Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51
बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वर्णिता: चिंच खजूर च ट्णी
वर्णिता: चिंच खजूर च ट्णी साठी युअर फूड लॅब्ज संज्योत कीर ह्यांचा व्हिडीओ बघा. यु ट्युब वर आहे. त्याने परफेक्ट प्रमाण दिलेले आहे. तुमच्या गरजे नुसार दुप्पट तिप्पट असे करून घ्या. ती चटणी करायला मी सामान आणले आहे पण अजून वेळच झाला नाही.
अमा, संज्योत कीरचा स्टुडिओ
अमा, संज्योत कीरचा स्टुडिओ मुलुंड वेस्टला आहे जॉन्सन अँड जॉन्सन जवळ.
अमा धन्यवाद.. मी इथं दोन चार
अमा धन्यवाद.. मी इथं दोन चार दिवस आधी विचारायला हवं होतं. काल मी मधुरा रेसिपीने प्रमाण घेऊन आंबटगोड पाणी केलं. पण प्रमाण थोडं बदललं. एक दोन वाटी चिंचेचं प्रमाण परफेकट होतं. एक किलो चिंचे ला सव्वा किलो गूळ आणि पाऊण किलो खजूर लागला. चव परफेकट जमली. पण अंदाज चुकला. 70 - 80 प्लेट साठी अर्धा किलो चिंच बस झाली असती. चुरा पुरी फार लागलीच नाही. आंबटगोड दाटसर चटणी उरलीय बरीच. टिकते फ्रीजमध्ये 15 दिवस त्यामुळं वाया जाणार नाही अस वाटतंय.
हो, टिकते भरपूर.आणि आमटी
हो, टिकते भरपूर.आणि आमटी सांबारात पण घालून संपवता येईल.
आमटी, सांबार, अळूवडी साठी हि
आमटी, सांबार, अळूवडी साठी हि वापरता येईल .
वर्णीता धन्य आहेस ग बाई, एवढी
वर्णीता धन्य आहेस ग बाई, एवढी पाणीपुरी केलीस. एवढी चटणी बाब्बो. हे इतकं सगळं स्वत: करायचं माझ्या डोक्यातही नाही येणार.
वर्णिता मी अत्ता वाचलं, मी
वर्णिता मी अत्ता वाचलं, मी वाचल्या वाचल्या चं म्हंटलं कि जास्त होईल १ किलो चिंंच आणि १ किलो गुळाची चटणी. खजूर पण येणार ना त्यात? आता उरलेली चटणी चांगली उकळून मग फ्रिजमध्ये ठेव. आणि टिकेल . तशीही आंबटगोड चटणी संपते पटापट
Varnita you can make dahi
Varnita you can make dahi wada and bhel for that chutney.
वर्णिता, ७०-८० प्लेट पाणी
वर्णिता, ७०-८० प्लेट पाणी पुरी केलीत! ग्रेट आहात!
चटणी लगेच वापरुन संपवायची नसल्यास चांगली उकळून गार करुन फ्रीज करुन ठेवता येइल.
हो अनु, अश्विनी .. आमटी,
हो अनु, अश्विनी .. आमटी, सांबारात वापरेन थोडी थोडी.
धनुडी, स्वाती .. कुकरमधूनच शिजवून केलेली पण नन्तर 8 -9 तास बाहेर होती म्हणून परत उकळून गार करून फ्रीजमध्ये ठेवली.
अमा, सेम केलं , काल संध्याकाळी घरच्यानी मनसोक्त भेळ खाल्ली. आता एकदा रगडा पॅटिस करीन. सध्या मीच नुकती व्हायरल मधून उठल्याने तळण प्रकार नको वाटतोय.
अंजू, स्वाती .. कौतुक कोणाला आवडत नाही
. धन्यवाद
. मी ही एवढी पापु घरी करायचा घाट घातलाच नसता कधी. झालं काय, एकदातरी स्टॉल लावून बघायची इच्छा होती. एका सांस्कृतिक मंडळात स्टॉल लावला होता. आधी मिसळ, अप्पे , इडली चटणी (पण मग सांबार ही लागेल) असा काही मेनू ठेवायचा विचार करत होते. पण पहिलाच अनुभव असणार होता. ते सर्व्ह करणे, पैसे घेणे हे सगळं जमवण्यात गॅस ची भानगड नको ठरवलं आणि पापु करू म्हणलं. मजा आली . जोडीला पाठ ही भरून आली.
१० जणांच्या पाव भाजी ला किती
१० जणांच्या पाव भाजी ला किती माप लागेल सगळ्या
भाज्यांचं अंदाजे?
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/72251 here u go anamika
.
हे प्रमाण मी 90 ते 95 लोकांना पुरेल असं पकडते .
Tried n tested multiple times
धन्यवाद स्वस्ति
धन्यवाद स्वस्ति
सुमारे 40 लोकांसाठीचा
सुमारे 40 लोकांसाठीचा मसालेभात साधारणपणे प्रत्येकी एक मिडीयम साईझ बाउल भरून द्यायचा आहे. तर किती किलो बासमती तांदूळ लागेल?
तोंडली, मटार अस घालणार असाल
तोंडली, मटार अस घालणार असाल तर साधरण नऊ वाट्या तांदूळ लागतील.
धन्यवाद ममो
धन्यवाद ममो.
पण 9 वाट्या म्हणजे किती किलो तांदूळ तेही लिहाल का ?
The change of 1 kg - kilo (
The change of 1 kg - kilo ( kilogram ) unit in a white Basmati rice measure equals = into 5.59 cup us ( US cup )
यूएस कप आठ औंसांचा असतो. वाटी
यूएस कप आठ औंसांचा असतो. वाटी साधारण सहा औंस भरेल.
म्हणजे या हिशोबाने ९ वाट्या म्हणजे साधारण दीड किलो.
धन्यवाद मी_वैदेही आणि स्वाती
धन्यवाद मी_वैदेही आणि स्वाती
हे चॅट जी पी टी चे उत्तर
हे चॅट जी पी टी चे उत्तर मसालेभाताच्या प्रश्नासाठी
To make vegetable fried rice for 40 people, you'll need to consider the typical serving size of fried rice and adjust the quantities accordingly. A standard serving of fried rice is usually around 1 cup per person.
So, for 40 people, you would need approximately 40 cups of cooked rice.
To determine how much uncooked rice you'll need, you'll have to account for the fact that rice typically triples in volume when cooked. So, divide the total cooked rice quantity (40 cups) by 3 to get the amount of uncooked rice needed:
40 cups cooked rice ÷ 3 = 13.3 cups uncooked rice
Rounding up to ensure you have enough, you'll need about 14 cups of uncooked rice to make vegetable fried rice for 40 people. Adjust the amount of vegetables, seasoning, and other ingredients accordingly based on your recipe and preferences.
आधी मला हे सांगा चॅट जी पी टी
आधी मला हे सांगा चॅट जी पी टी ला स्वयंपाक कुणी शिकवला?
काल केला मसाले भात. ममोंचा 9
काल केला मसाले भात. ममोंचा 9 वाट्या अंदाज परफेक्ट होता. घरातल्या आमटीच्या वाटीच्या साईझमध्ये 9 वाटयांमध्ये साधारणपणे 1.25 किलो तांदूळ मावला.
सर्वांना मनापासून धन्यवाद.
ममोंचा 9 वाट्या अंदाज परफेक्ट
ममोंचा 9 वाट्या अंदाज परफेक्ट होता. >> थँक्यू चैत्रगंधा.
नऊ वाट्या म्हंजे सव्वा किलो भरला का ? >> बरं झालं इथे लिहिलंस ते...
१०० आलू परोटे करायला किती
१०० आलू परोटे करायला किती बटाटे लागतील?
१००?
१००?
ब्रंच प्लान आहे. ७५ जण आहेत.
ब्रंच प्लान आहे. ७५ जण आहेत. सोबत दही/रायता/ पुदीना चटनी. चहा बिस्किट.
झाले का करून ऑलरेडी पराठे ?
झाले का करून ऑलरेडी पराठे ?
१०० साठी exact सांगता नाही येणार पण तुम्ही मोठया size कडे झुकणारे २ मध्यम बटाटे घेऊन करून बघा २ मध्यम बटाट्यांचे ३ पराठे होतील असं वाटतंय
धन्यवाद.
धन्यवाद.
एका मध्यम बटाट्यात दोन मध्यम
एका मध्यम बटाट्यात दोन मध्यम आकाराचे पराठे सहज होतात. (सारणाची गोळी डोळ्यांसमोर आणा)
दोन मध्यम बटाट्यांत पाच पराठे होतील. म्हणजे १०० पराठ्यांना ४० बटाटे पुरे झाले, अगदीच शंका असेल तर ४५.
५० अगदी डोक्यावरून पूर!
ब्रंच प्लान आहे. ७५ जण आहेत.
ब्रंच प्लान आहे. ७५ जण आहेत. सोबत दही/रायता/ पुदीना चटनी. >>
७५ जणांना घरी केलेले १०० पराठे कमी पडतील असं वाटतंय. घरचे पराठे लहान असतात आणि बाहेर भरतो तसं भरपुर सारण भरलं जात नाही. घरी करणार असलात तर एवढे पराठे लाटायचा लोड येइल खुपच. लहान मुलं सुद्धा सहज आवडीने १.५-२ पराठे खातातच.
ब्रंच म्हणजे दणकट भुकेची वेळ असेल त्यामुळे आधी तर मेनु चा विचार करा असे सुचवेन.
२ मध्यम आकाराच्या बटाट्यात व्यावस्थित सारण भरलेले ३ पराठे होतील.
Pages