अंदाज किती घ्यावा?

Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51

बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर व्हेज पुलाव जमेल का? पराठे लाटायला मदत मागवली तर बरे पडेल. एकट्याने पाठीचा भुगा होईल.

आलू पराठ्यां सोबत ढोकळा, दही वडा, गुलाब जाम, शेव पुरी, फ्रुट सालड.. असे काही तरी साईड ला ठेवा..म्हणजे पुरवठा पडेल.

७५ जणांना घरी केलेले १०० पराठे कमी पडतील असं वाटतंय. घरचे पराठे लहान असतात आणि बाहेर भरतो तसं भरपुर सारण भरलं जात नाही. घरी करणार असलात तर एवढे पराठे लाटायचा लोड येइल खुपच. लहान मुलं सुद्धा सहज आवडीने १.५-२ पराठे खातातच.
>>> मी ही हेच लिहिणार होते.
पराठे जनरली सगळ्यांना आवडतात. 75 जणांसाठी 100 पराठे कमी पडू शकतात. सोबत पुलाव किंवा एखादा भाताचा प्रकार ठेवलात तर बरे. फक्त पराठेच करायचे असतील तर प्रत्येकी किमान २चा हिशोब धरा. आदल्या दिवशी करून थोडे भाजून स्टोअर केलेत तर दुसऱ्या दिवशी तूप/तेल घालून नीट भाजून सर्व करता येतील.

धन्यवाद स्वाती.
@स्मिता मी आलू पराठे आणि चहा बनावणार आहे. आणि २ जणी २ पदार्थ बनवणार आहेत.
हो मदतीला आहे पराठे शेकायला.
धन्यवाद सर्वांचे

मुंबईतल्या केटरिंग कॉलेजच्या प्राध्यापिका थंगम फिलिप यांच्या पुस्तकातून साभार
१०० लोकांसाठी पराठ्याचे प्रमाण १०० पराठे नव्हेत
२.८ किलो कणीक आणि मैदा प्रत्येकी. ३५० मिली दूध, २२५ मिली दही, १०० ग्रॅम मीठ, ६८० ग्रॅम तूप / तेल

५.६ किलो बटाटे , त्याच्या निम्मे वाटाणे ११५ ग्रॅम हिर्वी मिरची, १० ग्रॅम आले, ५ ग्रॅम लसूण, १०० ग्रॅम मीठ, १५ ग्रॅम गरम मसाला, ४५५ग ग्रॅम कांदे , ११५ ग्रॅम तूप तेल

यात पराठे भाजायचं तेल धरलेलं नाही. कणकेची एक पोळी लाटून त्यावर सारण पसरुन त्यावर दुसरी पोळी पसरुन पराठे लाटायची पद्धत दिलेली आहे.

मुंबईतल्या केटरिंग कॉलेजच्या प्राध्यापिका थंगम फिलिप यांच्या पुस्तकातून साभार
१०० लोकांसाठी पराठ्याचे प्रमाण
२.८ किलो कणीक आणि मैदा प्रत्येकी. ३५० मिली दूध, २२५ मिली दही, १०० ग्रॅम मीठ, ६८० ग्रॅम तूप / तेल

५.६ किलो बटाटे , त्याच्या निम्मे वाटाणे ११५ ग्रॅम हिर्वी मिरची, १० ग्रॅम आले, ५ ग्रॅम लसूण, १०० ग्रॅम मीठ, १५ ग्रॅम गरम मसाला, ४५५ग ग्रॅम कांदे , ११५ ग्रॅम तूप तेल

यात पराठे भाजायचं तेल धरलेलं नाही. कणकेची एक पोळी लाटून त्यावर सारण पसरुन त्यावर दुसरी पोळी पसरुन पराठे लाटायची पद्धत दिलेली आहे.

आले , लसूण इतके कमी कसे? टायपो आहे का? दही, दूध कशासाठी तेही कळले नाही. पिठ भिजवताना घालतात का?

दही दूध दोन्ही पीठ मळताना घालायचे आहे. कणीक आणि मैदा एकत्र चाळून त्यात मोहन घालून मिक्स करुन घ्या . मग दही + दूध + मीठ घालून , लागेल तसे पाणी घालून पुन्हा मळून घ्या आणि अर्धा तास तरी झाकून ठेवा असे लिहिलेय. घट्ट कणीक असावी .
मी कधी अशा प्रकारे केलेलं नाही.

आले लसूण मला पण फारच कमी वाटतंय. पुस्तकातच टायपो असेल तर माहिती नाही. ४ माणसांच्यासाठीचं प्रमाण दोन लसूण पाकळ्या आणि स्मॉल पीस जिंजर असं दिलंय.

ठेपल्यांची कणीक भिजवताना दही घालतात हे ऐकलं होतं, पराठ्यांच्या कव्हरसाठी दहीदूध नवीन आहे.

मी सारणातही कांदा/मटार घालत नाही.

पराठ्यांच्या कव्हरसाठी दहीदूध नवीन आहे....... माझ्या बाईने(ती पंजाब्याकडे काम करत असे) थोडे दही आणि मिरी कणकेत घातली होती.आता चवही आठवत नाही.

कोणी अंदाज विचारला की लोकं मेन्यू बदल का सुचवायला लागतात? Lol
पराठे का करायचे त्याचा विचार केला असणार ना करणाऱ्याने?

मेन्यू बदल का सुचवायला लागतात?>>>>> मेनू बदल कुठे कोणी सुचवलाय? थोडं अ‍ॅडिशन सांगत आहेत पुरवठा पडावा म्हणून. पराठे करायचे हे त्यांचं आधीच ठरलंय की.

हो, मलाही कोणी पराठ्यांऐवजी काही सुचवलेलं दिसलं नाही. अ‍ॅडिशन्सच सुचवल्या आहेत आणि त्याही त्यांनी सगळा मेनू
(सोबत दही/रायता/ पुदीना चटनी. चहा बिस्किट) सांगितल्यावर.

मेनू बदल कुठे कोणी सुचवलाय? >> अंजली, मेनु बदलाची कमेंट कदाचित मला उद्देशुन आहे...मी माझ्या प्रतिसादात लिहिलं होतं की मेनु चा विचार करा.
रिया ताई, जे काही लिहिलं ते चांगल्या हेतु ने लिहिलं होतं. प्रश्णकर्तीने प्रश्ण विचारताना बाकी दोन जणी पण दोन पदार्थ आणणार आहेत असा उल्लेख आधी केला नव्हता म्हणुन त्यांचा अंदाज चुकु नये म्हणुन लिहिलं होतं. सॉरी हा .. अशी घोडचुक परत नाही करणार ..एक डाव माफी द्या.

Also I was worried about back pain for anyone who rolls 100 parathe standing up. unless sit down two people set up it is a strain even on healthy bones.

स्मिता, Sorry वगैरे नाही पण हे या बाफावर कायम होताना दिसतं. चाळून बघा Happy
आत्ता नेमके तुम्ही सापडलात पण केवळ तुम्हाला उद्देशुनच आहे असं नाही. मेनु बदल हवा असता किन्वा आधीक आयटम काय ॲड करु वगैरे प्रश्न असता तर बेत काय करु चा दुसरा बाफ आहे तिकडे प्रश्न आला असता. इकडे केवळ अंदाज हवा होता म्हणुन प्रश्न आला Happy
शिवाय प्रश्नकर्तीला कदाचित त्याचा त्रास झालाही नसेल पण हे फक्त पराठ्यांबाबत नाही आणि फक्त तुम्हालाच उद्देशुन नाही पण आजकाल सगळेच सगळीकडेच प्रश्नाचं उत्तर देउन न थांबता आधिकचे सल्ले देतात हे माझं पेट पिव्ह आहे.
पुन्हा सांगते की कारण तुमची पोस्ट झाली पण माझी पोस्ट फक्त तुम्हलाच एकट्याला उद्देशुन नाही. हे फेसबूकचे ग्रूप, इथले वेगळे वेगळे बाफ, दुसर्या साईट्स सगळीकडेच दिसुन ये तं

२ मिडीयम साइज् बटाट्याचे ३ पराठे होतात... मी पराठ्याकरता कणीक मळताना त्यात थोडी हळद आणि थोडी काळी मिरी पावडर टाकते..आणि बटाट्याच्या सारणात कांदा बारीक चिरलेला आणि थोडी धने जिरे पूड टाकते.

१५ pound बटाटे, ३ कांदे वापरून १२५ पराठे झाले. इतर पदार्थ असल्याने पुरलेत

अय्यो
आपण +10 ची सिरीज तयार केली.हा गोंधळ घालायला मी यशस्वीपणे चालू केल्याबद्दल माझं अभिनंदन.

Happy अनु!
पण खरंच, १७५ पराठे लाटणे व भाजणे खायचे काम नाही!

Pages