Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51
बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अच्छा,,, मला वाटल बाहेरुन
अच्छा,,, मला वाटल बाहेरुन मागवणार आहेत तर तयार १ किलो ची पुरली २५ जणांना.म्हणुन प्र्श्न पडला.
घरी च तयार केली हे नंतर झेपल.
हो 1किलो तांदूळ आणि almost
हो 1किलो तांदूळ आणि almost 1कि भाज्या . आणिछोले पोळ्या, सलाड, बुंदी रायता, श्रीखंड. सर्व घरीच केले होते.
१५० बटाटा वड्यांना काय प्रमाण
१५० बटाटा वड्यांना काय प्रमाण घ्यावे? हॉटेलात मिळणार्या बटाटा वड्यांमधे कांदा नसतो, तर कांदा टाकावा कि नको?
चार लोकांसाठी जिरा राइ स व
चार लोकांसाठी जिरा राइ स व दाल बनवायच आहे. किती वाटी बासमती घेउ. तूर डाळ किती लागेल.
चार लोकांसाठी जिरा राइ स व
चार लोकांसाठी जिरा राइ स व दाल बनवायच आहे. किती वाटी बासमती घेउ. तूर डाळ किती लागेल.
अमा, बासमती फार फुलत नाही तर,
अमा, बासमती फार फुलत नाही तर, दोन वाट्यांचा राईस पुरेल जर बाकी पदार्थ असतील तर. एक ते दीड आमटीच्या वाटीचं वरण पुरेल दाल तड्क्याकरता.
पूर्ण जेवण असेल तर (पोळी भाजी
पूर्ण जेवण असेल तर (पोळी भाजी कोशिंबीर भात वरण/आमटी) एक वाटी बासमतीचा भात ४ ते ५ जणांना व्यवस्थित पुरतो.
पेरू, एक किलो बटाट्यांचे २५
पेरू, एक किलो बटाट्यांचे २५ वडे (वडापाव साईजचे) होतात.
एक वाटी रवा एक वाटी मैद्याचे
एक वाटी रवा एक वाटी मैद्याचे तीस चिरोटे होतात ....
पूर्ण जेवण नाही. हे दोनच
पूर्ण जेवण नाही. हे दोनच पदार्थ आहेत. ते ही बडी मुश्किलसे. मुली म्हटल्या तर पनीरची भाजी व रोटी/ नान ऑर्डर करीन. ( एवढा स्वयंपाक होत नाही एकटीने आता. ) स्लीप ओव्हर आहे व त्या कधीही घेतील असे फक्त बनवून फ्रिज मध्ये दाल व राइस कुकर मध्ये राइस बनवून ठेवनार व झोपून जाणारे.
धन्यवाद योकू व मंजुडी. दाल मध्ये मेथी घातली तर ब्रेकफास्ट पालक पराठी. नाहितर व्हाइसे वर्सा.
२०-२२ लोकांसाठी व्हेज
२०-२२ लोकांसाठी व्हेज बिर्याणी ऑर्डर करायची आहे.केटरर किलो वर बिर्याणी देतो.
१ किलो बिर्याणी म्हणजे - १ किलो तांदुळ व १ किलो भाज्या असे वापरतो म्हणाला.
केटरर २.५ किलो बिर्याणी लागेल असं सांगतोय. ( २.५ किलो तांदुळ व २.५ किलो भाज्या )
सोबत २ स्टार्टरस ( हराभरा कबाब , कॉर्न पॅटीस ) असणार आहेत.
गोडात फ्रुट कस्टर्ड आहे.
तर २.५ किलो बिर्याणी खुप जास्त होईल का ?
मला विकतच्या बीर्याणीचा काहीच अंदाज येत नाहिये.
प्लीज कोणाला अनुभव असेल तर सांगा.
२०-२२ लोक
२०-२२ लोक
प्रत्येक माणूस अर्धी वाटी (म्हणजे १०० ग्रॅम) खाईल असे धरले तर २ किलो पुरावी.
मराठी माणसं भात हा मुख्य प्रायमरी इन्ग्रेडियंट म्हणून मोठ्या प्रमाणावर एका बैठकीत खाऊ शकत नाहीत
(सर्व माणसं हैदराबादी वा चेन्नई ची असल्यास गोष्ट वेगळी)
(हे आपले उगीच आमच्या बिर्ञाणी ओर्डरिंग अनुभवावरुन..बाकी एक्स्पर्ट्स सांगतीलच)
बिर्याणी अशी किलो वर ऑर्डर
बिर्याणी अशी किलो वर ऑर्डर करण्याचा अनुभव नाही पण जनरली केटरर ला सांगताना माणसांचा पाउण पट अंदाज सांगितला तरी पुरतो. म्हणजे २०-२२ लोक असतील सुमारे १६-१७ लोक सांगितले तरी पुरते (वर उरते)असा अनुभव आहे.
बिर्यानी कुठून मागवणार यावरही
बिर्यानी कुठून मागवणार यावरही ठरेल.
पुण्यातल्या एसपी ची एक बिर्याणी (व्हेज/नॉनव्हेज) दीड माणूस पोटभर खातो. हा एक अंदाज उदाहरण म्हणून.
दोन पिटूकले स्टार्टर्स आहेत (पिटूकले म्हणजे यांनी पोट असं भरणार नाही) + फ्रूट कस्टर्ड; तर मै नी सांगितलेला अंदाज पुरेसा होईल.
सोबत घरी केलेलं कुठलही दह्याचं रायतं असेल तर बेश्ट.
केटररचा अडीच किलो हा अंदाज २०
केटररचा अडीच किलो हा अंदाज २०-२२ मोठ्या, तब्येतीनं खाणार्या माणसांसाठी योग्य आहे. ज्येष्ठ नागरिक, मुलं वगैरे असतील तर दोन किलोही पुरेल. आम्ही पीके बिर्याणीतून मागवलेली एक किलो बिर्याणी (जेवणात फक्त बिर्याणी, पोळ्या नाहीत) साधारण दहा लोकांना पुरते.
मला १५ लोकांसाठी पावभाजी
मला १५ लोकांसाठी पावभाजी करायची आहे. कोणी बटाट्याचा आणि इतर लागणार्या भाज्यांचा अंदाज सांगू शकेल का?
मला किलो मधे असं नाही कळणार! माणशी किती बटाटे, सिमला मिरची घ्यावी असं कोणी सांगू शकेल का?
मंजूडीची प्रार्थना कर. तिला
मंजूडीची प्रार्थना कर. तिला हे अंदाज जनरली सांगता येतात.
मंजू देवी प्रसन्न व्हा...
तसं आभा ने पण उत्तर दिलेय. पण माझी गल्ली चुकली प्रश्न विचारताना.
मला १५ लोकांसाठी पावभाजी
मला १५ लोकांसाठी पावभाजी करायची आहे. कोणी बटाट्याचा आणि इतर लागणार्या भाज्यांचा अंदाज सांगू शकेल का?>> मध्यम आकाराचे 12-15 बटाटे. पाऊण की फ्लाॅवर, 5-6 टो. , 7-8 कां, दोन वाट्या मटार, 4 सि. मि. कमी पडू नये एवढेच बघायचं. उरली तरी संपतेच.
धन्स आभा आणि मेधा
धन्स आभा आणि मेधा
१५ लोकांच्या पोटभरीच्या
१५ लोकांच्या पोटभरीच्या भाजीला एक ते दीड किलो बटाटे; किलोभर टोमॅटो ची ताजी प्युरे (ही चांगली शिजवली तर फारच कमी होते आता वाचायला खूप वाटलं तरी) आणि त्यानुषं(?)नं पुढलं साहीत्य - फ्लॉवर पाऊण किलो, अर्धा किलो कोबी, अर्धा किलो मटार, आणि अर्धा ते पाऊण किलो सिमला. टोटल यील्ड - ३ ते साडेतीन किलो व्हावं असं मला वाटतं. तेव्हढी भाजी १५ लोकांना पुरेल. पावभाजी मध्ये भाजी जास्तच लागते ही बेसलाईन.
अंदाजात नाही पण पावभाजीत
अंदाजात नाही पण पावभाजीत फ्लॉवर, कोबी वगैरे भाज्या घालू नयेत हे माझे प्रामाणिक मत आहे.
कोबी मी नाही घालत पण फ्लॉवर
कोबी मी नाही घालत पण फ्लॉवर घालतात ना?
धन्यवाद योकु.. तुम्ही तर एक्स्पर्ट आहात एकदम
फ्लॉवर का नाही रे घालायचा? तो
फ्लॉवर का नाही रे घालायचा? तो बर्यापैकी ब्लँड (स्वतःची काही पिक्युलिअर टेस्ट नसलेला) असतो की.
आणि पोराटोरांच्या पोटात
आणि पोराटोरांच्या पोटात तेवढाच फ्लॉवर ढकलल्याचे समाधान
कोबी ? कचकचीत नाही का लागणार?
कोबी ? कचकचीत नाही का लागणार? आणि पाणी पण सुटेल ना?
फ्लॉवर अजिबात ब्लँड नसतो. एक
फ्लॉवर अजिबात ब्लँड नसतो. एक उग्र वास असतो त्याला. त्यामुळे पावभाजीची मूळ चव बिघडते.
ह्म्म.
ह्म्म.
मी घालते नेहेमी. मी केलेली पावभाजी अगदी एक्सेप्शनल वगैरे नाही म्हणता येणार पण वाईट ही नसावी
मी काही लोकांनां गाजरं, बीट (रस) हे घालताना बघितलं आहे. इकडे योकु ने कोबी घालायचा असं लिहीलं आहे. इतक्यात कुठेतरी "ग्रीन पावभाजी" असंही एक व्हेरिएशन बघितल्याचं आठवत आहे.
थोडक्यात, पावभाजी मसाला आणि इतर साहित्य (आलं लसूण पेस्ट - घालत असलात तर, बटर, लिंबू, कोथींबीर, झालंच तर कसूरी मेथी, किंचीत हिंग) ह्यांच्या मॅरेज मध्ये ज्या काही भाज्या लपतील आणि चांगल्या लागतील त्या कुठल्याच घालायला हरकत नसावी असं माझं मत झालं आहे.
जनरल संकेत भरपूर बटाटा, टोमॅटो, मटार, फ्लॉवर, कांदा असं मला तरी वाटतं ( मुंबईतल्या गाडीवाल्यांकडे बघितलं आहे) पण पावभाजी हा काही पारंपारीक पदार्थ नाही. त्याची हिस्टरी बघता जे काही संपवायचं आहे ते द्यावं ढकलून आणि मग पूर्णपणे मॅश करून भरपूर पावभाजी मसाला, बटर वगैरे ने झाकून टाकावं (म्हणजे कोणाला कानोकान खबर नको
) जे काही रसायन करू ते चविष्ट झाल्याशी मतलब p
सशल +१
सशल +१
मी पावभाजीत घालते फ्लॉवर. नेहेमी नाही पण एकदा कोबीचा अगदी छोटा ठोकळा फ्रीजमध्ये शिल्लक होता पचडी किंवा भाजी कशालाच पुरला नसता तो ढकलला होता. गाजर पण १-२ वेळा ढकललं आहे.
मसाल्याच्या, तिखटाच्या
मसाल्याच्या, तिखटाच्या स्वादापुढे फ्लॉवर चा उग्रपणा लपून जातो.. हेमावैम.
Pages