Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तरला पाहिला.सुरुवातीला जरा
तरला पाहिला.सुरुवातीला जरा कंटाळवाणा वाटला पण तिने बटाटा मुसल्लम बनवल्यापासून रंगत गेला.हुमा कुरेशी रोल मध्ये नीट विरघळलीय.फार जास्त कथा नाही,पण एकदा बघायला रोचक आहे.
शेवटी खऱ्या तरला दलाल पाहून डोळे पाणावलेच थोडे.
काल रात्री लेकीने व तिच्या
काल रात्री लेकीने व तिच्या मित्र मैत्रीणींनी मिळून पास्ट लाइव्ज नावाची कोरिअन फिल्म पाहिली. फार छान विषय आहे. प्रेम कथा . विविआना ला रात्रीचा १०. ३५ चा शो होता त्यामुळे पाउस अंतर सर्व मिळून मुलां ची धावपळ झाली बट वर्थ इट. खाली विकी लिंक देत आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Past_Lives_(film) जरुर बघा जिथे मिळेल तिथे.
पास्ट लाइव्जचा ट्रेलर आवडला.
पास्ट लाइव्जचा ट्रेलर आवडला. यादीत टाकते.
Thank you Sonali. It was a
Thank you Sonali. It was a sudden plan by children. They all had office work and a Monday. But they made the effort to catch this movie. That I liked.
My Fav. Murder Msytery - A
My Fav. Murder Msytery - A Perect Crime by Karan Joha
आयबी ७१ हा नवीन स्पाय मूव्ही पाहिला. विद्युत जामवाल कसला तरी एजंट आहे यात. ठिसूळ प्लॉट, दम नसलेले कथानक आहे. अगदीच वेळ जात नसेल तर(च) बघावा.
मी पण कालच तरला पाहिला. थोडा
मी पण कालच तरला पाहिला. थोडा संथ वाटला. बर्याचदा पुढे ढकलत पाहिला. पण हुमाचं आणि तिच्या नवर्याचं काम मस्त आहे. विजोड दिसतात पण ती उंच धिप्पाड, तो बुटका. पण दोघांची केमिस्ट्री मस्त. भारती आचरेकर पण आवडली त्या शेजार काकूच्या रोलमधे. भंगारवाला पण लक्षात राहिला. रादर तिला मदत करणारे सगळेच. तरला दलालांचा त्या काळी हा स्ट्रगल सोपा नसेलच. सुरभी मधे ती क्लिप बघून पण छान वाटलं.
शेवटी टिप्पीकल सासू बघून वैताग आलाच. नशीब नवर्याला तरी जाणीव झाली. शेवटच्या सीनमधला डॉक्टर बळंच फुटेज आणि आगाऊ डायलॉग्स खाऊन गेला
Old इंग्रजी, नेटफ्लिक्सवर..
Old इंग्रजी, नेटफ्लिक्सवर..
एक फैमिली सुट्टीसाठी एका बीचवर जातात सोबत आणखी दोन फैमिली असतात.. तीथे थोडा वेळ घालवल्यावर त्यांच्या लक्षात येत कि अतिवेगाने त्यांचं वय वाढतंय..तिथला अर्धा तास म्हणजे एक वर्ष.. बाहेर निघायचा मार्गही सापडत नाहीए..थ्रीलींग सिनेमा.
तिथला अर्धा तास म्हणजे एक
तिथला अर्धा तास म्हणजे एक वर्ष>>>> ओह्ह माय गॉड काय विषय आहे
माझ्या आईने तरला दलालची
माझ्या आईने तरला दलालची क्रॉसवर्ड मधे मुलाखत घेतली होती.
कसलं भारी अनिरुध्द!!
कसलं भारी अनिरुध्द!!
अवांतर: आता असाच समोर आला म्हणून 'अंफ्रेंडेड: डार्क वेब' पाहिला.प्रचंड सुन्न झालेय.
सही!!! निरू सर.
सही!!! निरू सर.
अंफ्रेंडेड: डार्क वेब' पाहिला.>>>> बघावा का आज ??
माझ्या आईने तरला दलाल यांची
माझ्या आईने तरला दलाल यांची क्रॉसवर्ड मधे मुलाखत घेतली होती. <<
साॅरी.. तपशीलात थोडी चूक झाली.
क्रॉसवर्ड मधली मुलाखत रश्मी उदय सिंग यांची होती.
दोन्ही मराठी दिवाळी अंकासाठी होत्या. तरला दलालांची मुलाखत त्या दिवाळी अंकाच्या कार्यालयातच घेतली होती.
जरा जुने सिनेमे पहात आहे
जरा जुने सिनेमे पहात आहे हल्ली. २००८ चा Sunshine Cleaning प्राईमवर पाहिला. नाव मलातरी माहिती नव्हते.
अगदी साधा तरीही फार छान आहे सिनेमा. सिनेमातल्या सगळ्या बाया भारी आहेत त्यामुळे कामं मस्त केलीयेत त्यांनी. आणि इतर सर्वांनी देखील मस्त केलीत कामं.
अनु
अनु
अंफ्रेंडेड: डार्क वेब' पाहिला काल नेटफ्लिक्सवर..ओके टाईप वाटला मला..थ्रीलींग, डिस्टर्बींंग नाही वाटला..
मला खूप डिस्टरबिंग वाटला
मला खूप डिस्टरबिंग वाटला.इंटरनेट चे धोके बिके असलं तरी थोड्या माफक अडचणी येऊन शेवटी थोडक्यात सुटका व्हावी असं वाटतं(म्हणजे आपल्या tcgn सारखं.)
इतकं काही झालेलं बघायची तयारी नव्हती.कथा सत्य घटनांवर आधारित आहे.
याचा पहिला भाग अजून पाहिला नाही.तो बघते.
Fractured इंग्रजी,
Fractured इंग्रजी, नेटफ्लिक्सवर.
एक माणूस,त्याची सहा वर्षाची मुलगी आणि बायकोला घेऊन एका दवाखान्यात येतो, मुलगी पडली आणि हात फ्रैक्चर झाल्याचं निमित्त..दवाखान्यात बायको आणि मुलगी सीटीस्कैन करायला गेल्या त्या परत आल्याच नाहीत.. हॉस्पिटल चा स्टाफ, पोलिस, हा मनुष्य कुणाच्याच सांगण्यात ताळमेळ बसत नाहीए...दोघी गेल्या तरी कुठे...काय प्रकार आहे नक्की, पहा सिनेमात..
सायकोथ्रीलर, सस्पेन्स, सुन्न करणारा सिनेमा.
बर्डबॉक्सचा पुढचा भाग
बर्डबॉक्सचा पुढचा भाग नेटफ्लिक्सवर आलेला दिसला. पहायला घेतलाय.
यूट्यूबवर बासू चटर्जी यांची
यूट्यूबवर बासू चटर्जी यांची हमारी शादी नावाची एक नितांत सुंदर टेलिफिल्म पाहिली. फारच छान आहे. हलकी फुलकी कथा, हलके फुलके विनोद, इत्यादी. छोटीसी बात सिनेमाची आठवण पदोपदी होते. नक्की बघाच असं सर्वांना सुचवेन.
बाईपण भारी देवा पाहिला..
बाईपण भारी देवा पाहिला.. आवडला.. एकदा पाहायला खरंच चांगला आहे.. इतकाही वाईट नाही.!
सगळ्याचा अभिनय आणि कपडे पट छानच आहे.. पहिल्या half मध्ये खुसखुशीत विनोद होते.. मस्त हशा पिकाला होता.. आणि थेटर मध्ये फक्तं बायकांची च गर्दी होती. अपवादाने पुरुष होते म्हणजे पाच सहा वैगरे. .
बऱ्याच काळनंतर असे मराठी मूवी ल बायका ग्रुप ने जात आहेत.. छान वाटल..
Panic room इंग्रजी बघितला
Panic room इंग्रजी बघितला नेटफ्लिक्सवर.
थ्रीलर सिनेमा.. मस्त आहे. आवडला.
बी. एस. यांच्या पोस्टशी
बी. एस. यांच्या पोस्टशी सहमत..
Snatch पुन्हा पाहिला. खरच
Snatch पुन्हा पाहिला. खरच अफलातून. सिनेमा आहे.
Snatch मी ही अधून मधून बघते!
Snatch मी ही अधून मधून बघते!
नवीन mission impossible पाहिला. नेहेमीप्रमाणे मस्तच. नवीन मुलगी आवडली, जराशी व्हिक्टोरिया बेकहम सारखी आहे दिसायला. टॉम चा इथन हंट जरा सुलझा, seasoned असा झालाय. या वेळेस थोडेसे अधिक लक्ष character development साठी दिलेय जे काही लोकांना आवडेल काहींना स्लो वाटेल.
Spoiler alert
काही काही सीन पाहून पठाणची आठवण झाली, कोणी कोणाला कॉपी केलेय ते त्यांनाच ठाऊक
"घरच्या प्रेशरमुळे" मी अगदी
"घरच्या प्रेशरमुळे" मी अगदी निरिच्छेने "बाईपण भारी देवा" बघायला गेलो. आणि आता मी "टोटल कन्व्हर्ट" आहे. धमाल पिक्चर आहे. वरती लोकांनी जे फ्लॉज वगैरे लिहीले आहेत ते धरूनसुद्धा पिक्चर एन्जॉयेबल आहे. याचा थेट टार्गेट ऑडियन्स पुरूष लोक नाही. सगळीकडे चित्र असेच दिसते की बायकांच्या झुंडीच्या झुंडी जाउन पिक्चर पाहात आहेत. पोस्टर समोर फोटो काढत आहेत - पिक्चर बघताना अनेकदा जाणवते की प्रेक्षकांतून उत्स्फुर्त रिस्पॉन्स मिळतो. बहुतांश बायकांचा पण पुरूषांना बघायला बोअर होणार नाही.
मला वाटले होते ही "झिम्मा"ची पुढची आवृत्ती आहे. पण हा चित्रपट जास्त चांगला आहे. लोकांकडून पडणार्या टाळ्या. पब्लिकचा हॉल मधून व थिएटर मधून लौकर पाय न निघणे. पोस्टर समोरची गर्दी - सगळी "हिट" ची लक्षणे आहेत. सैराट ला ते गाणे दोनदा लावत. इथे पोस्टरसमोर इतकी झुंबड होती की नंतर तो पोस्टर त्यांनी थिएटरच्या बाहेर आणून ठेवला आत गर्दी नको म्हणून
हा थिएटर मधेच बघायचा पिक्चर आहे. जरूर पाहा टोटल माहौल आहे.
वा फारेंड.. मस्त लिहिले.. मला
वा फारेंड.. मस्त लिहिले.. मला हेच म्हणायचे होत पण नीट सांगता नाही आल.... तुम्ही व्यवस्थित मांडलं आहे..!
https://www.latestly.com
https://www.latestly.com/socially/social-viral/fact-check/the-unsolved-s...
या घटनेवरचा याच नावाचा (फ्लाईट ९१४) चित्रपट पाहिला. बातमी जेव्हढी सनसनाटी आहे तितका चित्रपट नाही. कदाचित जास्त नाट्य टाळलं असेल. ओके ओके आहे. पण खूप स्कोप होता असे वाटले. भारतातल्या नेटफ्लिक्स वर सापडत नाही. युट्यूबवर आहे. त्यामुळं पेनड्राईव्ह मधून पाहिला हे सांगायला संकोच वाटत नाही.
https://www.mensxp.com/special-features/features/79021-mystery-santiago-...
ही आणखी एक घटना आहे. फ्लाईट क्र. वेगळा आहे. यातले सर्वच प्रवासी मृत झाले होते. या दोन वेगवेगळ्या घटना आहेत कि एकाच घटनेच्या दोन आवृत्त्या आहेत ?
Submitted by फारएण्ड on 17 July, 2023 - 02:56 >>> +१
बघायला पाहीजे होता का ? आग्रह झालेला खूप.
फारेंड शी सहमत! परवा बाईपण
फारेंड शी सहमत! परवा बाईपण बघितला आणि खरंच आवडला.
काही काही जागा लाऊड घेतल्यात, पण सिनेमॅटिक लिबर्टी असते आणि असायलाच हवी नाहितर चित्रपट मचूळ होऊन जातो.
हे असं कुठं असतय? असं कोण बोलतय वगैरे म्हणणार्याचं हसू येतय..कारण असं बोलणार्या, वागणार्या, अबोला धरून राहणार्या बहिणी-बहिणी, बहीण-भाऊ अशा जोड्या प्रत्यक्ष माहितीत आहेत
मला ते रीवरजन (?) जे एका गाण्यात दाखवलाय ते विलक्षण आवडलं...भूतकाळात जाऊन (ब्लॅक न व्हाईट) भविष्यातले कॅरॅक्टर जाते आणि जे त्या वेळी करायला हवे होते पण राहून गेलेय, ते करताना दाखवलंय. भारीच !!
खरंच कित्ती कित्ती वेळा असं मनात येतं की मला हे भूतकाळात जाऊन अनडू/डू करता आलं असतं तर....!
आणि ह्या बायकांचाच नाही तर बायका, मुली, मुलगे, नवरे सगळ्यांचाच चित्रपट आहे- कौटुंबिक!
इथे फुल्ल हाऊस फुल होते, आणि सर्व एजग्रूप बायका मुले, पुरुष अगदी सर्व होते. धमाल आली
रघू आचार्य,
रघू आचार्य,
हरवलेले विमान परत येते यावर नेटफ्लिक्स वर Manifest नावाची चार हंगामांची वेबसिरिज आहे.
Et tu, फारएंड ?
Et tu, फारएंड ?
Submitted by अ'निरु'द्ध on 17
Submitted by अ'निरु'द्ध on 17 July, 2023 - 08:27>> धन्यवाद
Pages