अंदाज किती घ्यावा?

Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51

बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाभा करताना आदल्या दिवशी सुक्या लाल मिरच्या,धणे, जिरे भिजत घाला.दुसर्‍या दिवशी आले लसणीबरोबर वाटून कांद्यावर परता.पा.भा मस्त होते.

पाभा करताना आदल्या दिवशी सुक्या लाल मिरच्या,धणे, जिरे भिजत घाला.दुसर्‍या दिवशी आले लसणीबरोबर वाटून कांद्यावर परता.पा.भा मस्त होते.>>> मग पाभा मसाला, लाल तिखट घालायचे नाही का? की कमी घालायचे?

>>>बरेचदा वाचलं म्हणून विचारतेय. सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात ढकलायच्या ही काय कन्सेप्ट आहे?
एवढा गाळ शिजवुन, मॅश करुन, झालंच तर मिक्सरला फिरवुन (हो काही जणी मिक्सरला फिरवतात ते मिश्रण) अशी काय जीवनसत्व मिळत असतील पावभाजीतुन? का भाज्या ओव्हरकूक करुन, वाटुन, चेचुनही जीवनसत्व मिळतात? सिरीयसली विचारतेय.
आणि सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात ढकलायच्याच म्हणुन पावभाजीत वांगं घालणं ही अतिरेकी कारवाई आहे.<<

अगदी अगदी.
लोकं किलोभर साखर घालून गाजराचा हलवा “हेल्दी“ म्हणून खातात. मैदा खात नाही म्हणून , गव्हाचे पीठ वापरून गोड पुरी करतात मुलांना डब्यात आणि मॅगीत भाज्या घालून... अगदीच फन्नी यु नो...

हो झंपी. लॉजिक तेच. मुलांना भाज्या खातोय हा फील न येता किंवा माहित न पडता भाज्या मुलांच्या पोटात जाण्यासाठी. Happy

फ्लेवर फार वेगळा नसेल तर भाज्या नक्की ढकलाव्या.नाहीतर फ्रीज मध्ये उरलेल्या आणि पुढच्या वेळी भाजी करायला पुरणार नाही इतक्या असलेल्या भाज्यांना आपलं कोण म्हणणार?फ्लेवर बिघडणार नाही अश्या प्रकारे अर्धा इंच दुधी, अर्धे गाजर,अगदी छोटा बिट तुकडा बिनधास्त ढकलावेत. फक्त हा गुन्हा घडताना कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसेल याची नक्की काळजी घ्यावी.नाहीतर पुढच्या वेळी हे सर्व न घातलेली पावभाजी पण 'आज नाही आवडली' असेल. ☺️
हॉटेल वाले पावभाजीत व्हेजिटेबल स्टोक घालतात.
पिंपळे सौदागर चे प्रसिद्ध पावभाजी गाडीवाले मस्तच पावभाजी बनवतात.पण एकदा पावभाजीत उकडलेल्या शेवगा शेंगेचा दोरा(शीर) होती.जाऊदे, जोवर चव आवडते,पचते,भेसळ खाण्याच्या पदार्थाची केली जाते तोवर सब माफ.
आमच्या ऑफिस कँटीन वालयाच्या पावभाजीत मोहरी असते.

आमच्या फ्रीजमधे अर्धा इंच दुधी, अर्धे गाजर असं काही उरत नाही. आम्ही उरवत नाही. Light 1
ऑफिस कँटीन वालयाच्या पावभाजीत मोहरी असते.>>> कँटीनवाला सौद इंडियन आहे का?

नाही गं, ज्या दिवशी कँटीन मध्ये लंच ला पावभाजी बनते त्या दिवशी नाश्त्याला बटाट्याची पुरीभाजी वाली मोहरी घातलेली सुकी भाजी असते ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
मोठा संसार..थोडाफार कोंड्याचा मांडा व्हायचंच.

ते सौदिंडीयन हाटलात तर उरलेल्या अवियलची पण पाव भाजी बनवतील..
लोकं वरती फ्लॉवर,वांग घालून पाभाच्या गप्पा करताहेत.. हे राम! मग उरलेला भात काय वाईट Wink

लोकं वरती फ्लॉवर घालून पाभाच्या गप्पा करताहेत.. हे राम!>>> ऑ?? हे राम वाला धागा दुसरा झंपी. Happy
पाभात फ्लॉवर घालतातच ना? म्हणजे मुळ रेस्पीत असतो ना? मी तर घालतेच.

म्हंजे, रामायण झालं अन परत रामाची सीता कोण विचारतेस?? ☺️☺️
पावभाजीत फ्लॉवर एकदम राजमान्य आहे.व्हॉल्यूम वाढतो.उग्रता कमी होते.

चोरून, लपवून, गाळ करून, पराठ्भायात/पावभाजीत/कटलेटात घालून भाज्या मुलांच्या घशाखाली ढकलणार्यांच्या विरोधात मी पण. सर्व भाज्यांची गोडी लावता येते. मी माझ्या पाल्याला अगदी लहानपणापासूनच म्हणजे दात व अक्कल दोन्ही नव्हते तेव्हापासूनच जसे आपण खातो तसंच भाजीच्या ओरीजिनल रंगरुपासकट प्रत्येक भाजीच्या एक दोन फोडी जेवता जेवता भाताबरोबर कुस्करून खायला घातल्या. आज ती माझी सक्सेस स्टोरी आहे.

मला प्रमाणाचा अंदाज येतो जेव्हा करायची वेळ येते तेव्हा . फक्त शेगडीची आच किती ठेवावी हे कळत नाही. बरेचदा काळा/ गोडा मसाला कमी किंवा जास्त परतला जातो. ही आच कशी कमी अधिक केव्हा करावी व हिरवा किंवा काळा मसाला कच्चा राहीला आहे किंवा करपला आहे हे कसे ओळखावे.? शेगडीसमोर तोंड नेऊ शकत नाही.

मी माझ्या पाल्याला अगदी लहानपणापासूनच म्हणजे दात व अक्कल दोन्ही नव्हते तेव्हापासूनच जसे आपण खातो तसंच भाजीच्या ओरीजिनल रंगरुपासकट प्रत्येक भाजीच्या एक दोन फोडी जेवता जेवता भाताबरोबर कुस्करून खायला घातल्या. आज ती माझी सक्सेस स्टोरी आहे.>>>

हो, हे असे करता येते. अगदी कारल्याच्या भाजीची सुद्धा सवय लावता येते.

आणि तेव्हा लावली नसल्यास आजकालची पाल्ये खायचे नाकारून त्याचे भांडे पालकांच्या डोक्यावर फोडू शकतात. माझें पाल्य आंबा, केळे वगैरे फुटकळ तीन चार फळेच खाते, बाकी काही दिल्यास तू लहानपणी खाऊ घातले नाही, त्यामुळे मी आता खाणार नाही असे बाणेदार उत्तर देते.

पा भा वाचून करायची इच्छा झाली. मला पा भा त फ्लोवर आवडत नाही पण त्यात घालतात म्हणून इतकुलासा घालते.

Submitted by मेधावि on 31 January, 2019 - 15:33
<<
अनेक प्लस.

फक्त, एक छोटी गम्मत असते.

लहान मुलांच्या जिभेलाचवीची संवेदना भयंकर तीव्र असते. ज्या गोष्टी आपल्याला मवाळ वाटतात त्या त्यांना थू:थू वाटत असतात. अगदी गोडाचीही चव जास्त तीव्र लागते. पण तिची चटक फार लवकर लागते. भाजीची चव माइल्ड करून दिली तर मुलं सगळ्या भाज्या खातात. उदा, कोबी/फ्लॉवर द्यायचा तर उन्हाळ्यात नका देऊ. ऊग्र असतो. हिवाळ्यात मिळणारा फ्रेश अन खूपच माईल्ड असतो. इ. पण कारली, शेपू वगैरे उग्र, एक्स्ट्रीम चवी ४०शी नंतरच जमतात, समजतात.

माझ्या माहितीतले परंपरागत रित्या नॉनव्हेज खाणारे लोक मुलांना भरवताना चक्क लोणच्याची फोड धुतात तसे धुवून मॅश करून देतात, किंवा फोडणी घालण्या आधीचे पिसेस.

विषय काय, चाल्लंय काय! Proud

<<माझ्या माहितीतले परंपरागत रित्या नॉनव्हेज खाणारे लोक मुलांना भरवताना चक्क लोणच्याची फोड धुतात तसे धुवून मॅश करून देतात, किंवा फोडणी घालण्या आधीचे पिसेस.>> अनुमोदन. सगळ्यात उत्तम चिकन स्ट्यू वगैरे पासून सुरुवात करणे किंवा मग अगदी सौम्यात सौम्य चवीचा रस्सा करून खाऊ घालणे.
कारली, शेपू वगैरे उग्र, एक्स्ट्रीम चवी ४०शी नंतरच जमतात, समजतात.>> याच्याशी मात्र असहमत.

लहानपणी कितीही भाज्या खायला घातल्या आणि सवय केली तरी त्या पोराची एक आवडनिवड असतेच असते असा अनुभव आहे. मलाही काही भाज्या अगदी लहानपणापासून नाही त्या नाहीच आवडत. तेव्हा उगा टोकाचा अट्टाहास करू नये - म्हणजे पाभा मध्ये वांगं वगैरे Wink

आणि कुसकरूनच घालायच्या तर पराठे तरी करा. पाभामध्ये कशाला ती उगाच पोषणमूल्ये शोधायची?

लहान मुलांच्या जिभेलाचवीची संवेदना भयंकर तीव्र असते. ज्या गोष्टी आपल्याला मवाळ वाटतात त्या त्यांना थू:थू वाटत असतात. >>>> प्रत्येक पालक 100% सहमत असेल या स्टेटमेंटशी. न आवडणाऱ्या पदार्थाचा किंचित सुद्धा फ्लेवर असेल तरी तो पटकन ओळखतात.

>>पाभामध्ये कशाला ती उगाच पोषणमूल्ये शोधायची>> हो ना, उगाच काय ती वांगी बिंगी घालून वाट लावता पावभाजीची Uhoh

आणि मुलांबद्दल अगदी दूरदर्शन वरील कार्यक्रमात सुद्धा न चुकता सांगतात.. मुलांकरिता चांगले आहे.. अरे पण मोठ्यांना काही खाण्याच्या खोड्या नसतात का.. कि मुलं आपली लहान म्हणून त्यांच्यावरच अन्नसंश्कार आवश्यक असतात?

पण कारली, शेपू वगैरे उग्र, एक्स्ट्रीम चवी ४०शी नंतरच जमतात, समजतात. >> मला वाटतं की २०-२५ वर्षानंतर जास्त हट्टी असतात लोक.
चाळीशीनंतर आवडणारी उग्र चव असेलच तर ती स्कॉच फक्त .

पण कारली, शेपू वगैरे उग्र, एक्स्ट्रीम चवी ४०शी नंतरच जमतात
चाळीशीनंतर आवडणारी उग्र चव असेलच तर ती स्कॉच फक्त .>>>>>>>

पाभामध्ये कशाला ती उगाच पोषणमूल्ये शोधायची? >>>>>>>>>>>>>>
मुलांकरिता चांगले आहे.. अरे पण मोठ्यांना काही खाण्याच्या खोड्या नसतात का..>>>>>>>>>>>>

पाभा बरीच मॅश झाली इथे.>>>>>>>>>>>>

एकसे एक कमेंट्स Lol Rofl

Pages