अंदाज किती घ्यावा?

Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51

बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक मी मँगो शेवयांची खीर गोड पदार्थ म्हणून ठेवतेय. तर ५ वाट्या शेवयांची पुरेल का? थोडी दाट ठेवणार आहे. वरून ड्राय-फ्रूट्स वगैरे

5 वाट्या शेवया खूप जास्त होतील. माणशी 1 मुठ खूप झाल्या. सो टोटल 17/18 मुठी. दूध 4 लिटर. रच्याकने, हि रेसिपी लिहा प्लीज .

आभा, तुमच्या मुठी खूप लहान असाव्यात? Happy

मला १७/१८ मुठी ह्या ५ वाट्यांपेक्षा खूपच जास्त शेवया वाटत आहेत!

मला १७/१८ मुठी ह्या ५ वाट्यांपेक्षा खूपच जास्त शेवया वाटत आहेत! >≥>>> वाचल्यावर मलाही तेच वाटलं. मुठी लहान असतील किंवा घरातल्या वाट्या जम्बो साईझ Happy

शेवयांची खीर म्हटल्यावर निम्मे लोकं खाणारच नाहीत ही शक्यता ही ध्यानात घ्या!
ही तुमच्या सुगरणपणावर, चांगल्या रेसिपीवर कमेंट नसून शेवयांच्या इन जनरल गचाळ दिसण्यावर आणि चवी वर आहे.

मी पावभाजी मध्ये मटार, फरसबी आणि सी. मिरची पण घालते, कोबी, गाजर, बीट नाही.
Organic भाज्या खूपच चविष्ट लागतात, उग्र नसतात, पटकन शिजतात आणि काहीही मसाले न घालता, कुटाणा न करता मस्त होतात.

शेवयांच्या इन जनरल गचाळ दिसण्यावर आणि चवी वर आहे.>> वॉव मग व्हर्मीसेली म्हणून बघून बघा. कदाचित चांगले दिसे ल Wink

ताई मँगो शेवई खीर मध्ये वरून खूप ड्रायफ्रूट घातले तर फ्लेवर ओव्हर लोड होतो असे माझे वैयक्ति क मत आहे. मँगो खूप स्ट्राँग फ्लेवर इन फ्रू टी डिरेक्षन. व प्रत्येक ड्रायफ्रूटची अशी एक वेगळी फ्लेवर प्रोफाइल असते. नटी. ह्या दोन्ही एकदम वेगवेगळ्या लायनी आहेत. सेंट्रल वेस्टर्न सारखे.

एन हान्स करायचे असेल तर कन्सिडर फ्रूटी स्टफ. बारीक कापलेले दुसरे एखादे फ्रूट. पण मला तरी नुसते मँगो परफेक्ट वाट्टॅ. वरून फारतर फेटलेले क्रीम. . फार फळे घातली तर मग फ्रूट सलाडच होईल. विथ वर्मिसेली.

पावभाजीत टोमॅटो घालताना किती पण घाला, पण टोमॅटोची चव न घेता अजिबात घालू नका. कित्येकदा टोमॅटो दिसायला लाल असला तरी आंबट असतो आणि मग त्याच्यामुळे भाजी अत्यंत आंबट होते.

पावभाजी साठी ढोबळ अंदाज - जितकी माणसे असतील तेव्हढे मध्यम आकाराचे बटाटेम आणि मग ते जितके होतील त्याच्या अनुशंगाने बाकीच्या भाज्या(कांदा, टोमॅटो, मटार, सिमला मिरची, फ्लॉवर) त्याच्या निम्म्या + जास्तीचा पाव किलो कांदा भाजीला वरुन घेण्यासाठी (हा नेहमी विसरला जातो भाजी आणताना). घरी केलेली पावभाजी ही नेहमीच बाकीच्या भाज्यांपेक्षा कमीत कमी डबल खाल्ली जाते.. गरमा गरम पाव भाजी आणि वरुन मस्त बटरचा गोळा..

ही तुमच्या सुगरणपणावर, चांगल्या रेसिपीवर कमेंट नसून शेवयांच्या इन जनरल गचाळ दिसण्यावर आणि चवी वर आहे.>>
huh? सुरेख (चांदीच्या )वाटीत , वरती छान बेदाणे घातलेली हातावर केलेल्या शेवयाची खीर इतकी सुरेख लागते/दिसते. आमच्या घरी सासरी अजुनही पाटावरच्या शेवया मुहुर्तासाठी म्हणुन केल्या जातात लग्न वगैरे असेल तर. (बाकीच्या मशीनवर. घरोघरी मशीन झाली आहेत.) पांढर्‍या शुभ्र शेवया अगदी हलक्या एक्सारख्या भाजलेल्या, घट्ट दुध आणि वरती बेदाणे.
अमित wrong शेवयाची खीर खात असणार आहेस. इकडे ये खायला. Happy

शेवयांची खीर गचाळ दिसते?आणि निम्मे लोकं खाणारच नाहीत? Uhoh हे काय नवीनच?
चांगली केशर, ड्रायफ्रूटस घालून केलेली असेल तर कशाला दिसेल गचाळ?

शेवयांच्या इन जनरल गचाळ दिसण्यावर आणि चवी वर आहे.>> अमितवला हाणा.
सीमाच्या खीरीच्या वाटीतले बेदाणे काढून मी घेते ती वाटी. आत अखीर करावीशी वाटायला लागली आहे.

Lol शुम्पी, भेटलीस तर घरी केलेल्या शेवया घेवून येते तुला. Happy द्राक्ष शेतीमुळ ,बेदाणे घरचे असतात ग. ड्रायफ्रुट वगैरे गावाकडे कोण आणणार ? बेदाणे हिच चैन त्यामुळ. त्यामुळ शेवयाची खीर म्हटलं कि बेदाणे आठवतातच.
आमच्याकडे हळदी झाली कि वधु/वरांना शेवयाची खीर खाऊ घातली जाते. तसच मुलगी मोठी झाली कि पण पहिल्यांदा तीला शेवयाची खीर खायला देतात.
सॉरी हे सगळ हलविता येईल का कुठेतरी. अख्खा बाफ हायजॅक केला खीरीने. Sad

छान बेदाणे घातलेली हातावर केलेल्या शेवयाची खीर इतकी सुरेख लागते/दिसते. >> अगदी अगदी ! हात शेवयाची खिर अजिबात गिजकट होत नाही,

आधी रेसिपी, मग अंदाज Wink>>>>>>> अर्रे एवढे काही रेसिपी वगैरे नाहीये. घरगुती बनवलेल्या त्या शेवयांचा रंग आंबा कलर आहे आणि थोडा वास पण आहे आंब्याचा. मी खूप आधी घेतल्या होत्या माझ्या मैत्रीणिच्या गावी (सातारा बहुतेक) एक काकू करून देतात अर्थात हा त्यांचा व्यवसाय आहे का माहित नाही.
तर करायची नेहेमीच्या शेवयांच्या खिरीसारखी. फक्त रंग मस्त लाईट मँगो येतो खिरीला आणि मी थोडे त्यात हेवी क्रिम घालते दाटपणासाठी शेवई पुडींग म्हणा हवंतर Wink आत्तापर्यंत हीट झालिये त्यात काही मालमसाला (वेलदोडा पावडर, काजू बदाम )लागत नाही अ‍ॅक्चुअली पण सजावट म्हणून थोडंफार एवरेस्ट दुध मसाला किंवा वर अमा म्हटल्या त्याप्रमाणे व्हीप क्रीम!

मला १७/१८ मुठी ह्या ५ वाट्यांपेक्षा खूपच जास्त शेवया वाटत आहेत!>>>> हो मला पण त्या नक्कीच ५ वाट्यापेक्षा जास्त वाटतात.

शेवयांच्या इन जनरल गचाळ दिसण्यावर आणि चवी वर आहे.>>>>> कुफेहेपा दिवे घ्या. Proud

शेवटी दुनियाभर चर्चा करून या बाफवर यायला लावलेत पब्लिकहो Wink

>> शेवयांच्या इन जनरल गचाळ दिसण्यावर आणि चवी वर आहे
हाय कम्बख्त , तुने चखी ही नहिं >>. टोटली. फॅक्ल काढलात तर मी ही आहे.

शेवयांची खीर म्हटल्यावर निम्मे लोकं खाणारच नाहीत ही शक्यता ही ध्यानात घ्या! >>> गुड. मोअर फॉर अस Happy

पुढच्या गटगला अमितला अनेक पदार्थांतून शे.खी. द्यायला हवी. चहाच्या कपात खाली खीर व वरती चहा असे करून फसवायला हवे.

अमित wrong शेवयाची खीर खात असणार आहेस. इकडे ये खायला. >>> सीमा, ते वर्णन वाचूनच क्रेव्हिंग आले. आमंत्रण ओपन असेल तर मीही "टेक अ नंबर" करतो.

Biggrin अरे कोणी बदाम-वेलची-केशर घालून दिली तर खाईन मी वाटीभर. अगदीच दुश्मनी नाही. पण तेवढी चहात मात्र घालू नका रे!
आणि पुणेकरांना ही आय्डीया ही देऊ नका. फडक्यातून गाळलेला मडक्यातला चहा झाला, विळीवर आलं चिरुन चुलीवर आधण आलेल्या पाण्याचा चहा झाला आता शे.खि. चहाच्या दुकानांवर गर्दी करतील. काय नेम नाही!

आणि अशा प्रकारे अमित ला शेवयांच्या खीरीरूपी सूळावर चढवण्यात शे. खी. फॅ क्ल ला यश आलेलं आहे! Biggrin

सशल Happy Happy

मी पावभाजीबद्दलच लिहिणार. सगळ्या , दिसेल त्या , अगदी वांगं सुद्धा घालते. पण एकदा त्यात बटाट्याने उडी मारली, बटर धबाधबा कोसळलं, आलं-लसूण मस्त परतलं गेलेलं असलं की अंतीम सत्य म्हणजे पावभाजी मस्त होते. इथेच एक व्हिडेओ आला होता, जुहुवरच्या गाड्याची पावभाजी. त्यात पण सगळ्या भा़ज्या घालते. ती पण मस्त होते.

आणि पुणेकरांना ही आय्डीया ही देऊ नका. फडक्यातून गाळलेला मडक्यातला चहा झाला, विळीवर आलं चिरुन चुलीवर आधण आलेल्या पाण्याचा चहा झाला आता शे.खि. चहाच्या दुकानांवर गर्दी करतील. काय नेम नाही!>>> बासुंदी चहा मिळतोय की आधी पासूनच.. त्याच्यातच शेवया घातल्या की काम झालंच..

माझी शेजारीण जैन आहे . ती पावभाजीतील बटाटाला कच्चे केळ शिजवून घेणं हा पर्याय वापरते . (त्यांच्यात बटाटे बॅन आहेत ) मी एकदा चाखली आहे तिने केलेली पाभा .
नॉर्मल जशी चव असते तशीच लागत होती.
पाभात जे मसाले वापरतात त्याने कोणतीही भाजीची चव दडपुण टाकत असावेत

मला वाटतं की पावभाजीची चव ही फार 'रिलेटिव्ह' कंसेप्ट आहे... वांगं , भोपळा, गाजर अशा भाज्या ढकलून जो काय लगदा पावभाजी म्हणून दिला जाईल...तो 'कोण' चांगला म्हणतं....हेही महत्त्वाचं आहे ..नाही का? करणारी व्यक्ती तर म्हणेलच......नुसते मसाले आणि आलं लसूण पेस्ट ओतून मूळ चव काही अगदीच दडपली जात नाही!
पण रेस्टॉरंट सारखी छान चव येणं महत्त्वाचं मानायचं की 'सगळ्या' भाज्या मुलांच्या ( नी मोठ्यांच्याही!) पोटात ढकलण्यासाठी वाट्टेल ते पाव भाजीत घालायचं...ही प्रायॉरिटी आपणच ठरवायची!
त्या जुहूच्या व्हिडीओ मधे दाखवलीए तशी पावभाजी मस्त बनते..पण फक्त त्याच ठराविक भाज्या हव्यात......!!

Happy

बरेचदा वाचलं म्हणून विचारतेय. सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात ढकलायच्या ही काय कन्सेप्ट आहे?
एवढा गाळ शिजवुन, मॅश करुन, झालंच तर मिक्सरला फिरवुन (हो काही जणी मिक्सरला फिरवतात ते मिश्रण) अशी काय जीवनसत्व मिळत असतील पावभाजीतुन? का भाज्या ओव्हरकूक करुन, वाटुन, चेचुनही जीवनसत्व मिळतात? सिरीयसली विचारतेय.
आणि सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात ढकलायच्याच म्हणुन पावभाजीत वांगं घालणं ही अतिरेकी कारवाई आहे.

Pages