Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51
बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिला प्रश्ण माझा : एका
पहिला प्रश्ण माझा :
एका गेट्टुगेदर साठी व्हेज फ्रन्की करायच्या विचारत आहे.....
साधारण १० मोठे आणि ५-६ वर्ष वयाची १० लहान मुले आहेत.....
मेनु साधारण असा ठरवला आहे :
शेव बटाटा पुरी ( कडक चपट्या पुर्यांची करतात ती )
व्हेज-पनीर फ्रँकी ( पोळ्या कीती लागतील ? अंदाज सांगा ...कणीक + मैदा मिक्स करुन करणार )
मटारभात
बुन्दी रायता
गोड ( अजुन ठरले नाही..सुचवा प्लीज )
शेवपुरी मुले कितपत खातील शंका आहे...पुर्यांची किती पाकीटे आणु ?
फ्रॅन्की च्या भाजी साठी पनीर+ सिमला मिर्ची + कांदा + गाजर + बटाटा घालेन..
मटार्भात साठी तांदुळ आणि मटार किती घेउ ?.
मुलांना फ्रॅन्की आवडेल का ?
आयत्या वेळेस फ्रॅन्की असेंबल करायला गडबड नाही ना होणार ?
शेवपुरी आधीच रेडी करुन ठेवणार ताटात म्हणजे पुर्या मांडुन त्यावर बटाटा, कांदा, टोमॅटो ई सगळं घालुन ठेवीन....चट्ण्या, दही , शेव आयत्या वेळी घालेन...
येणारे सगळे पाहुणे मदत करतीलच
(No subject)
.
.
इथे प्रमाण विचारण्यापेक्षा ते
इथे प्रमाण विचारण्यापेक्षा ते इतरत्र विचारुन ( किंवा न विचारता देखील ) जेवणारी मंडळी, सर्व पदार्थ व प्रत्येक पदार्थांचे प्रमाण असे लिहिले तर पुढे शोधणार्यांना सोपे पडेल.
ट्राइड अॅण्ड टेस्टेड मेनू कॉम्बिनेशन्स सुद्धा एका ठिकाणी, शोधायला सोपे असे डॉक्युमेंट होत रहातील.
रुचिरा , अन्नपूर्णा, रस चंद्रिका, कूक अॅण्ड सी अशा पुस्तकांमधे ५० -१०० माणसांच्या स्वैपाकाचा अंदाज दिलेला आहे.
तेही इथे कोणी लिहिलं तर रेफरंस राहील
इथे काही इस्रायली
इथे काही इस्रायली सहकार्यांसोबत पिकनीक आहे .. साधारण २०-२२ जण आहोत... खायला काही तरी घेउन जायचे आहे आणि त्यांना भारतीय पदार्थच खायचे आहेत. काय आणि किती घेउन जाउ?
ओय, इथे फक्त अंदाज विचारायचेत
ओय, इथे फक्त अंदाज विचारायचेत ना बेत ठरवून झाल्यावर?
बर मग ठरवुन झालं की
बर मग ठरवुन झालं की विचारेन...
शेवपुरी मुले कितपत खातील शंका
शेवपुरी मुले कितपत खातील शंका आहे...पुर्यांची किती पाकीटे आणु ?>>> शेवपुरी मुलं जनरली खात नाहीत. त्या चपट्या पुर्या त्यांना कडक लागतात. त्यापेक्षा पाणीपुरीच्या पुर्यांमध्ये शेवपुरीचा माल भरून दिला तर त्यांना जास्त आवडतो असं माझं निरीक्षण.
मटार्भात साठी तांदुळ आणि मटार किती घेउ ?.>>> एक मेजरींग कप बासमती तांदुळाचा साधारण दोन कप भाज्या घातलेला पुलाव/ मसालेभात ५ जणांना व्यवस्थित पुरतो (भाताबरोबर अजून एखाद दोन पदार्थ असतात हे गृहित धरून. फक्त भातच असेल तर तीन मोठ्या माणसांना दोन वेळा व्यवस्थित घेण्याएवढा होतो.)
मुलांना फ्रॅन्की आवडेल का ?>>> हो! त्यात चीज असेल तर खूप म्हणजे खूपच आवडते. रोल असल्याने त्यांना नीट खाता येते.
आयत्या वेळेस फ्रॅन्की असेंबल करायला गडबड नाही ना होणार ?>> हो! गडबड होईल. शेवपुर्या पण असेंबल करायच्या आहेत ना...
शेवपुरी आधीच रेडी करुन ठेवणार ताटात म्हणजे पुर्या मांडुन त्यावर बटाटा, कांदा, टोमॅटो ई सगळं घालुन ठेवीन....चट्ण्या, दही , शेव आयत्या वेळी घालेन..>>> पुर्या चामट होतात.
शेवपुरी विथ पाणीपुरी
शेवपुरी विथ पाणीपुरी पुर्या.
रेडी ठेवता येणार नाही. पुर्यांना भोके पाडून ताटात रचून बाकी मटेरियल नीट तयार ठेवून असेंब्ली लाईन प्रमाणे रन टाईम भराव्या लागतील. एक माणूस यासाठी डेडिकेटेड. मुलांना एंटरटेन करत हे काम झटपट करता येत नाही.
फक्त शेव आधी भरुन ठेवता येईल, बाकी स्प्राऊट बटाटे टॉमेटो वगैरे सर्व रन टाईम.
धन्यवाद मंजुडी आणि
धन्यवाद मंजुडी आणि अनु....
फ्रॅन्की मुलांना आवडेल म्हणूनच ठेवायचा विचार करतेय..
शेवपुरीला पर्याय शोधते...
शे ब पुरी ऐवजी ढोकळा चालेल,
शे ब पुरी ऐवजी ढोकळा चालेल, किंवा बाईट साईझ इडली / वन बाईट कटलेट्स....
असेच ठरलेल्या बेताचे नियोजन
असेच ठरलेल्या बेताचे नियोजन कसे करावे याबद्दलही मंजुडी सारख्या टिपा मिळाल्या तर खुप छान होईल.
ढोकळा सॅंडविच पण चालेल शे ब
ढोकळा सॅंडविच पण चालेल शे ब पुरी ऐवजी
वरती मेधानी सुचवलेले मलाही
वरती मेधानी सुचवलेले मलाही योग्य वाटते.
पुण्यात निगडी आणि पि.सौ मधे
पुण्यात निगडी आणि पि.सौ मधे प्रदीप स्वीटस वाला त्यांच्या सँडविच ढोकळ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
अकु बेतबहाद्दर आहे व मंजु
अकु बेतबहाद्दर आहे व मंजु अंदाजपंचे किती ते सांगते. दोन्ही धागे एकत्र विणायला हवेत खरे तर.
फ्रॅन्की च्या भाजी साठी पनीर+
फ्रॅन्की च्या भाजी साठी पनीर+ सिमला मिर्ची + कांदा + गाजर + बटाटा घालेन..>>मी मक्याचे भरड केलेले थोडे बॉइल केलेले दाणे+चीज+मोठा पातीचा कांदा+सिमला मिर्ची अगदी बारिक चिरून पण थोडीशीच परतलेली असे कॉम्बो सुचवते
व्हेज बिरयानी, कांदा+काकडी
व्हेज बिरयानी, कांदा+काकडी रायता, गाजर हलवा, उडदाचे पापड तळुन. असा मेनु आहे.
उद्या १२ जण जेवायला आहेत, कोणते पदार्थ किती घेऊ अंदाज सांगा. त्याप्रमाणे भाज्या आणि ग्रोसेरी आणायची आहे.
कृपया लवकर मदत करा, ६ वाजता ग्रोसेरी शॉपिंग ला जायचय.
बेत विचारावे तर तुम्ही बजट
बेत विचारावे तर तुम्ही बजट विचाराल ना?
माणशी मूठ ते दिड मूठ तांदूळ
माणशी मूठ ते दिड मूठ तांदूळ (फक्त बिरयानी आहे म्हणून)
तीन ते चार किलो गाजरं लागावीत बहुधा (गाजरं शिजून कमी होईल; आणि समजा उरला जरी तरी फ्रिजमध्ये राहील)
रायता अर्धा किलो कांदा + अर्धा किलो काकडी + अर्धा ते पाऊण लिटर दही असा पुरावा (एखादवेळेला कमीही पडेल, पण चिराचिरी करून लगेचच बनवताही येईल)
दोन पापडाची पाकिटं. थोडे आधी तळून/भाजून एअरटाईट डब्यात ठेवणे. नंतर लागतील तसे तळता/भाजता येतील.
कुणाला उपयोग झाला तर म्हणून
कुणाला उपयोग झाला तर म्हणून पोस्ट करतेय..
लेकीच्या वाढदिवसाला १२ लहान आणि १५ मोठे (घरचे + बाहेरचे मिळून) असे लोक होते (अंदाजे. कारण आता नक्की आठवत नाही..) आम्ही काही कारणमुळे सकाळीच घरच्याघरी छोटी पार्टी ठेवली होती. अख्खा दिवस हाताशी नाही आणि सांगितलेली वेळ सकाळी ११ची हे गृहीत धरून मेनू हवा होता. जेवण नाही पण पोटभरीचा.
पुरी-बटाटाभाजी-श्रीखंड-ढोकळा-केक.
पुर्या- घरी केल्या - अंदाजे २ किलो कणीक. माझ्या कणकेच्या डब्यातला मोठा डाव या मापात १० डाव. आजकाल हे डाव पीठकाढी डाव म्हणून मिळतात त्यामुळे 'माझ्या घरचा' असला तरी अनोळखी नसावा
बटाटे - २ किलो.
कांदे- अर्धा ते पाऊण किलो.
आलं-लसूण-मिरची पेस्ट- १ ते दीड टेबलस्पून. मुलं खातील म्हणून फार तिखट नाही.
चक्का रेडिमेड - १.५ किलो.
ढोकळा - २ किलो. पण थोडा जास्त उरला. दीड किलो कमी होईल असं वाटलं होतं, कदाचित पुरला असता.
केक - २ किलो. हा केक माँजिनिसचा, डच लेअर चोकलेट. आम्ही कधी खाऊन नव्हता बघितला, पण सेल्सपर्सनने आग्रहपूर्वक "माझ्या गॅरंटीवर न्या, नक्की आवडेल" असं सांगित्लं. आणि खरंच अमेझिंग होता केक!!
१० लहान +५ मोठे लोकांसाठी
१० लहान +५ मोठे लोकांसाठी पावभाजी साठी पदार्थांचे अंदाज सांगा कृपया.
२५ पुरणपोळ्यांसाठी चा अंदाज
२५ पुरणपोळ्यांसाठी चा अंदाज द्या प्लीज.
ह. डाळ (भिजवुन - शिजण्यास तयार) -
गुळ -
साखर -
मैदा -
कणीक -
25 जणांसाठी छोले पुरी/पोळ्या,
25 जणांसाठी छोले पुरी/पोळ्या, श्रीखंड, व्हेज बिर्याणी, असा बेत ठरला आहे. तर छोले किती घ्यावेत? बिर्याणी किती किलोची सांगावी? बिर्याणी बाहेरुन मागवणार आहे . चक्का किती लागेल. 4-5 च लहान मुले आहेत बाकी मोठे.
Please help!! सांगेल का
Please help!! सांगेल का कोणी??? अकु , मंजुडी???
२५ माणसांसाठी साधारण ६ कप
२५ माणसांसाठी साधारण ६ कप छोले (न भिजवलेले) पुरतील.
दही विकत आणणार असाल तर ५ किलो दह्याचा चक्का लागेल. दुसरा प्रकार असला तर १ किलो बिर्याणी १२
जणांना पुरते.
धन्यवाद अंजु. कार्यक्रम कालच
धन्यवाद अंजु. कार्यक्रम कालच झाला. दिड किलो चक्का आणला. व्यवस्थित पुरले. तीन पावशेर छोले भिजत घातले होते. पुरुन उरले. एक किलो तांदुळाची बिर्याणी केली.
एक किलो तांदुळाची बिर्याणी
एक किलो तांदुळाची बिर्याणी केली.>>>> २५ जणांना कशी काय पुरली पण ??? लहान मुल वगळली तरी २० जणांना मधे फक्त १ किलो ???
एक किलो तांदूळ घेऊन त्याची
एक किलो तांदूळ घेऊन त्याची बिर्याणी केली. ते तांदूळ शिजून त्यात भाज्या-मसाले पडून ती नक्कीच साडेतीन-चार किलो बिर्याणी झाली असणार ना...
मंजूडी +१ मी काल एक किलो
मंजूडी +१
मी काल एक किलो तांदुळ घेउन चिकन बिर्याणी केली. १२ जण जेवलो. थोडी दोन माणसांसाठीची उरली.
फक्त बिरयाणी होती.
अंकु, सोबत पुर्या+छोले आहेत तर बरोबर आहे प्रमाण.
Pages