Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51
बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी चांगले मोठे मोठे मोदक
मी चांगले मोठे मोठे मोदक केलेले आणि पुन्हा चारी ठाव स्वयंपाक पण होता.
अर्थात मोठे
मोदक पण सापेक्ष आहे कारण आमच्या आईकडे चेंडूच्या आकाराला मोठे मोदक म्हणतात तर साबा भारतीय लिंबाच्या आकाराला मोठे मोदक म्हणतात.
रोजच्या लिंबाच्या आकाराएवढे
रोजच्या लिंबाच्या आकाराएवढे लहान उकडीचे मोदक कुठे बघितले नाहीत,त्यामुळे थोडं नवल वाटलं, ते करणं कौशल्य आणि वेळखाऊ असेल, त्यापेक्षा मोठे मोठे पटकन उरकले जातात. द्यायलाही छान वाटतं.
सार्थक अगदी लहान होता तेव्हा त्याच्यासाठी एक पिटुकला मोदक केलेला आठवतो, एक पिटुकली करंजीही केलेली. त्याने स्वतः उचलून तोंडात टाकावं हा उद्देश होता.
रियाने लिहिलेल्याच्या मधले मोदक करते मी, माझी आई रियाच्या आई सारखी.
आमच्या आईकडे चेंडूच्या
आमच्या आईकडे चेंडूच्या आकाराला मोठे मोदक म्हणता...रबरी चेंडू? बापरे इतके मोठे मोदक मी करत नाही.
पण अगदी पिटुकले मोदक माझी शेजारीण संकष्टीच्या वेळी देत असे काय खातो हे कळेपर्यंत मोदक संपलेला असेतीचेही बरोबर आहे.आणखी कोणाला द्यायचे असतीलही.
माझे आळणी चतुर्थीला मोदक
माझे आळणी चतुर्थीला मोदक गोटी च्या आकारा एवढे असतात. न जाणो 21 खावे लागले तर?
रबरी चेंडू? >> हो!
रबरी चेंडू? >> हो!
एका मोदकात पोट भरलं पाहिजे आणि अति आग्रहाखातर फार तर फार एक आणखी .
रिया ते अळणी खायचे असतात, ते
रिया ते अळणी खायचे असतात, ते व्रत करणारे सगळे इवले इवले करतात ते बरोबर, कधी कधी 21 वा मिठाचा लागतो.
आजही करतात ही चतुर्थी?
आजही करतात ही चतुर्थी?
कुठलीतरी जुनी गोष्ट आठवली. लेखकाने बहुतेक आईवर लिहिले होते. ओढग्रस्तीच्या संसारात आईचे उपास तापास सुरु असतात. मिठाच्या चतुर्थीला मुले वाट पाहायची आईला कधी मिठाचा मोदक मिळतो याची. उरलेले मोदक यांना मिळायचे ना.
पहिलाच मिठाचा निघाला की आनंद व्हायचा. लेखकाला नंतर ते आठवुन स्वतःचीच लाज वाटली. मोठेपणी लक्षात आले की आई दिवसभर निर्जळी ठेऊन कामाचे डोंगर उपसायची. रात्रीचे मोदक हेच तिचे त्या दिवशीचे जेवण आणि त्यातही आपण कसे पहिलाच मोदक मिठाचा निघावा म्हणुन प्रार्थना करायचो.
हो मलाही आठवते. 'श्यामची आई
हो मलाही आठवते. 'श्यामची आई'मध्ये होते का?
श्यामची आई'मध्ये होते का? >>
श्यामची आई'मध्ये होते का? >> ना
Every chaturthi for 21
Every chaturthi for 21 chaturthi since vrat started.
I am doing it continuously for 5 times which means 115 chaturthis
साधना नुसते वाचून पण वाईट
साधना नुसते वाचून पण वाईट वाटले.
आजकाल अशी त्याग वृत्ती कुणी ठेवत नाहीत आणि ठेवायला ही नको. आया/बाया कुपोषित होतात त्यामुळे.
छान चर्चा चालू आहे . आज काल
..
आजकाल अशी त्याग वृत्ती कुणी
आजकाल अशी त्याग वृत्ती कुणी ठेवत नाहीत आणि ठेवायला ही नको. >>> १०००+
त्यागमूर्ती बनायची गरज नाही आणि त्याग करायचाच असेल तर सगळ्यांनीच थोडा थोडा करावा.
तो एक काळ होता जेव्हा काहीही
तो एक काळ होता जेव्हा काहीही प्रश्न निर्माण झाले तर घरची बाई उपास तापास ठेवायची. आत्मक्लेश करुन आपल्या हातात नसलेल्या प्रश्नांवर उपाय सापडतील अशी भाबडी समजुत होती. अजुनही आहे.
काही ठिकाणी अमुक एका देवाला लोटांगण घालत जायचे असा नवस किंवा नेम केला जाई. एका कथेत वाचले होते, आईने नेम केलेला असतो तर घरातले आदल्या दिवशी वाटेतले दगड वगैरे काढुन टाकतात. मी गुरुवायुरच्या मंदीरात गेले होते. तिथे खुपजण लोटांगण घालत मण्दीर प्रदक्षणा करत होते. आमच्यासारखे चालत प्रदक्षिणा घालणार्यांना त्यांच्यावर पाय पडु नये म्हणुन काळजी घ्यावी लागत होती.
रिया, खुपच कठिण. तुझी मनोकामना पुरी होवो.
गणराया कठीण पडू देत नाहीये.
गणराया कठीण पडू देत नाहीये. मनोकामना पूर्ण झाली पहिल्या सेटच्या वेळेलाच. आता दिलेले शब्द गणोबाने पाळला तसा मी पाळते आहे
लोकहो,
लोकहो,
मला दिवाळी पार्टी साठी अंदाज हवा आहे. २ करी करणार आहे. बाकि भात , रोटी , सॅलड, पकोडे, स्वीट. तर करी साठी, एका half tray (us size) मधे किती लोक जेवतील ? सगळी देशी कपल्स आहेत. no kids.
Half-Size Steam Table Trays:
Half-Size Steam Table Trays: चे माप पुढील प्रमाणे, ट्रेच्या उंची नुसार कमी जास्त होईल प्रमाण.
एक क्वार्ट म्हणजे ३२ आउंस , डॅनन , स्टोनीफिल्ड किंवा चोबानी वगैरेचे दह्याचे डबे ३२ आउंस असतात. बहुतेक देशी रेस्टॉरंट मधून टेक आउट जेवण मागवल्यास १६ आउंस क्लियर कंटेनर भरून देतात. यावरुन तुम्हाला किती क्वार्ट लागतील ते ठरवा.
Dimensions: 12 x 10 inches
Volume: About 4 to 6 quarts
ईशिता मी चॅट जिपिटी वर विचारल
ईशिता मी चॅट जिपिटी वर विचारल तर हाफ ट्रे १०-१५ लोकाना पुरेल असा अन्दाज देत आहे, तुम्ही जर बाहेरुन मागवणार असाल तर रेस्टॉरन्ट वाले आयडिया देतात किती जणाना पुरेल याची.
ok. Thank you Medha and
ok. Thank you Medha and Prajakta.
६० व्यक्तिंसाठी भोंडल्याची
६० व्यक्तिंसाठी भोंडल्याची खिरापत म्हणुन भेळ करायची आहे.
सिंगल सर्विंग असेल.
मटार करंजी / दाबेली / सामोसा , काहीतरी कोरडा खाउ आणि एखादा गोड पदार्थ असा इतर खाउ पण असेल.
तर भेळीसाठी अंदाज काय घ्यावा ?
चिरमुरे, फरसाण, कांदे, टोमॅटो, गणेश भेळ ची तयार चिंच चटणी ई अंदाज सांगावा अशी विनंती.
धन्यवाद.
( ता.क. - आमची खिरापत फोडु नये )
Pages