनवा चालत नाही , असं लिहिलेलं नसल्याने उपासालाही चालेल.
साबुदाणा चालत नाही हेही पोथ्या पुराणांत लिहिलेला नसल्यामुळेच तो चालतो.
Pages